Wednesday, April 22, 2020

दोन दुचाकी समोरा समोर भिडल्याने एक युवक ठार तर चार जखमी

 दोन दुचाकी समोरा समोर भिडल्याने एक युवक ठार तर चार जखमी

 गंभीर पैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक ,



जिंतूर प्रतिनिधी/सय्यद नसीर
 जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे हद्दीतील बामणी फाट्या जवळ झालेल्या दुचाकी  अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले या जखमी पैकी दोन जणांना परभणी येथील सामान्य  रुग्णालयात हलवण्यात आले आहे 
   याबाबत अधिक वृत्त असे कि जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाणे हद्दीतील कोळपा येथील युवक रवी सातपुते व त्याचा मित्र  बाबु सखाराम गिरी हे कोळप्याहुन ( MH 22 0625 ) या दुचाकीवरुन बामणी कडे येत होते तर सिध्दार्थ नामदेव अंभुरे व त्याचे दोन मिञ हे (MH 22 AF~8145) या दुचाकीवरुन अंबरवाडीहुन बामणी कडे जात असतांना या दोन वाहनांची बामणी फाट्या जवळ दि 22 एप्रिल बुधवार रोजी सकाळी 9;30 च्या सुमारास एकमेकांच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगात असल्याने समोरसमोरून भिडल्यामुळे हे अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे ,तर या झालेल्या दुचाकी अपघातातील अपघातग्रस्तांना जिंतूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी प्रथम उपचारा दरम्यान त्यातील रवि पंजाब सातपुते वय 25 वर्ष, ( रा. कोळपा ता जिंतूर) यास मृत घोषित केले तर बाबु सखाराम गिरी वय 25 वर्ष,(संक्राळा,जिंतूर),सिध्दार्थ नामदेव अंभुरे वय 25 वर्ष,विकास शिवाजी भुतेकर वय 20 वर्ष दोघेही (रा. केलसुला ता सेनगाव जि हिगोली),मिलिंद बबन दुजाकर वय 32 वर्ष (रा. बोरी जिंतूर) हे चार जण गंभीर जखमी झाले असल्याचे कळविले आहे यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना पुढिल उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे तर मृतक व्यक्तीवर  शवविच्छेदन प्रक्रिया जिंतूर शासकीय रूग्णालयात सुरू असून या प्रकरणात बातमी लिहीपर्यंत बामणी पोलीसांत  अपघाताची नोंद  झाली नव्होती, तर या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे ,

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...