परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील
भोकर (प्रतिनिधी)
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या भोकर येथील ६ दुकाने सील केल्याची मंगळवारची बातमी ताजी असताना परत ५ दुकाने व हॉटेल व्यावसायिक लॉक डाऊनचे नियम पायदळी तुडवून ५ वाजताच्या नंतर व्यवसाय करत असल्याचे आढळून आले यावरून महसूल विभाग आणि नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने आज सामूहिक दंडात्मक कारवाई करून सील केले आहे. या कारवाईमुळे हॉटेल वेवसायक व दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच प्रत्येकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र, या नियमाला हरताळ फसला जात असल्याचे चित्र सध्या भोकर शहरात सर्वत्र दिसत आहे. विशेष म्हणजे दुकानदारही नियम पाळत नसून लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन होत आहे. नियमा बाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच प्रशासनाने घाऊक व्यापाऱ्यांना ऑनलाईन तसेच फोनवरुन मालाची मागणी स्वीकारुन ती पुरवावी. जेणेकरुन बाजारात ग्राहकांची एकच गर्दी न होता ही रोखले जाईल. तसेच दुकान सुरू करण्यासाठी ठराविक वेळही दिली आहे. परंतु, नियमाचे पालन न केल्यामुळे ५ वाजता च्या नंतर पण आपला वेवसाय चालू ठेवल्यामुळे भोकर येथील व्यवसाय करणाऱ्या आंबेडकर चौक मधील १)मराठवाडा बिर्याणी हॉटेल २) एव्हर ग्रीन चिकन बिर्याणी हॉटेल ३) बासस्टँड जवळील नृसिंह टी हाऊस,४) श्री. साईकृपा हेअर स्टाईल,५)भवानी हेअर सलून
असे एकूण ५ दुकाने व हॉटेल दिनांक २४जून रोजी महसूल प्रशासन व नगरपरिषद व पोलीस प्रशासन भोकर यांच्या वतीने सामूहिक कारवाई करत एकूण ५ दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून ५ दुकाने सील करण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
या कार्यवाही पथकात भोकर तहसिल महसूल प्रशासनच्या वतीने पथक प्रमुख नायब तहसिलदार सतीश जोहरे,
यांचे सोबत श्री. बी. के. राऊत, श्री. गोविंद राचेवाड
नगर परिषद तर्फे श्री. सचिन वैष्णव व पोलीस प्रशासन तर्फे श्री. बिरकलवाड व आदि उपस्थित होते व तसेच सर्व व्यापाऱ्यांनी ५ वाजता दुकान बंद करावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे