Wednesday, April 22, 2020

अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनच्या वतीने मौ.मांगदरा येथील गरजूंना मदतीचा एक हात!

अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनच्या वतीने मौ.मांगदरा येथील गरजूंना मदतीचा एक हात!



अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने अन्न व धान्याचे करण्यात आले वाटप

भोकर प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या असंख्य गरीब व गरजूंची उपासमार होत आहे.सामाजिक जाणिवेतून अनेक सामाजिक संस्था,संघटना व दानशूरांकडून सर्वत्र मदतीचा ओघ सुरु आहे.विशेषत: शहरी भागात याचे प्रमाण अधिकचे आहे.परंतू ग्रामीण भागातही अशा प्रकारे मदतीची अत्यंत आवश्यकता आहे.याची जान ठेऊन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे यांच्याकडून १ महिन्याचे धान्य व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर आणि भोकर तालुका मराठी पत्ररार संघाच्या वतीने जेवन असे ४०० गरजूंना दि.२० एप्रिल २०२० रोजी मौ.मांगदरा ता.भोकर येथील ४०० गरजूंना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले आहे.




ग्रामीण भागातही अनेकांचा उपासमार होत आहे. शासनाकडून स्वस्त धान्याचे वितरण होत आहे. धान्य मिळत आहे परंतू ते खायचे कशा सोबत ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे.दाळ,तिखट,मीठ, साखर, तेल आदी काही लागते.त्यासाठी पैसे कुठून आणायचे ? हा प्रश्न देखील आहेच.याची जान असलेल्या अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,मराहाष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने असे ठरविले की,शासनाचे धान्य खरेदीसाठी या गरीब गरजूंना जे पैसे दुकानदारास द्यावे लागतात,ते त्यांनी द्यायचे नाहीत,तर ते पैसे संघटनेच्या वतीने द्यायचे व त्या गरजूंनी धान्य खरेदीपोटीचे जमा राहणा-या पैशातून उपरोक्त जीवनावश्यक वस्तू खरेदीवर खर्च करावा.

याच अनुशंगाने अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे यांनी त्या धान्याचे एकूण शुल्क दिले.तर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर व भोकर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जेवन दिले.अशा प्रकारे मौ.मांगदरा (सिद्धार्थ नगर)ता.भोकर येथील ४०० गरीब,गरजूंना दि.२० एप्रिल २०२० रोजी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समिती ता.भोकर व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत Social Distancin चे नियम पाळून अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.तसेच सदरील धान्य शुल्काच्या रक्कमेचा धनादेश उत्तम बाबळे यांच्या हस्ते स्वस्त धान्य दुकानदारास देण्यात आला.

सदरील मदत ही मोठी नसली तरी किमान दोन घास भरविणारी नक्कीच आहे.समाजात पैशेवाले व सरकारी नौकरीवाले मोठे पदस्त लोक आहेत.परंतू ते ग्रामीण भागातल्या गरजूंकडे फिरुनही पाहत नाहीत.यामुळे हा उपक्रम पाहणा-यास लहान जरी दिसत असला तरी गरजूंच्या पदरी काहीतरी टाकणारा अभिनव उपक्रम नक्कीच आहे.या सेवाभावी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते सखाराम मोरे,नामदेव वाघमारे,पत्रकार सिद्धार्थ जाधव, गंगाधर पडवळे,राजन्ना माहूरकर, गोणेकर,देवराव मनपुर्वे, शिवकुमार गाडेकर,दत्ता आष्टीकर,राहूल कदम,पांडूरंग सुर्यवंशी,श्रीकांत बाबळे,साई मोरे यांसह आदींनी प्रयत्न,परिश्रम व सहकार्य केले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...