Thursday, January 23, 2020

भोकर शहरात पिसाटलेल्या वानरांचा हौदोस

भोकर शहरात पिसाटलेल्या वानरांचा हौदोस

                                                            फाईल  फोटो

माणसानंतर जर कोणता प्राणी हुशार असेल तर तो म्हणजे वानर. एक वानर असूनही तो अनेक गोष्टी शिताफीने करत असतो. मात्र कधी-कधी त्यांच्या वानरचाळ्यांमुळे अनेकांना नुकनही सहन करावं लागतं. डोंगरकडांवर आढळून येणारी ही वानर ज्यावेळी मानववस्तीमध्ये येतात त्यावेळी त्यांचा हौदोस पाहण्यासारखा असतो. एकतर मानववस्तीत आल्यामुळे येथील लोक मारतील ही भीती त्यांच्या मनात असते, तर दुसरीकडे प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असतं.

भोकर शहरातील भीम टेकडी  परिसर व बसस्टँड रोडवर असलेल्या नसीब बोरवेल वर गुरुवारी एका पिसाळलेल्या वानरांने उच्छाद माजवला होता रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढविला होता त्यांचा चावा घेण्याचा प्रयत्न करत होता व तसेच बोरवेल मधील काच तोडण्याचा प्रयत्न करत होता या वानरांच्या उच्छादामुळे  परिसरात बघायची गर्दी जमली होती पण त्याला हाकलून लावण्याची कोणाचीही हिंम्मत होत नव्हती पिसाट असल्या मुळे परिसरातील नागरिंकामध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे बसस्टँड रोड व भीम टेकडी या भागात पिसाटलेल्या वानरांनी नागरिकांना लक्ष करून या पिसाटलेल्या वानंराने तळ ठोकून बसला आहे.
त्यामुळे नागरिकांचे घरा बाहेर पडने कठीण झाले आहे घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्या ना देण्यात आली असून वन विभाग काय कार्यवाही करेल या कडे जनतेचे लक्ष लागले आहे

Wednesday, January 22, 2020

CAA पर रोक नहीं, सुप्रीम कोर्ट ने केंद्र सरकार से 144 याचिकाओं पर 4 हफ्ते में मांगा जवाब

CAA पर रोक नहीं, सुप्रीम कोर्ट ने केंद्र सरकार से 144 याचिकाओं पर 4 हफ्ते में मांगा जवाब





CAA के खिलाफ सुप्रीम कोर्ट करीब 150 याचिकाओं पर सुनवाई कर रही है। चीफ जस्टिस एसए बोबडे की अध्यक्षता वाली 3 सदस्यीय बेंच इसके विभिन्न पहलुओं पर सुनवाई करेगी। 12 दिसंबर को राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने इस कानून पर किए थे हस्ताक्षर।



नई दिल्ली
सुप्रीम कोर्ट ने नागरिकता संशोधन कानून (CAA) से जुड़ी 144 याचिकाओं पर जवाब देने के लिए सरकार को 4 हफ्ते का वक्त दिया है। आज मामले की सुनवाई करते हुए शीर्ष अदालत ने कहा कि वह इस कानून पर फिलहाल कोई अंतरिम रोक नहीं लगाएगा। कोर्ट ने साथ ही संकेत दिया कि वह याचिकाओं की सुनवाई के लिए संविधान पीठ का गठन कर सकता है। शीर्ष अदालत ने सभी हाई कोर्टों को CAA से जुड़े मामले की सुनवाई नहीं करने को कहा है।

सुप्रीम कोर्ट का अंतरिम आदेश से इनकारचीफ जस्टिस बोबडे, जस्टिस अब्दुल नजीर, जस्टिस संजीव खन्ना की 3 जजों की पीठ ने आदेश देते हुए कहा कि असम और त्रिपुरा पर अलग से सुनवाई होगी। बता दें कि सुनवाई के दौरान कानून को चुनौती देने वाले पक्ष की दलील रखते हुए वरिष्ठ वकील कपिल सिब्बल ने कहा कि जबतक इस मामले की सुनवाई पूरी नहीं हो जाती तबतक इस को निलंबित कर दिया जाना चाहिए। सिब्बल ने संविधान पीठ के गठन की मांग भी की थी। चीफ जस्टिस ने कहा कि अभी अंतरिम आदेश पर कोई आदेश नहीं देंगे।



असम, त्रिपुरा की याचिका पर अलग से सुनवाई
कोर्ट ने कहा कि वह असम और त्रिपुरा का CAA से जुड़े मामले को अलग से सुनवाई करेगा। कोर्ट ने कहा कि इन दो राज्यों का मामला देश के दूसरे राज्यों से अलग है। कोर्ट ने कहा, 'असम त्रिपुरा और उत्तर प्रदेश से जुड़े मामले को अलग से सुना जा सकता है।' बता दें कि उत्तर प्रदेश बिना कोई नियम बनाए ही CAA से जुड़ी कार्रवाई शुरू कर चुका है।


संविधान पीठ बनाने के भी दिए संकेत
सुप्रीम कोर्ट ने साथ ही CAA से जुड़े मामले की सुनवाई के लिए संविधान पीठ बनाने के भी संकेत दिए। कोर्ट ने सुनवाई के दौरान कहा कि वह याचिकाओं की सुनवाई के लिए संविधान पीठ का गठन करेगा।

केंद्र की बात सुने बिना आदेश नहीं-SC
चीफ जस्टिस ने कहा कि वह केंद्र की पूरी बात सुने कोई एकतरफा आदेश नहीं दे सकते हैं। उन्होंने कहा कि सभी याचिकाओं को केंद्र के पास पहुंंचना जरूरी है।

जब CJI सिब्बल से बोले, यह तो रोक वाली बात ही होगी
चीफ जस्टिस ने असम के तर्क को अलग रखते हुए कहा कि वहां की स्थिति अलग है। उन्होंने कहा कि हर याचिका सरकार के पास जानी जरूरी है। सिब्बल की निलंबन वाली दलील पर चीफ जस्टिस बोबडे ने कहा कि यह एक तरीके से रोक की ही बात होगी। चीफ जस्टिस ने कहा कि असम और त्रिपुरा से दाखिल CAA विरोधी याचिकाओं की अलग से सुनवाई होगी। सुप्रीम कोर्ट ने कहा कि CAA पर अब 144 से ज्यादा याचिकाओं पर सुनवाई नहीं होगी। शीर्ष अदालत ने कहा कि अब इससे ज्यादा याचिका दाखिल नहीं होगी।

सिब्बल ने दी निलंबन की दलील
सिब्बल ने कहा कि नागरिकता देकर वापस नहीं ली जा सकती है। उन्होंने दलील दी कि इसपर कोई अंतरिम आदेश जारी होना चाहिए। सिब्बल ने कहा कि हम कानून पर रोक की मांग नहीं कर रहे हैं बल्कि इसे दो महीने के लिए निलंबित कर दें।

अटॉर्नी जनरल ने जवाब के लिए मांगा 6 हफ्तों का वक्त
सुप्रीम कोर्ट में सुनवाई के दौरान अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल ने कोर्ट में भीड़ का सवाल उठाते हुए कहा कि कोर्ट का मौहाल शांतिपूर्ण होना चाहिए। सिब्बल ने कहा कि इस पहलू पर तुरंत सुनवाई होनी चाहिए। अटॉर्नी जनरल ने कहा कि इन याचिकाओं पर जवाब देने के लिए सरकार 6 हफ्तों का वक्त चाहिए।

और याचिकाओं पर रोक की भी मांग
अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल ने कहा कि हमने 60 याचिकाओं पर जवाब तय किए हैं जबकि कोर्ट में 144 याचिकाएं हैं। उन्होंने कहा कि कोर्ट अब और पिटिशन दाखिल करने की इजाजत नहीं दे। शीर्ष अदालत ने सुनवाई के दौरान कहा कि इस मामले में वह जल्दबाजी में कोई आदेश नहीं दे सकती है।


इन्हें मिलेगी भारत में नागरिकता
बता दें कि नागरिकता संशोधन कानून के तहत तीन पड़ोसी देशों- पाकिस्तान, बांग्लादेश और अफगानिस्तान से धार्मिक प्रताड़ना के शिकार अल्पसंख्यक शरणार्थियों को भारतीय नागरिकता देने का प्रावधान है। इसके तहत तीनों देशों के धार्मिक अल्पसंख्यकों यानी हिंदू, सिख, बौद्ध और क्रिश्चन समुदाय के ऐसे लोगों को भारतीय नागरिकता दी जाएगी जो 31 दिसंबर 2014 से पहले भारत आए थे।

इन याचिकाओं में इंडियन यूनियन मुस्लिम लीग और कांग्रेस नेता जयराम रमेश की याचिकाएं भी शामिल हैं। राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने 12 दिसंबर को नागरिकता (संशोधन) विधेयक 2019 को मंजूरी दी थी जिससे यह कानून बन गया था।

नागरिकता कानून का विरोध कर रहे कपिल सिब्बल की सबसे बड़ी दलील क्या थी
CAA को 2 महीने के लिए निलंबित किया जाए। संविधान पीठ को भेजा जाए मामला

CJI की सबसे बड़ी टिप्पणी क्या थी
चीफ जस्टिस एसए बोबडे ने कहा कि यह एक तरह से रोक जैसा ही होगा। कोर्ट ने इस मामले पर कोई अंतरिम आदेश नहीं दिया।

सुप्रीम कोर्ट ने केंद्र सरकार को क्या आदेश दिया
शीर्ष अदालत ने केंद्र सरकार को सभी 144 याचिकाओं पर जवाब के लिए केंद्र सरकार को 4 हफ्ते का वक्त दिया।

Saturday, January 18, 2020

नागरिकत्व कायदा रध्द करण्याच्या मागणीसाठी भोकर तहसिल समोर विविध संघटनांची प्रचंड धरणे आंदोलन केंद्र सरकार विरूद्ध तिव्र संताप

नागरिकत्व कायदा रध्द करण्याच्या मागणीसाठी भोकर तहसिल समोर विविध संघटनांची प्रचंड धरणे आंदोलन
केंद्र सरकार विरूद्ध तिव्र संताप




भोकर (लतीफ शेख )केंद्र सरकारने नागरिकत्व सीएए कायदा  लागू केल्याने देशात सर्वत्र असंतोष पसरला असून  एनआरसी एनपीआर हा कायदा जाचक असल्याने त्वरित रद्द करावा या व अन्य मागण्यांसाठी संविधान समर्थक व नागरिकत्व कायदा विरोधी कृती समितीतर्फे एक दिवसीय प्रचंड धरणे आंदोलन करण्यात आली. या आंदोलनात विविध सामाजिक राजकीय संघटनांनी सहभाग घेतला.



 ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार एल.ए.हिरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात कुल जमाती तहेरीक, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, एम.आय.एम, भारिप, वंचित बहुजन आघाडी, सिपीएम, भटके-विमुक्त,आदिवासी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, सहभाग घेतला होता उपस्थित अनेक संघटनेच्या नेत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,शहा यांनी लागू केलेल्या नागरिकत्व सीए कायद्याच्या विरोधात तिव्र संताप व्यक्त  करून हा कायदा त्वरित  रद्द करण्याची मागणी केली.  तसेच जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यावर हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई करावी, आजचे शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर बंदी घालून राष्ट्रपुरुष यांचा अपमान करणाऱ्या भगवान गोयल यांच्यावर कठोर कारवाई करावी. आदी मागण्यांचे निवेदन  तहसिलदारा मार्फत राष्ट्रपती भारत सरकार, प्रधानमंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्याचे निवेदन सादर केले मागण्याचे निवेदन निवेदनावर एल.ए. हिरे ,,सुभाष तेले, मुफ्ती  इम्रान साहब, मौलाना उमर फारूख,  भीमराव दुधारे, शिवाजी गायकवाड ,बी.आर. वाकोडे, पत्रकार एजास कुरेशी,  करीम करखेलीकर,लतिफ शेख, एम. ए.रजाकसेट, परमेश्वर ढवळे, बाळासाहेब टिकेकर, आप्पाराव राठोड ,जुनेद पटेल,माजी सभापती शिवाजी देवतुळे,नगर सेवक मनोज गिमेकर,दत्ताभाऊ डोंगरे,  आदिसह अनेकांच्या सह्या आहेत.
या धरने आंदोलनात


नागोराव शेंडगे,गोल्ला गोलेवार समाजाचे नामदेव आयलवाड, एम आय.एमचे मा.प्रदेश अध्यक्ष  सय्यद मोईन,  सभापती जगदीश पाटील भोसीकर, राष्ट्रवादीचे अँड. शिवाजी कदम, संचालक  रामचंद्र मुसळे, जेष्ठ पञकार अहेमद करखेलीकर, भिमशाहीर साहेबराव येरेकर,भिम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद गायकवाड, एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष मिर्झा अहेमद बेग, अँड. प्रकाश मेडके, भिमशाहीर साहेबराव गाडेकर,  हैदर पटेल,बाबाखाॅन,भिमराव दुधारे, शमीमोद्दीन इनामदार, काॅ,दिलीप पोतरे, अनिल कराळे,आदिनी सिएए, एनआरसी,एनपीआर कायद्याच्या रद्द करण्याची एकमुखी मागणी केली.धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Friday, January 17, 2020

भोकर अवैध वाहतूकीचे थांबे करून रस्त्याची कोंडी केल्या मुळे वृद्धाचा मृत्यु

भोकर अवैध वाहतूकीचे थांबे करून रस्त्याची कोंडी केल्या मुळे वृद्धाचा मृत्यु




घटनेबाबत कळालेली माहिती अशी की, दिनांक 16 जानेवारी रोजी भोकरचा आठवडी बाजार असल्याने भोकरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठी गर्दी झाली होती, त्यातल्या त्यात अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हलस,मागझिमो, ऑटो ,व तसेच मोटारसायकल,  ट्रॅफिक पोलिसांच्या समोर रस्त्यातच उभी करतात या गर्दीतून किनवट कडून नांदेड कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम. एच. 26 एडी 14 77 चा चालक निष्काळजीपणाने आपले वाहन चालवून, हाजी मिर्झा वाहेद बेग रहीम बेग वय 80 वर्षे राहणार सहिद नगर भोकर, यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.



अपघातस्थळी जमलेली गर्दी चौकात अपघात होताच शेकडो नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन वृद्धास वाचवण्याचा प्रयत्न केला पण, ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला होता, गर्दीचा फायदा घेऊन ट्रक चालक घटनास्थळावर ट्रक सोडून  पळून जाण्यात यशस्वी झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विकास पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले,पो.हे.उमेश कारमुंगे अशोक सिंगनवाड,संजय अरकीलवाड, यांनी तात्काळ  घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती  नियंत्रणात आणली अपघाताचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.
 गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या संघटना व सामाजिक कार्यकर्तेने अनेक तक्रारी देऊन सुद्धा या बाबत संबंधित विभागाने दखल न घेता प्रवाशी वाहतुकिस पाठबळ दिले सदरील रस्त्यावरुन हजारों विद्यार्थी ची दररोज ये जा असते आशा प्रकारचा अनर्थ पुन्हा होऊ नये म्हणून सदरील आंबेडकर चौकात अवैध वाहतुकीची थांबे तात्काळ बंद करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष राजेश चंद्रकर (चंद्रे) यांनी दिला आहे


Thursday, January 16, 2020

नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी; भोकरमध्ये१८ जानेवारी रोजी मोर्चा व धरणे आंदोलन

नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी;
भोकरमध्ये१८ जानेवारी रोजी मोर्चा व धरणे आंदोलन




भोकर (प्रतिनिधी) भारतीय संविधान समता स्वातंत्र्य सर्वधर्म स्मभावा लोकशाहीवर अधारित असतांना केंद्र सरकारने नागरिकत्व नोंदणी सीएए कायदा लागू करून देशात अराजकता माजवीत आहे.हा कायदा रध्द करावा. या मागणीसाठी शनिवार दि,१८जानेवारी रोजी सकाळी ११वाजता मोर्चा व धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत. या धरणे आंदोलना ला कुल जमाती तहेरीक संघटना
भोकर यांचा जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे.
आपल्याच देशातील नागरींकांना जाचक अटी लावुन नागरिकत्व  सिद्ध करायची काय गरज आहे.   ज्यांच्यासाठी हजारो वर्षापासून शिक्षणाची दारे बंद होती दर्याखोर्यात रहाणारे मागास आदिवासी बहुजन भटके विमुक्त नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारला हवी ती कागद पत्रे कुठून आणायची ? मोदी शहा अनेक जाचक कायदे करून देशातील नागरिकांना वेठीस धरत आहेत.केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व कायदा त्वरित रद्द करावा.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या गुंडावर कठोर कारवाई करावी.आज के शिवाजी नरेंद्र मोदी या शिवाजी महाराजाचा आवमान करणाऱ्या पुस्तकावर कायमची बंदी घालावी.लेखक भगवान गोयल यांच्यावर कठोर कारवाई करावी. आदी मागणीसाठी मोर्चा व धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहेत.

आंदोलनाला मार्गदर्शन व सहभागी होण्यासाठी डॉ.यशपाल भिंगे,प्रा.रामचंद्र भरांडे,अँड.शिवाजी कदम,मोहन राठोड,फारूख अहैमद,सयद मोईन,नामदेव आयलवाड,जगदिश पाटील,गोविंद गौड,सुभाष पा.किन्हाळकर,नागोराव शेंडगे,बी.आर.वाकोडे, आदीसह विविध संघटनाचे कार्येकर्ते सहभागी होणार आहेत आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान नागरिकत्व कायदा विरोधी कृती समिती मोर्चाचे आयोजक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  एल.ए.हिरे,बाबुराव राठोड,मिलिंद गायकवाड,करीम करखेलीकर यांनी केले आहे.

Thursday, January 2, 2020

मुलाचा राग काढला बापावर शेख सलिमवर जिव घेना हल्ला

मुलाचा राग काढला बापावर शेख सलिमवर जिव घेना हल्ला


गाव गुंडाकडून केलेल्या मारहाणीत
अजणीचा शेख गंभीर जखमी

बिलोली(तालुका प्र.)दि.०१ जानेवारी
तालुक्यातील अजणी येथील शेख सलिम शेख अहेमद वय ४५ वर्ष हा गावातुन एका दुचाकी वरुन जात असतांना याच गावातील सहा व्यक्तीनी चार महिण्या पूर्वि शेख सलिम यांच्या मुला सोबत झालेला वाद मनी धरुन रागाच्या भरात शेख सलिमवर जिव घेना हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे.या प्रकरणी बिलोली पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या सहा पैकी संभाजी नागनाथ हंडे वय २५ वर्ष या आरोपीला अटक करण्यात आले असून अन्य पाच आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.
चार महिण्या पूर्वी शेख सलिम याच्या मुलाचा वाद प्रेम प्रकरणातून या गावातील कांही व्यक्ती सोबत झाला होता पण आप-आपसात तडजोड करुन वाद मिटून घेण्यात आला.या नंतर शेख यांचे कुटुंब तेलंगना राज्यात राहत होते.कांही कालावधी नंतर हा गावाकडे येऊन दुचाकीवर बिलोलीकडे  येत असतांना दि.३१ डिसेंबर रोजी दोन ते तीन व्यक्तीनी दुचाकी अडवून शेखला खाली उतरवण्यात येऊन दमदाटी करीत दुसऱ्या दुचाकी मोटार सायकलवर बसवण्यात आले.या नंतर एका शेतात घेऊन जाऊन त्या ठिकाणी दोरीने हातपाय बांधुन कोणी तोंडावर थापडबुक्या देत तर कोणी काठीने मारहान करीत गंभीर जखमी केले आहे.ही घटना समजताच बिलोलीचे सामाजिक कार्यकर्त पत्रकार वलियोद्दिन फारुखी यांनी ही माहिती पोलीस स्टेशनला कळवून तात्काळ जखमीला रुग्नालयात दाखल करण्यात मदत केले.तर दुसारीकडे या बिटचे जमादार शिंदे हे अजणीकडे येत असल्याचे आरोपीला समजताच
याच दुचाकीवर शेख यास त्याच्या घरी जखमी अवस्थेत सोडण्यात आहे.प्रकृती गंभीर असल्यामुळे प्रार्थमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक केंन्द्रे हे करीत आहेत.

भोकर तालुक्यातील ५०३ शिक्षकांना ' निष्ठा' प्रशिक्षण






भोकर तालुक्यातील ५०३ शिक्षकांना ' निष्ठा' प्रशिक्षण




. भोकर (एजास कुरेशी)- तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे गुणवत्तेत वाढ व्हावी या करिता शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील  पहिली ते आठवी इयत्तेसाठी शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक ऍडव्हान्समेंन्ट(निष्ठा) या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे.


 केंद्र सरकारकडून २२ ऑगस्ट २०१९ रोजी निष्ठा प्रशिक्षण या कार्यक्रमाची विधीवत घोषणा करण्यात आली. यानंतर प्रत्येक राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे.याचाच भाग म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, गट साधन केंद्रात दिनांक १८ डिसेंबर पासून राज्य साधन व्यक्ती तथा डायटचे जेष्ठअधिव्याख्याता श्री एस.वाय.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रशिक्षण  कार्यक्रम सुरू आहे.

या प्रशिक्षणात अध्ययन निष्पत्तीवर आधारित अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रिया, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन,, पुढाकार नेतृत्वाचा परिपूर्ण विकास, अध्ययन अध्यापन पद्धती मध्ये कलात्मकरीत्या सर्व विषयांचा अंतर्भाव करणे, आदीसह सर्व विषयाच्या अध्यापन शास्त्राविषयी सखोल माहिती, सिम्बॉयसिस पुणे येथे भाषा, गणित,सामाजिक शास्त्र या विषयात राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतलेले  साधन व्यक्ती प्रमोद पाटील, अशोक कोळगावकर, संतोष रत्नपारखी, आर.एस. झाडे,संजय खांडरे आदीकडून दिले जात आहे.

सदरचे प्रशिक्षण हे चार टप्प्यामध्ये ५०३ शिक्षकांना दिले जात असून पहिल्या टप्प्यातील १२५ शिक्षकांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहेत.सध्या दुसरा टप्पा सुरू असून डायटचे प्राचार्य जयश्री आठवले, गट शिक्षणाधिकारी डॉ.डी.एस मठपती, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्ताराधिकारी आर.एल. मुधोळकर,एम.जी.वाघमारे ,डी.डी.सुपे,तसेच केंद्रप्रमुख विजय महाजन,लक्ष्मण सुरकार, अनिल सिरसाठ ,विषयतज्ञ जगदीश थडवे ,राधेश्याम चौधरी आदी  प्रशिक्षण यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत..

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...