Saturday, May 9, 2020

Breaking..! नांदेड़ मध्ये कोरोनाचा वाढता कहर सुरुच नवीन दोन रुग्णाची वाढ

Breaking..! नांदेड़ मध्ये कोरोनाचा वाढता कहर सुरुच नवीन दोन रुग्णाची वाढ



नांदेड (प्रतिनिधी)
नवीन दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे असून सदरचे दोन रुग्ण हे जम्मू कश्मिर येथील आहेत.दोन महिन्यांपूर्वी ते नांदेड येथे श्री. गुरुव्दारा दर्शनासाठी आले होते
आज प्राप्त झालेला अहवाल पैकी प्रयोग शाळेकडून 54 जणांचे थ्रोट स्ॅवब घेण्यात आले होते. यामध्ये 49 अहवाल निगेटीव्ह आले. 3 अहवाल अनिर्णीत आले तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोन्ही जण कश्मिरी पुरुष असून प्रत्येकी 55 व 57 असे त्यांचे वय वर्षे आहे. या दोन्ही रुग्णांवर  महसूल कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहे.


नांदेड शहरात दोन नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याचे असून सदरचे दोन रुग्ण हे जम्मू कश्मिर येथील आहेत.दोन महिन्यांपूर्वी ते नांदेड येथे श्री. गुरुव्दारा दर्शनासाठी आले होते.

आतपर्यंत नांदेड व पंजाब या दोन राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. परंतु जम्मू कश्मिर येथून दोन यात्रेकरू हे काही महिन्यांपूर्वी नांदेड येथे दर्शनाला आले होते. परंतु ते दोन रुग्ण हे गावी परतू शकले नाहीत. ते कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यातही कोरोनाचे लक्षणे आढळून आली आहेत.
त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या चाळीसवर गेली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला, असून उर्वरीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत

नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसिकर यांनी जनतेला आवाहन केले आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी  प्रशासनाला सहकार्य करावे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...