Thursday, October 24, 2019

कोण कोण विजयी झाले ! पहा राज्यातील विजयी उमेदवारांची यादी

कोण कोण विजयी झाले !  पहा राज्यातील विजयी उमेदवारांची यादी


मुंबई : गेल्या विधानसभा निवडणूकीत चौफेर उधळलेल्या भाजपाचा वारु राज्यातील या विधानसभा निवडणूकीत रोखला असल्याचे स्पष्ट झाले लगाम घातला महायुतीची घोडदौड १५८ जागांच्या आसपासही गेली नाही. मात्र राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत निष्ठावंतांची नाराजी आणि बंडखोरीचा परिणाम शिवसेना आणि भाजपाच्या निकालावर दिसून येत आहे.आतापर्यंत हाती आलेल्या विजयी उमेदवारांची यादी आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

विजयी उमेदवारांची यादी



मुंबई

कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप
धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस
भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप
माहिम – सदा सरवणकर, शिवसेना,
मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस
वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस
वरळी – आदित्य ठाकरे, शिवसेना
शिवडी – अजय चौधरी, शिवसेना
सायन कोळीवाडा – कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप
अंधेरी पश्चिम – अमित साटम, भाजप
अंधेरी पूर्व – रमेश लटके, शिवसेना
अणुशक्तीनगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी
कलिना – संजय पोतनीस, शिवसेना
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, भाजप
कुर्ला – मंगेश कुडाळकर, शिवसेना
गोरेगाव – विद्या ठाकूर, भाजप
घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व – पराग शाह, भाजप
चांदिवली – दिलीप लांडे, शिवसेना
चारकोप – योगेश सागर, भाजप
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर
दहिसर – मनिषा चौधरी, भाजप
दिंडोशी – सुनील प्रभू, शिवसेना
बोरीवली – सुनील राणे, भाजप
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, शिवसेना
मागाठणे – प्रकाश सुर्वे, शिवसेना
मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी, सपा
मालाड पश्चिम – अस्लम शेख, काँग्रेस
मुलुंड – मिहीर कोटेचा, भाजप
वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर, भाजप
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, काँग्रेस
विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना
विले पार्ले – पराग अळवणी, भाजप

पालघर

डहाणू – विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड – सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर – श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर -राजेश पाटील, बविआ
नालासोपारा – क्षितीज ठाकूर, बविआ
वसई – हितेंद्र ठाकूर, बविआ

ठाणे

भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व – रईस शेख, सपा
शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड – किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर – कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व – गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण – प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली – रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर – गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे – संजय केळकर, भाजप
ऐरोली – गणेश नाईक, भाजप
बेलापूर – मंदा म्हात्रे, भाजप

सिंधुदुर्ग

सावंतवाडी – दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण – वैभव नाईक, शिवसेना
कणकवली-देवगड – नितेश राणे, भाजप

रत्नागिरी

राजापूर – राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी – उदय सामंत, शिवसेना
चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर – भास्कर जाधव
दापोली – योगेश कदम, शिवसेना

रायगड

महाड – भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग – महेंद्र दळवी, शिवसेना
पेण – रवीशेठ पाटील, भाजप
उरण – महेश बाल्दी, अपक्ष
कर्जत – महेंद्र थोरवे, शिवसेना
पनवेल – प्रशांत ठाकूर

पुणे

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी
इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
कसबा – मुक्ता टिळक, भाजप
कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप
खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप
खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप
जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी
दौंड – राहुल कुल, भाजप
पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप
पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप
पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस
बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी
भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस
भोसरी – महेश लांडगे, भाजप
मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी
शिवाजीनगर – सिध्दार्थ शिरोळे, भाजप
हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

कोल्हापूर

इचलकरंजी – प्रकाश आवाडे, अपक्ष
करवीर – पी. एन. पाटील, काँग्रेस
कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस
चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी
राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना
शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगली

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी
खानापूर – अनिल बाबर, शिवसेना
तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस
मिरज – डॉ.सुरेश खाडे, भाजप
शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी
सांगली – सुधीर गाडगीळ, भाजप
जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

सातारा

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना
पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना
फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी
माण – जयकुमार गोरे, भाजप
वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी
सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूर

अक्कलकोट – सचिन शेट्टी
करमाळा – संजय शिंदे अपक्ष
पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी
माळशिरस -राम सातपुते, भाजप
मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी
सांगोला – शाहजी बापू पाटील, शिवसेना
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजप
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे

अहमदनगर

अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी
कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप
श्रीरामपूर – लहू कानडे, काँग्रेस
संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी

नाशिक

इगतपुरी – हिरामन खोसकर, काँग्रेस
कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय
चांदवड – राहुल अहेर, भाजप
दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी
देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी
नांदगाव – सुहास कांदे, शिवसेना
नाशिक पश्चिम – सीमा हिरे, भाजप
नाशिक पूर्व – राहुल ढिकळे, भाजप
नाशिक मध्य – देवयानी फरांदे, भाजप
निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
बागलाण – दिलीप बोरसे, भाजप
मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना
मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम
येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

धुळे

साक्री – मंजुळा गावित, अपक्ष
धुळे ग्रामीण – कुणाल पाटील, काँग्रेस
धुळे शहर – शाह फारुक अन्वर, एमआयएम
शिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप
शिरपूर – काशिराम पवार, भाजप

नंदुरबार

अक्कलकुवा – केसी पाडवी काँग्रेस
शहादा – राजेश पाडवी, भाजप
नंदुरबार – विजयकुमार गावित, भाजप
नवापूर – शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

जळगाव

अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप
चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप
जामनेर – गिरीश महाजन, भाजप
पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना
भुसावळ – संजय सावकारे, भाजप
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष
रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस

बुलडाणा

खामगाव – आकाश फुंडकर, भाजप
चिखली – श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद – संजय कुटे, भाजप
बुलडाणा – संजय गायकवाड, शिवसेना
मलकापूर – राजेश एकाडे, काँग्रेस
मेहकर – संजय रायमुलकर, शिवसेना
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

अकोला

अकोट – प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी
मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, भाजप

वाशिम

कारंजा – राजेंद्र पाटनी, भाजप
रिसोड – अमित झनक, काँग्रेस
वाशिम – लखन मलिक, भाजप

अमरावती

अचलपूर – बच्चू कडू, प्रहार
अमरावती – सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा – यशोमती ठाकूर, काँग्रेस
दर्यापूर – बळवंत वानखडे, काँग्रेस
धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड, भाजप
बडनेरा – रवी राणा, अपक्ष
मेळघाट – राजकुमार पटेल, प्रहार
मोर्शी – देवेंद्र भुयार- स्वाभिमानी पक्ष

वर्धा

आर्वी – दादाराव केचे, भाजप
देवळी – रणजीत कांबळे, काँग्रेस
हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप
वर्धा – डॉ. पंकज भोयर, भाजप

नागपूर

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी
सावनेर – सुनील केदार, काँग्रेस
हिंगणा – समीर मेघे, भाजप
उमरेड – राजू पारवे, काँग्रेस
नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण – मोहन मते, भाजप
नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे, भाजप
नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम – विकास ठाकरे, काँग्रेस
नागपूर उत्तर – नितीन राऊत, काँग्रेस
कामठी – सुरेश भोयर, काँग्रेस
रामटेक – आशिष जैस्वाल, अपक्ष

भंडारा

तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
भंडारा – अरविंद भलाधरे, भाजप
साकोली – नाना पटोले, काँग्रेस

गोंदिया

अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
तिरोरा – विजय रहांगडले, भाजप
गोंदिया – गोपालदार अग्रवाल, भाजप
आमगाव – सहसराम कोरोटे, काँग्रेस

गडचिरोली

आरमोरी – कृष्ण गजबे, भाजप
गडचिरोली – देवराव होली, भाजप
अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

चंद्रपूर

चंद्रपूर – किशोर जोर्गेवार, अपक्ष
चिमूर – बंटी भांदडिया, भाजप
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप
ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजुरा – सुभाष धोटे, काँग्रेस
वरोरा – प्रतिभा धानोरकर, काँग्रेस

यवतमाळ
वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप
राळेगाव – अशोक उईके, भाजप
यवतमाळ – मदन येरावार, भाजप
दिग्रस – संजय राठोड, शिवसेना
आर्णी – संदीप धुर्वे, भाजप
पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
उमरखेड – नामदेव सासणे, भाजप



औरंगाबाद
औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य – प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड – उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर – प्रशांत बंब, भाजप
पैठण – संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर – रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना

हिंगोली

वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
कळमनुरी – संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली – नाजी मुटकुळे, भाजप

परभणी

जिंतूर – मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी – डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप
पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस

जालना

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी
जालना – कैलास गोरंट्याल, काँग्रेस
बदनापूर – नारायण कुचे, भाजप
भोकरदन – संतोष दानवे, भाजप

उस्मानाबाद

उमरगा – ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर – राणा जगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद – कैलास पाटील, शिवसेना
परांडा – तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड

किनवट – भिमराव केराम, भाजप
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, शिवसेना
नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे, काँग्रेस
नायगाव – राजेश पवार, भाजप
भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस
मुखेड – डॉ. तुषार राठोड, भाजप
लोहा – शामसुंदर शिंदे, शेकाप
हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस

लातूर

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी
औसा – अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

बीड

गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप
परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
केज – नमिता मुंदडा, भाजप
बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

भाजपाच्या सगळ्या अडचणी मी समजून घेणार नाही :–उद्धव ठाकरे

भाजपाच्या सगळ्या अडचणी मी समजून घेणार नाही :–उद्धव ठाकरे




शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी,मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणेचं होईल असे स्पष्ट संकेत दिले.


मुंबई:-विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा मिळवत सत्ता स्थापनेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीला चांगलाच फटका बसला आहे. मतमोजणीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्यामुळे, राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याप्रमाणे होईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत सर्व मतदारांचे आभार मानले. “लोकसभेआधी शिवसेना आणि भाजपा यांच्यात ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र विधानसभेच्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी मला विनंती केल्यामुळे मी त्यांची अडचण समजून घेतली. मात्र प्रत्येकवेळी मी सगळ्या अडचणी समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. याचसोबत सत्तास्थापनेची आपल्याला कोणतीही घाई नसून सर्व पर्याय खुले असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.

यंदाच्या मतमोजणीमध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. अनेक महत्वाच्या जागांवर निष्ठावंत उमेदवारांना तिकीटं नाकारल्यामुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी गेल्या हंगामापेक्षा चांगली कामगिरी करत सत्ताधारी पक्षापुढे चांगंल आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे सत्तास्थापनेदरम्यान मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

19 आयारामांचा पराभव, शिवसेनेचे 11 तर भाजपचे 8 उमेदवार पराभूत

19 आयारामांचा पराभव, शिवसेनेचे 11 तर भाजपचे 8 उमेदवार पराभूत



बेधडक महाराष्ट्रविशेष:-
शिवसनेतील पराभूत आयाराम
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांचा पराभव झाला आहे. अपक्ष लढणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघात पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या शेखर गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून पराभव झाला आहे.

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघात पराभव झाला आहे.

शिवसेनेत आलेल्या विजय पाटील यांचा वसई मतदारसंघात पराभव झाला आहे.

शिवसेनेत आलेल्या संजय कोकाटे यांचा माढा मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मतदारसंघात पराभव झाला आहे.

शिवसेनेत आलेल्या नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघात पराभव झाला आहे.

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे.

👉 भाजपमधील पराभूत आयाराम

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमदून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांच्या गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे.

भाजपमध्ये आलेल्या रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे.

भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.

फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांचा पराभव, पवारांचा दणका! कोण आहेत ते मंत्री..?

फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांचा पराभव, पवारांचा दणका!
कोण आहेत ते मंत्री..?




महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी
  विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राज्यात पुन्हा युतीचंच सरकार येणार असलं तरी युतीला दणका बसल्याचं दिसत आहे. यावेळी युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला होता. पण हा आकडा आता 150 ते 160 वर पोहचला आहे. 2014 मध्ये युतीला 189 जागा मिळाल्या होत्या. आता तेवढ्या जागा मिळणंही कठीण दिसत आहे. दुसरीकडे फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला आहे.कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झाले. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री राम शिंदेंचा पराभव केला.*

राम शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये जलसंवर्धन मंत्री होते. याशिवाय राज्यात सर्वात मोठी आणि लक्षवेधी ठरलेल्या लढतीत पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं. पंकजा मुंडे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रीपद होते. त्यांना 20 हजार मतांनी पराभूत व्हावं लागलं.

भाजपला अपेक्षित असं यश निवडणुकीत मिळालं नाही. भाजप नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी विजय मिळवला. दुसरीकडे शिवसेना नेते विजय शिवतारे यांना काँग्रेसचे संजय जगताप यांचा पराभव केला.पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने विशेषत अजित पवार यांनी ताकद लावली होती.जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांचा पराभव झाला आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या गोरंट्याल यांनी विजय मिळवला.दुपारपर्यंतचे कल हाती आले त्यामध्ये भाजपचे 99 उमेदवार आघाडीवर होते तर सेनेचे 59 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने 99 जागांवर आघाडी घेतली होती. 2014 च्या तुलनेत भाजपला यावेळी 20 पेक्षा जास्त जागांचा फटका बसला आहे.

भोकर मधुन बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ९७४४५ मतांनी विजयी

 भोकर मधुन बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ९७४४५ मतांनी  विजयी




भोकर(एजास कुरेशी)
: भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अखेर  ९७४४५ मताची लीड मिळाली आहे. एकूण मतदान दोन लाख सहा हजार मतदान झाले आहे. सर्व मतांची मोजणी झाली असून अशोक चव्हाण यांचा विजय झाला आहे. भाजपाचे बापूसाहेब गोरठेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झालं आहे.





  भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांनी बाजी मारत भाजपला धक्का दिला आहे. अशोक चव्हाण सुरवाती पासूनच आघाडीवर होते. अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे बापूसाहेब गोरठेकर होते. राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी देऊन अशोक चव्हाण यांच्याविरोधात मोठे आव्हान उभे केले होते. परंतू अशोक चव्हाणांनी भाजपला धोबीपछाड दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पूर्ण झाली असून भोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांनी आघाडी घेतली आहे.
अखेर भाजपला धक्का बसला आणि काँग्रेसने आपला गुलाल उधळला.

भोकर विधानसभा क्षेत्र
एकूण ७ उमेदवार निवडून रिंगणात होते याना मिळालेली मते खालील प्रमाणे
१) अशोक चव्हाण(काँग्रेस)-१,४०,५५९
२)रत्नाकर शामराव तारू(भारिप)- १२४०
३)बापूसाहेब गोरठेकर(भाजप)- ४३,११४
४)नामदेव आयलवाड(वंचित आघाडी)-१७,८१३
५)भगवान भिमराव कदम(संभाजी ब्रिगेड)-२,०६९
६)पापाराव चव्हाण(अपक्ष)-९५६
७)बालाप्रसाद लिंगमपल्ले(अपक्ष)-३३४
नोटा--१२९७
९७,४४५ मताधिक्याने अशोक चव्हाण विजयी





अशोक चव्हाण च्या बाजूने निकाल येताच शेकडो युवक कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन रस्त्यावर आले युवकांनीं पूर्ण भोकर शहरामध्ये फटाके लावून बँड लावून रैली काढली काँग्रेस व अशोक चव्हाण यांच्या घोषणा केल्या



Tuesday, October 15, 2019

भोकर वॉर्ड क्र.१९ चे युवा नेते देवाभाऊ हटकर व विलास भाऊ हाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यां सोबत केला काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

भोकर वॉर्ड क्र.१९ चे युवा नेते देवाभाऊ हटकर व विलास भाऊ हाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यां सोबत केला काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश





भोकर प्रतिनिधी:-
 भोकर  येथील युवा कार्यकर्ते व बापूसाहेब गोरठेकर गटाचे युवा नेते यांनी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देवा भाऊ हटकर व विलास भाऊ हटकर यांनी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यां सोबत काँग्रेस पक्षात बिनशर्त जाहीर प्रवेश केला आहे.




भोकर 85 विधानसभा मतदारसंघातील  काँग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हान यांच्या उपस्थितीत हा प्रवेश मेळावा घेण्यात आला असून या प्रवेशा मूळे दुसऱ्या पक्षाला खूप मोठा हादरा बसला आहे कारण देवा हटकर व विलास हटकर  हे युवा पिढी चे लोकप्रिय कार्यकर्ते असून भोकर नगर परिषदेत निवडणूकित  फक्त १७ मतांनी त्यांचा पराजय झाला होता तरी पण ते खचून न जाता जनतेचे प्रश्न सोडवित राहिले  वार्डाचे प्रश असो का शहराचे त्यांनी इमानदारी ने ते प्रश्न सोडविले आहे  तसेच या जाहीर प्रवेशा मुळे काँग्रेस पक्षाचे हात बळकट झाले आहे  अशी चर्चा  भोकर शहरात सध्या आहे.
 देवा हटकर व विलास हटकर यांच्या सोबत  हजारोच्या संख्येने युवा कार्यकर्ते चा जाहीर प्रवेश झाला आहे

या प्रवेश मेळाव्यात भोकर विधानसभा मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भोकर शहराध्यक्ष खाजु इनामदार, नगर उपाध्यक्ष प्रतिनिधी इसुफ भाई,हमीद पठाण, शफी इनामदार, सुभाश पवार  या सोबत काँग्रेस पक्षाचे  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते..

Saturday, October 12, 2019

नांदेड :-आचारसंहिता भंग. १२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आयोगाची नोटीस

नांदेड :-आचारसंहिता भंग. १२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आयोगाची नोटीस ..!




नांदेड :-प्रतिनिधी
  निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून, सर्व विभागप्रमुखांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असे आदेश करण्यात आले आहे

  निवडणूक आयोगाच्या सर्टिफिकेशन व मॉनिटरिंग कमिटीने
फेसबुक आणि ट्विटरवरही नियम लागू
फेसबुक आणि ट्विटरवरही हा नियम लागू करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत केंब्रिज एनालिटिका घोटाळा झाल्यानंतर निवडणुकांदरम्यान सोशल मीडियाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. नांदेड एमसीएमसी चे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवाराला प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. उमेदवाराने परवानगी न घेता कोणत्याही माध्यमातून प्रचार केल्यास त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो.

 निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने नांदेड मधील१२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. ज्या मेसेजसाठी अ‍ॅडमिनला नोटीस पाठवली आहे ते मेसेज अ‍ॅडमिनने पाठवले नव्हते. ते मेसेज त्यांच्या ग्रुपमध्ये पोस्ट करण्यात आले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने मुंबईतील ४ फेसबुक पेजेसला देखील नोटीस जारी केली आहे. या सर्व ग्रुप्सवर आयोगाच्या परवानगी शिवाय उमेदवारांचा प्रचार करण्याचा आरोप आहे

आत्तापर्यंत १२०० तक्रारी आल्या आहेत
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून cVigil अ‍ॅपवर आत्तापर्यत १२०० तक्रारी आल्या आहेत. सध्या नांदेडमध्ये पाठविलेल्या या नोटिसींमध्ये या १२ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आपल्या ग्रुपवरील सर्व प्रकारचा निवडणूक प्रचार बंद करणे तसेच एका आठवड्यात आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे

राजकीय पक्षांनी प्रचाराच्या विविध माध्यमांचा वापर करण्यापूर्वी ते प्रमाणित करून घ्यावे. प्रचारावर होणाऱ्या सर्व खर्चाचे विवरण सादर करावे. शेड्यूल, राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बॅंकांमध्ये निवडणूक काळात आयोगाने दिलेल्या आदेशानुसारच आर्थिक व्यवहार होतील. १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराची माहिती महाव्यवस्थापक, प्राप्तिकर विभागाकडे नोंदवावी. मात्र, सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आदेश करण्यात आले आहे 


Thursday, October 10, 2019

नांदेडात नदीच्या पाण्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेडात नदीच्या पाण्यात पडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू.




नांदेड:-(प्रतिनिधी)
शेतातील कामे आटोपून नदीच्या काठावरून घराकडे येत असलेल्या दोन बालकांचा नदीच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे घडली. तालुक्यातील बामणी येथील गजानन सोनाजी कदम (वय 16) व दीपक दत्तरामजी मुंगल (वय 15) हे दोघे दुपारी 12 वाजेच्या सुमारास नदी पलीकडील शेतात गेले. दिवसभर शेतातील कामे करून सायंकाळी परतत असताना नदीच्या काठावरील रस्त्यात गजानन कदम याचा अचानक पाय घसरल्याने तो नदीच्या पाण्यात पडला. तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी दीपक मुंगल याने पाण्यात उडी मारली. दरम्यान पाण्याचाअंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावातील पोहणारे काही तरुण साहेबराव कदम, आनंद गाडगे, श्रीधर कदम, सुनील कदम हे तरुण नदीमध्ये उतरले आणि दोन तासाच्या शोधानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती अर्धापूर पोलिसांना देण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून रात्री उशिरा दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कोकरे हे करीत आहेत.

Monday, October 7, 2019

अब्बब...तब्बल 91 पैकी 84 उमेदवारांनी घेतली माघार अत्ता 7 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात

अब्बब...तब्बल 91 पैकी 84 उमेदवारांनी घेतली माघार अत्ता 7 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात




 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

प्रतिनिधी
भोकर:- : भोकर 85 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मतदार संघात 91 पैकी.84 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याने 7  उमेदवार निवडणुक रिंगणात राहिले आहेत.
राज्यातील उच्चांकी नामनिर्देशपत्र दाखल झालेल्या 85- भोकर विधानसभा मतदार संघात माघार घेण्याचाही उच्चांकच झाला असून 91 उमेदवारांपैकी 84 जणांनी माघार घेतल्याने 7 जण प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात

.नामनिर्देशन पत्र मागे घेणाऱ्या उमेदवार यांचे नाव...
1)श्रावण सत्ताजी नरवाडे
 2) शरद हनमंतराव सोळंके
 3) शेख जाकेर शेख महंमद चाऊस
 4) अमरखान सरदार अली खान
 5) मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील
 6) जरीनाबेगम अकबर अली खान
 7) गौतम कामाजी पंडीत
 8) दिगंबर धोंडीबा वाघमारे
 9) कैलास गणपतराव कानिंदे
 10) चांदखान अलीखान
 11) शफी शेख अमीर शे 12)उषाताई आकाश भालेराव
 13) साहेबराव भिवा गजभारे
 14) असलम शेख हमीद शेख
 15) इस्लम बिन सलम चाऊस
 16) शंकर मारोतराव जाधव
 17) विश्वनाथ हिरामण बाबळे
 18) प्रकाश विठ्ठलराव घुन्नर
 19) अब्दुल रईस अहेमद अ. जब्बार
 20)राजू गणपत बिराजदार 21. आदित्य सारंगधरराव पाटील 22) अक्रम रहेमान सय्यद
 24) अन्वर अ. खादर अ. खादर शेख
23) अमजद अली जाकेर खान
25)अब्दुल खुदुस अब्दुल रजाक
26)शशिकांत संभाजी पाटील
 27)लतीफ उल जफर कुरेशी
 28) कार्तिक भुजंगराव शेळके
 29) संदीप विजयराव निखाते
30) अलीमोद्दीन मोहिनोद्दीन स
31) स. मोहमद स. मुनिर 32)फहाद सलीम शेख
 33) रमेश दौलती माने
 34) उत्तम रामा गायकवाड 35) मुशीरखान महंमदखान
36) साजिद खुर्शीद खा  37) स. अहमद अ. खादर
38) अ. मूनाफर अ. खादर
 39) सुभाष खेमा जाधव
40)स. सिराज अली शौकत अली
41)अफसरमिया गफूर शेख
 42) चंद्रप्रकाश तूळशिराम सांगवीकर
 43) लता गौतम कांबळे
 44) राहुल नामदेव काळेवार
45)जमीर सालेम अ. चाऊस
 46) स. फेरोज स. याकूब
 47)नविद युनूस खान
48) म. तौफिक म. युसूफ 49) सलीम म. इकबाल
 50) तन्वीर बेगम म. तौफिक 51) मोहमद शाकेर मोहमद इब्राहिम 52) चंद्रकांत पिराजी गव्हाणे
 53) तुकाराम गणपत बिराजदार
54)प्रल्हाद रामजी इंगोले
 वाकोडे साहेब: 55) अमोल धनराज पवार
56) मीना रमेश माने
 57) इकबाल अहमद फकीर महमद 58) अ. मूहिद अ. माजिद
 59) महमूद रजाक स.
 60) खान अलयार युसूफ खान
 61)अहमद इकबाल अ. अशपाक
 62) वाजीद स. अकबर स.
 63) श्रीराम रावसाहेब वाकदकर
 64) दिक्षामाला धर्मपाल नरवाडे
 65)अशोक जनार्धनराव बुटले
 66) नूरजहाबेगम गफार पठाण
 67) ज्ञानदीप दत्तात्रय भागानगरे
 68) सलाम अहमद सलीम
 69) जुल्फेखान जीलानी सय्यद
 70)फेरोज नाजीर शेख  71)स. गुफरान स. दाऊद
 72) शे. सरफराज अहेमद शेख जमील अहेमद
 73) दीपक विश्वनाथ सरोदे
 74) गजानन दत्तारामजी धुमाळ
 75) शे. नजीर शे. शफीउद्दीन
 76) मोहम्मद सिद्दीख मोहम्मद गौस
77) म. अफसर म. नवाज 78) केसर सुलताना अल्ताभ अहमद
79) राजाराम शंकरराव देशमुख 80) स. तन्वीर स. हमजा
 81) स. युसूफ स. मुर्तुजा
 82) सत्तार अ. अजीज अ.
 83) शे. रईस जणी गुलाम समदानी
 84) शाकीर खान हामजा खान

 अत्ता 7  उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.
या मध्ये
1. अशोकराव शंकरराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस)
2. रत्नाकर पि. शामराव तारु (बहुजन समाज पार्टी)
3. श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (भारतीय जनता पार्टी)
4. आयलवाड नामदेव नागोराव (वंचित बहुजन आघाडी)
5. भगवान भिमराव कदम (संभाजी ब्रिगेड पार्टी)
6. पापाराव पंडित चव्हाण (अपक्ष)
7. बालाप्रसाद नारायण लिंगमपल्ले (अपक्ष) हे 
 उमेदवार निवडणूकीच्‍या रिंगणात आहेत.

Sunday, October 6, 2019

भोकरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या अटकेचा निषेध

भोकरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या अटकेचा निषेध






 भोकर( प्रतिनिधी)
मुंबई येथे बाळासाहे आंबेडकर यांना महाराष्ट्र पोलिसां कडून अटक झाल्याच्या  निषेधार्थ भोकर येथील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आज (दि०६)सायंकाळी पोलीस स्थानक भोकर येथे निवेदन देऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

मुंबई येथील आरे जंगल तोड प्रकरणात विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना अटक केल्याने वंचित आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव आहे अशी टीका  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.  भाजपा, शिवसेना सरकारला इथली जागा हडप करायची आहे. एवढंच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही स्वार्थ यामध्ये आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मुंबईकर या सरकारला आरे वृक्षतोडीवरुन योग्य उत्तर देतील असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करत आरे वृक्षतोडीच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. पवई फिल्टरपाडा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, अटकेच्या विरोधात भोकर तालुका भारिप बहुजन महासंघ व  वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानक भोकर येथे निवेदन देऊन तीव्र निषेध  नोंदवला आहे. नेते प्रकाश आंबेडकर यांना तात्काळ पोलिसांच्या अटकेतून सोडले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे देण्यात आला आहे.

यावेळी एल ए हिरे,भीमराव दूधारे,सुभाष तेले, दत्ता डोंगरे,सुनील कांबळे,दशरथ भदरगे,नागोराव शेंडगे,दत्ता डोंगरे,सूमेश फुगले,बाबूराव राठोड,बाळासाहेब टिकेकर, तुकाराम कयीलवाड,आनंदराव एडके, शंकर जिंकलवाड ,राहुल एडके,  पुंजाराम डोकळे, भागाजी जाधव आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, October 3, 2019

बापूसाहेब गोरठेकर यांचा भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल

बापूसाहेब गोरठेकर  यांचा भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल



भोकर (प्रतिनिधी)
  माजी.आ.बापूसाहेब गोरठेकर यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे गुरूवारी (दि. ३ ऑक्टोंबर २०१९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. भोकर 85 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला आहे यावेळी दिलीपराव देशमुख सोमठाणकर,सुभाष पाटील घंटलवार,शिवाजी,राजेश्वर वंगलवार,किशोर देशमुख, गुलाबराव नाईकभगवान दंडवे,सुभाष पाटील गौड,उत्तम बाबळे,गणपत मुसळे,रामलू गोदेवाड,यासह आदी जण उपस्थित होते.




उमदवारी अर्ज भरल्यानंतर माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी म्हणले आहे की भोकर मतदारसंघातील नागरिकांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. मी त्यांच्या विकासाबद्दलच्या स्वप्नांना तडा जाऊ दिलेला नाही. मतदारसंघातील सर्व नागरिकांचे आशिर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकणार, असा विश्वास गोरठेकर यांनी व्यक्त केला.

Wednesday, October 2, 2019

काँग्रेस चा स्टिकर लावून फिरणाऱ्या बुलेट मोटारसायकल मालकावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

काँग्रेस चा स्टिकर लावून फिरणाऱ्या बुलेट मालकावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल





भोकर ;-प्रतिनिधी
   भोकर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श लागू असताना सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोटरसायकलला काँग्रेस पक्षाची निशाणी पंजाचे स्टिकर लावल्याने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शंकर व्यंकटराव पवार रा.निवघा ता.मुदखेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 आदर्श आचारसंहिता लागू असताना राजकीय प्रचारासाठी सार्वजनिक स्थळाचा उपयोग करत दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहाच्या दरम्यान भोकर शहरातील बायपास रोडवरील ओम लोन्स मंगल कार्यालय येथे विनापरवानगी बुलेट मोटरसायकल वर काँग्रेस पक्षाची निशाणी असलेले पंजाचे स्टिकर पाठीमागील बाजूस लावले असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने सदर तक्राराची खात्री करण्याकरिता फिरते पथकाला पथकातील पथक प्रमुख वनपाल बाबुराव नारायण पेरलेवाड, वनपाल सुनील मेटकर, सपोउ मेघराज जेता राठोड,  कॅमेरामॅन देवराव राचेवाड,यांनी गाडीची पाहणी केली असता बुलेट मोटरसायकल क्रमांक एम एच26   4912 वरील प्रकार खरा असल्याचे आढळून आल्या यावरून गाडी मालक शंकर पवार वय 40 वर्ष व्यवसाय शिक्षक राहणार तालुका मुखेड या गाडी मालकाचा सदरील प्रकाराबाबत विचारणा केली असता ते म्हणाले या सभा निवडणुक ट्रेनिंग संबंधाने भोकर येथे आलो असल्याचे सांगितले व काँग्रेस पक्षाच्या स्टिकर  विनापरवानगी लावले असल्याचे निदर्शनास आले यावरून आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भा.द.वी.171-एफ 188 134 ए प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉस्टेबल अहेमद खान मोजम खान करीत आहेत

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...