Tuesday, April 21, 2020

भोकर मधून पंतप्रधान सहायता निधीसाठी एक लाखाची मदत ; खा चिखलीकर यांच्यसकडे धनादेश सुपूर्द

भोकर मधून पंतप्रधान सहायता निधीसाठी एक लाखाची मदत ; खा चिखलीकर यांच्यसकडे धनादेश सुपूर्द 



भोकर(प्रतिनिधी )लाॅकडाऊनमुळे    जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे अडचणीत सापडलेल्या गोरगरीब गरजवंत लोकाच्या  मदतीला धावून जात आहेत त्यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अशा अडचणीच्या  काळात लोकांना मदत करत आहेत२२लाख रुपयांचा पीएम सहाय्यता निधी देण्यात आला त्यानंतरही  कार्यकर्ते देणगीदार पुढे येत आहेत भोकर तालुक्याच्या वतीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी १ लाख ५ हजार रुपये रुपयाचा धनादेश खा. प्रतापराव पाटील  यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आला आहे व तसेच भोकर येथील सामाजिक कार्यकर्ता दिलीप सोनटक्के यांनी 11 हज़ार रुपयाचा धनादेश पीएम सहय्यता निधिसाठी दिले आहे.



भोकर येथील  दिलीप सोनटक्के
गणेशराव पाटील कापसे बटाळकर, रावसाहेब पाटील लामकाणीकर, विशाल माने, शिवाजी जाधव, अजित पाटील, अनिल अंगदेगावे, राजू अंगरवार देवठाणकर, दिनेश लक्षटवार यांनी १लाख ५ हजार रुपयांचा धनादेश जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे
     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्या नंतर जिल्ह्यातील भाजपा च्या वतीने कार्यकर्त्यांना  'पीएम' फंडा साठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला भोकरच्या कार्यकर्त्यांनी हा फंड दिला
     देशात व राज्यात टाळेबंदी झाल्यानंतर सर्वसामान्य माणसांची परवर होऊ होऊ नये यासाठी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर स्वतः जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांच्या  व गावांच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या  समस्या अडचणी जाणून घेत आहेत त्यांची सोडवणूक करीत आहेत शिवाय भारतीय  जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष महानगराध्यक्ष, तालुका अध्यक्ष बूथप्रमुख कार्यकर्ते  अशी  सर्वांची टीम  अडचणीत सापडलेल्या लोकांच्या सेवेत अहोरात्र  गेल्या अनेक दिवसापासून कार्यरत आहेत शिवाय त्यांना मदतिला धावत  आहेत .खासदार प्रतापराव पाटील स्वतः जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत .. कोरोना सारख्या  अडचणीच्या काळात आपला "हक्काचा माणूस ' कठीण प्रसंगात धावून येता आहेत .खासदार असावे तर असे प्रतापराव पाटील  यांच्या सारखे असे  लोकभावना व्यक्त होत आहे   खा.चिखलीकर आणि  त्यांच्या टीम करीत असलेले  काम  संपूर्ण जिल्ह्यात  होत लक्ष्यवेधी ठरले आहे  काहीजणांना द्वेषाचा संसर्ग कायम दिसतो आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...