Monday, April 6, 2020

धर्माबाद शहरातील गरजू, गरीब कुटुंबाना सिंहनाद प्रतीष्टानकडून अन्नधान्याचे 151 किट वाटप.

धर्माबाद शहरातील गरजू, गरीब कुटुंबाना सिंहनाद प्रतीष्टानकडून अन्नधान्याचे  151 किट वाटप.




धर्माबाद प्रतिनिधी:- लॉक डाऊनच्या कार्यकाळात गरजू व गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी सिंहनाद युवक प्रतिष्टान धर्माबाद अनुपसेठ कासलीवाल यांच्या माध्यमातून धर्माबाद शहरातील   गरीब व गरजू 151 कुटुंबांना  अन्नधान्याचे किट वाटप केले.
   मागील गेल्या चौदा दिवसापासून संबंध भारतभर केंद्रसरकारने कोरोना सारखा महाभयंकर विषाणू नागरिकांत पसरू नये म्हणून लॉक डाऊनची घोषणा केली. त्यामुळे मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या धर्माबाद शहरातील अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. धर्माबाद शहरातील अनेक सामाजिक संघटना, मा.न्यायालय,पत्रकार, दानशूर नागरिक याच बरोबर सिंहनाद युवक प्रतिष्टान धर्माबाद यांनी
 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे किट पाकिटे पुरवून, हातभार लावल्याने अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शहरातील फुलेनगर, शास्त्रीनगर, रामनगर, देवी गल्ली, सरस्वती नगर.शंकर गंज .वडार गल्ली या भागात असणाऱ्या व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ, साबण, तोंडावर लावण्याचा मास्क, डाळ, तेल आदी वस्तू देण्यात आल्या,





यावेळी तहसिलदार दत्तात्रय शिंदे मुख्याधिकारी मंगेश देवरे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे पो उपनिरीक्षक नागनाथ सनगले सहाय्यक पोलीस निरीक्षक उजगरे. कराड .मुंबई पोलीस निरीक्षक रवि अण्णा बोलमवार अनुपसेठ कासलीवाल.नरेश शिरलावार.बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माधव हानमंते सचिव सुरेश घाळे पोलीस हेड काँ.शबीर शेख.चेतन सोनी.संतोष येरावार.राजु गोडगुलवार मनोज काले राजु वानखेडे साईनाथ सिरपूरे छोटु पाटील.शेख लाल सुर्यकांत राखोंडे
 जैन युवा संघटनेचे महाविरसेठ लोहाडे.अनुपसेठ कासलीवाल.प्रणय पहाडे अंकीत गोधा अमन पाडें लोकेश गोधा अमीत कासलीवाल व ईतर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.महावीर जयंती निमित्ताने
 जैन युवा सघटना यांच्या परिवाराकडून 300 सनिटायझर चे 200 एम एल च्या बाटल व  300 मास वाटप केले.
 वैद्यकीय सेवा व पोलीस यांना 100 बाधंवाना जेवन दिले  आहे . यामुळे सिंहनाद युवक प्रतिष्टान धर्माबाद यांचे शहरातून कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...