Thursday, April 23, 2020

भारत लोक सेवक पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिजेश तिवारी(मुंबई) यांचा भारत प्रभात पार्टी मध्ये प्रवेश

भारत लोक सेवक पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिजेश तिवारी(मुंबई) यांचा भारत प्रभात पार्टी मध्ये प्रवेश





मुंबई:-(प्रतिनिधी)
भारत प्रभात पार्टी अर्चना सिंह बहनजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात माधव मेकेवाड यांची संपूर्ण टीम कार्य उत्कृष्ट करत आहे त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास करून ब्रिजेश तिवारी यांची भारत लोक सेवक पार्टी मधून तात्काळ राजीनामा देऊन भारत प्रभात पार्टी मध्ये आपला प्रवेश केला आहे पक्ष कमिटीने सुद्धा त्यांना युवक आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव पदी नियुक्ती देऊन महत्वाची जबाबदारी दिली आहे.ब्रिजेश तिवारी यांचं वास्तव्य मुंबई येथे आहे .ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा पूर्वी सांभाळल्या मुळे त्यांचा निश्चित भारत प्रभात पार्टीला फायदा होणार असल्याचे पक्ष कमिटीच्या पदाधिकारी यांनी कळविले आहे.डॉ.नितीन पवार(महासचिव),डॉ.रेखा पाटील(राज्य महासचिव),हेमंत खरात मुंबई(राज्य उपाध्यक्ष),दिपा आवळे(महिला आघाडी,प्रदेश अध्यक्ष),सोमनाथ साधू(युवक आघाडी,प्रदेश अध्यक्ष),विजय घाडगे(युवक आघाडी,राज्य उपाध्यक्ष) आदींनी  त्यांच्या निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या आहे.
महाराष्ट्र काँग्रेस,भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी ह्या प्रमुख राजकीय पार्टी आहेत त्यात पुढील महत्वाच्या निवडणुकीत केवळ भारत प्रभात पार्टी जनतेच्या मनात असणार असल्याचा विश्वास ब्रिजेश यांनी दिला आहे.युवक हा देशाचा कणा असतो म्हणून देश पातळीवर राजकीय कार्य करून युवकांना न्याय देणारी पार्टी म्हणून महाराष्ट्र मध्ये मी ओळख निर्माण करेन आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका मुंबई सह भारत प्रभात पार्टी लढवणार आहे म्हणून मी ह्या राजकीय पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी कळविले आहे.


                                 जाहिरात👇



No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...