Wednesday, April 1, 2020

पत्रकार सिद्धार्थ जाधव यांनी अन्नदान करून गरिबांच्या पोटाला दिला आधार

पत्रकार सिद्धार्थ जाधव यांनी अन्नदान करून  गरिबांच्या पोटाला दिला आधार




दिड हजार गरीब लोकांना दिले भोजन दान


भोकर - कोरोना विषाणूच्या महामारी संकटाने कहर मांडलेला राज्य व परप्रांतीय अनेक गरीब,मजूर,भिक्षूक,निराश्रीत असे अनेक कुटूंब पालात होम लॉकडाऊन झाले यामुळे आहेत यांच्यावर



उपासमारी वेळ आली  आहे.अशा गरीब गरजूंना भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव पत्रकार सिद्धार्थ जाधव यांच्या वतीने  बटाळा रोड, किनवट रोड, बोरगाव रोड, हनुमान नगर, शेख फरीद नगर, येथील 
हातावर पोट असलेल्या भुकेल्यांसाठी, भिक्षुक, गोर गरीब अशा १ हजार ५००  लोकांना आज ३१  मार्च २०२० रोजी भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मा.मुजीब एस.शेख,वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश मंदार एन. पांडे, तहसीलदार भारत सूर्यवंशी,उप.नि.शालीनी गजभारे यांच्या हस्ते पुरी- भाजी- भात  वाटप करण्यात आले.यावेळी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,पत्रकार लतिफ शेख,पत्रकार अॅड.स्वरुपा भोसले,यांसह न्यायालयीन कर्मचारी विठ्ठल कृष्णावाड,अजय नेहूलकर,गांजरे,पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव आदींची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...