Tuesday, May 26, 2020

वैघकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे.-आ.राजुरकर

वैघकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे.-आ.राजुरकर





नांदेड दि. 26 - लोकांमध्ये जावून काम करीत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारासाठी नांदेडमधील एका रूग्णालयात त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना तात्काळ मुंबईला या असा आग्रह धरला. त्यामुळेच त्यांना मुंबईला हलविण्यात आले. यातही काही जणांकडून राजकारण होत आहे. एका बाजूस त्यांना बरे होण्याचे सदिच्छा देताना राजकारण करण्याचा जो काही प्रयोग होत आहे तो अतिशय खालच्या पातळीचे असल्याचे मत विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर यांनी व्यक्त केले.
देशात आणि राज्यात जेंव्हा कोरोनाचा प्रसार होत होता. अशावेळी आपला नांदेड जिल्हा हा या रोगापासून दूर राहिला पाहिजे. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अहोरात्र प्रयत्न केले. वारंवार बैठका घेवून प्रशासनास सूचना केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या उपलब्ध निधीपैकी 33 टक्के निधी हा आरोग्य सेवेसाठी वापरण्यात यावा असा आदेश दिला. नांदेडमधील जुन्या दवाखान्यातील सेवासुविधा वाढविण्यासाठी त्यांनी 2.25 कोटी निधी जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ उपलब्ध करून दिला. प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटरची स्थापना केली. भविष्यात वाढणार्‍या रूग्णांसाठी सेवेत कुठलीही कमी पडू नाही यासाठी औषध उपलब्धता, पीपीई किटची उपलब्धता, मास्क यासोबत अन्य वैद्यकीय साधन सामुग्रीची उपलब्धता अनेकदा तपासून पाहिली.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील गरीब माणसांना अन्नधान्याची अडचण येवू नये यासाठी घरपोच अन्नधान्य योजना राबविली. दुर्देवाने लोकांमध्ये काम करताना त्यांना कोरोनाची  लागन झाली. यामुळे जिल्ह्यातील जनता चिंताक्रांत आहे. लवकरच या आजारातून मुक्त होवून जिल्ह्यातील लोकांच्या समस्यांना सोडविण्यासाठी ते सहभागी होणार आहेत.
अशावेळी एका बाजूस त्यांनी बरे व्हावेत ह्या शुभेच्छा देताना दुसर्‍या बाजूस जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेवर विश्वास नाही काय? अशा पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होय. ज्यांनी हा आरोप केला त्यांना जिल्ह्यातील जनता चांगलेच ओळखून आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची सुश्रुशा व सेवा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून यावर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सूक्ष्म लक्ष असल्याचेही आ. राजुरकर यांनी यावेळी सांगीतले.

दिलासादायक भोकर मधील 'त्या' तिस-या संशयीत चालकाचा कोरोना स्वॅब अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक भोकर मधील 'त्या' तिस-या संशयीत चालकाचा कोरोना स्वॅब अहवाल निगेटिव्ह 




भोकर (प्रतिनिधी)
शहरातील एका भागात  मुंबईहुन एक वेक्ती आला  होता तो 15 दिवस क्वाँरटींन राहिल्यानंतर त्या वेक्ती चा अहवाल पाँजिटिव्ह आढळल्याने भोकर शहरात एकच खळबळ उडाली होती.

 भोकर येथील आरोग्य विभाग,पोलीस विभाग व न.प.प्रशासकीय यंञनेने जलद गतीने यंञणा राबवुन भोकर येथील एका भागात राहणाऱ्या त्या वेक्तीच्या संपर्कात आलेल्या वाहन चालकासह ,त्यांच्या कुंटुबातील 2 लोकांना येथील कोविड सेंटर मध्ये क्वाँरटींन करुन त्या  लोकांचे तपासणी स्वँब रिपोर्ट  पाठविण्यात आले होते त्या दोन दिवसा नंतर कुटुंबातील 2 लोकांचे  रिपोर्ट अहवाल निगेटिव्ह आले पण चालका चा अहवाल आला नव्हता ते आज रोजी निघेटीव्ह आला आहे.

 त्यांमुळे भोकर शहरावरचे कोरोना वायरस चे तात्पुरते संकट टळले असले तरी 1 पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील कोविड सेंटर मध्ये उपचार  घेत आहे त्या  वेक्तीची प्रकृती स्थिर आहे  त्यामुळे नागरीकांनी कोरोना बाबतीत काळजी घ्यावी, असे आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे यांनी वारंवार सांगितले आहे.

 शहरातील सर्व प्रशासकीय यंञणा आपल्या साठी मोठे शर्थीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील नागरीकांनी आपले नातेवाईक मुंबई ,पुणे व इतर भागातील गावातील नागरीक जर भोकर ला आले तर भोकर येथील  रुग्नालयात होम क्वाँरनटाईन करावे किंवा संबंधित प्रशासकीय यंञेनेस कळवावे तरी शहरातील कोणत्याही नागरीकांनी माहिती दडपून ठेवु नये येथील आरोग्य विभाग,पोलीस विभाग  तहसील विभाग ,न.प.विभाग सर्वच प्रशासकीय  यंञणा आपल्या शहरासाठी अहोराञ परिश्रम घेत आहे. तरी नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले.

उमरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव 4 रुग्ण पॉझिटिव्ह

उमरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव 4 रुग्ण पॉझिटिव्ह



नांदेड (प्रतिनिधी)
देशभरासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता ग्रामीण भागातही पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. आज उमरी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. उमरी शहरात  चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. चार मध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे त्याच्यात एक 7 वर्षाचा मुलगा आहे व 9 व 14 वर्षांचे 2 मुली आहेत व तसेच एक 48 वर्षाची महिला आहे
चार ही रुग्ण हे बाहेरून आले होते
दरम्यान या सर्वांना उमरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदरील सर्व रुग्ण बाहेरून आल्यामुळे त्याना कोरोना ची लागण झाल्याचे समजते ते कोणा कोणाच्या संपर्कात आले आहे याची चौकशी सुरू आहे


उमरी तालुक्यात कोरोनाचा 4 रुग्ण सापडले आहे .त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे .प्रशासनाने  शहरात धाव घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत तालुक्यात मागील दीड महिन्यापासून कोरोनाविरुद्ध चांगला लढा देत कोरोनाला रोखले होते .मात्र आता कोरोनाचा शिरकाव तालुक्यात झाला आहे. मुंबई पुणे  येथून मोठ्या संख्येने नागरिक तालुक्यात येत आहेत. त्यांच्या मार्फतच कोरोना तालुक्यात पोहचला आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

मंत्री अशोकराव चव्हाण लवकर बरे व्हावेत मात्र त्यांचा नांदेडच्या वैद्यकीय सेवेवर विश्वास नव्हता काय ?: खा.चिखलीकर

मंत्री अशोकराव चव्हाण लवकर बरे व्हावेत मात्र त्यांचा नांदेडच्या वैद्यकीय सेवेवर विश्वास नव्हता काय  ?: खा.चिखलीकर



नांदेड : (प्रतिनिधी) पालकमंत्री तथा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी, ते लवकरात लवकर कोरोना मुक्त व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त करतानाच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण  उपचारासाठी मुंबईला गेले आहेत त्यामुळे अशोकरावांचा नांदेड च्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही का असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे असे मत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त आहे.
महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारे अशोकराव चव्हाण हे राज्याच्या सत्तेच्या राजकारणात अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. परिवहन मंत्री, महसूल मंत्री, सांस्कृतिक मंत्री यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री व  अशा विविध महत्त्वपूर्ण खात्याचे मंत्रिपद भूषविले आहेत. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचा नांदेडच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणातही सक्रिय सहभाग राहिला आहे. इतकी वर्षे राज्याच्या सत्तेत राहिल्यानंतरही नांदेडला जी आरोग्यसेवा आवश्यक आहे ती आरोग्यसेवा आतापर्यंतही उभारण्यात त्यांना यश आले नाही हे अशोकराव चव्हाण उपचारासाठी मुंबईला गेल्यानंतर सिद्ध झाले. इतक्या वर्षाच्या सत्तेच्या काळात नांदेडमध्ये मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आरोग्य सेवा निर्माण कारणे आवश्यक होते.परंतु चव्हाणांना ते आतापर्यंत जमले नाही हे ते उपचार घेण्यासाठी मुंबईला गेल्यानंतर सिद्ध झाले आहे.  खरे तर नांदेडच्या आणि काँग्रेसच्या राजकारणात अशोकराव यांची नितांत गरज आहे .त्यामुळे त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारली पाहिजे अशी आपली सदिच्छा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणात ते सत्तेत सहभागी असतानाही नांदेडला योग्य आरोग्यसेवा उभारता आली नाही हेच यातून दिसून येते.  वास्तविक नांदेड शहरामध्ये 50हून अधिक  कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा, आरोग्य यंत्रणा योग्य रीतीने काम करत असल्यानेच ते रुग्ण बरे झाले आहेत . त्यामुळे नांदेड च्या आरोग्य सेवेत उपचार न घेता पालकमंत्री मुंबईला उपचार घेण्यासाठी जाणे हे येथील आरोग्य विभागावर, त्यांच्या कामावर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची मानसिक खच्चीकरण करणारी ही बाब आहे. शिवाय जे गोरगरीब कोरोणा बाधित रुग्ण आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण करणारा हा प्रकार आहे.

अशोकराव चव्हाण यांच्यावर  नांदेड मध्ये जर उपचार करण्यात आले असते किंवा त्यांनी येथेच उपचार येथे घेतले असते तर नांदेडच्या आरोग्य सेवेवर नांदेड जिल्ह्यातील लोकांचा, कोरोना रुग्णांचा आणि महाराष्ट्रातील एकूण आरोग्य यंत्रणेचा ही मोठा विश्वास निर्माण झाला असता. दुर्दैवाने नांदेडच्या आरोग्य यंत्रणेला ही संधी मिळाली नाही त्यामुळे अशोकराव चव्हाण यांचा आरोग्य विभागावर त्यांच्या आरोग्य सेवेवर विश्वास नाही काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडला आहे असे मतही खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.

प्रशासकीय यंत्रणा पोलिस यंत्रणा आरोग्य यंत्रणा एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना स्वतः पालकमंत्री यांनी यांचेवर गैरविश्वास करावा ही बाब जिल्ह्यातील अनेकांना खटकली आहे. त्या बरोबर जे 133 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यांच्या मनात आरोग्य विभागाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाने जेवढे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांनाही मुंबईला घेऊन जायला पाहिजे. प्रशासनाने कोरोना संदर्भात तरी दुजाभाव करू नये, असे मत जनता व्यक्त करत आहे.
 अशोकराव लवकरात लवकर कोरोणा मुक्त व्हावेत, नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात ते लवकरच परत येतील परंतु दुरुस्त होऊन आल्यानंतर तरी नांदेड शहर, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी  व लोकांचा या आरोग्य विभागावर विश्वास बसण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असे मतही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

धक्कादायक:जगातील सर्वोच्च तापमानाच्या 'टॉप टेन'मध्ये विदर्भातील तीन शहरे!

धक्कादायक:जगातील सर्वोच्च तापमानाच्या 'टॉप टेन'मध्ये विदर्भातील तीन शहरे!



- अकोला, नागपूर आणि चंद्रपूर
- भारतातील नऊ शहरांचा समावेश


नांदेड, दि.२६: मागील २४ तासात जगामध्ये सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील तीन शहरांची नोंद झाली आहे. अकोला, नागपूर विमानतळाचे सोनेगाव आणि चंद्रपूर अशी या तीन शहरांची नावे आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यातील तापमानाने कहर गाठला आहे. जगात हवामानाची नोंद ठेवणाऱ्या संकेतस्थळावर सर्वाधिक तापमानाच्या पहिल्या १५ शहरांमध्ये भारतातील ९ आणि पाकिस्तानातील ५ आणि दक्षिण आफ्रिकेतील एका ठिकाणांची नोंद केली आहे.

भारतातील नऊ शहरांमध्ये राजस्थानातील चार, महाराष्ट्रातील विदर्भाची तीन तसेच उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशातील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे.

राजस्थानातील चुरू (४७.५ अंश सेल्सिअस) जगात दुसऱ्या व देशात पहिल्या क्रमांकाचे तापमान नोंदवल्या गेले. त्यापाठोपाठ  विदर्भातील अकोला येथे जगात तिसऱ्या क्रमांकाचे ४७.४ अंश सेल्सिअस तापमान होते. पाचव्या क्रमांकावर नागपूर सोनेगाव  (४७.०), सहाव्या क्रमांकावर राजस्थानच्या गंगानगर (४६.९), सातव्या  क्रमांकावर राजस्थानातील बिकानेर आणि विदर्भातील चंद्रपूर (४६.८), आठव्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील बांदा आणि मध्यप्रदेशातील खजुराहो (४६.६) तसेच नवव्या क्रमांकावर राजस्थानातील कोटा (४६.५) असा जागतिक उच्चांकी तापमानाचा क्रम आहे. सोमवारी नांदेड शहराचे तापमान ४५.६ पर्यंत पोहचले होते. वर्षभरातील हे सर्वाधिक तापमान असले तरी दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता पुढील दोन आठवडे तापमान वाढत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे.


- अंटार्क्टिकात कमी तापमानाचा निच्चांक
भारत आणि पाकिस्तान सारखा एकमेकांचा शत्रू राष्ट्र तापमानाच्या प्रकोपाशी लढत असताना तिकडे अंटार्क्टिकात तापमानाचा निच्चांक नोंदवला गेला आहे. मागील २४ तासात पहिल्या १५ शहरांमध्ये तेथील सर्व शहरांचा समावेश असून  -६७.९ ते -४०.७ पर्यंत तापमान नोंदवले गेले.


Monday, May 25, 2020

जिंतुरात शासनासह धर्मगुरूंच्याही आदेशाचे पालन ईदगाहवर होणारी विशेष नमाज सुद्धा घरीच अदा करण्यात आली ,

जिंतुरात शासनासह धर्मगुरूंच्याही आदेशाचे पालन
ईदगाहवर होणारी विशेष नमाज सुद्धा घरीच अदा करण्यात आली ,




जिंतुर प्रतिनिधी (सय्यद नसीर)
मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या दिवशीही शासनाच्या आदेशानुसार व स्थानिक धर्मगुरूंच्या विनंतीला मान देऊन जिंतुरात मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज घरी अदा करून ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे,
सध्या देशासह जगात कोरोना विषाणू या महामारीने सर्वत्र थैमान घातले असून त्यावर कोणत्याही प्रकारची लस तयार नसल्यामुळे त्याच्यावर एकमात्र उपाय म्हणुन 24 मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करून सोशल डिस्टनसिंगचा आदेश देण्यात आला आहे ,आणि दशातील सर्व नागरिक या आदेशाचे कडीचोट पालन करीत आहे तसेच या लॉकडाऊन दरम्यान मुस्लिम समाज बांधवांचा  पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे मागील दिनांक 25 एप्रिल पासून या पवित्र रमजान  महिन्यास सुरुवात झाली आणि या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव दिवसभर रोजा ठेऊन ,कुरआन चे पठण करतात आणि त्याचप्रमाणे रात्री तरावीची विशेष नमाज अदा करतात परंतु देशात लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे शासनाने व मुस्लिम धर्मगुरूंनी मुस्लिम समाज बामधवांना या लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून या महिन्यातील ईबादत म्हणजे रात्रंदिवातील पाचवेळची नमाज ,कुरआन पठण करणे ,आणि तरावीची विशेष नमाज सुद्धा घरातच अदा करण्याची सुचना दिल्या आणि मुस्लिम समाज बांधवांनीही या नियमांचे तंतोतंत पालन करीत आपल्या समाजातील  अनेक धार्मिक विधी पार पाडत देशासह जगात थैमान घालणाऱ्या या कोरोना या जागतिक महामरीतून देशासह जगाला मुक्ती मिळावी या साठी प्रत्यक दिवसातील प्रत्यक नामजात अल्लाहच्या दरबारात (दुआ) प्रार्थना केली आहे मात्र त्यानंतर महिन्याच्या शेवटी म्हणजे महिनाभर रोजेसह अल्लाहच्या आराधना केल्यानंतर ईद साजरी करतात या ईदचे एक वेगळे महत्त्व असल्याने मुस्लिम समाज बांधव या ईदच्या दिवशी नवीन कपडयासह आदी वस्तूची खरेदी करतात आणि ईदच्या दिवशी विशेष नमाज हे शहरातील ईदगाह मैदानात अदा करुन अल्लाहच्या दरबारात गुन्ह्याशी तौबा करून देशासह जगाच्या सुख शांतीसाठी ,सुख समृध्दीसाठी प्रार्थना करतात व आपल्या सोबती असलेल्या  हिंदू समाजबांधवांनाही यादिवशी शिरखुरमा पिण्याचे निमंत्रण देऊन एकदुसऱ्याशी गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊन अतिउत्साहाने ईद साजरी करतात   मात्र यावर्षी  तसे काही करण्यास जमले नसुन मुस्लिम समाजबांधवांनी कोणत्याही प्रकारची खरेदी न करता आणि आपल्या समाजातील  इतरसमाजातील समाजबांधवांना  मदत करून अत्यंत साध्या पद्धतीने आज  दिनांक 25 मे सोमवार रोजी रमजान ईद साजरी केली आहे आणि यात विशेष म्हणजे ईदची नमाज सुद्धा ईदगाह मैदानात अदा न करता आपापल्या घरीच अदा करून देशासह जगाच्या सुख शांती व समृद्धीसाठी व जगात थैमान घालुन जनजीवन उद्ध्वस्त  करणाऱ्या कोरोना या जागतिक महामरीतून सर्व जगाला मुक्ती मिळावी यासाठी विशेष (दुआ) प्रार्थना करुन अत्यंत साध्या पद्धतीने ही पवित्र ईद साजरी केली आहे

नांदेड;इतवारा व जिजामाता कॉलोनी सह ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची वाढ आज नवीन 6 पॉझिटिव्ह

नांदेड;इतवारा व जिजामाता कॉलोनी सह ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची वाढ आज नवीन 6 पॉझिटिव्ह




नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड  : जिल्ह्यात कोरोना कहर थांबता थांबेना अत्ता जिल्ह्यासहित ग्रामीण भागात कोरोना चे रुग्ण वाढत आहेत
नांदेड शहरात आज दि. 25 रोजी  आलेल्या अहवालात प्राप्त झालेल्या 96 अहवालापैकी 84 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह  आला आहे व तसेच अजुन 6 रुग्णांची कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे तर जिल्हयात एकुण 133 कोरोना रुग्णसंख्या झाली आहे.
आज प्राप्त झालेल्या 6 पॉजिटिव्ह रुग्णांपैकी इतवारा भागातील दोन रुग्ण या ( 2 पुरुष वय 27 व 32 वर्ष ) व आनंद कॉलनी, जिजामाता कॉलनी येथील एक रुग्ण (एक पुरुष वय 80 वर्ष ) मिल्लत नगर येथील एक पुरुष वय 55 वर्ष, वडसा तालुका माहूर येथील एक रुग्ण वय 17 वर्ष व दहेली तांडा तालुका किनवट येथील एक रुग्ण वय 29 वर्षे या सर्व रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे.

 आज दिनांक 25 रोजी  एनआरआय यात्री निवास कोव्हिड सेंटर येथील चार रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे आतापर्यंत 133 पॉजिटिव्ह रुग्णांपैकी 63 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व ऊर्वरित 63 रुग्णावर औषधोपचार चालू असून  एक  पुरुष  व एक  स्त्री  यांची  प्रकृती  गंभीर  आहे  तर  मृत्यू  झालेल्या  रुग्णांची  संख्या  7 झाली असल्याचे  जिल्हा  शल्य  चिकित्सक डॉ  निळकंठ  भोसीकर  यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे  सांगितले .
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

पत्रकाराविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्या कंदकुर्तीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पत्रकाराविषयी सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्या कंदकुर्तीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी




धर्माबाद (प्रतिनिधी) शहरातील गंगासिटी नगर मध्ये आरक्षित जागेवर अनाधिकृतरित्या भव्य मंगल कार्यालयाचे बांधकाम करणारे देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी सोशल मीडियावर पत्रकाराविषयी अपशब्द वापरल्यामुळे कंदकुर्तीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील पत्रकार बांधवांनी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
          शहरातील गंगासिटी नगर मध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी शासनानी सदरील जागा आरक्षित केली होती.परंतु देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी धनशक्तीच्या जोरावर भव्य अनाधिकृतरित्या मंगल कार्यालयाचे बांधकाम केले आहे.सदरील अनाधिकृत मंगल कार्यालयाचे बांधकाम पाडण्यासाठी येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर केला होता.परंतु सदरील ठराव पारीत होऊन सहा महिने उलटले आहे.परंतु मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे नगरपरीषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उलट सुलट चर्चा सुरू आहे.सदरील प्ररकरणाचे वृत्त अनेक पत्रकार बांधवांनी प्रकाशित केल्या होत्या.व गंगासिटी नगर मध्ये जुगार सुरू असल्याचे नागरीकांनी पत्रकारांना सांगितल्यानंतर काही वृत्तमान प्रत्रात सदरील जुगाराविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे पित्त खवळलेल्या देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांनी शनिवारी व्हाॅटसाफ गुरूपवरील झेड प्लस गुरुप मध्ये  पत्रकाराविषयी अपशब्द तेही घाणेरड्या भाषेत मजकूर टाकल्यामुळे पत्रकार बांधवात संतापाची लाट उसळली होती.सदरील घटनेचा निषेध पत्रकार संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,व्यापारी व नागरीकांनी केला आहे.देवल्ला रामचंद्र कंदकुर्तीकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी येथील पत्रकार बांधवांनी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.यावेळी बहुभाषिक पञकार संघाचे अध्यक्ष माधव हानमंते, सुरेश घाळे, कृष्णा तिम्मापुरे,अंनतोजी कालीदास, गंगाधर धडेकर, बालाजी बकवाड, संपादक मनोज बुंदेले, सुमेध बनसोडे,सुदर्शन वाघमारे, राजेश मनुरे,सतिष शिंदे,मारोती झंपलवाड, गजानन चंदापुरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना पत्रकारांचा शिष्टमंडळ भेटणार असल्याचे बहुभाषिक पञकार संघाचे अध्यक्ष माधव हानमंते यांनी सांगितले आहे.

Saturday, May 23, 2020

खळबळजनक:नांदेड जिल्ह्यात बाल तपस्वींची निर्घृण हत्या!

खळबळजनक:नांदेड जिल्ह्यात बाल तपस्वींची निर्घृण हत्या!



नांदेड़ (प्रतिनिधि)
- उमरी तालुक्यातील घटना
नांदेड: उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री दीड वाजताच्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला, आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली.

महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.

- मठात आणखी एकाचा मृतदेह

ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. भगवान शिंदे रा.चिंचाळा ता. उमरी असे मयताचे नाव असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. पालघर मध्ये दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरू कडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग: नांदेड सह तालुक्यात कोरोनाचा फैलाव आणखी 6 रूग्ण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली 125

ब्रेकिंग: नांदेड सह तालुक्यात कोरोनाचा फैलाव आणखी 6 रूग्ण पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या झाली 125






नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड :- आज रोजी प्राप्त झालेल्या एकूण नमुन्यांच्या 135 अहवालां पैकी 120 निगेटिव अहवाल प्राप्त झाले व नवीन 6 रुग्णांचे  नमुने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 125 झाली आहे.

आता प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी कुंभार टेकडी 2 रूग्ण (1 पुरुष (वय 15), 1 महिला(वय 28)/ सकाळी येथील 3 रूग्ण पॉझिटिव्ह होते. करबला नगर 2 रूग्ण ( 1 पुरुष (वय 38), 1 महिला- वय 6) व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील  2 रूग्ण (1 पुरुष (वय34), 1 महिला- वय 22) या भागातील असुन सर्व रुग्णांना औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थितीत स्थिर आहे.

दोन युवक व एका चिमुकलीचा समावेश, मुखेडलाही आणखी दोन रूग्ण; दिवसभरात नऊ रूग्ण वाढले. कुंभार टेकडी, करबल्यात पॉझिटिव्हची मालिका सुरूच!

आज दिनांक 23 एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड केअर सेंटर येथील 1 रुग्ण व डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 2 रुग्ण असे एकूण 3 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. आतापर्यंत 125 पॉझिटिव रुग्णांपैकी 55 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित 62 रुग्णांवर औषध उपचार सुरू आहेत.


जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

दिलासादायक त्या कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील दोघेही निघेटीव्ह एकाचा अहवाल येने बाकी

दिलासादायक त्या कोरोना रुग्णाच्या कुटुंबातील दोघेही निघेटीव्ह एकाचा अहवाल येने बाकी



भोकर (प्रतिनिधी)
दिलासादायक बातमी आली आहे. भोकर येथील जो रुग्ण पोझिटिव्ह आढळला होता, त्याचा बाप आणि भाऊचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर ड्रायव्हर चा  रिपोर्ट अजून यायचा आहे. दोन महिन्यांनंतर भोकर तालुक्यात कोरोनाचा पोझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना व त्याच्या ड्रायव्हर ला क्वारंटाईन केले होते. आता त्यातील दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत व ड्रायव्हर चा रिपोर्ट येणे बाकी आहे

देशात कोरोना विषाणूने चांगलाच थैमान घातला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरली आहे.

भोकर तालुका आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे यांनी एकाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर भोकर प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील दोघांचे नमुने निगेटिव्ह आल्याने थोडी चिंता कमी झाली आहे. मात्र, एकाचा  अहवाल अद्याप यायचा आहे.

नांदेड जिल्हा पूर्ण चालू सलून, शीतपेय, चहा, टपरी,पानठेल्यांना हिरव कंदील, अजून खूप काही

नांदेड जिल्हा पूर्ण चालू सलून, शीतपेय, चहा, टपरी,पानठेल्यांना हिरव कंदील, अजून खूप काही





नांदेड (प्रतिनिधी)
सलूनसाठी घरूनच टॉवेल आणा!
- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
- सर्व दुकाने सुरू ठेवण्याचे विस्तारित आदेश
- शासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक
- जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही
- कापड, चप्पल-बूट, ज्वेलर्स हाताळण्यावर मर्यादा



- सोमवार ते रविवार याप्रमाणे आठवड्यातील सातही दिवस सकाळी ९ ते ५ दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा. (त्यामुळे पूर्वी सुरू ठेवण्यास मुभा असलेली दुकानेदेख आता नवीन सुधारित वेळेत सुरू राहतील)

* संचारबंदी:
- दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ (सूट दिलेले अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता)

- व्यायामशाळा बंद, पण शारीरिक अंतर राखून व्यायामास परवानगी
- प्रेक्षक व समूह यांना थांबण्यास मनाई

- शीतपेयांची दुकाने, चहा टपरी, पानठेल्यांना हिरव कंदील
(

- कापड व रेडिमेड दुकाने, चप्पल बूट, ज्वेलर्स सुरू करण्यास परवानगी; पण दुकानातील मालक व  कामगार वगळता एकापेक्षा अधिक ग्राहकांना साहित्य प्रत्यक्ष हाताळण्यास मनाई (वारंवार सनेटायझरचा वापर बंधनकारक)

- लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या मर्यादेत सकाळी ७ ते सायंकाळी ५ ची वेळ
- दहा वर्षाखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, आजारग्रस्त व्यक्ती यांना आरोग्याशिवाय अन्य कारणासाठी बाहेर पडण्यास मनाई

* केश कर्तनालय/ सलूनसाठी अटी व शर्ती :
 १. प्रत्येक ग्राहकाने फोनवर पूर्वकल्पना देऊन वेळ ठरविल्याशिवाय प्रवेश नको.
२. प्रत्येक ग्राहकाने स्वतःचा स्वतंत्र टॉवेल/नॅपकिन सोबत आणणे अनिवार्य. नसेल तर प्रवेशास मनाई. एकाचा टॉवेल दुसऱ्यास वापरण्यास सक्त मनाई.
३. सलून साहित्य प्रत्येक ग्राहकास वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक.
४. सलूनमध्ये सेवा देणारा व घेणारा वगळून इतर प्रत्येक दोन ग्राहकांमध्ये तीन फूट अंतर असावे.
५.चार पेक्षा अधिक ग्राहकांना थांबण्यास परवानगी नाही.
६. दाढी, केशकर्तन व सलून झाल्यानंतर खुर्ची प्रत्येक वेळी निर्जंतुक करणे आवश्यक.

काय काय सुरू राह

- दारुची दुकाने
- वैद्यकिय सुविधा पुरविणारे दवाखाने/ क्लिनिक (OPD)/औषधी दुकाने (२४ तास)
- कृषी व जनावरांसाठी आवश्यक साहित्याची विक्री
- टॅक्सी, कॅब, रिक्शा चारचाकी वाहने (१+२ व्यक्ती)
- दुचाकी वाहने (१ व्यक्ती)
-  जिल्हा अंतर्गत बस सेवा (५० टक्के क्षमतेने)
- मालाचा पुरवठा
- औद्योगिक आस्थापना (शहरी)
- औद्योगिक आस्थापना (ग्रामीण)
- शहरी भागातील सीटू बांधकाम
- इतर खाजगी बांधकाम स्थळे
- शहरी एकल विक्रेता दुकाने
- अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने
-  ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तू
- ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तू
- खाजगी कार्यालये
- शासकीय कार्यालये (१०० टक्के उपस्थिती आवश्यक)
- कृषिविषयक कार्य
- बँक आणि वित्त
- कुरियर व पोस्टल सेवा - 
- वैद्यकिय अतितात्काळ सेवांची हालचाल
- केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून
- प्रेक्षकांना व्यतिरिक्त स्टेडियम
- घरपोच सेवा देणारे रेस्टॉरंट
- दुय्यम निबंधक/ RTO/DY RTO
- शीतपेयांची दुकाने

** ही सर्व दुकाने शारीरिक अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

* काय काय बंद राहणार?
(

- हवाई,रेल्वे व मेट्रो प्रवास
- आंतरराज्य मार्ग वाहतूक
- शैक्षणिक संस्था
- आदरातिथ्य/ हॉटेल
- शॉपिंग मॉल्स
- प्रार्थना स्थळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे
- ६५ वर्षे वयावरील व १० वर्षे वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये-जा
- आंतरजिल्हा बस सेवा
 शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून)
- शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल
- सामाजिक/धार्मिक/शैक्षणिक/राजकीय कार्यक्रम/सभा/मेळावे
- व्यायामशाळा, जल तरणिका
- सर्व धार्मिक स्थळे
- हॉटेल/रेस्टारंट/बार/धाबे
- तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री

* कँटेटमेंट झोनमध्ये फक्त मालाचा पुरवठा ही एकमेव  सेवा सुरू राहील.



* असा लागेल दंड:

+ शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड!

* खालील कारणासाठी एक हजार रुपये दंड
१.शारीरिक अंतर ठेवले नाही
२. थुंकल्यास
३.मास्क न वापरल्यास

** नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांना ५ हजार दंड व दुकान बंद **

+ लग्न समारंभाची मर्यादा २० वरून ५० वर

+ ग्राहक जास्त वेळ थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा देता येईल. हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवता येईल

(सोबत सविस्तर आदेशाची प्रत जोडत आहे.)

 काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा
 आपण कोरोना सोबत त्याच्याशीच लढून जगतोय, याचे भान प्रत्येक वेळी असू द्या

Friday, May 22, 2020

अवैध वाळू चा ट्रक पकडला वाळु माफियांचे धाबे दणाणले

 अवैध वाळू चा ट्रक पकडला वाळु माफियांचे धाबे दणाणले                                                               

भोकर (प्रतिनिधी)
भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्याने अस्वस्थ झालेल्या वाळूमाफियांनी आता बंदिस्त ट्रकद्वारे वाळू वाहतूक सुरू केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.  एक ट्रक तहसीलदारांनी गेल्या आठवड्यात पकडला होता अत्ता आणखी एक ट्रक पकडण्यात आला आहे.
दिनांक 22 मे 2020 च्या रात्री 8 ते 9 च्या दरम्यान मुगट मार्गे आलेले वाहन नारवाट जवळ अवैध रीत्या 2 ब्रास वाळू हे गौण खनिज  वाहतूक करताना नायब तहसिलदार सोलंकर यांना तपासणी दरम्यान आढळून आला सदरील वाहन क्रमांक MH,26, AD, 0743, मालक  केशव माधव मुतकलवाङ,रा.वासरी,ता.मुदखेड, व चालक शिवाजी रामजी वहिंदे,रा.वासरी,ता.मुदखेड, यांच्यावर दंडात्मक कार्यवाही साठी ते वाहन जप्त करून तहसीलकार्यालयात आणण्यात आले आहे सदरील कार्यवाहीसाठी पथकात मंडळ अधिकारी मातुळ सुरेश कपाटे दिवशी येथील तलाठी राजकुमार मस्के यांचा सहभाग होता
सदरील वाहन भोकरचे उपजिल्हाधिकारी पावन चांडक यांच्या आदेशाने व सूचनेनुसार करण्यात आले आहे.

वाहतुकीचा नवा "फंडा'

गेल्या आठवड्या पासून तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली. सर्वसाधारणपणे खुल्या ट्रक, ट्रॅक्‍टर व डंपरमधून वाळू वाहतूक केली जाते. परंतु ही वाहने खुली असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे सहज शक्‍य होते. त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी आता त्यावर इलाज शोधून वाळू वाहतुकीचा नवा फंडा सुरू केला आहे. मालवाहू बंदिस्त ट्रकमधून वाळू वाहतूक होत असून, ट्रक बंदिस्त असल्याने वाळू दिसत नाही आणि इतर वाहनांपेक्षा अधिक साठा वाहून नेला जाऊ शकतो, म्हणून ही पद्धत अलीकडे सर्रास सुरू आहे.

लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन जागे करण्यासाठी नायगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा दि २२ मे रोजी घरीच उपोषण संपन्न

लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन जागे करण्यासाठी नायगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा दि २२ मे रोजी घरीच उपोषण संपन्न




नांदेड (प्रतिनिधी)
ज्या दिव्यांग बांधवाना चालता येत नाहि, जगात काय चाले ते दिसत नाहि, जगातील काही ऐकु येत नाहि दिव्यांग हक्क मिळावा म्हणुन बोलता येत नाहि पण देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान देऊन अनेक लोकप्रतिनिधी यांना सर्वोच्च पदावर मानसन्मान खासदार आमदार सर्व पदासाठी मते देऊन मोठे केले पण सतेची खुर्ची मिळताच सर्व सामान्य दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार यांच्या कडे कोणताही लोकप्रतिनिधी चे लक्ष दिसत नाहि.
अशा जागतिक करोना संकटकाळी पालकमंत्री, खासदार, आमदार, जी.प. अध्यक्ष, सर्व सभापती जी. प. सदस्य, प. स. सदस्य सर्व कमिटीचे अध्यक्ष यांनी जे मदत ज्या दिव्यांग. वृध्द निराधार याना करणे गरजेचे असताना आज घडीला उपेक्षित समाजाला मदत करण्याऐवजी आपले कार्यकर्ते संभाळून ठेवण्यासाठी मदत कमी फोटो काढून प्रसिध्दी जास्त असा प्रकार पाहायला मिळत आहे.
मते घेताना जशी चुरस लागते दिव्यांग आहे त्यांना चालता येत नाहि गाडीवर घेऊन या मते करुन घरी सोडा व ज्यांना दिसत नाहि त्यांचे मतदान विश्वासु व्यक्तीकडून करुन सतेत जाताना दिव्यांग वृध्द निराधार यांची आठवण होते पण अशा महामारी संकटकाळी लोकप्रतिनिधीना का? आठवण येत नाहि असा सवाल चधपतराव डाकोंरे यांनी केले
सर्व सामान्य जनतेसारखे जीवन स्शबळावर जगता यावे या ऊध्देशाने शासनाने दिव्यांग हक्क कायदा 2016 य्या नियमानुसार ग्रामपंचायत, नगरपंचायत नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद महानगरपालिका येथील दिव्यांग राखिव 5 टक्के स्वनिधीे निधि अधिक चोदावा वित विकास निधि हा दिव्यांग कायदा 2016 व शासन निर्णय 1 ते 6 निर्णय व मा ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचे 27 वेळा लेखी आदेश व वारंवार आदेश देऊनहि दिव्याग बांधवाना त्यांचा हक्क व न्याय का मिळत नाहि?
म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर याच्या नेतृत्वाखाली दि २२ मे २०२० रोजी आपल्या घरी सकाळी १०ते सायं. ६ वाजेपर्यंत एक दिवसाचे उपोषण करुन शासन प्रशासनास जागे करून आपला संताप व्यक्त केला असे आवाहन नांदेड अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले ,
नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,सय्यद मगदूम,चांदु आंबटवाड, चंद्रकांत बेलकर, साविञाबाई शिंदे, निवृति वडजे, बालाजी पा, गायकवाड़ भगवान,मिरकुटे एकनाथ बालाजी ताटे, शंकर पांचाळ, रावसाहेब बसवदे, दिंगांबर भूरे, मोहन कऊटकर माधव शिंदे, प्रल्हाद बेलकर, राजेश संञे, इत्यादि असे ता, प्रसिद्धि प्रमुख माधव बालाजी शिंदे बरबडा वाडी यानी दिली

मुदखेड शहर व परिसरामध्ये सध्या चालू असलेल्या अफवाह विश्वास ठेवू नका लॉक डाऊन चा पूर्णपणे पालन करा :-डॉ.संदिप पचलिंग साहेब

मुदखेड शहर व परिसरामध्ये सध्या चालू असलेल्या अफवाह विश्वास ठेवू नका लॉक डाऊन चा पूर्णपणे पालन करा :-डॉ.संदिप पचलिंग साहेब



मुदखेड (संदिप पवार निवघेकर)
डॉ.संदिप पचलिंग यांच्या दवाखान्यात कोरोना पेशंट आला होता अशी अफवाह सध्या शहरात चालू आहे पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.कारण वस्तूस्तिथी अशी आहे की, पुण्याहून एक व्यक्ती आलेला होता.त्यानंतर तो 13 तारखेला *पोट दुखत* असल्यामुळे दवाखान्यात आला त्या व्यक्तीवर साहेबांनी औषधोपचार केले व त्या व्यक्तीला समजून सांगितले की तु बाहेर इकडे-तिकडे फिरु नको,प्रवासातून आलेल्या लोकांनी सुरक्षित काळजी घ्यावी यामुळे तुला स्वतःला व इतरांनला काही होणार नाही.याची काळजी घे आणि होम क्वांरटाईन हो असा सल्ला डॉ.पचलिंग साहेबांनी संबंधित व्यक्तीला दिला.त्यानुसार तो व्यक्ती 14 तारखेपासून स्वतःच्या शेतामध्ये होम क्वारंटाईन झाला.त्या व्यक्तीची तब्येत चांगली असून तो सुरक्षितपणे काळजी घेत आहे.अशी माहिती डॉ.पचलिंग साहेबांनी मला दिली.याउलट मुदखेड शहर व परिसरामध्ये डॉ.पचलिंग साहेब व  त्यांच्या दवाखान्याबाबत विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत.ही चुकीची बाब असून जनतेने खरी वस्तूस्थिती जाणून घ्यावी.डॉ.संदिप पचलिंग साहेबांनी वैद्यकीय क्षेत्रांत चांगले कार्य केले आहे व करत आहेत.पेशंटला योग्य तो सल्ला देणे व औषधोपचार करणे यामध्ये ते परिपूर्ण अनुभवी आहेत हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे.महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे अगोदरच खाजगी दवाखाने काही काळ बंद होते.त्यामुळे रुग्णसेवा बरोबर होत नव्हती.आता कुठेतरी   दवाखाने सुरळीत सुरु होत आहे.त्यातच अशा वैद्यकीय क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींबाबत अफवा पसरून एक प्रकारचा मानसिक ञास देण हे अयोग्यच आहे.
याप्रसंगी जनतेने व रुग्णांनी कुठल्याच प्रकारचा संकोच मनामध्ये ठेऊ नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहान *डॉ.संदिप पचलिंग साहेब* यांनी केले.

त्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तिन जणांचे स्वाॅब चे नमुने प्रयोगशाळेत पाठविले

त्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तिन जणांचे स्वाॅब चे नमुने प्रयोगशाळेत पाठविले




भोकर (प्रतिनिधी )
भोकर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे ३ जणांना कोरोणा केअर सेंटर  येथे व ५० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे  तसंच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना किमान १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे  तसेच भोकर येथील कोंवीड केअर सेंटर येथे कोरोंटाइन करण्यात आलेल्या  तीन जणांचे स्वाँब नमुने अत्रीनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी घेतले व त्यांना  श्री झाहेद यांनी सहाय्य केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक,
 डॉ अशोक मुंडे  प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,सत्यजीत टिप्रेसवार,पांडुरंग तम्मलवाड मनोज पांचाळ
उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून
 भोकर मध्ये बाहेर गावावरून आलेल्यांना त्यात ग्रामीण भागांमध्ये ४ हजार २९३ तसेच शहरी भागांमध्ये ८०५ व्यक्तींना होमकोरर्टाईन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे,  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे, तसेच सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास सदर ॲप फायदेशीर ठरते असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूचित केले आहे

कोरोनाच्या संकटातही जीवमुठीत घेऊन काम करत असलेल्या पोलीसांना शिवीगाळ दोघावर गुन्हा दाखल


कोरोनाच्या संकटातही जीवमुठीत घेऊन काम करत असलेल्या पोलीसांना शिवीगाळ दोघावर गुन्हा दाखल .




भोकर (प्रतिनिधी)
कोरोनाच्या संकटातही पोलीस  जीवमुठीत घेऊन काम करत जनतेचा जीव वाचावं म्हणून उन्हात काम करत आहेत त्यांना हॅन्डग्लो नाही पी पी किट नाही नाही कित्येक पोलिस या कोरोना ने मरण पावले कित्येक पोलिसांवर उपचार सुरू आहे जीव धोक्यातघालून अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे लोकांनी त्यांना सहकार्य करायला हवे त्यांचा मान सन्मान करायला पाहिजे  मात्र, काही ठिकाणी परिस्थिती नेमकी उलटी दिसत आहे. पोलिसांवर हात उचलला जात आहे.
असाच प्रकार भोजर मध्ये घडला आहे.
दारू पिउन कर्तव्यावर असलेले कर्मचारी यांना खालच्या भाषत शिवीगाळ करून धक्का बुकी केल्याने दोन मद्यपीविरूध शासकीय कामात आउथळा केल्याचा गुन्हा दाखल करून गजाउनाड केले आहे .
भोकरशहरात गेल्या अनेक दिवसापासून डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथील वाहतूक सुरळीतरहावी त्याचबरोबर शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीसाकडून सदापोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात . दि .२१ रोजी जनता कर्फ्यू असतांना सायंकाळी सहा वाजता मद्यपी दिलीप गुरूप्रसाद तिवारी, गंगाधर जयराम लोणे हे दारूच्या नशेत कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी इश्वर बळीराम राठोड यांचे कॉलर पकडून तुमच्यामुळे आमच्या भोकरला करोना रुग्ण आला म्हणून अत्यंत अर्वाच्य भाषत शिवीगाळ केली .करोनाच्या कालावधीत चोखपणे आपले कर्तव्य बजावनारे पोलीस यांना मदत करणे त्यांच्या कर्तव्याची प्रशंसा करून त्यांना सहकार्य करणे गरजेचे असतांना अशा प्रकारचे अशोभनीय वर्तन या मद्यपीने केल्याने कर्तव्यावरील इश्वर बळीराम राठोड यांनी पोलीसात तक्रार दिल्यांने ३५३, ३३२, ५०४, १८८, १८६, २६९, २७०, ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघा मद्यपीनां तात्काळ आटक करून गजाआड करण्यात आले असून भोकर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस .बी. डेडवाल हे पुढील तपास करत आहेत .

नांदेड ब्रेकिंग:शनिवार पासून सकाळी ९ ते ५ गर्दीची ठिकाणे वगळून सर्व बाजारपेठ सुरू

नांदेड ब्रेकिंग:शनिवार पासून सकाळी ९ ते ५ गर्दीची ठिकाणे वगळून सर्व बाजारपेठ सुरू




नांदेड (प्रतिनिधी)
गर्दीची ठिकाणे वगळून उद्यापासून सर्व बाजारपेठ सुरू करणार!
-मा.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश
दुकानांसाठी सुधारित वेळ: सकाळी ९ ते ५
दिवस: संपूर्ण आठवडा
संचारबंदी: दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ (सूट दिलेले व्यक्ती वगळता)
+ शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड!

+ ग्राहक थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा देता येईल. हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवता येईल.
शारीरिक अंतर ठेवले नाही/थुंकल्यास/मास्क न वापरल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड लागणार
+ दुचाकीवर एक, ऑटो मध्ये चालक+२, चारचाकी वाहनात चालक+२ याप्रमाणे परवानगी
 बसेससाठी ५० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी
लग्न समारंभाची मर्यादा २० वरून ५० वर
हे बंदच राहणार..
- चहा टपरी, पान ठेले
- विमान, रेल्वे प्रवास
- शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतर शिक्षण वगळून)
- शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल
- सामाजिक/धार्मिक कार्यक्रम
- व्यायामशाळा, जल तरणिका
- सर्व धार्मिक स्थळे
- हॉटेल/रेस्टारंट/बार/धाबे
- आठवडी बाजार
- शीतपेयांची दुकाने
- तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री

वरील ठिकाणे वगळता गर्दी न होणारी इतर दुकाने एका वेळी जास्तीत जास्त पाच ग्राहक दोघांमध्ये सहा फूट शारीरिक अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

 नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांना ५ हजार रुपयांचे दंड व दुकान बंद
काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा

आपण कोरोना सोबत त्याच्याशीच लढून जगतोय, याचे भान प्रत्येक वेळी असू द्या

बिलोली तालुक्यात कोरोना चा पहिला रूग्ण सापडला नागरिकांनी घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी

बिलोली तालुक्यात कोरोना चा पहिला रूग्ण सापडला नागरिकांनी घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी




नांदेड:- शहरानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना विषाणुचा फैलाव सुरू झाला असून बिलोली तालुक्यात कोरोना चा पहिला रूग्ण आढळला असून रूग्ण केरूर येथील रहिवासी आहे. अशी माहिती बिलोली चे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा तसेच बिलोली तालुका प्रशासन दिवस-रात्र प्रयत्नशील होते.तब्बल दोन महिन्यात एकही कोरोना रूग्ण बिलोली तालुक्यात सापडला नव्हता.पण दि.१७ मे रोजी तालुक्यातील केरूर येथील रहिवासी असलेला रूग्ण त्रास होत असल्याने तो नांदेड येथुन केरूर येथे न जाता थेट बिलोली येथील उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल झाला.त्याचे स्वँब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता.त्याचा अहवाल दि.२१ मे रोजी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आला असून त्याचेवर बिलोली शहरातील कोविड सेंटर येथे सध्या उपचार चालू असून नागरिकांनी आपल्या घरी राहून प्रशासनास सहकार्य करावे.अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.
             कोरोना विषाणूने शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही पसरत असल्याने नागरिकांनी अधिक सावधानता बाळगत घरी राहून प्रशासनास सहकार्य करावे.बिलोली तालुक्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्याने  एकच खळबळ उडाली आहे.



Thursday, May 21, 2020

नांदेड जिल्हा माहिती अधिकारी पदी विनोद रापतवार

नांदेड जिल्हा माहिती अधिकारी पदी विनोद रापतवार




           महाराष्ट्र शासनाने श्री विनोद रापतवार यांची नेमणूक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात   वरिष्ठ सहायक संचालक (अधिसंख्य) म्हणून केली आहे. तथापि, त्यांच्या सेवा जिल्हा माहिती अधिकारी ,नांदेड म्हणून उपलब्ध करून दिल्या आहेत. या नियुक्ती बद्दल श्री रापतवार यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.श्री रापतवार लवकरच आपल्या पदाची सूत्रं घेत आहेत.

दिलासादायक:-कोरोनाचे एकुण 41 रुग्ण उपचारांने बरे तर 62 रुग्णांवर औषधोपचार

दिलासादायक:-कोरोनाचे एकुण 41 रुग्ण उपचारांने बरे तर 62 रुग्णांवर औषधोपचार सुरु




नांदेड, दि. 21  (कालीदास अनंतोजी) :- डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील 3 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड केअर सेंटर मधील 1 रुग्ण व यात्री निवास एनआरआय कोवीड सेंटर येथील 1 रुग्ण असे एकुण 5 रुग्ण औषधोपचारामुळे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 110 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 41 रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत 62 रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.
   जिल्ह्यात एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 26 हजार 716 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 827 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 461 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून बुधवार 21 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 66 रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व 64 रुग्णांचे स्वॅब तपासणी चालू आहे. घेतलेल्या एकुण स्वॅबपैकी 110 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
  आतापर्यंत एकुण 110 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 41 रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचे 62 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 51 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 1 रुग्ण, भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण असून या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 50 जणांना होम कोरोंटाइन

त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 50 जणांना होम कोरोंटाइन



भोकर (प्रतिनिधि)
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबई, पुण्यामध्ये वेगाने वाढते आहे. त्यातच  भोकर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे 3 जनाना रुग्णालयात व 50 जणांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय तालुका अधिकारी राहुल वाघमारे यांनी घेतला आहे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

देशभरात 1लाखाच्या वर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून या रोगाने हजारो बळी घेतले आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नक्कीच आहे.  काल भोकर येथील पवार कॉलोनी येथील एका युवकाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह येताच 2 फॅमिली मेम्बर व एक ड्रायवर यांना रुग्णालयात कोरोंटाइन तर  50 जणांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
 तसंच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना किमान 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून होम क्वारंटाईन केले आहे
 भोकर मध्ये बाहेर गावावरून आलेले तसेच ग्रामीण भागांमध्ये 4 हजार 293 तसेच शहरी भागांमध्ये 805 व्यक्तींना होमकोरर्टाईन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे, काल पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांला भोकर येथील कोविंड केअर सेंटर, शासकीय समाज कल्याण वस्तीगृह किनवट रोड भोकर येथे देखरेखीखाली व ईलाजास्तव ठेवण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे, तसेच सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास सदर ॲप फायदेशीर ठरते असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूचित केले आहे

पवार कॉलोनीचे सर्व रस्ते सील प्रशासनाला सहकार्य करा:- पोलीस निरीक्षक विकास पाटिल

पवार कॉलोनीचे सर्व रस्ते सील प्रशासनाला सहकार्य करा:- पोलीस निरीक्षक विकास पाटिल




भोकर (प्रतिनिधि)काल भोकर येथील एका युवका चा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे पवार कॉलोनी कडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊन कायदा मोडू नये असे आवाहन भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटिल यांनी केले आहे.
     कोरोना साथ रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश  लागू आहे त्यात भोकर येथे 2 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.  शहरातील पवार कॉलोनी भागात एक रुग्ण आढळून आल्या नंतर पवार कॉलोनी कडे जाणारे सर्व रस्ते कोणतीही वाहतूक करण्यास बंद करण्यात आले आहेत.
  भोकर शहरात जनता कर्फ्यू असल्यामुळे नागरिकांनी काम नसेल तर रस्त्यावर येऊ नये असे आवाहनही  पाटिल यांनी केले आहे.  पोलीस कर्मचारी ऊन व कसल्याही संकटाची तमा न बाळगता रस्त्यावर सेवा बजावत आहेत त्या मुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

Wednesday, May 20, 2020

भोकर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात खळबळ..!

भोकर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण..! तालुक्यात खळबळ..!




भोकर (प्रतिनिधी)
देशभरासह राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता ग्रामीण भागातही पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. आज भोकर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भोकर शहरात  एका 30 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या भोकर येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदरील व्यक्ती मुंबई येथुन आल्यामुळे त्याला कोरोना ची लागण झाल्याचे समजते तो कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे याची चॉकशी सुरू आहे 
तो वैक्ती पवार कॉलोनी येथील असून संपूर्ण एरिया सील करण्यात येणार असल्याचे समजते

भोकर तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पवार कॉलोनी येथे सापडला आहे .त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे .प्रशासनाने  शहरात धाव घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत  सदर व्यक्ती राहत असलेल्या घरातील 2 जणांना व त्याच्या ड्रायव्हर ला एकूण 3 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे .
तालुक्यात मागील दीड महिन्यापासून कोरोनाविरुद्ध चांगला लढा देत कोरोनाला रोखले होते .मात्र आता कोरोनाचा शिरकाव तालुक्यात झाला आहे. मुंबई येथून मोठ्या संख्येने नागरिक तालुक्यात येत आहेत. त्यांच्या मार्फतच कोरोना तालुक्यात पोहचला आहे.

  पोलीस निरीक्षक विकास पाटील ,तहसीलदार भरत सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, आदींनी पवार कॉलोनी येथें जाऊन पाहणी केली आहे . तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आले आहे .मुंबईवरून पुण्यातून येणारे नागरिक सर्रास कुठेही फिरताना आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल .त्यांना प्रशासनाने कोरोनटाईन केले आहे

भोकर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर व खासगी डॉक्टर्ससाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फेस शिल्डचे वाटप

भोकर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर व खासगी डॉक्टर्ससाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फेस शिल्डचे वाटप



भोकर तालुका (प्रतिनिधी)
भोकर शहर व तालुक्यातील आशा वर्कर , आरोग्य अधिकारी , तथा खासगी डॉक्टरांच्या वापरासाठी फेस शिल्डचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले ।

जग भरात सुरू असलेल्या महामारीच्या पार्श्र्वभूमीवर दिवस रात्र लढणारा सर्वात महत्वाचा  घटक म्हणजे डॉक्टर, आशा वर्कर,आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,  जिवाची पर्वा न करता सामाजिक बांदुलकी जोपासण्या करीता दिवस रात्र आपल्या घरा , मुलं, बाळा पासून दुर राहून समाजातील नागरिकांना या कोरोना सारख्या अजारा पासून वंचीत राहण्याकरिता हा वर्ग पूर्ण पणे कार्यरत आहे.

कोरोना महामारीच्या वेळी विविध खेडेगावात जाऊन आरोग्य सुविधा पुरविण्याचे महत्वपूर्ण कार्ये हे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी करीत आहे , हे लोक गावात प्रत्येक्ष फील्डवर काम करताना त्यांचा संपर्क बाधित व्यक्तीबरोबर येत असतो अश्या वेळी त्यांच्या स्वरक्षणासाठी फेस शिल्ड महत्वाचा असा एक उपयोगी ढाल सारख त्याच कार्य असते कारण रुगणाच्या तोंडातून जे दवबिंदू बाहेर पडतात ते सरळ आशा वर्कर किंवा आरोग्य अधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क होऊ देत नाही ।आणि असल्या प्रकारे कॉरोना पासून त्यांचे रक्षण होते ।ह्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भोकर विधानसभा संपर्क प्रमुख बाळू देशमुख कामनगावकर , राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष ऍड शिवाजी कदम , डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ फेरोज इनामदार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ राहुल वाघमारे , ग्रामीण रुग्णालय भोकरचे अधीक्षक डॉ मुंडे , राष्ट्रवादीचे मा नगरसेवक खाजा तौफिक , मा नगरसेवक वकील खैराती , मा पंचायत समिती सदस्य जवाज बरबडेकर यांच्यासह तालुक्यातील CHO डॉक्टर्स , ANM नर्स , आशा वर्कर्स आदी उपस्थित होते

Tuesday, May 19, 2020

कोरोना कहर :-नांदेड़ मध्ये शंभरी पार एकाच कुटुंबातिल सहा पॉजिटीव्ह

कोरोना कहर :-नांदेड़ मध्ये शंभरी पार एकाच कुटुंबातिल सहा पॉजिटीव्ह



नांदेड़ प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ मंगळवारी १८२ जणांच्या अहवालांची प्रतिक्षा होती़ त्यातील २८ जणांचा अहवाल सकाळी प्राप्त झाला़ त्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. दरम्यान रात्री उशिरा आणखी १३७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२४ अहवाल  निगेटिव्ह आले असले तरी आठ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १०६ वर जाऊन पोहचली आहे़
प्रलंबित असलेले १३७ कोरोना आवहाल नुकतेच आले आसून यात १२४ रिपोर्ट निगेटीव्ह तर ०८ रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. ०५ रिपोर्ट अवैध आले आहेत.

मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून ही संख्या १०६ झाली आहे.या आठ पैकी सहा जण एकाच कुटूंबातील असल्याचे सांगण्यात येते.
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या स्वॅब तपासणी अहवालामुळे नांदेडकरांची चिंता अधिकच वाढली आहे. मंगळवारी सकाळी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री उशिरा १३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या १०६ वर गेली आहे.रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये ५ पुरुष, दोन महिला आणि एका चार वर्षीय मुलाचा समावेश आहे

बाधीतांची संख्या १०६ वर गेली आहे. या पैकी ५ जनांचा मृत्यू झाला आसून ३० जन बरे झाले आहेत. २ फरार आसून इतरांवर उपचार सुरु आहे


ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो - प्रकाश आंबेडकर

ग्रामीण भागात मजुरांना काम द्या, अन्यथा काय करायचे ते सांगतो -  प्रकाश आंबेडकर




पुणे दि.१९ -  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी  राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम देण्यात यावे, त्यासाठी मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, काम न दिल्यास पुढे काय करायचे ते मी सांगतो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मजुरांना केले आहे.
            शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झालेला नाही, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी खेड्यापाड्यांमध्ये मजुरांना दुरुस्तीचे काम, रस्त्याचे काम  तसेच खोद काम मिळत होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली नव्हती. मात्र आता हे काम बंद झाल्याने शेतकरी, गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी गरज असलेल्या सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा आणि त्या अर्जा मार्फत रोजगार हमी योजना किंवा नरेगा द्वारे काम देण्याची मागणी करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. देशात नोकरी तसेच व्यवसाय करणाऱ्यांकडून शासन मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल करतात. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागात गरीब मजुर, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम मिळावे. त्यामुळे ज्या मजुरांना कामाची गरज आहे, त्यांनी सरपंच, तलाठी किंवा ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. अर्ज दिल्यानंतर तीन दिवसात काम मिळाले नाही तर आपल्याला बेरोजगार भत्ता देण्याची सोय यामध्ये आहे. त्यामुळे सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. त्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी तर दुसरी प्रत बीडीओ आणि तहसिलदाराकडे पाठविण्यात यावी, त्यांनी आपल्याला काम दिले नाही तर पुढे काय करायचे ते मी सांगतो, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

Sunday, May 17, 2020

मुंबईतुन भोकरला आले 21 जन..!त्यांना जी.प.शाळेत केले क्वारंटाईन.!

मुंबईतुन भोकरला आले 21 जन..!त्यांना जी.प.शाळेत केले क्वारंटाईन.!



 भोकर (प्रतिनिधी)
लॉकडाऊनच्या काळात मूळ गावी जाण्यास परवानगी मिळाल्याने 21 जण मुंबईतून सकाळी फुले नगर भोकर येथे दाखल झाले आहेत. ही माहिती मिळताच त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची पाहणी करून आणि आरोग्य तपासणी करून त्यांना शिक्के मारून भोकर येथील जिल्हा परिषद शाळा येथे  क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे,व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधीक्षक अशोक मुंढे, यांनी दिली. तसेच सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन पाळण्याच्या सूचना भोकर पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी नागरिकांना दिले आहे.
उपविभागीय अधिकारी पवन चांडक,तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार भोकर येथे योग्य ती दक्षता व खबरदारी घेण्यात येत असून या विषाणूचा संसर्गाचा एकही रुग्ण परिसरात आढळलेला नसल्याची माहिती दिली आहे मुंबई,पुणे, परिसरातून गावात येणाऱ्यांची संख्या वाढली असून असे नागरिक मिळेल ती वाहने व सापडेल त्या मार्गाने गाव गाठत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनाशी जिद्दीने लढा देत असलेल्या नागरिक व प्रशासनाची डोकेदुखी वाढणार असल्याने सर्वच जण चिंतेत असल्याचे पाहावयास मिळत आहे या सर्व साठी ,बी.ई.ओ.भोकर मठपती, व मुख्याधिकारी प्रिंयका टोंगे,व तसेच भोकरचे तलाठी मडगूलवार,वैष्णव, आदी नी परिश्रम घेऊन आपापली जीमेदारी निभावली

बाप रे: नांदेडध्ये वाढले अजुन 13 रुग्ण ; एकूण संख्या 97 त्यात शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णाचा समावेश

बाप रे: नांदेडध्ये वाढले अजुन 13 रुग्ण ; एकूण संख्या 97 त्यात शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णाचा समावेश




नांदेड़ (प्रतिनिधि)
रविवारी नवीन 13 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 9 रुग्ण प्रवासी असून 1 रुग्ण करबला भागातील तर 2 रुग्ण अबचलनगर भागातील आहे. व ग्रामीण बारड येथील 1 रुग्ण आहे. सदरील रुग्णांपैकी 12 पुरुष (अनुक्रमे वय वर्ष 13, 14, 14, 19, 24, 25, 30, 37, 44, 50, 74) तसेच 1 स्त्री ( वय वर्ष 57) आहेत. सदरील रुग्ण या रुग्णांवर यात्री निवास एनआरआय भवन व बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचार सुरु आहेत.

16 मे 2020 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार 14 व 16 मे रोजी पाठविण्यात आलेल्या स्वॅब पैकी 374 रुग्णांचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये नवीन 13 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 97 वर पोहचली आहे.

नांदेड जिल्ह्यात 97 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 26 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचार सुरु असलेल्या 64 रुग्णांपैकी- 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, तसेच पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे- 54 रुग्ण व बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये- 2 असून औषधोपचार सुरु आहेत.

जनतेनी अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Saturday, May 16, 2020

नांदेड :-लॉकडाऊनमुळे उपवाशी मरणाची आली वेळ..! म्हणून त्याने घरातच गळफास घेऊन संपवला जीवनाचा खेळ..!

नांदेड :-लॉकडाऊनमुळे उपवाशी मरणाची आली वेळ..!
 म्हणून त्याने घरातच गळफास घेऊन संपवला जीवनाचा खेळ..!



नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड येथील हदगाव शहरातील आझाद चौक वडार गल्ली येथील राजू मारुती बाभुळकर वय 40 धंदा मजुरी हा तरुण वडार समाजातील  दगड फोडण्याचे काम करत असे लॉक डाऊन कोरोणा महामारी मुळे काम नसल्यामुळे खाण्या चे वांदे झाले बायको लेकरं कसे पोसव प्रश्न पडल्याने  नैराश्यातून केली आत्महत्या
  सरकारने लॉक डाउन केल्यामुळे आज जवळपास पन्नास दिवसापासून हाताला काम नाही उपासमारीची वेळ येत आहे त्याच परिसरातील नातेवाइकाकडून त्याला रोज जेवण दिल्या जाई त्याच्यासोबत एक मुलगी राहत होती व त्याची पत्नी दोन मुले हे मुंबई येथे मोलमजुरी काम करण्यासाठी गेले होते पण करोणा या महामारी मुळे मुंबई लॉक डाऊन झाल्यामुळे  दिनांक 12 तारखेपासून हदगाव ला आले

कोविड सेंटर समाज कल्याण वस्तीग्रह मध्ये त्यांना कोरण टाइन करण्यात आले आहे हे माहिती त्यांना मिळाल्यामुळे माझ्याच खाण्यापिण्याचे वांदे होत असल्यामुळे मी दोन मुले पत्नी  इतक्या जीवाची कशी  वेवस्था करू या निराशेतून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या सोबत राहणारी मुलगी ही  नातेवाईक कडे रात्री झोपण्यासाठी गेली होती सकाळी आवाज दिला वडील दरवाजा उघडत नाही काय झाले असेल तिने आजूबाजूच्या लोकांना उठवले व दाराच्या फटीतून पाहिले तर वडिलांनी आत्महत्या केली ही खबर हदगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली त्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला तपास अधिकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल मुडीक हे करत आहेत त्यांना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे उत्तरीय तपासणी करून त्यांचा मृतदेह नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आला हाताला काम नसल्यामुळे नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केली असल्यामुळे हदगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे

हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशा पल्लवीत

हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशा पल्लवीत



नांदेड, (प्रतिनिधी) दि. 16 :- यावर्षी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाला वेळेवर सुरूवात होणार असून सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे  शेतकऱ्यांसाठी व कृषी विभागासाठी हे वर्षा समाधानाचे जाईल अशी आशा वाटते. कोविड-19 विषाणूच्या लॉकडाऊनच्या काळात शेती व्यवसायाला काही अंशी सूट मिळाली आहे. बळीराजा आता शेतीच्या पूर्वमशागतीसह इतर कामे पूर्ण करून पेरणीसाठी सज्ज होतो आहे.
कंधार तालुक्यात खरीप पेरणी क्षेत्र 68 हजार हेक्टर असून मुख्य पीक कापूस साधारणतः 28 हजार हेक्टरवर तर सोयाबीन साधारणत: 22 हजार हेक्टरवर पेरले जाते. त्यानंतर ज्वारी तुर मुग उडीद ही खरीप पिके प्रामुख्याने घेतली जातात. तालुक्यात यावर्षी खरीपासह रब्बी व उन्हाळी हंगामात पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली असून पीक घनता जवळपास 134 टक्के झाली आहे. रब्बी हंगामात हरभरा, गहू ,रब्बी ज्वारी तर उन्हाळी हंगामात भुईमूग, ज्वारी या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात तर तिळासह  भाजीपाला चारा पिकांची लागवड  करण्यात आली.
कृषी विभागाच्या विविध योजनांचा शुभारंभ
खरीप हंगाम 2020 मध्ये कृषी विभागामार्फत काही उपक्रम हाती घेतले असून यामध्ये सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणे वापरणे, या सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करणे व त्यानंतर बीजप्रक्रिया करून रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्यावर  विभागाने मार्गदर्शन करून भर दिला आहे. सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्फत तालुक्‍यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर घेतले जात असून नुकतीच उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते हाळदा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
कृषी निविष्ठाची खरेदी गटामार्फत
एकत्रितरित्या थेट बांधावर उपक्रमाचा शुभारंभ
कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव पासून सुरक्षित राहण्यासाठी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी कंधार तालुक्यातील आत्मा अंतर्गत नोंदणी झालेले गट व गावातील शेतकऱ्यांना अशा निविष्ठांची खरेदी एकत्रितरीत्या करण्याबाबत कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून थेट बांधावर कृषी निविष्ठा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज मौ. बिजेवाडी तालुका कंधार येथील वसंतराव नाईक शेतकरी गट यांना कृषी निविष्ठांचा थेट बांधावर पुरवठा या उपक्रमाअंतर्गत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते आज कंधार येथे करण्यात आला. यावेळी या 4 गटातील एकूण 70 शेतकऱ्यांना 20 टन रासायनिक खते व बियाणे  21  क्वि. थेट बांधावर विक्री करण्यात आले.
याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी नागोराव आंबुलगेकर, विकास नरनाळीकर, पवनसिंह बैनाडे , कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांची उपस्थिती होती. या निविष्ठांचा थेट बांधावर पुरवठा विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन मास्क बांधून व सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आला.
कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टरचलीत औजारांची पाहणी कंधार तालुक्यातील मौ. बहाद्दरपुरा येथे केली यावेळी शिवाजी गणपती पेठकर यांनी खरेदी केलेल्या रोटाव्हेटरची पाहणी केली. तालुक्यात यावर्षी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत औजारे साठी 52 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा केले.
मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीचा शुभारंभ
महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मौ. बिजेवाडी तालुका कंधार येथे कल्पवृक्ष फळबाग लागवड अंतर्गत आंबा फळपीक लागवडीचा शुभारंभ आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. चालू वर्षी या योजनेतून इच्छुक पात्र लाभार्थ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत व मोठ्या प्रमाणावर फळ पिकाची लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मौ. बिजेवाडी येथे गजानन संभाजी डांगे यांच्या आंबा फळ लागवडीचा खड्डे खोदण्याचा शुभारंभ आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते  करण्यात आला. तसेच सन 2018 19 मध्ये या योजनेअंतर्गत  लागवड केलेल्या संभाजी माणिकराव लुंगारे यांच्या आंबा लागवड केलेल्या फळपिकांच्या बागेला भेट देऊन पाहणी करण्यात आली.
निंबोळी अर्क घरी तयार करून  फवारणीसाठी  वापर करा
मागील काही वर्षापासून कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता या अळीमुळे दोन वर्षापूर्वी कापूस पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झालेले होते. शेंदरी अथवा गुलाबी बोंड आळीचे व्यवस्थापन करण्यासाठी कृषी विभागाकडून मागील काही वर्षापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून विविध उपाययोजनाद्वारे सेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कापूस फरदड मुक्ती अभियान राबविणे, पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड टाळणे, शेतातील पराठी काडी-कचरा जाळून नष्ट करणे, क्रॉप सॅपच्या माध्यमातून गावोगावी निवडलेल्या कापूस प्लॉटची दर आठवड्याला निरीक्षणे नोंदवणे, किडीची आर्थिक नुकसानीची पातळी पाहून त्वरित उपाय योजना सुचविणे, रासायनिक-जैविक कीटकनाशके, कामगंध सापळे यासह प्रत्येक फवारणी सोबत निंबोळी अर्काचा वापर या बाबी प्रभावीपणे वापरल्याने या अळीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊन किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.
रासायनिक कीटकनाशकावरचा खर्च कमी करून लिंबोळी अर्काचा वापर केल्याने किडीचे नियंत्रण प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आले पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी ही फायदेशीर दिसून आली. निंबोळी अर्काची खरेदी बाजारातून न करता शेतातील व परिसरातील लिंबोणीच्या झाडाखाली निंबोळ्या जमा करून उन्हात वाळवून सुकवून त्या लिंबोळीचा भरडा तयार करून असा पाच किलो भरडा दहा लिटर पाण्यात रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी वस्त्रगाळ करून 100 लिटर पाण्यात मिसळून वापरला तर घरच्या घरी कमी खर्चामध्ये लिंबोळी अर्क तयार होत असल्याने अशा पद्धतीने निंबोळ्या गोळा करून घरच्याघरी निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रवृत्त करण्यात येत आहे.
फुळवळ येथील एमआयडीसी स्थित निमार्क निर्मिती केंद्रास भेट
कंधार तालुक्यात फुळवळ येथील एमआयडीसी येथे निंबोळी पासून निंबोळी भरडा व नीम तेल तसेच निमार्क तयार करण्यात येते व माफक दरात विक्री केली जाते. त्याचाही फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रकल्पाला आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट दिली व हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. तालुक्यातील व तालुक्याच्या आजूबाजूला असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा निश्‍चितपणे फायदा होईल असे मनोगत व्यक्त केले.
या केंद्रातून शेतकऱ्यांना माफक दरात तसेच दर्जेदार लिंबोळी पावडर निंबोळी अर्क मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. गरजू शेतकऱ्यांना जमा केलेल्या लिंबोळीचा भरडा योग्य दर लावून करून देण्याबाबत सूचना केली. केंद्रचालकांनी सुद्धा यास संमती दर्शविलीव शेतकऱ्यांनी स्वत: जमा केलेल्या लिंबोळीचा भरडा शेतकऱ्यांना त्यांच्या समक्ष योग्य दरात करून देऊ असे आश्वासन दिले.
खरीप हंगामाच्या सर्व शेतकरी बंधूंना व कृषी विभागाला  आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी एस. एम. मुंढे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार, कृषी सहायक भुषण पेटकर, बंटी गादेकर, ज्ञानेश्वर चोंढे, उमराव आदमपुरे, प्रल्हाद डांगे, बालाजी डांगे, माधव लुंगारे सुरेश राठोड यांची उपस्थिती होती.

झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी पळविले

झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी पळविले





 धर्माबाद तालुक्यातील बेल्लुर( खु) गावातील घटना

धर्माबाद ( प्रतिनिधी)  तालुक्यातील बेल्लुर ( खु) येथील झोपीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने अज्ञात चोरट्यांनी पळविल्याने लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.हि घटना दि.१५ मे २०२० रोजी रात्री मध्यरात्री घडली आहे.

कोरोना विषाणू मुळे जगासह भारत देश हैराण असताना, लाॅकडाऊन मध्ये ग्रामीण भागात  चोरीचे सत्र सुरू झाले आहे.धर्माबाद तालुक्यातील बेल्लुर ( खु) येथील अनसाबाई आड्डेलु कांबळे हे नेहमी प्रमाणे आपल्या दुकानाचा दरवाजाला कुलुप लावुन, दुकानासमोरच एकटेच बाजावर ( काॅट ) झोपी गेले.गाढ झोपी गेलेले पाहून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील सोन्याचे
मंगळसूत्र,मणी,चंपुल आदी दागीणे लंपास केले. झोपेतून उठून अनसाबाई आड्डेलु कांबळे पाहिले असता अंगावर मंगळसूत्र नाही.तेव्हा रात्री चोरी झाल्याचे समजले.ही माहिती मिळाल्याने  पोलिस निरीक्षक सोहन माछरे, जमादार देवकाबंळे घटनास्थळी भेट देऊन चोरीचा तपास गतीने करण्याचे आदेश दिले.

लाॅकडाऊन मध्ये धर्माबाद तालुक्यात पहिलीच चोरी  झाली असून बेल्लुर (खु) गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.धर्माबाद पोलिस ठाण्यात राम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिकेट ग्रुप ऑफ धर्माबादच्या वतीने 101 धान्य किट चे वाटप

क्रिकेट ग्रुप ऑफ धर्माबादच्या वतीने 101 धान्य किट चे वाटप




धर्माबाद (प्रतिनिधी)
  धर्माबाद येथे क्रिकेट ग्रुप ऑफ धर्माबादच्या क्रिकेट खेळाडूंच्या वतीने गरीब व गरजवंत परिवारातील लोकांना 101 धान्य किट चे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो तुरीची डाळ, एक किलो साखर, चहाची पत्तीची पॅकेट, मिरची पावडर, हळद पावडर, एक किलो मिठाचे पॅकेट आणि एक किलो गोड तेलाचे पॅकेट्सचा समावेश होता, कोणताही गाजावाजा न करता ह्या धर्माबाद च्या क्रिकेट खेळाडूनी कडक उन्हात सोशल डिस्टन्सीगचा वापर करत ह्या धान्य किट चे वाटप केले. हे वाटप करतेवेळी गरीब व गरजवंत लोकांच्या डोळ्यात अक्षरच अश्रू आले होते व हे लोक ह्या खेळाडूंना आशीर्वाद ही देत होते.ह्यामध्ये धर्माबाद क्रिकेट ग्रुप चे खेळाडू श्री यल्लप्पा आकलवार, श्री निलेश गोविंदलवार, ईजाज भाई , अजहर सर, श्रीकांत आदमवाड, सैफु, धर्मेश धुर्वे, शेख अन्सार,विशाल गड्डेवाड, राहल पाटील,   ए पी आय उत्तम भापकर, ए पी आय मल्हारी शिवरकर, जेष्ठ खेळाडू अहमद लड्डा, वेणूगोपाल आकलोड,पत्रकार संजय कदम, पोलीस कर्मचारी संतोष संगेवार, लायक भाई, देविदास पाटील आणि अशोक उघडेनी परिश्रम घेतले.

३०४ पैकी फक्त ४१ अहवाल मिळाले त्यात १८ जण कोरोनाबाधित. अजून अहवाल येणे बाकी..!

३०४ पैकी फक्त ४१ अहवाल मिळाले त्यात १८ जण कोरोनाबाधित. अजून अहवाल येणे बाकी..!




नांदेड (प्रतिनिधी)
२२ कोरोनाबाधितांना घरी सोडण्यात आल्यानंतर नांदेडकरांना काहीसा दिलासा मिळाला असताना शनिवारी एकाचवेळी १८  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत म्हणजे ३६ तासांपासून ३०४ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने त्यापैकी अनेकजण कोरोनाबाधित असू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत असताना शनिवारी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ही भीती खरी ठरली आणि संपूर्ण नांदेड जिल्हा पुन्हा हादरून गेला .विशेष म्हणजे ३०४ पैकी फक्त ४१ अहवाल मिळाले ,त्यात अठरा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. अजून अहवाल येणे बाकी आहे त्यात काय होईल नांदेड करांना अंदाजा अजून तर नाही अजून
तपासणी अहवाल येणे बाकी आहे. यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास नांदेडची कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढेल अशी भीती नांदेडच्या जनतेला आहे

नांदेड परिसरात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच ठिकाणी विनापरवाना कापड दुकाने चालू आहेत व दुकानदार व ग्राहकांनी बंधने पाळण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळतात. तेथील दुकाने बंद केले पाहिजे. परंतु, तेथील विक्रेते पुरेसे सहकार्य करत नसल्याचे आढळले आहे.

व तसेच यामध्ये मागे मृत्यू पावलेल्या करबला येथील कोरोनाबाधिताच्या निकटवर्तीयातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान सराफा परिसरातील कुंभारगल्ली येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने या भागातही कोरोनाने पाऊल ठेवल्याचे दिसून येते.यामुळे सराफा भागातील संपूर्ण दुकाने बंद करण्यात यावी व सर्व सराफा भाग सील करण्यात यावे अशी मागणी जनतेत होत व तसेच  लोकांची चिंता वाढली आहे.
१३ कोरोनाबाधित हे प्रवासी असल्याचे सांगण्यात आले असून ते  कुठून आले,कुठले प्रवासी आहेत याची माहिती प्रशासनाने प्रेसनोटमध्ये दिली नाही.
एकीकडे बाजारपेठ सुरू करता येईल का याची पण चाचपणी प्रशासनाकडून केली जात असताना आज १८ नवे रुग्ण सापडल्याने नांदेडवर चिंतेचे ढग जमा झाले आहे.
अत्ता उर्वरीत अहवाल येण्याची वाट बघायचे आहे

Friday, May 15, 2020

नांदेडला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा दणक्याने वाढला बाधितांची संख्या ८४ वर



नांदेड (प्रतिनिधी)
दि. १४ मे २०२० रोजी तपासणी साठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी १८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेला आहे.
त्यापैकी  13 रुग्ण प्रवासी आहेत, 4 रुग्ण करबला भागातील आहेत व 1 रुग्ण सराफा, कुंभार गल्ली, नांदेड येथील रहिवासी असून तो शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल आहे

दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल शनिवार दि. 16 मे रोजी प्राप्त झाले आहेत. यामध्ये नव्याने 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 13 जण प्रवासी, चार जण करबला नगर व एक जण सराफा भागातील रहिवासी आहे.

मागच्या दोन दिवसांपासून अहवाल प्रलंबित होते. प्रयोग शाळेत काही तांत्रिक अडचण असल्याने दि. 15 मे रोजी अहवाल येऊ शकले नव्हते. सदरचे अहवाल शनिवारी सकाळी धडकले. यात 18 जणांना कोरेानाची लागण झाल्याने नांदेडकरांना पुन्हा जोर का झटका बसला आहे.

आठरा जणांमध्ये 13 जण हे परराज्यातील असल्याचा अंदाज असून काही दिवसांपूर्वी करबला नगर येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. त्याच भागातील चार जणांना कोरोनाची लागण झाली, तर सराफा भागात ही नव्याने रुग्ण आढळून आल्याने सराफा परिसरातही सकाळी-सकाळी मोठी खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वी कोरोनाचे लक्षणे न  आढळून आल्याने 26 जणांना  कोविड केअर सेंटरकडून डिस्चार्ज देण्यात आला होता. जिल्ह्यासाठी दिलासा बाब काही औटघटकेची ठरली, असून पुन्हा नवे आठरा रुग्ण सापडल्याने नांदेडमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 84 इतकी झाली. यात 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा यापूर्वी मृत्यू झाला, तर दोन कोरोनाग्रस्तांचा तपास अद्याप लागू शकला नाही. त्यामुळे उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या आता 51 वर आली आहे.

अवैध रेती चालवण्यासाठी मासिक हप्ता 25 हजार रुयांची मागणी करून ती स्वीकारणारा तलाठी लाचलूचपत विभागाच्या जाळयात

अवैध रेती चालवण्यासाठी मासिक हप्ता 25 हजार रुयांची मागणी करून ती स्वीकारणारा तलाठी लाचलूचपत विभागाच्या जाळयात


नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड:-लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. याला पोलिस विभाग आणि महसूल विभागाच्या छुपा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे. सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असतानाही नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आलेले आहे. यामध्ये नांदेड जवळ असलेले सर्व  नदी मधून अवैध रेती वाहतूक करणारे वाहने रात्रभर रेतीची वाहतूक करत आहेत.

नांदेड येथील ब्राह्मणवाडा तलाठी हे वाळूचे टिपर विनापरवाना चालू देण्यासाठी मासिक हफ्ता 25 हजार रुयांची मागणी करून ती स्वीकारणाऱ्या  ब्राह्मणवाडा सज्जाचे तलाठी माणिक बोधगिरे यास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
नांदेड शहर आणि जिल्ह्यात विनापरवाना वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे येती माफियांचे मनसुबे दिवसेंदिवस वाढल्याचे पाहावयास मिळते लॉकडाऊनमध्ये सुद्धा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे.

अवैध वाहतुकीला सर्वाधिक पाठबळ असणाऱ्या महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लाड वाळूमाफियाकडून पुरविले जातात. त्याचे आजची कारवाई उत्तम उदाहरण आहे. दरम्यान तक्रार दारचे  वाहन रेतीची वाहतूक करण्यासाठी चालू द्यावे यासाठी ब्राह्मणवाडा सज्जचे तलाठी माणिक बोधागिरे यांनीही  मासिक 25 हजार रुपयांचा हप्ता मागितला होता

रमजान ईदला मुस्लिम बांधवानी नवीन कपडे खरेदी करू नयेत; धर्माबाद कुल जमाती तहेरीक चे आव्हान

रमजान ईदला मुस्लिम बांधवानी नवीन कपडे खरेदी करू नयेत; धर्माबाद कुल जमाती तहेरीक चे आव्हान


धर्माबाद:-(प्रतिनिधि)
ईद-उल-फितर हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असतो..या दिवशी सर्वच मुस्लिम बांधव व भगिनी नवीन कपडे परिधन करून हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात सध्या जगात व देशात कोरोना वायरस ने थैमान घातले असून त्यामुळे देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे.लॉक डाऊनच्या पावर्षभूमीवर मुस्लिम बांधवानी प्रशासनाचे नियम पाळले असून या पुढे प्रशासनचे नियम पाळावेत या वर्षी नवीन कपडे खरेदी करू नयेत असे आव्हान धर्माबाद कुल जमाती ताहेरीकच्या वतीने करण्यात करण्यात आला आहे..

रमजान महिना मुस्लिम समाजाचा पवित्र महिना असून यात लहान पासून ते वृद्धापर्यंत सर्व लोक पूर्ण महिना तीस दिवस कडक उपवास करतात आज रोजी उपवासला २२ दिवस झाले असून या रमजान मध्ये आपण सर्व मुस्लिम बांधवानी घरातच राहून रोज, इफ्तार व पाच वेळा नमाज शुक्रवारला सुद्धा घरीच राहून नमाज अदा केले तसेच तरावीह महत्वाची नमाज सुद्धा मस्जिदला न जाता घरीच राहून सर्धापूर्वक नमाज अदा केले.
ईद उल फ़ित्र हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण २४ किंवा २५ मे रोजी साजरा होणार आहे त्यासाठी मुस्लिम बांधव महिला भगिनी बाजारात जाऊन नवीन कपडे खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात परंतु यावर्षी आपण या महामारीला बळी पडायचे नाही म्हणून कोणीही बाजारात कुठे ही गर्दी करू नये कुठे ही जाऊ नये आपल्या कडे बऱ्याच पैकी जुने कपडे असतातच त्यामधील चांगले स्वछ धुतलेले कपडे परिधन करून हा सण साजरा करावा..अल्लाह ईश्वर आपले मन बघतात म्हणून सर्व मुस्लिम बांधव या ईद ला नवीन कपडे खरेदी करू नये याच पैशातून अन्न दान किंवा दान धर्म करावे व गोर गरीब लोकांची मदत करावी हे खरे ईद उल फ़ित्र साजरी कारण्यासारखे होईल. मुस्लिम समाजानी प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ईद घरीच साजरी करावी असे आव्हान धर्माबाद कुल जमाती तहेरीकच्या वतीने तहसिल प्रशानास व नगर पालिका मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आले आहे.

Thursday, May 14, 2020

भोकर येथे 14 मे ला रक्तदान शिबिराची यशस्वी रीत्या संपन्न ताळेबंदीच्या काळातही 100 दानशुरांनी केले रक्तदान....

भोकर येथे 14 मे ला रक्तदान शिबिराची यशस्वी रीत्या संपन्न
ताळेबंदीच्या काळातही 100 दानशुरांनी केले रक्तदान.....



भोकर  (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कोरोना महामरीचा प्रादुर्भाव लक्षात, कोरोनवर मात करण्यासाठी  आणि ह्या रोगाला तोंड देणाऱ्या रुग्णांसाठी आज घडीला रक्ताची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे .हे लक्षात घेता भोकर तालुका मराठी संघाच्या वतीने भोकर येथे दि 14 मे 2020 रोज गुरुवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात  दानशूर व्यक्तीनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन देशातील कोरोना तसेच इतर रोगाचा सामना करणाऱ्या रूग्णाच्या जीवाला जीवदान देण्यासाठी एक पाऊल पुढे येवून , धगधगत्या उणाची तमा न बाळगता अत्यंत परिस्थिती गांभीर्य लक्षात घेवून भोकर येथील 100 पेक्षा जास्त रक्त दात्यांनी आज स्वखुशीने रक्त दान केले आहे आणि समाजकार्य तसेच देशकार्याला हातभार लावून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
 जवळपास दोन ते अडीच महिन्यापासून कोरोनो महामारीचे संकट सर्वत्र पसरलेले असुन यामुळे विविध आजाराच्यां रुग्णांची  संख्या वाढत चाललेली आहे . यात विशेषतः कोरोना रुग्ण,गरोदर माता , वार्धक्य ग्रस्त व्यक्ती, लहान मुलांच्या आजाराचे प्रमाण, थायलेसिमिया, आणि इतर अनेक आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आसल्याचे दिसुन येत असुन आत्यावश्यक असलेला रक्तपुरवठ्यातही तुटवडा जानवत आहे.
 कोरोना सहअदी आजारांसी आपण लढत आहोत त्यामुळे त्यासाठी रक्तसंकलनाची नितांत गरज असल्याकारणाने  दि. १४ मे 2020 रोजी सकाळी ९ :०० वाजता भोकर तालुका मराठी संघाच्या वतीने भोकर येथील तहसिल कार्यालयाच्या तळमजला या ठिकाणी करण्याचे योजिले होते. त्या अनुषंगाने भोकर येथील ठराविक ठिकाणी सामाजिक आंतर ठेवून तसेच शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून उत्तम प्रकारे रक्तदान संकलन करण्यात आले आहे.
यामध्ये 100 पेक्षा ही जास्त रक्त दानशुरानी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी पार पाडण्यास मदत केली आहे.
या शिबीरासाठी  नांदेड येथील स्व.कै.शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय महाविद्यालय,व रुग्णालय रक्तपेढी नांदेड ह्यांना रक्त संकलन करून 100 पेक्षा जास्त रक्त पिशव्या रक्त देण्यात आले आहे.   

     सदरिल शिबीराचे उद्घाटक म्हणुन भोकर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायधिश मुजीब एस. शेख तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार भरत सुर्यवंशी, पोलीस निरिक्षक विकास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैधकिय अधिक्षक  डॉ. आशोक मुंडे, पोलिस उपनिरिक्षक  अनिल कांबळे आदिंची उपस्थिती लाभली असून ह्यामध्ये भोकर येथील वरिष्ट न्यायाधीश , दिवाणी स्थर मा.मंदार पांडे ह्यांनी स्वतः स्वखुशीने पुढाकार घेऊन आज रक्तदान करून सर्वांना  रक्तदान करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे यावेळी पी.एस.आय. अनिल कांबळे, संतोष पांडे, न्यायालयातील कर्मचारी वर्ग तसेच आयोजित कार्यक्रमाचे भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे सन्मा. सचीव सिद्धार्थ जाधव यांनी रक्तदान करून रक्तदान हे जिवनदान आहे आणि लोकांच्या जीवाला जीवनदान देण्यासाठी प्रत्येक माणसाने रक्तदान रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्यवान कार्य करण्यासाठी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन वरील रक्तदात्यांनी यावेळी जनतेला केलेले आहे.

त्या दात्यांसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊन सहकार्य केले.त्या सर्व सन्माननियांचे ऋण व्यक्त करण्यात आले असून या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे, सचिव सिद्धार्थ जाधव,गंगाधर पडवळे,शेख़ एजाज़ कुरेशी,संदेश कांबळे,राहूल कदम,बालाजी नार्लेवाड,स्वरुपा भोसले (चौरे), विलास हटकर,सुधांशू कांबळे, शेख लतिफ, फहीम शेख ,शारुख शेख,यांसह आदींनी परिश्रम घेतले

तसेच सदरिल शिबिरात बहुसंख्येने रक्तदान करून देशसेवेस हातभार लावलेल्या सर्व रक्तदात्यांचे  तसेच आयोजित कार्यक्रमास पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे शब्द सुमनांनी मनस्वी आभार भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...