भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या कामगिरीने मोकाट फिरणाऱ्यांची होतेय 'दांडी गुल'
संचार बंदीत सैराट होवून फिरणाऱ्याची वाहने होणार अत्ता"लॉक डाऊन"पो.हे.साहेबराव सगरोळीकर
लॉक डाऊन काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नका अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल--पो.नि. विकास पाटील
भोकर (एजास कुरेशी):-
सध्या जग कोरोना या विषाणूच्या प्रचंड सावटाखाली आहे.दिवसेंदिवस महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. या मुळे एका बाजूला प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना भोकर तालुक्यातील नागरिक मात्र या आजाराची गंभीरता न जाणून घेता,बिनधास्तपणे वागताना दिसत आहेत,देश लॉक डॉऊन मध्ये असताना आणि राज्यात संचार बंदी असताना विनाकारण,आणि मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना,वाहन चालकांना भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी केलेल्या कारवाईमुळे चांगलाच धसका घेतल्याचे चित्र भोकर शहर आणि तालुक्यात दिसू लागले आहे.
पोलीस निरीक्षक विकास पाटील करीत असलेल्या सिंघम कामगिरीने मोकाट,विनाकारण,दुचाकी आणि चारचाकी वाहनातून सैर मारणाऱ्याची चांगलीच दांडी गुल होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे, महाराष्ट्रात संचारबंदी कायदा लागू असताना आणि भोकर नगरपरिषद,पोलीस स्टेशन,तहसिल कार्यालय,आरोग्य विभागाने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आवश्यक ती सर्व जनजागृती करून "Stay Home चा सल्ला देत असताना वरील सर्व प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून विनाकारण आणि दुचाकी चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसताना मोकाट फिरणाऱ्याची वाहनेच पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लॉक डॉउन करणार असल्याने अनेक वाहनधारकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
कोरोना व्हायरस वेगात पसरत असल्याने, शासनाच्या आदेशाने (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्वाना घरी थांबणे बाबत जन जागृती सध्या चालू आहे. परुंतु सदर आदेशाचे जो उल्लंघन करील त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे भोकर चे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सांगितले आहे.

No comments:
Post a Comment