ब्रेकिंग न्यूज़ नांदेडमध्ये कोरोनाचे नवीन तीन रुग्ण
नांदेड: प्रतिनिधि
नांदेडमध्ये गुरुवारी एकाच दिवशी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूने खळबळ उडवून दिल्यानंतर शुक्रवार दि. 1 मे रोजी सकाळी नव्या तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे तिन्ही जण ड्रायव्हर असून पंजाब येथून यात्रेकरूंना सोडून नांदेडकडे परतले होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नांदेड शहरात कोरोनाच्या रुग्णांचे तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी नांदेड शहरात पहिला रुग्ण 22 एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर दुसरा रुग्ण अबचल नगर येथील 44 वर्षीय रुग्ण सापडला होता. त्यानंतर सेलू येथून उपचारास आलेली महिला 29 कोरोनाबाधित झाली होती. यातील दोन पीरबुर्हाण येथे राहणार्या व सेलू येथून उपचार घेत असलेल्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला.
नांदेड येथून पहिल्या टप्यात यात्रेकरूंना घेऊन खुराणा ट्रॅव्हल्स पंजाबकडे रवाना झाल्या होत्या. यात सतरा चालकांचा समावेश होता. हे चालक पंजाब येथून परतल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. यातील सतरा जणांपैकी तीन ट्रॅव्हल्स चालकांचे अहवाल पोझिटीव्ह आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून ते चारला चार जण हे ड्रायव्हर आहेत. नव्याने पॉझिटीव्ह झालेले रुग्ण यामध्ये एक जण लोहा तालुक्यातील किवळा, एक जण कंधार व नांदेड शहरातील सांगवी परिसरातील आंबा नगर येथील असल्याचे समजते.