Saturday, June 20, 2020

नांदेड:- ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी वाढली पंडित कच्छवे यांना बोलवा:-बजरंग भेंडेकर

नांदेड:- ग्रामीण पोलिस स्टेशन  अंतर्गत गुन्हेगारी वाढली पंडित कच्छवे यांना बोलवा:-बजरंग भेंडेकर




नांदेड: (एजास कुरेशी)
नांदेड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे सुट्टीवर गेले तेव्हापासून सिडको भागात गुंडाने थैमान घातले आहे म्हणून पंडित कच्छवे यांना लवकरात लवकर सेवेवर कार्यरत करा अशी मागणी नांदेड येथील बजरंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग भेंडेकर, यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे

सिडको येथील ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे जेव्हा  कार्यरत होते तेव्हा गुंडगिरीला आळा बसला होता. परंतु ते जेव्हापासून सुट्टीवर गेले आहेत तेव्हापासून सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी वाढली आहे व तसेच तसेच महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक तलवारीने मारामारी करत आहेत आणि खुलेआम अवैध धंदे, सुरू झाले आहेत मटका, गुटखा, जुगार अड्डे, चालू झाले आहेत व तसेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ असताना सुद्धा गुन्हेगार प्रतीचे लोक वाढलेले आहेत व तसेच पुरुष व महिलांसाठी भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे असे निवेदन बजरंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग भेंडेकर, यांनी बजरंग सेनाच्या  लेटरपॅडवर निवेदन दिले आहे त्यामध्ये
भास्कर हंबर्डे, बजरंग सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, व गजानन कहाळेकर, बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष ांचे स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...