Tuesday, March 31, 2020

नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांचं भावनिक साद

नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांचं भावनिक साद




 कोरोना....निर्णायक क्षण

अमेरिकन मानववंश शात्रज्ञ जेरेड डायमंड यांचं ‘ गन्स,जर्म्स अँड स्टील’ नावाचं पुस्तक वाचल्यानंतर, एक इवलासा  विषाणू मानव जातीच्या इतिहासाची दिशा बदलू शकतो ह्या गोष्टीची मोठी गम्मत वाटली होती! त्यावेळी जराही कल्पना नव्हती की लवकरच अशा एका विषाणूचा प्रकोप आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
COVID १९ ची साथ आता सामाजिक संक्रमणाच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. म्हणजेच आपल्याच अवती भवती असलेल्या एखाद्याकडून हा संसर्ग आता आपल्याला होऊ शकतो. ही मोठी नाजूक अवस्था असते.
‘गर्दी’ हा ज्या समाजाचा स्थायीभाव आहे त्या समाजासाठी ही अवस्था घातक ठरू शकते. म्हणून आपण पाहतोय की सरकार lock down जाहीर करतंय , प्रशासन परोपरीने बजावतंय की घराबाहेर पडू नका, social distancing पाळा... पण  'नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे'  ह्या म्हणीसारखं आपल्यावर मात्र हवा तसा परिणाम होताना दिसत नाही. बहुतेक अजूनही आपल्या मनात असा भ्रम आहे की काही केल्या आपल्याला हा आजार होणार नाही. निव्वळ गम्मत म्हणून मोटारसायकलवर फिरणारी पोरं गावात दिसतंच आहेत, औषधाची चिठ्ठी खिशात ठेवून संचारबंदी बघायला निघालेले हौशे फिरतंच आहेत, सुखासुखी बसलेले 'आमचे इकडचे नातेवाईक तिकडे जाऊ द्या’ म्हणून पासेस मागणारे उच्चभ्रू प्रशासनाला तगादा लावतंच आहेत .... काहीही करून आपण कसे सिस्टिमच्या वरचे आहोत आणि सामान्यांना लागू असणारी बंधनं आपल्याला कशी लागू होत नाहीत हे दाखवण्याचा काही लोकांना सोस असतो. असे लोकच येत्या काळात आपल्या समाजाचा घात करतील.
इतिहास पाहिला आणि नांदेड पुरतं बोलायचं झालं तर आपल्याकडे कधीच मोठी युद्ध झाली नाहीत, कधीच कुठली सुनामी आली नाही, ज्वालामुखी, भूकंप अशा आपत्ती तर आपल्या लोकांना माहीतच नाहीत. त्यामुळे आपण अजिंक्य आहोत अशी काहीशी बेफिकिरी आपल्या मानसिकतेत रुजली आहे....आणि इथेच हा विषाणू आपल्याला मात देऊन जाईल... आता क्षणभर अशी कल्पना करूया की आपल्या अशा बेफिकिरीमुळे कोरोनाची लागण आपल्याकडे सुरु झालीय. आणि अगदी फार नाही पण केवळ १ टक्का लोक या आजाराने बाधित झाले आहेत. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ढोबळ्मानाने ३५ लक्ष गृहीत धरली तरी बाधितांचा हा आकडा ३५००० इतका होतो! आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले डॉक्टर्स, हॉस्पिटलचे बेड्स, आणि व्हेंटीलेटर्स यांचं साधं त्रैराशिक मांडलं तर दर १८ कोरोना रुग्णांमागे एक डॉक्टर, २० रुग्णांमध्ये मिळून एक बेड आणि ३५००० रुग्णांमध्ये मिळून एक व्हेंटिलेटर अशी विदारक परिस्थिती समोर येते... आणि हे फक्त एक टक्क्यावरच बरं का ! 

'घराबाहेर पडू नका’ म्हणून प्रशासनाचा जो कंठशोष चालला आहे त्यामागे हे त्रैराशिक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवंय. आपली आरोग्य व्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा ताण झेलण्यासाठी निदान आजघडीला तरी सक्षम नाही हे वास्तव आहे. जिथे इटली सारख्या देशाने हात टेकले आहेत तिथे वार्षिक उत्पन्नाच्या (GDP) केवळ १.२८% सार्वजनिक आरोग्यावर खर्च करणाऱ्या आपल्या देशाला ह्या संसर्गाचा विस्फोट झाल्यानंतरची परिस्थिती हाताळणे खूप कठीण जाणार आहे हे सांगायला कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नाही.

Prevention is the only cure for us !
संक्रमणाची साखळी तोडणे हाच एकमेव उपाय आहे.

त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा... प्रशासन म्हणतंय ते निमूटपणे ऐका आणि घरातच बसा.
आपण किती तीसमारखान आहोत हे दाखवण्याची ही वेळ नव्हे . निव्वळ उनाडपणा नियंत्रणात आणण्यासाठी जर आपण प्रशासकीय यंत्रणेची सगळी शक्ती आताच खर्च करणार असू तर उद्या ही यंत्रणा थकल्यावर आपण कुणाकडे बघणार आहोत? ह्या यंत्रणेला कुठलेच बॅक अप नाही हे लक्षात घ्या . There is no second line of defence....

अल्बर्ट कामू ह्या फ्रेंच लेखकाने ‘प्लेग’ नावाच्या त्याच्या पुस्तकात हाताबाहेर गेलेल्या साथीच्या तावडीत सापडलेल्या एका शहराचं वर्णन केलंय. व्यवस्थेचा सगळा कमकुवतपणा आणि मानवी स्वभावाच्या सगळ्या हिंस्र छटा अशा वेळी उजागर होतात. वाचताना अंगावर काटा येतो....
देव करो तशी वेळ न येवो पण तशी वेळ आलीच तर आपत्तीचा मुकाबला करण्याइतपत ऊर्जा प्रशासनात शिल्लक राहील हे बघण्याची जबाबदारी आपली आहे.
डॉक्टर,पोलीस, प्रशासन,पत्रकार आणि जनता हे सगळे घटक सामंजस्याच्या एकाच पातळीवर उभे असतील तरच ह्या आपत्तीचा मुकाबला शक्य आहे .
आज ताबा आपल्या हातात आहे. उद्या तो नसेल.
ह्या सार्वजनिक आपत्तीचे पर्यावसान सार्वजनिक जल्लोषात करायचे की सार्वजनिक शोकांतिकेत करायचे हा निर्णय उंबरठ्यातून पाऊल बाहेर टाकताना प्रत्येकाने घ्यायचाय...

परीक्षेच्या या घटकेला आपण कसे वागणार आहोत यावर आपलं मूल्यमापन उद्याचं जग करेल. १३५ कोटींचा भारत देश ह्या आपत्तीचा मुकाबला कसा करणार आहे ह्याकडे सगळं जग डोळे लावून आहे. खरी देशभक्ती दाखविण्याची हीच वेळ आहे. स्वयंशिस्तीने वागू तर नक्कीच आपण ही लढाई जिंकू. आणि सगळं माहित असूनही  उद्या तसेच वागणार असू तर  आपल्यासारखे करंटे आपणच असू....

निर्णय आपल्या हाती सोपवतो.

जय हिंद !

राष्ट्रीय एकता व कर्तव्य पार पाडण्यासाठी पुरूष हक्क संरक्षण समिती व मेन्स राईट्स फाउंडेशन वेलफेअर तर्फे कुटुंबसंस्था आणि विवाहव्यवस्था वाचविण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय एकता व कर्तव्य पार पाडण्यासाठी पुरूष हक्क संरक्षण समिती व मेन्स राईट्स फाउंडेशन वेलफेअर तर्फे कुटुंबसंस्था आणि विवाहव्यवस्था वाचविण्याचा प्रयत्न




   
 पुणे-प्रतिनिधी :  भारतातील पहीली नोंदणीकृत पुरुष हक्क समिती जी राष्ट्रीय एकता व अखंडता वाचविण्यासाठी तसेच महत्वाचे म्हणजे सध्या कोरोना व्ह्यायरचे वाढते संक्रमण /प्रादुर्भाव पाहता संघटित-असंघटित मजदूर तसेच  पिछड़ा शोषित व अन्य समुदाय इत्यादी सर्वानी  या आपात्काल स्थिती मध्ये सुरक्षाचे काय उपाययोजना करून सावधानी बाळगायची व या व्हायरसचे  वाढते संक्रमण/प्रादुर्भाव त्वरित रोखण्यासाठी तसेच त्याबाबत लोकांमधे जागरूकता आणून  कुटुंबसंस्था व विवाहव्यवस्था वाचवून राष्ट्रीय एकता अखंड राहण्यासाठी भारत सरकार ला  सहकार्य करण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. म्हणून समिती  सम्पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये कार्य करीत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून पु  ह  सं समिती व मेन्स राईट्स वेलफेअर  फाउंडेशन सोसायटी चे पुणे अध्यक्ष /राष्ट्रीय सहसचिव अँड.संतोष शिंदे, तसेच त्यांचे कार्यकारिणीतील सौ.संगीता ननावरे, श्री.प्रसाद पंचपोर, तारिक अली, भोपाळ, ललित ठाकूर, तेजस नाईक, यांनी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार तर्फे कलम -144 नुसार लावलेल्या संचारबंदी व भारतात आपल्या मा .पंतप्रधान यांनी केलेल्या लॉकडाऊन चा आदर राखणे व त्याकरिता लोकांमधे जागरूकता वाढवणे साठी फोन वर चर्चा करून या आपदाग्रस्त, अन्यायग्रस्त लोकांना आवशकता भासल्यास निशुल्क सल्ला, सहाय्य,  मदद मिळवून देण्याबाबत पाऊल उचलले आहे . कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाबाबत लोकांनी उपलब्ध माध्यमाच्या द्वारे अफवा पसरू न देणे, सरकारच्या आदेशांचे पालन करून सरकारला सहकार्य करावे,   सर्वानी आपली व  स्व:ताची तसेच आपल्या परिवार व परिवारातील लोकांची काळजी घेवून या महामारीपासून संरक्षण करने, सर्वानी घरातच रहा,  कुणीही  घराबाहेर पडू नका, विनाकारण तर अजिबात नको पण कारण असताना देखील ते टाळून रस्त्यांवर येवूच नका, जास्त गर्दी-घोळका करू नका,  इत्यादी  सरकारी नियमांचे काटेकोर पालन स्वयंस्फूर्तीने करा  तरच आपण कोरोनाच्या संक्रमणा वर नक्कीच अल्पावधीत विजय मिळवू.  गेल्या बऱ्याच वर्षामध्ये जास्त संखेने पत्नी-पत्नी मधील वाद-विवाह /केसेस भारतातील न्यायालयामधे दाखल आहेत.या कोरोना विषाणू च्या वाढत्या संक्रमणमुळे  सम्पूर्ण भारतातील  हिंदू-मुस्लिम-शीख-ईसाई आदी सर्व जाती- धर्माचे सर्वानी आपले हेवे-दावे विसरून, जाती धर्म भेद विसरून या महामारीला  हद्दपार करण्यासाठी कंबर कसलेली आहे. तर मग भांडणारे पती-पत्नी सुध्दा आपले भूतकाळातील वाद विसरून एकत्रित एका छताखाली येवून याला तोंड देवू शकतात. त्यामुळे कोर्टातील पेंडिंग वीवादीत केसेस मधील पती-पत्नी यांनी आपसी द्वेष-क्लेश विसरून मुलांचे  भविष्य आणि आपला तूटनारा संसार व परिवार वाचवू शकतात. यामुळे भारताची ताकद वाढेल,  कोर्टावरील वाढता ताण व केसेस ची संख्या देखील कमी होईल.यासाठी कोणाही पती-पत्नी ला त्यांचा संसार व पारिवार वाचवणेकरिता कानुनन सल्ला, सहाय्य आवश्यक असल्यास आम्ही त्यांच्या वीवादीत केसमध्ये निशुल्क सल्लारुपी मदद करण्यास तैयार आहे. जगात वाखाणण्याजोगी भारतिय  कुटुंबसंस्था आणि विवाहव्यवस्था वाचवणे अत्यंत आवश्यक असल्याने निशुल्क सल्ला व मार्गदर्शना करिता सम्पर्क करण्याचे आवाहन अँड.संतोष शिंदे-7507004606, सौ.संगीता ननावरे-9923832409, प्रसाद पंचपोर, प्रसाद ननावरे, तारिक अली, तेजस नाईक , ललित ठाकूर, आदी याअन्वये करीत आहेत.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीबरोबर अन्नधान्याची मदत करा:-पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीबरोबर अन्नधान्याची मदत करा:-पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन


(कालिदास अनंतोजी)
नांदेड, दि. 31:-  शिधापत्रिका असलेल्या किंवा नसलेल्या गरजूंना धान्याची किट उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीबरोबर अन्न धान्याची मदत करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

कोरोना संदर्भात बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूकर, उपमहापौर सतीश देशमुख-तरोडेकर, स्थायी समितीचे सभापती अमित तहेरा, सभागृह नेता विरेंद्रसिंग गाडीवाले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, किशोर स्वामी, निलेश पावडे, विलास धबाले, शमीम अब्दुला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

स्वस्त धान्य दुकानावर काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर उपलब्ध असलेल्या धान्याचे फलक लावावेत. स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करीत असतांना त्याठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानावर नागरिकांची गर्दी होणार नाही असे दूर अंतरावर (सोशल डिस्टन्स) ठेवण्याबाबतही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर - पालकमंत्री अशोक चव्हाण

श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर - पालकमंत्री अशोक चव्हाण 


     
कालिदास अनंतोजी                                                       नांदेड,दि. 31 :- येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाखरुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडजिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.“कोरोना”चा प्रादुर्भावरोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याअध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री अशोकचव्हाण बोलत होते.     या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणीअंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षकविजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, अधिष्ठाताचंद्रकांत मस्के, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेशकदम, डॉ. संजय कदम, डॉ. मानकर,  डॉ.दिपक गोरे, उमेश कोळेकर, डॉ. राम बहिरवाड, डॉ. शशी गायकवाड, श्री खडकीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, इंडियन असोसिएशनच्याअधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वयाने चर्चा करुन सर्व प्रश्न तातडीनेसोडवावीत. अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावे. इंडियनमेडिकल असोसिएशनच्यावतीने अत्यावश्यक सेवेचे प्रश्न, अडी-अडचणीबाबत नांदेड जिल्हाधिकारीयांच्याकडे सादर करण्याची सुचना दिली. कोरोना विषाणू संदर्भातील आरोग्य विभागातीलकंत्राटी पध्दतीची पदे तात्काळ भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात रुग्णांनासन्मानपूर्वक वागणूक द्यावी. नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीसप्रशासनाने घ्यावी. नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहनपालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.  तालुकास्तरावर रक्तसाठा उपलब्ध व्हावा यासाठी येत्या काळात सुविधाउपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून मास्क, वेंन्टिलिटर, औषधाचीअतिरिक्त मागणी कळवावी. डॉक्टरांना करोना आजारापासूनसंरक्षण करणाऱ्या किट या उपलब्ध करून देण्यात  याव्यात. केंद्र सरकारने करोना आजारावर उपचार करणाऱ्याहेल्थ केअर वर्करांसाठी 50लाख रुपयाचा विमा जाहीर केला आहे. नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीनेआयसीयू मधील व्हेंटिलेटर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय दवाखाना शिवाजी पुतळा नांदेड येथेकरण्यात येणाऱ्या आयसीयूमध्ये सल्ल्यासाठी उपलब्धता राहील. त्यांच्या निगराणीखाली याआयसीयूची बांधणी करण्यात येईल. यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची मदत करण्याचे आयएमएनांदेडतर्फे जिल्हा प्रशासनास व आरोग्य विभागास सांगण्यात आले. कोरोना या आजारावरलढ्यामध्ये जर शासकीय यंत्रणा व त्यातील हेल्थ केअर वर्कर्स यांना आयएमएच्याडॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली आहे.जनतेला सुरक्षितपणे घरी रहा व अत्यंतमहत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे आणि साबणाचा वापर हा कोरोना विषाणूचासंसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सोपा व स्वस्त असा उपाय आहे. त्याचा जास्तीतजास्त वापरकरावा, असे आवाहनकरण्यात आलेले आहे. बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येकांनी घरात प्रवेश करण्याअगोदरआपले हात स्वच्छ धुऊन घेणे गरजचे आहे आणि हाताचा चेहऱ्यावर व डोळ्यांना स्पर्श होऊदेवू नये, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 0000

नांदेडच्या त्या संशयित रुग्णाची चाचणी आली निगेटिव्ह नांदेड कराणो घाबरून जाऊ नका

नांदेडच्या त्या संशयित रुग्णाची चाचणी आली निगेटिव्ह नांदेड कराणो घाबरून जाऊ नका






नांदेड :-(एजास कुरेशी)
   उमरी तालुक्यातील अब्दुलापुरवाडी येथे कोरोना संशयित रुग्ण आढळला होता पुण्याहुन नायगावला आल्याने होमकोरोनटाईन करण्यात आले होते. मात्र त्याला सर्दी, ताप, खोकला , श्वास घेण्यासाठी त्याला त्रास होतानाचे हे सर्व लक्षण आढळुन आल्याने त्यास नांदेडला ऑक्सिजन लावुन हलविण्यात आले होते . नायगाव येथील एक ३० वर्षीय तरुण पुणे येथे कामासाठी होता. तो २१ मार्चला पुण्याहुन नायगाव येथे आला असता त्याला हातावर शिक्का मारुन होम कोरोनटाईन करण्यात आले तरी पण तो घरात न राहाता नायगावाहुन सासरवाडीला  उमरी तालुक्यातील  अब्दुल्लापुरवाडी येथे आठ दिवस राहिला मध्यंतरी तो नायगावला अंत्यविधीला जावुन पून्हा आला होता यातच त्याला तीन चार दिवसापासुन ताप,सर्दी , खोकला येत होता. दि ३० मार्च रोजी पहाटे त्याची तब्येत फारच बिघडल्याने त्याला पहाटे ४-०० वाजता उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय आधिक्षक डॉ. शंकर चव्हाण यांनी त्याच्यावर उपचार केले. ताप सर्दी ,खोकला ,श्वास घेण्यासाठी त्रास होत होते हे सर्व लक्षण त्याच्यात आढळुन आल्याने तो कोरोना संशयित असल्याचे डॉक्टरा कडुन सांगण्यात आले असुन त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांच्या देखरेख खाली पाठवुन देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आधिकारी डॉ. माधव विभुते , डॉ. .मारोती चंदापुरे , डॉ. आशिष कदम यांनी दिली होती उमरी तालुक्यात कोरोना संशयित रुग्ण आढळुन आल्याने तालुका प्रशासन डॉक्टर आरोग्य विभाग सर्तक झाले होते उमरी तालुक्यातील अब्दुल्लापुरवाडी येथे तो संशयित त्याच्या सासरवाडीत थांबला होता त्या कुटुंबातील सर्व लोकांना वीस दिवसासाठी होमकोरोटाईन करण्यात आले होते ते घरा बाहेर पडु नये तसेच गावचे लोक कोणीही त्या कूटुंबाला भेटु नये असा कडक इशारा प्रशासना च्या वतीने देण्यात आला होता. त्या कोरोना संशयित रुग्णांच्या गळयातील थुंकीचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते ते आज दि३१ मार्च रोजी त्याचा  अहवाल आला आहे त्यात तो  निगेटीव्ह आला असल्याची माहीती डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी दिली आहे त्याची रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे नांदेडच्या जनता आनंदी झाली आहे.

धर्माबाद औद्योगिक वसाहत की ओरसे मुख्यमंत्री सहायता निधी मे दिये 25000 रुपये

धर्माबाद औद्योगिक वसाहत की ओरसे मुख्यमंत्री सहायता निधी मे दिये 25000 रुपये



नांदेड (कालिदास अनंतोजी)
  देश मे चल रहे कोरोना के संकट के चलते धर्माबाद औद्योगिक वसाहत के व्यापारीयो की ओरसे मुख्यमंत्री सहायता निधी मे आज 25000 रुपये का निधी का चेक दिया गया। औद्योगिक वसाहत के अध्यक्ष श्री अमिरोद्दीन सेठ मिर्चीवाले के हाथो यह चेक तहसीलदार श्री दत्तात्रय शिंदे को प्रदान किया गया। इस वक्त हमारे संवाददाता से बात करते हुवे औद्योगिक वसाहत के पुर्व अध्यक्ष श्री कमल सेठ राठी ने कहा है के, सारी दुनिया मे कोरोना के कारण तबाही मची हूवी है, ऐसे मे सिर्फ जीवनावश्यक वस्तूओं को छोडकर सभी तरह के व्यापार बंद पडे है। इस कारण औद्योगिक वसाहत को भी अभी बुरे दिन का सामना करना पड रहा है। फिलहाल औद्योगिक वसाहत के व्यापार बंद होते हुवे भी इन व्यापारीयोने सामाजिक दृष्टिकोन को निभाकर इंसानियत की मिसाल पेश कर इस कार्य की शुरुवात की है। इस मुख्यमंत्री सहायता निधी का चेक प्रदान करते समय अध्यक्ष अमिरोद्दीन सेठ मिर्चीवाले, उपाध्यक्ष राजगोपाल झंवर, पूर्व अध्यक्ष श्री कमल सेठ राठी, पंचायत समिती के सभापती श्री मारोती कागेरू, कृषी उत्पन्न बाजार समिती के संचालक श्री अशोक पाटील वडजे,   अहमद लढ्ढा उपस्थित थे। धर्माबाद तहसील मे इस कारण इन सभी व्यापारीयो सराहना हो रही है।

नागरिकांनी सढळ हस्ते अन्न धान्य द्यावे व -- जिल्हाधिकारी डॉ विपीन

नागरिकांनी सढळ हस्ते अन्न धान्य द्यावे  व -- जिल्हाधिकारी डॉ विपीन




नांदेड --कोरोना साथ रोग नियंत्रण आणताना अन्न धान्य कमी पडू नये या करिता नांदेड शहरात अन्नधान्य संकलन करणारे सहा  केंद्रे स्थापन करण्यात आली असून नागरिकांनी त्या ठिकाणी अन्नधान्य आणून द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन यांनी केले आहे.
    शहरातील पूर्णा रोड वरील नरवाडे मंगल कार्यालय, पाटीदार मंगल कार्यालय दत्त नगर, हनुमान मंगल कार्यालय विजय नगर, फत्तेसिंह मंगल कार्यालय अबचल नगर, व  देगलूर नाका परिसरातील हैदरबाग फंक्शन हॉल व आर्य वैश्य मंगल कार्यालय कॅन्सर हॉस्पिटल जवळ सिडको  येथे अन्न धान्य गोळा केले जाणार आहे. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.
     दानशूर नागरिकांनी सढळ हस्ते अन्नदान करावे व गरजू पर्यंत ते पोहचवण्या करिता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ही डॉ विपीन यांनी केले आहे.
    लॉक डाऊन कालावधीत हे धान्य गरजू व्यक्तींना वाटप केले जाणार आहे त्या मुळे राष्ट्रीय कार्य म्हणून नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहनही डॉ विपीन यांनी केले आहे

कामगारांना सांभाळा अन्यथा कारवाई-- डॉ. विपिन

कामगारांना सांभाळा अन्यथा कारवाई-- डॉ. विपिन

                              फाईल फोटो


नांदेड --- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खाजगी  उद्योगधंदे व कारखाने इत्यादी मधील कामगार इतर इतर ठिकाणीं स्थलांतरित होत असतील तर अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन  यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत दिला आहे
       कोरोना  संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून काही उद्योगधंदे व कारखान्यातील कामगार हे एका जागेवरून दुसरीकडे स्थलांतरित होत असल्याचे निदर्शनास येत आहे संबंधित कामगारांना सांभाळण्याची जबाबदारी त्या त्या कारखाने व उद्योग धंदा व्यवस्थापन  यांची आहे. या कामगारांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात याव्यात, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात यावी व सोशल डिस्टन्सची  अंमलबजावणी करण्यात यावी गरज पडल्यास या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून घेणे संबंधिताची जबाबदारी राहील असे स्पष्ट करून डॉ विपीन यांनी याप्रकरणी हलगर्जी झाल्याचे आढळून आल्यास  कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा  दिला आहे.
       राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे जेथे काम चालू आहे तेथील संबंधित कंत्राटदार यांनी परराज्यातील व इतर  कामगारांची व्यवस्था करावी.
याबाबत काही तक्रारी किंवा अडचणी आल्यास तसेच  अधिक माहितीसाठी श्री भिंगारे,  प्रादेशिक अधिकारी महा औद्योगिक विकास महामंडळ नांदेड मोबाईल क्रमांक 9975597711 यांचेकडे व श्री सय्यद मोहसीन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड मो.क्रमांक 7276216066 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार जिल्हाधिकारी डॉ. विपीन

शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार जिल्हाधिकारी डॉ. विपीन





नांदेड,३०- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषणा केल्यानंतर आता शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून अन्नधान्य पुरवठा केला जाणार आहे. पुढील तीन महिने लाभधारकांना  रेशन दुकानातून धान्य पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे.
शिधापत्रिकाधारकांनी धान्य घेताना गर्दी होऊ नये तसेच धान्य दुकानासमोर एक मीटरचे अंतर राखूनच धान्य घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना हँडवॉश तसेच सँनीटायझर वापरूनच धान्य वितरण करण्यात यावे. अशी खबरदारी प्रशासननाअंतर्गत घेण्यात येत आहे.
शिधापत्रिकाधारकांना एप्रिल महिन्यात टप्प्या टप्प्याने ३ महिन्याचे धान्य वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी अन्नधान्याची उचल करून पावती घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

विस्थापित व परराज्यातील अडकलेले कामगारांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

विस्थापित व परराज्यातील अडकलेले कामगारांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
                           फाईल फोटो



अनंतोजी कालीदास (प्रतिनिधी)
नांदेड,३०- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या  लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग-व्यवसायातील प्रभावित झालेले कामगार तसेच परराज्यातील विस्थापीत कामगार यांच्या स्थलांतरामुळे लॉक डाऊन व सोशल डिस्टन्सच्या उपाययोजनेसाठी तसेच स्थलांतरित कामगारांचा अडचणी कमी करण्यासाठी निवारागृह,  अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल या सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून शिजवलेले व शिजवण्यासाठी तयार आन्नाचे पुरवठा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्हास्तरीय, उपविभागीय स्तरीय, तालुकास्तरीय, महानगरपालिका, नगरपालिका/नगरपंचायती स्तरावर समित्या गठीत केल्या आहेत.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून या समिती मध्ये २२ अधिकारी सदस्य राहणार आहेत. महानगरपालिका स्तरावर आयुक्त. उपविभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी, तालुका स्तरावर तहसीलदार तर नगरपालिका व नगरपंचायत स्तरावर मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती काम करणार आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अडकलेले मजूर विस्थापित व बेघर व्यक्तींना आवश्यकतेनुसार निवारा, अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गठित केलेल्या समितीद्वारे विविध घटकातील जीवनावश्यक सुविधा उपलब्ध न झालेले मजूर, विस्थापित  व बेघर व्यक्ती यांची निश्चिती करणे, सदर गरजू व्यक्तींची तालुका व भागनिहाय यादी तयार करणे, या यादीच्या आधारावर तालुकानिहाय व गाव निहाय लागणारे अन्नधान्याची आवश्यकता व उपलब्धता निश्चित करणे, सदर कामे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, धर्मदाय संस्था, सहकारी संस्था तसेच सीएसआर मधून मदत उपलब्ध करून देणाऱ्या संस्था, दानशूर व्यक्ती यांची यादी समिती एकत्रीत करणार आहे.
तरी स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, धर्मदाय संस्था, सहकारी संस्था तसेच सीएसार मधून मदत उपलब्ध करून देणात येणार आहे. तरी उद्योग-व्यवसायातील प्रभावित झालेले कामगार तसेच परराज्यातील विस्थापीत कामगारांनी काळजी करूनये असे आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Monday, March 30, 2020

कोरोना के पार्श्वभूमीपर माहेश्वरी समाज की युवा शक्ती हूवी एक

कोरोना के पार्श्वभूमीपर माहेश्वरी समाज की युवा शक्ती हूवी एक                         





 प्रतिदिन 50 किलो पुलाव का वितरण       

विशेष संवादात महाराष्ट्र
कालिदास अनंतोजी:-
धर्माबाद:-  कोरोना लॉक डाऊन के पार्श्वभूमीपर माहेश्वरी (मारवाडी) समाज की युवाशक्ती एक साथ मिलकर सुविधा देने के लिये कुछ भी दिखावा ना करके सबसे आगे रहे है। शुभम सारडा, रमन झंवर, हरीश झंवर, पंडित इनानी, कपिल सारडा, महेश सारडा, प्रणय पहाडे, आनंद राठी, पंकज कालिया, पवन मंत्री और  मुकुंद मालू यह युवक संघटित होकर नियोजन कर जरूरतमंद लोगों को कुछ भी दिखावा ना करते हुवे अत्यावश्यक सेवा दे रहे है। प्रस्तुत प्रतिनिधी को कोरोना के पार्श्वभूमीपर बाजार व गलियोसे समाचार संकलन के लिये घुमते हुवे यह बात समझ मे आयी। यह युवाशक्ती पिछले छह दिनों से खुद एक साथ मिलकर पचास किलो के उच्च प्रति के चांवल का व्हेज पुलाव बनाकर बांट रहे है। इससे एक बात निष्पन्न होती है के प्रसिद्धी से दूर रहकर इंसानियत के नाते जो हाथ से जो हूवी वही समाजसेवा करके परमोच्च आनंद हासिल कर रहे है।     

नांदेड जिल्ह्यात सापडला कोरोनाचा संशयित रुग्ण

 नांदेड जिल्ह्यात सापडला कोरोनाचा संशयित रुग्ण  




नांदेड एजास कुरेशी
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील अब्दुल्लापुर वाडी येथे सासरवाडीत आलेल्या जावयाला करोना आसल्या सारखे लक्षन दिसून आल्याने तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे नायगाव येथील रहिवासी असलेला एक तरुण पुणे येथे कामासाठी गेला होता आठ दिवसापूर्वी पुणे येथून थेट आपली सासरवाडी  उमरी तालुक्यातील मौजे अब्दुल्लापुर वाडी येथे आला तर हा आठ  दिवसापासून सासरवाडीत राहत  होता या गावातील मित्रा सोबत राहून शेतात ओल्या पार्ट्या केल्या त्याचा आनंद घेत असताना रात्रीला तरुणास खोकला ताप व श्‍वास घेण्यास त्रास होत असल्या ने सदरील तरुणाला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करण्यात आले तरुणावर वैद्यकीय अधीक्षक शंकर चव्हाण, डॉ.चंदापूर, यांनी तपासणी करून उपचार केल्यानंतर तरुणाला अधिक उपचारासाठी रुग्ण वाहिकेद्वारे नांदेड येथे शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे तरुण गेल्या आठ दिवसापासून अब्दुल्लापुर वाडी येथे राहत असताना अनेक नागरिक त्याच्या सहवासात आले आहेत त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

 तरुणाला कोरोना संशयित म्हणून नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
या ठिकाणी त्याची तपासणी केली असता कोरोनाचे लक्षणं आढळून आले. त्यामुळे त्याला कोरोनाच्या विशेष वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले. त्याचे थुंकी अन इतर नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये कोरोनाचा संशयित आढळला होता. परंतु तपासणी नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

 तरुणीच्या तपासण्या केल्यानंतर आजार स्पष्ट  होईल त्याबद्दल कुठल्याही प्रकारची नागरिकांनी अफवाह पसरवणे हा गुन्हा आहे.नागरिकांनी  विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच  स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी
विनाकारण संचारबंदी काळात फिरणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Friday, March 27, 2020

नांदेड जिल्ह्यात कोरोणाचा एकही रुग्ण नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका --- डॉ. भोसीकर

नांदेड जिल्ह्यात कोरोणाचा एकही रुग्ण नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका --- डॉ. भोसीकर





 नांदेड:-   (एजास कुरेशी)
  ‘कोरोना’वरून काही अज्ञातांकडून अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये  असे आवाहन  नांदेडचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले! फोनवर विधान करताना ते म्हणाले की, लोक फक्त नांदेड जिल्ह्यात अफवा पसरवत आहेत, अफवाकडे दुर्लक्ष करा! जनतेत काही शंका असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा, अशाप्रकारे कोणताही कायदा घेऊन अफवा पसरवू नका. जर कोणी अशी अफवा पसरविली तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. जिल्हा प्रशासनाची संपूर्ण टीम रात्रंदिवस लोकांच्या सेवेत मग्न आहे, डॉक्टर व त्यांची टीम त्यांचे कर्तव्य बजावत आहे, परंतु या दरम्यान कोणीतरी अफवा पसरवत आहे म्हणून मी जनतेला तेथे विश्वास ठेवू नये असे आवाहन करतो आणि काही शंका असल्यास जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाशी थेट संपर्क साधा.


परदेशातून आलेल्यांची माहिती कळवा

परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण सर्वाधिक आहेत.नांदेड परिसरात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती आरोग्य केंद्रामध्ये कळवावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. या व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नसली तरीदेखील, आरोग्य विभाग त्यांची तपासणी करून त्यांच्यावर १४ दिवस लक्ष ठेवणार आहे जेणेकरून पुढील प्रादुर्भाव वाढणार नाही.

भोकर तालुक्यात 550 जण 'होम क्वारंटाइन

भोकर तालुक्यात  550 जण 'होम क्वारंटाइन'




भोकर(एजास कुरेशी)
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे गुजरात व इतर राज्यातून आलेल्या नागरिकांची वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. बाहेर गावाहून आलेल्या 550 जणांना शिक्के मारून होम क्वारंटाईन करण्यात  आले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.


गेल्या काही दिवसांपासून बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेऊन नागरिकांना वैद्यकीय पथकामार्फत घरी जाऊन शिक्का मारण्यात येत आहे. शिक्का मारलेल्या नागरिकांना १४ दिवस घरातच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय पथक नेहमी त्यांच्या  प्रकृतीची तपासणी करत आहे

पण त्याच्यातील काही 'होम क्वारंटाइन' बाहेर फिरत आहेत प्रशासनाने त्यांना सक्ती करण्याची गरज आहे किंवा त्याचा मोबाईल लोकेशन घेण्यात यावे कोरोनाच्या धोक्याविषयी वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकायला तयारी नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे

तालुक्यात बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांवर आशा वर्कर्स , अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, पालिका कर्मचारी यांच्यातर्फे 550 जणांना शिक्के मारलेले आहे. त्यासाठी न पुसणारी निवडणुकीची शाई वापरण्यात येत आहे. त्यामुळे काही दिवस त्या व्यक्तीच्या हातावर शिक्का उमटलेला राहील शिक्के मारलेल्या लोकांना १४ दिवस घरातच राहण्याच्या सक्त सूचना असून असे लोक बाहेर दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.आणि काही लोकं मुंबई पुण्यातुन सिक्का न मारताच आले आहेत त्याची माहिती प्रशासनाला देण्यात यावी  असे आव्हान करण्यात आले आहे चेकअप न करता लपून  बसलेल्यानी आपल्या घरच्यांचा तरी विचार करावा.

Thursday, March 26, 2020

प्रभागातील नागरिक संकटात नगरसेवक व स्वघोषित भावी नगरसेवक अज्ञातवासात

प्रभागातील नागरिक संकटात नगरसेवक व स्वघोषित भावी नगरसेवक अज्ञातवासात


                   

बेधडक विशेष :-भोकर
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह नगरपरिषद  युद्धपातळीवर प्रयत्न करीत असताना, निवडक व स्वघोषित भावी नगरसेवक मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून लांब गेल्याचे चित्र दिसत आहे. भोकर शहरातील निवडक नगरसेवक व स्वघोषित भावी नगरसेवक बहुतांश नगरसेवकांनी लोकांपासून दूर चा आसरा घेतला आहे. त्यामुळे आता तुम्ही निवडणुक वेळी मत मागायला कसे येता तेच बघतो असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

काही सामाजिक कार्यकर्ते कडून अन्नधान्य व उपजीविका चे समान देण्यात आले व तसेच आव्हान करण्यात आले आहे की गरजू लोकांनी उपजीविके चे समान घेण्यासाठी दिलीप सोनटक्के यांना संपर्क साधण्यासाठी व  तसेच उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी याच्या कडून मास्क व 400 घरांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे व तसेच निळकंठ वर्षेवार यांनी पण आव्हान केले आहे तोहीद भाई टेंट वाले व सईद नगर मध्ये खाँँजा भाई कुरेशी यांच्याकडून पण गरजू लोकांना उपजीविकेचे समाज वाटप करण्यात आले आहे पण ज्यांना निवडणूक वेळी या जनतेची गरज असते ते निवडक व स्वघोषित भावी नगर सेवक कुठे आहेत असा जनतेत प्रश्न निर्माणहोतआहे



करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र-राज्य सरकार तसेच प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. करोनाचा अटकाव रोखण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न केले जात आहे. परंतु, नागरिकांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी निवडक व स्वघोषित भावी नगरसेवका कडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची ‌आवश्यकता असून नागरिकांना बाहेर न पडण्याबाबत आवाहन करण्याची गरज आहे. परंतु, ऐन संकटावेळी मात्र स्वत:ला शहराचे राखणदार असणारे नगरसेवक  मात्र गायब झाले आहेत. नगरपरिषद कडून सध्या औषध फवारणी केली जात असून काही  बहुतांश नगरसेवक व स्वघोषित नगरसेवक मात्र प्रभागातूनच गायब असल्याचे चित्र आहे. या नगरसेवकांकडून पोलिस यंत्रणेला तसेच महापालिकेच्या यंत्रणेला सहकार्य होणे अपेक्षित आहे. परंतु,नगरसेवक मात्र प्रभागात नसल्याने पोलिसांवर आता बळाचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ऐन संकटकाळात लोकांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना घरातून बाहेर पडू न देण्याची जबाबदारी घेणारे नगरसेवकच घरातून बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या या कृतीचा प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे व सोशल मीडियावर यांची खूप चर्चा होत आहे.




प्रभागातील हातावर पोट भरण्याऱ्या गरीब जनतेला  आता खऱ्या अर्थाने मदतीची गरज असतांना, हे नगरसेवक व स्वघोषित भावी नगरसेवक मदतीऐवजी बाहेर निघून गेल्याने आणि काही नगरसेवक घरातच बसून असल्याने नागरिकांमध्ये असंतोषांचे वातावरण आहे

Tuesday, March 24, 2020

महाराष्ट्रामध्ये रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने व मेडिकल उघडी राहतील;जनतेने घाबरून जाऊ नये- नवाब मलिक

महाराष्ट्रामध्ये रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने व मेडिकल उघडी राहतील;जनतेने घाबरून जाऊ नये- नवाब मलिक





मुंबई दि. २४ मार्च - महाराष्ट्रामध्ये रेशन आणि खाण्यापिण्याच्या सामानांची दुकाने व मेडिकल उघडी राहतील त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

आज रात्री १२ नंतर देशात २१ दिवसासाठी लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावर लागलीच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. घाबरू नका सर्व सामान मिळेल अशाप्रकारचे ट्वीट अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करून जनतेला धीर दिला आहे.

‘करोना व्हायरस’नंतर ‘हंता व्हायरस’… चीनमध्ये एकाचा मृत्यू; ३२ जणांची घेण्यात आली चाचणी


‘करोना व्हायरस’नंतर ‘हंता व्हायरस’… चीनमध्ये एकाचा मृत्यू; ३२ जणांची घेण्यात आली चाचणी




बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क

करोनामुळे जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनमधील वुहान येथून पसरत गेलेल्या या विषाणूचा संसर्ग आता १०० हून अधिक देशांमध्ये पोहचला आहे. युरोपीयन देशांबरोबरच आशियामधील अनेक देश करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. असं असतानाच आता चीनमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा (Hantavirus) संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. कामावरुन शाडोंग प्रांतांमधून परत येताना बसमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

करोनाप्रमाणे हंतानेही महामारीचे स्वरुप धारण करु नये अशा अर्थाचे ट्विटस अनेकांनी केले आहे. अनेकांनी या बातमीनंतर हंता विषाणूंबद्दल सर्च करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हा हंता विषाणू नक्की काय आहे?, हा कसा पसरतो? याची लक्षणे काय यासंदर्भात सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे.


हंता नक्की आहे तरी काय?

तज्ज्ञांच्या मते हंता विषाणू हा करोनाइतका घातक विषाणू नाहीय. करोनानुसार हा संसर्गाने पसरत नाही. उंदीर किंवा खारीच्या थेट संपर्कात आल्यास हा विषाणू पसरतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) या अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार, “घरामध्ये उंदीर असतील तर हंता विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अगदी ठणठणीत व्यक्तीही उंदरांच्या संपर्कात आल्यास त्याला हंता विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.”

करोनाप्राणे हंता विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. मात्र उंदराच्या विष्ठेला किंवा मृत शरीराला हात लावून एखाद्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केल्यास त्याला हंताचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

हंताची लक्षणे काय?

हंताचा संसर्ग झाल्यास व्यक्तीला ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे, अतीसार ही हंताची प्रमुख लक्षणे आहेत. उपचार करण्यास उशीर झाल तर हंतामुळे फुफुसांमध्ये पाणी साचतं. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

हंता किती धोकादायक?

सीडीसीच्या माहितीनुसार हंतामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो इतका हा विषाणू धोकादायक आहे. हंताची लागण झालेल्यांचा मृत्यूदर ३८ टक्के इतका आहे. चीनमधून जगभऱात पसलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यादाच हंतामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आल्याने जगभरातील नेटकऱ्यांनी सोशल मिडियावरुन चिंता व्यक्त केली आहे. करोनामुळे जगभरामध्ये आतापर्यंत १६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ८० हजारहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे.

Tuesday, March 17, 2020

सरकारी कार्यालये 7 दिवस बंद; शासनाचा मोठा निर्णय

सरकारी कार्यालये 7 दिवस बंद; शासनाचा मोठा निर्णय



विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र
मुंबई :- काल मंत्रालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे हे कळाल्यावर प्रशासनाने आज मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता 7 दिवस सुट्टी मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसंच तहसीलदार कार्यालय तसंच विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे मुंबईची लाईफ लाईन लोकल देखील टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार शासन करत आहेत.
दरम्यान, सगळ्या खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. तसंच येणाऱ्या काही दिवसांत अनावश्य गर्दी टाळण्यासाठी लोकांनी देखील अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे.

Monday, March 16, 2020

कोरोना कहर: ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका अत्ता ३ महिने पुढे..!!

कोरोना कहर:  ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुका अत्ता ३ महिने पुढे..!!





(बेधडक विशेष.)
कोरोना : सरकारने ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका ३ महिने पुढे ढकलल्या  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावलं उचलत आहे. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबईतील वर्षा निवासस्थानी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथरोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून, रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री म्हणाले, एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असली तरी ती काही गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहे त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नियम सर्वांना सारखे असून धार्मिक सण-उत्सव, समारंभांसोबतच राजकीय कार्यक्रमांनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. ग्रामीण भागातील शाळा बंद करतानाच सार्वजनिक स्वच्छतागृह या ठिकाणी सॅनिटायजर, साबण आणि पाणी उपलब्ध राहील यांची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. परदेशातील टुर्सना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्य शासन कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी सर्तक रहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले

Sunday, March 15, 2020

शहरातील कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेशा पर्यंत बंद ठेवा.......जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर

शहरातील कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेशा पर्यंत बंद ठेवा.......जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर




नांदेड:-(एजास कुरेशी)
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक मालक यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी हे बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हााधिकारी डॉ. सचिन खल्लााळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही‍.शिंगणे, जिल्हा महिला बालकल्यााण अधिकारी श्रीमती आर.पी.काळम, उपशिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक मालक यांच्यासह विविध अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागू केला असून सदरील कायद्याची दिनांक १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम २०२० लागू केलेली आहे. त्यानुसार महानगरपालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगर पंचायत क्षेत्रातील, सर्व सरकारी व खाजगी अंगणवाड्या, सर्व सरकारी व खाजगी शाळा, तसेच महाविद्यालय, आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे यांच्या अधिपत्या खालील शैक्षणिक संस्था दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत सांगितले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रिडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला असून यापुर्वी वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. नांदेड जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा समान, दुध, भाजीपाला, औषधी दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून) दिनांक ३१ मार्च, पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी सांगितले. कोणत्याही व्यक्तीस, संस्था, संघटनांना करोना संसर्गाबाबत अफवा अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॅानिक किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर व दंडनिय कारवाई करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी यावेळी दिल्या.
मागील १४ दिवसांत ज्या व्यक्तींनी करोनाबाधित देशातून प्रवास केलेला आहे, त्यांनी स्वत: याबाबतची माहिती करोना नियंत्रणासाठी राज्य नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 020-26127394 , एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष 020-27290066 व टोल फ्री क्रमांक 104 किंवा जिल्हा रुग्णालय नांदेड येथील नियंत्रण कक्ष 02462-249279 संपर्क साधावा.
करोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होणे आवश्यक आहे. त्यास मज्जाव, प्रतिबंध, अडथळा आणण्याविरुध्द दंडनिय कार्यवाही करण्यात येईल.

*भारत प्रभात पार्टीच्या राज्य कमिटीच्या बैठकीत भोकर नगरपरिषद निवडणूक लढवण्याचा झाला निर्णय

*भारत प्रभात पार्टीच्या राज्य कमिटीच्या बैठकीत भोकर नगरपरिषद निवडणूक लढवण्याचा झाला निर्णय*




भोकर:-(प्रतिनिधी)
दि १४ मार्च २०२० रोजी सकाळी १० वाजता ,भोकर शासकीय विश्रामगृह येथे राज्य कमिटी कडून आज बैठक बोलावण्यात आली होती ही बैठक माधव मेकेवाड यांच्या नेतृत्वाखाली होती पुणे,मुंबई,नाशिक,औरंगाबाद येथून राज्य कमिटीचे काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्यानी बैठक मध्ये बोलताना असा निर्णय घेतला की भारत प्रभात महाराष्ट्र मध्ये नवीन नसून त्या पार्टीने लोकसभा,विधानसभा महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी लढवल्या आहेत.भोकर नगरपरिषद सुद्धा संपूर्ण ताकतीने लढवण्यासाठी खंबीर आहे असे यावेळी माधव मेकेवाड यांनी नमूद केले.तसेच १९ वार्ड शहरात आहेत त्यापैकी केवळ 3 वार्ड मध्ये अनुसूचित जाती पुरुष १ व महिला २ असे आरक्षण आहे त्यासाठी सुद्धा जागा जिंकण्या सारखे उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होते,अनुसूचित जमाती साठी राखीव असलेला वार्ड ६ असून तो सुद्धा जिंकून दाखवण्याची तयारी इच्छुक असलेल्या महिला उमेदवाराने भारत प्रभात पार्टीच्या बैठकीत सांगतील आहे सर्वच जागा १ ते १९ वार्ड मध्ये उमेदवार भारत प्रभात पार्टीला सक्रिय मिळाले असून त्यांच्या साठी भरीव मते कसे पडतील हे चर्चा सत्र आज आम्ही दाखवले आहेत.OBC महिला व OBC पुरुष साठी सुद्धा उमेदवार मिळाले आहे लोकांच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार भारत प्रभात पार्टी कडून देण्यात आल्याने भारत प्रभात पार्टीची एकहाती सत्ता मिळेल असा विश्वास हेमंत खरात यांनी यावेळी स्पष्ट केला आहे.ह्या बैठकीत वर्षाराणी नामवाड(मराठवाडा अध्यक्षा,महिला आघाडी),हेमंत खरात(महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिलीप शिवाजी पाटील(राज्य सचिव) यांनी आपले मनोगत पार्टी बद्दल नमूद केले आहे.
इच्छुक उमेदवार सुद्धा ह्यावेळी इच्छुक फॉर्म भरून अर्ज माधव मेकेवाड यांच्याकडे दाखल केला पहिल्या 1 तासात 9 जण इच्छुक फॉर्म भरले आहेत
 वेळेच्या आत मिटिंग साठी उपस्थित राहावे असे आव्हान माधव मेकेवाड यांनी केले होते त्यांच्या आव्हाना नंतर महाराष्ट्र भरातून अनेक जनाची प्रमुख उपस्थित होती माधव मेकेवाड (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ),हेमंत खरात साहेब मुंबई(राज्य उपाध्यक्ष),दिलीप शिवाजी पाटील (नाशिक),संजय नरवाडे(मराठवाडा अध्यक्ष),संजय बिलोलीकर(मराठवाडा,कार्याध्यक्ष),वर्षाराणी नामवाड(मराठवाडा अध्यक्षा),कु. मधू पाटील(महाराष्ट्र अध्यक्षा, युवती आघाडी), साईनाथ शिंगारे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया),बापूराव आडे(जिल्हाध्यक्ष,नांदेड),रामेश्वर चार्लेवाड (तालुका अध्यक्ष,भोकर),लक्ष्मण गायकवाड(शहराध्यक्ष, भोकर),कुणाल पवार यांची उपस्थिती होती.तर यावेळी काही नवीन निवडी देखील करण्यात आल्या आहेत .

मी दिलेला गुलाब तुला खुप आवडायचा

मी दिलेला गुलाब तुला खुप आवडायचा ना !



लेखक ऍड. हर्षवर्धन मु. पाटील रेनापूरकर


मी दिलेला गुलाब तुला खुप आवडायचा ना !किती जपुन ठेवायचीस त्याला , फुल सुकुन गेल तरी ते वही पुस्तकामध्ये त्याच्या पाकळ्या ठेवायचीस
दररोज तु माझ्याकडे खुप हट्ट करायचीस मोगर्याच्या गजर्यासाठी आणि गूलाबाच्या फुलासाठी  रोज- रोज गावभर शोधुन आणताना खुप तारांबळ उडायची आणि कधी गूलाब भेटला नाही तर माझ्यावर ओरडायचीस तु आणि "Heart" व्हायचीस हे मला सहन व्हायच नाही म्हणुन गूलाबाच झाड आणि मोगर्याचा वेल तुझ्या प्रेमाच्या आठवणीत लावला, मोगराही गुलाबाच्या झाडाचा आधार घेवुन खुप मोठा वेल झाला आणि आता तर तु दिवसातुन दोन दोन वेळा पांढर्या गजर्यामध्ये गुलाबी फुल केसामध्ये कोंबुन माझ्या घरासमोरुन मिरवायचीस अन् किती तरी वेळा विचारायचीस मी कशी दिसते- मी कशी दिसते म्हणुन.....
तेव्हां  खुपच "छान" दिसायचीस तु,
अचानक का? कुणास ठावुक तुला कुणाची नजर लागावी. काही दिवसाने जस जसा मोगर्याचा वेल वाळत होता तस- तस आपल्या दोघाच अंतर पण कमी होत गेल...
शेवटी गुलाबाच्या झाडापासुन मोगर्याचा वेल दुर झाला आणि त्या  वेलाच्या "पिळण्या" त्या खुना झाडावर जश्याच्या तश्या मोगर्याची आठवण बनुन आहे.
तु... ही माझ्या आयुष्यातुन मोगर्यासारखी गेलीस परंतु तुझ्याही आठवणी सुध्दा झाडासारख्या "पिळण्या मात्र माझ्या ह्रदयाला.... आहेत
काही दिवस गुलाबाला 'फुले' ही आलेली  नव्हती ..
रुसलं असेन बिचारं... मोगर्याच्या आठवणीत...
   पण त्याच गुलाबाच्या झाडाच सहा महिन्यानंतरच उमललेल.... फुल.

                    

Friday, March 6, 2020

कोरोना ; कॉग्निझंट कंपनीचे ऑफिस बंद, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना

कोरोना ; कॉग्निझंट कंपनीचे ऑफिस बंद, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना




जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांनी जास्त सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. आयटी सर्व्हिस कंपनी कॉग्निझंटने (Cognizant India) हैदराबादमधील आपले ऑफिस तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास कंपनीने सांगितले आहे.

हैदराबादमध्ये कॉग्निझंट कंपनीचे ऑफिस आयटी पार्क रहेजा माइंड स्पेसच्या बिल्डिंग 20 मध्ये आहे. याच बिल्डिंगमधील आणखी एका कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे कॉग्निझंट कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एका ई-मेलद्वारे ऑफिस बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, ऑफिस बंद करून निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करण्याचे कंपनीने म्हटले आहे. 
 कॉग्निझंटने ई-मेलमध्ये म्हटले आहे की, "रहेजा माइंड स्पेसमधील बिल्डिंग 20 मध्ये असलेल्या एका कंपनीच्या ऑफिसमधील एक कर्मचारी कोविड-19 च्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून आम्ही बिल्डिंग 20 मधील ऑफिस बंद करत आहोत. या ऑफिसचे निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता केली जाईल." याच बरोबर, कॉग्निझंट कंपनीने स्पष्ट केले आहे की, आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाली नाही. तसेच, सर्व कर्माचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना कंपनीने दिला आहे.  

दरम्यान, जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना व्हायरससंबंधी सर्व प्रकरणावर लक्ष ठेवण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. देशात आतापर्यंत 29 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विदेशातून आलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

दाभोलकर हत्या: अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल?

दाभोलकर हत्या: अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल?




विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं असल्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. या पिस्तुलाची सध्या पाहणी केली जात आहे. यानंतरच आरोपींनी हे पिस्तूल वापरलं होतं की नाही हे स्पष्ट होईल. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.
हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का ? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २०१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. “अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या दुबई स्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी ९५ लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा यासाठी सीबीआय सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दरम्यान, सध्या या पिस्तुलाची पाहणी केली जात असून यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं हे स्पष्ट होईल.

निर्भया प्रकरण; दोषींना आता २० मार्च रोजी फाशी दिली जाणार

निर्भया प्रकरण; दोषींना आता २० मार्च रोजी फाशी दिली जाणार


विशेष प्रतिनिधी
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या चार दोषींना २० मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे. २० मार्चला पहाटे ५.३० वाजता दोषींना फासावर लकटवणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. याआधी ३ मार्च रोजी या दोषींना फाशी दिली जाणार होती. मात्र ती तारीख टळली. आरोपी पवन कुमारची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती.



 मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ही तारीख टळली होती. डेथ वॉरंटसाठी पुढची तारीख मिळेपर्यंत या चारही दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती. आता आज काही वेळापूर्वीच या आरोपींच्या फाशीसाठी नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Thursday, March 5, 2020

भारतातही काेराेना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

भारतातही काेराेना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.




पुणे
: चीनमधून पसरलेल्या काेराेना विषाणूमुळे जगभरात हजाराे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव आता चीनबराेबरच इतर देशांमध्ये हाेताना दिसत आहे. भारतात देखील काेराेनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. काही सुरक्षा घेतल्यास काेराेनापासून आपला बचाव करता येऊ शकताे.

असा पसरताे काेराेना विषाणू
काेराेनाची लागण झालेली व्यक्ती निराेगी व्यक्तीच्या समाेर खाेकल्यास किंवा शिंकल्यास निराेगी व्यक्तीला काेराेनाची लागण हाेऊ शकते. लागण झालेल्या व्यक्तीच्या लाळेच्या माध्यमातून काेराेनाचे विषाणू अनेक वस्तूंवर पसरु शकतात. त्या वस्तूंना तुम्ही स्पर्शकरुन तुमच्या डाेळ्याला, कानाला किंवा नाकाला हात लावल्यास तुम्हाला विषाणूची लागण हाेऊ शकते.

अशी घ्या काळजी

- सातत्याने खाेकणाऱ्या तसेच शिंकणाऱ्या व्यक्तीशी 2 ते 5 मीटरचे अंतर ठेवून संवाद साधा

- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, तसेच गर्दीच्या ठिकाणी गेल्यास मास्कचा वापर करा.

- विविध वस्तूंवर काेराेनाचे विषाणू 48 तासांपर्यंत जीवंत राहू शकतात. त्यामुळे सातत्याने तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. कमीत कमी 20 सेकंदापर्यंत तुमचे हात स्वच्छ करा.

- आजारी व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा

- डाेळे, कान, नाकाला वारंवार हात लावणे टाळा

- आजारी पडल्यास रुग्णालयात जाऊन याेग्य ते उपचार घ्या

Tuesday, March 3, 2020

भोकर तालुक्यात दहावीच्या परीक्षा सुरळीत

भोकर तालुक्यात दहावीच्या परीक्षा सुरळीत

                           फाईल फ़ोटो

तालुक्याच्या नियंत्रण कक्षाकडून परीक्षेवर नजर

 भोकर (प्रतिनिधी)
 तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीचे 2066 विद्यार्थी परीक्षा देत असून आज( दि ‌‌०३ )मंगळवार रोजी मराठीचा पेपर  कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ डी.एस मठपती यांनी दिली आहे.

तालुक्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी पासून कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा पार पडावेत यासाठी तालुका प्रशासनाकडून योग्य  नियोजन करण्यात आले आहे.तालुक्यातल्या सहा परीक्षा केंद्रावर भरारी व बैठे पथके निर्माण करून नजर ठेवण्यात येत आहे. परीक्षा केंद्रावर व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण परीक्षा परिसर कैद केला जात आहे. परीक्षा केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्यावर नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे याद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती, अनुपस्थिती, व परीक्षेतील कॉपी प्रकार, तोतयागिरी याबद्दल केंद्र संचालकांकडून, कडून वेळोवेळी माहिती घेऊन वरिष्ठांना कळविले जात आहे. एकूणच आज तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर मराठीचा पहिला पेपर कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत पार पडला आहे.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जि प हा भोकर -३५०, मंजुळाबाई किन्हाळकर विद्यालय-३९१, श्री शाहू महाराज विद्यालय-४००, श्री लक्ष्मणराव घिसेवाड विद्यालय-४३० , आश्रम शाळा साळवाडी-२३९ ,कै.ल.पा   विद्यालय लगळुद-२५६ असे मराठी, इंग्रजी, उर्दू ,माध्यमाचे एकूण २०६६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दरम्यान परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडत असल्याचे पाहून पालक समाधान व्यक्त करत आहेत.

मरवाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न

मरवाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न



नांदेड प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 390 व्या जयंती निमित्ताने शिव व्याख्यानाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिव व्याख्यानासाठी सोपान पाटील कदम यांना निमंत्रित करण्यात आले होते सायंकाळी 4:00वाजता छत्रपती शिवाजी राजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती पालखी मिरवणुकीत गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील माता-भगिनी लहान थोरांनी पालखीतील छत्रपती चे पूजन करुन दर्शन घेतले सायंकाळी 7:00 वाजता संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लहान लहान मुलांनी आपल्या कलेतून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर सोपान पाटील कदम यांचे शिवव्याख्यान झाले या कार्यक्रमास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होण्याकरिता स्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळ शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संजय पाटील चिखले, देशाचे सैनिक गजानन पाटील वडजे, समितीच्या इतर सदस्यांनी मेहनत घेतली.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...