राज्यस्तरीय भीमगीत स्पर्धेत भोकरचा
धम्मानंद जाधव ठरला मानकरी.
भोकर.(प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा सार्वजनिकरीत्या साजरी करता आली नाही. यावर उपाय म्हणून हिंगोली येथील ऊपासकानी मोबाईलवर राज्यस्तरीय भीमगीत स्पर्धा घेतली . महाराष्ट्रासह अन्य राज्यातील सुमारे पावणेतीन हजार स्पर्धेकानी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचा निकाल शनिवारी ( ता.२५) जाहीर करण्यात आला असून भोकर येथील भीम शाहिर धम्मानंद जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावून मानकरी ठरला आहे.
#यावर्षी देशात कोरोना विषाणूंमुळे हाहाकार उडाला असून अनेकांना जीव गमावावा लागला आहे.यावर उपाय म्हणून देशात मागील महिन्यापासून "लाॅकडाऊन" करण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाली आहेत.अनेक महापुरुषांच्या जयंतीला फाटा द्यावा लागल्याने घरात बसूनच सण उत्सव साजरे करावे लागलेत.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सूध्दा यंदा घरात बसूनच साजरी करण्यात आली.सार्वजनिक ठिकाणी कूठलाही कार्यक्रम आयोजित करता आला नाही.शासनाचे आदेश पाळून मराठवाड्यातील हिंगोली येथील काही आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक बापूराव घोंगडे.शिवाजी गावडे.अभिनंदन घोंगडे यांनी भीमजंयती निमित्ताने राज्यस्तरीय भीम गीत स्पर्धा आयोजित केली होती.स्पर्धेकानी मोबाईलवर गीताची व्हिडिओ क्लिप करून आयोजकांकडे पाठवली होती.यात महाराष्ट्र.तेलगंणा.कर्नाटक.गोवा.मध्यप्रदेश.गूजरात राज्यातील सुमारे दोन हजार सातसे त्र्येचाळीस बांधवांनी सहभाग नोंदविला होता.परिक्षक म्हणून संतोष खिल्लारे व पत्रकार प्रकाश इंगोले (हिंगोली) यानी काम पाहील . स्पर्धेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून सांगली येथील पृथ्वीराज देवानंद माळी (प्रथम). आकाश गायकवाड यळवत मंडळ तानूर जिल्हा निर्मल तेलंगणा (व्दितीय).भोकर जिल्हा नांदेड येथील भीम शाहिर धम्मानंद जाधव (तृतीय) पारितोषीकाचे मानकरी ठरले आहेत. गायक श्री. जाधव यांना तबल्याची साथ भोकर येथील बातमीदार बाबूराव पाटील तर आॅर्गनची साथ प्रवचन लोखंडे यांनी केली आहे. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम लवकरच देण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

No comments:
Post a Comment