Wednesday, July 31, 2019

त्या सामूहिक बलात्कारा प्रकरणी भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधिश एम.एस.शेख यांनी दोघांना दिली वीस वर्षांची शिक्षा

त्या सामूहिक बलात्कारा प्रकरणी भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधिश एम.एस.शेख यांनी दोघांना दिली वीस वर्षांची शिक्षा


   



 भोकर :- एजास कुरेशी
   उमरी येथीलसामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी भोकरचे जिल्हा सत्र न्यायाधिश एम.एस.शेख यांनी दोघांना वीस वर्षांची शिक्षा दिली आहे व एकाची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

नांदेड जिल्ह्यातील उमरी शहरातील व्यंकटेश नगरात एक अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. दि.२६ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्री एकच्या दरम्यान, आरोपी आनंदा महादू सावंत, कुणाल उर्फ खंडू पांडूरंग गायकवाड, शुंभम पांडूरंग देशमुख हे तिघे घरात घुसून मुलीच्या आईच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला होता.

या प्रकरणी पिडीत मुलीने उमरी पोलिसात रितसर फिर्याद दिल्यानंतर आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन भोकर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी विरुध्द सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. पिडित मुलगी व तिची आई प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. आरोपी आनंदा सावंत व कुणाल उर्फ खंडू गायकवाड या दोघांविरुध्द सबळ पुराव्याच्या आधारे वीस वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व ८ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. तर आरोपी शुंभम देशमुख यांच्या विरोधात पुरावा सिध्द न झाल्याने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे, आयपीएस अधिकारी नुरुल हसन यांनी तपास केला होता. पैरवी अधिकारी बालाजी वडजे यांनी काम पाहिले होते. सरकारी वकील रमेश राजूरकर यांनी फिर्यादी पक्षाची बाजू मांडली तर आरोपीतर्फे अँड.जे.जे जाधव आणि अँड.प्रकाश टोम्पे यांनी काम पाहिले. शिक्षा सुनावताच आरोपीच्या आई व नातेवाईकांनी न्यायालय परिसरात आक्रोश केला.

Tuesday, July 30, 2019

१०० दिवसांत देशातील सर्व वक्फ मालमत्तांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार

१०० दिवसांत देशातील सर्व वक्फ मालमत्तांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार




बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी
   देशभरात सहा लाखाहून अधिक नोंदणीकृत वक्फ मालमत्ता आहे. मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने याचावापर करणे गरजेचे आहे. हे करत असताना या मालमत्तांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असून त्यासाठी येत्या 100 दिवसांत या सर्व मालमत्तांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सोमवारी केली.केंद्रीय कक्फ परिषदेच राष्ट्रीय संमेलन केंद्रीय मंत्री नकवी यांच्या उपस्थितीत पार पडले. या परिषदेत वक्फ मालमत्तांच्या संरक्षणात महत्वाची भूमिका पार पाडणार. यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.देशभरात कार्यरत असणारे मुतवल्लि हे खऱया अर्थाने वक्फ मालमत्तांचे संरक्षक आहेत. मुस्लीम समाजाच्या विकासासाठी दान करण्यात आलेल्या जमीनींचा त्याच कारणासांठी वापर कसा होईल याची दक्षता त्यांनी घेणे आवश्यक असल्याचे नकवी म्हणाले.वक्फ मालमत्तांवर कुणीही अतिक्रमण करू नये. त्याचबरोबर त्यांचा उपयोग मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केला जावा. यादृष्टीने सरकार प्रामुख्याने पावले उचलत असून या सर्व मालमत्तांचे वर्गिकरण करण्याबरोबरच जिओ टेगिंग अर्थात डिजिटलायझेशन करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय कक्फ परिषदेकडून राज्य कक्फ बोर्डांना आर्थिक मदत आणि तांत्रिक सहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली.विवादास्पद मालमत्तांबाबत ठोस निर्णयवक्फ मालमत्तांचा योग्य कामांसाठी वापर करण्यात यावा. त्यासंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी जकीउल्लाह खान यांच्या नेतृत्वात पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार विवादास्पद मालमत्तांबाबत नियमांत काही बदल करून ठोस निर्णय येणाऱया काळात घेण्यात येतील. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून वक्फ मालमत्तांच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय, रुग्णालय यासारख्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येतील, असे नकवी यांनी सांगितले.

Wednesday, July 24, 2019

भोकर तालूक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परचालका विरुध्द भोकर पोलिसात गून्हा दाखल

भोकर तालूक्यात अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परचालका विरुध्द भोकर पोलिसात गून्हा दाखल







भोकर (एजास कुरेशी)
भोकर तालुक्यात अवैध रेती दररोज चोरट्या रेतीची वाहतूक होत असते. त्यामुळे महसूल प्रशासनाने एकदा कारवाई केली तरी ती सातत्याने व्हायला हवी, असे सर्वसामान्य नागरिकात चर्चा होत आहे. महिन्यातून एक-दोनदा दिखाऊ कारवाई करायची व त्यानंतर रोजचे दहा वीस चोरट्या रेतीचे ट्रक दिवसाढवळ्या भोकर शहरातून किनवट रोड ने बाहेर गावी जाता असतात हे या लोकांना दिसत का नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन दक्ष नसल्यानेच इतक्या प्रमाणात चोरटी रेती शासनाचा मोठा महसूल बुडवून वाहतूक करतात.
अमर्याद रेतीउपसा होत असल्याने पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. प्रत्यक्षात ज्यांनी कारवाई करायची आहे ते अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने ते 'मालामाल' झाले आहेत.



नांदेड जिल्ह्यात रेतीघाट बंद असताना सुद्धा मुदखेड ते भोकर मार्गाने रेतीची वाहतूक करणार्‍या एका टिप्परचालकाविरुध्द भोकर पोलिलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक माहिती अशी की, दि.२३ जूलै रोजी उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी आपल्या शासकिय वाहनाने मूदखेडकडे जात असताना समोरुन अनाधिकृत गौनखनिज रेतीची वाहतूक करीत असलेला टिप्पर क्र.एम.एच.२६ ए.डी.९९०२ येत असल्याचे त्यांना दिसताच गाडी थांबवून टिप्परचालकास विचारणा केली.

जिल्ह्यात रेतीघाट बंद असताना रेती आणली कूठून असा प्रश्न केल्यावर जूनी पावती टिप्परचालकाने दाखवली तीन ब्रास रेती अंदाजे किंमत १२००० असल्याचे निदर्शनास आल्यावर टिप्पर तहसीलमध्ये लावण्यात आला असून.दि.२४ रोजी मंडळअधिकारी महेश वाकडे यांच्या फिर्यादीवरीन टिप्परचालक तूकाराम लक्ष्मण मूतकलवाड यांच्याविरुध्द महाराष्ट्र जमिन अधिनियम १९६६ ४८(७)४८(८) भादवि३६९ प्रमाणे गून्हा नोंदविण्यात आला आहे.

गेली अनेक दिवसापासून जिल्ह्यातील रेतीघाट बंद असताना गौनखनिज रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक होत आहे चढ्या दराने रेतीची भोकर शहरात व तालूक्यात विक्रि होत आहे.मध्यरात्री हा व्यवसाय जोमात चालत असल्याची चर्चा होत आहे.महसूल विभाग या अनाधिकृत रेती वाहतूकीकडे अक्षम्य दूर्लक्ष करीत आहे.एकीकडे तालूक्यातील असंख्य घरकूल लाभार्थ्यांचे रेतीअभावी घरकूलाचे बांधकाम रखडले असताना रेतीची वाहतूक कशी होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.अव्वाच्या सव्वा दराने विकून रेतीतस्कर आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत महसुल प्रशासनाने अशा गौनखनिज रेती,मूरुम,दगड,अनाधिकृत वाहतूक करणार्‍यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Monday, July 22, 2019

आमच्या उमेदवाराची ताकत मतपेटीतून आम्ही दाखवून देऊ.......दिलीप मोहिते

आमच्या उमेदवाराची ताकत मतपेटीतून आम्ही दाखवून देऊ.......दिलीप मोहिते




भोकर:-(एजास कुरेशी)
समविचारी पक्षासोबत युती करण्यासाठी बहुजन रयत पार्टीची बोलणी सुरु असून आघाडी करताना काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. म्हणून बहुजन रयत पार्टी स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी जोमाने करावी असे आवाहन पार्टीच्या वतीन करण्यात आले आहे.
 राज्य कमिटीची महत्व पूर्ण  पदाधिकारी यांची बैठक भोकर येथील विश्रामगृहात पार पडली , राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विदर्भ युवा नेते,सर्व जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी यांची महत्वपुर्ण बैठक रविवारी भोकर येथे पार पडली. या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. दिलीप मोहिते यांनी बोलताना म्हणाले की,महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक अनुषंगाने बहुजन रयत पार्टीचे आमदार जास्ती जास्त कसे निवडून येतील यासाठी बहुजन रयत पार्टीचे काम जोमाने वाढवणे गरजेचे आहे.आम्ही आज आमचं भवितव्य मतपेटी वर विश्वास टाकत आहोत संबंध महाराष्ट्र भर असलेले बहुजन रयत पार्टीची कार्यकारणी ह्या साठी विधानसभा साठी चांगले उमेदवार देणार आहे .ही लढाई आमची वंचित बहुजन आघाडी सोबत नसून आमची ही लढाई सत्ता धारी असलेल्या भाजप सरकार विरोधी आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे,स्वाभिमानी जीवन जगत असताना बहुजनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्याच बरोबर विधानसभेत सामान्य माणूस कसा निवडणूक लढून निवडून जाईल ह्या संविधानिक व फुले, शाहू च्या विचाराने चालणारा माझा पक्ष आहे असे ते यावेळी बोलले.
     बहुजन रयत पार्टी निडणुकीत जास्ती जास्त सभा कशा व कुठे कुठे घेणार,२८८ उमेदवार चारित्र्यवान,सर्वगुण सम्पन्न असले पाहिजे, निवणुकीत पुरेसे पैसे खर्च करण्याची ताकद नसेल तरी तो प्रसिद्ध असला पाहिजे जनतेमध्ये चर्चेत असलेला पाहिजे. अशा उमेदवाराच्या चाचपणीसाठी बहुजन रयत पार्टीही ,राष्ट्रीय कमिटी,मराठवाडा उमेदवार निवड कमिटी,महाराष्ट्र राज्यासाठी समिती, यावेळी स्थापन करण्यात आली.यावेळी ह्या बैठकीला दिलीप मोहिते(राष्ट्रीय अध्यक्ष,बहुजन रयत पार्टी),डॉ.लोखंडे (राष्ट्रीय उपाध्यक्ष),प्राचार्य आकाश लोखंडे, मोहिते (अध्यक्ष मातंग सेवा संघ),माधव मेकेवाड(महासचिव),राजेंद्र चिल्कावार(युवक आघाडी,राज्य अध्यक्ष),सुप्रभा मांजरमकर(युवती आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष),अक्षय मनवर(महाराष्ट्र अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी),शुभम जाधव(मातंग सेवा संघ,राज्यअध्यक्ष ),राम पावडे(महाराष्ट्र उपाध्यक्ष),बालाजी चार्लेवाड(मराठवाडा उपाध्यक्ष),संजय नाईकडे(कार्याध्यक्ष,नांदेड),कु.मधू पाटील(युवती जिल्हा अध्यक्ष),नवनियुक्त कार्यनिरणी सुद्धा भोकर शहरात स्थापन केली गेली शेकडो तरुणांनी मा.मोहिते साहेब यांच्या सोबत फोटो काढून नियुक्ती पत्र घेऊन पक्षात प्रवेश केले.

स्पोर्टस असोसिएशन शाखा भोकर तर्फे खेळाडूंना ग्रेड बेल्ट वितरण सोहळा व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

स्पोर्टस असोसिएशन शाखा भोकर तर्फे खेळाडूंना ग्रेड बेल्ट वितरण सोहळा व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न


 भोकर :- (एजास कुरेशी)
शहरातील विमल इंग्लिश स्कूल येथे नांदेड जिल्हा स्पोर्टस असोसिएशन शाखा भोकर तर्फे खेळाडूंना ग्रेड बेल्ट वितरण सोहळा व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला असून  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमल इंग्लिश स्कूलचे सचिव डॉ. राम नाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम बाबळे, उपाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, सचिव सिद्धार्थ जाधव, सल्लागार बी.एस. सरोदेसर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कराटे स्ट्रोक, ग्रुप डेमो काता, सेल्फ डिफेन्स आदी खेळांची विविध प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली.





  सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध बेल्टचे व प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील छोटा धावपटू ईशांत हनुमंत बारसे यांचा सर्वाकडून सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी भोकर तालुका मराठी मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे आयोजकांकडून यथोचित सत्कार करण्यात आले.
  या कार्यक्रमास विमल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य लखन जाधव, प्रशिक्षक घुगे सर, कराटे प्रशिक्षक बालाजी गाडेकर, पत्रकार कमलाकर बरकमकर, गंगाधर पडवळे, शेख शाहरुख, संजय नाईकडे, विद्यार्थ्यांचे आई-वडील व  विद्यार्थी- विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कांडली ग्रामस्थांनाचा तिबार पेरणीसाठी त्वरित अर्थसहाय्य करा मागणी साठी सर्व मुलाबाळासह तहसील कार्यालयावर मोर्चा

कांडली ग्रामस्थांनाचा तिबार पेरणीसाठी त्वरित अर्थसहाय्य करा मागणी साठी सर्व मुलाबाळासह तहसील कार्यालयावर मोर्चा 







 भोकर (एजास कुरेशी)
-- तालुक्यातील कांडली येथील पडलेल्या प्रखर उन्हामूळे शेतकऱ्यांना तिबार पेरणीची वेळ आली . पहिल्याच पेरणीला बँकेकडून मिळालेले कर्ज, सावकारांच्या दारातून व्याजाने आणलेले कर्ज, त्यातून घेतलेले बी-बियाणे सर्व वाया गेल्याने आता तिबार पेरणी साठी मायबाप सरकारने सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व जनावरांसाठी छावण्या उभारून चारा-पाण्याची व्यवस्था करावी या मागण्यासाठी गावातील मुलाबाळांसह महिला पुरुषांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चाने संबंध भोकर शहरवासीयांचे लक्ष खेचून घेतले.
  तालुक्यात गेल्या दिड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तीही आता  वाया गेली असल्याने भविष्यात जीवनाचा गाडा कसा चालवावा ? मुलाबाळांचे शिक्षण, लेकिबाळीचे  लग्न व सावकाराचे कर्ज कसे फेडणार? या विवंचनेने कांडली येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे.
 त्यामुळे नाईलाजाने त्यांनी गावातील सर्व मुलाबाळासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तिबार पेरणी साठी त्वरित अर्थसहाय्य करा, जनावरांसाठी चारा छावण्या उभारून चारा-पाण्याची व्यवस्था करा, सन २०१७-१८ मधील पिक विमा मंजूर करा, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा आदी मागण्यासाठी भव्य मोर्चा काढला.
 हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार एल.ए. हिरे, पत्रकार  बालाजी नार्लेवाड, शाहीर गाडेकर यासह अनेक जणांनी  मार्गदर्शन करून अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने त्वरित मदत करावी व त्यांना आत्महत्येपासून परावर्तित करून जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी असे आवाहन केले.




  तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी सर्व शेतकऱ्यांना आपल्या केबिनमध्ये बसवून त्यांच्या सर्व मागण्यांची आस्थावाईक पणे चौकशी करून शेतकऱ्यांसोबत हितगुज साधले व माझ्याकडून शक्‍यहोणार्‍या सर्व मागण्या मी पूर्ण करणार. ज्या वरिष्ठ स्तरावरून पूर्ण होणार आहेत त्या त्वरित पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन  शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या मोर्चाचे समापन केले.
  यावेळी सरपंच प्रतिनिधी हरी दूमलवाड, उपसरपंच दिलीपराव सूर्यवंशी, नारायण पाटील गणेश पाटील, हनमनलू बडगर, प्रताप पाटील, मारोतराव राठोड, रामदास राठोड, माधव करेवाड आदी सह शेकडो ग्रामस्थ, महिला व नागरिक उपस्थित होते.

Friday, July 19, 2019

दुचाकी-चारचाकी असली तरी रेशनकार्ड रद्द होणार नाही.

दुचाकी-चारचाकी असली तरी रेशनकार्ड रद्द होणार नाही.




बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
रेशनकार्ड धारकांकडे दुचाकी, चारचाकी वाहन असले तर रेशनकार्ड रद्द होईल या भीतीने सगळ्यांनाच ग्रासले आहे. सरकारकडून काढण्यात आलेल्या एका परिपत्रकामुळे उडालेला गोंधळ निस्तारण्यात आला आहे. कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द करण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचे परिपत्रक काढून याबाबत खुलासा केला आहे.सरकारने 13 जून रोजी काढलेल्या परिपत्रकात 1999 शासन निर्णयाचा हवाला देऊन दुचाकी-चारचाकी असेल तर रेशनकार्ड मिळणार नाही या अटीसह आणखीही काही अटी घालण्यात आल्या होत्या.




या परिपत्रकात दुचाकी तसेच चारचाकी वाहनांबाबत प्रादेशिक परिवहन विभागाशी समन्वय ठेवून कागदपत्रांची छाननी करावी. तसेच जमिनीच्या मालकीबाबत महसूल विभागाशी समन्वय ठेवून रेशनकार्ड धारकांच्या कागदपत्रांची छाननी करावी अशा सूचना होत्या. यामुळे दुचाकी-चारचाकीधारक तसेच ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा परिपत्रक काढून विभागाने स्पष्टता केली आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या रेशनकार्डधारकांकडे दुचाकी, चारचाकी तसेच जमिनीची मालकी असल्यास कुटुंबाचे रेशनकार्ड रद्द करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नसल्याचे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 5 नोव्हेंबर 1999 च्या शासन निर्णयाद्वारे रेशनकार्ड देण्यासाठी जे निकष ठरविण्यात आले आहेत त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Thursday, July 18, 2019

भोकरच्या त्या दुहेरी खून खटल्यात एकाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेप

भोकरच्या त्या दुहेरी खून खटल्यात एकाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेप
       



 आज च्या निकालाकडे संपूर्ण भोकर तालुक्याची उत्सुकतेने नझर होती

                         दिगंबर दासरे........ मोहन दासरे


भोकर (एजास कुरेशी)
भोकर तालुक्यातील थेरबन येथील बहुचर्चित दुहेरी खून खटल्यात दोषी असणाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात अली असून एकाला फाशीची शिक्षा तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    या बाबत माहिती अशी की आरोपी नामे दिगंबर बाबुराव दासरे व मोहन नागोराव दासरे यांनी त्यांची सख्खी बहीण नामे पूजा ही दिनांक २३ जुलै २०१७ रोजी ती इतर समाजाच्या व त्यांच्याच गावातील मुलगा गोविंद कऱ्हाळे सोबत पळून गेली. तेलंगणामध्ये एका गावात राहून दोघे प्रियकर आणि प्रियेसी आपल्या जीवनाचा गाडा पुढे चालवत होते. तेव्हा दिगंबर दासरेला याबद्दलची माहिती प्राप्त झाली की ते दोघे तेलंगणा राज्यातील गाव खरपाडा मंडळ मुधोळ येथे राहत आहेत. आपल्या बहिणीने समाजात आपली बेइज्जती केली म्हणून तो राग धरून दिगंबरने एका दिवशी आपल्या चुलत बंधू मोहन नागोराव दासरेला सोबत घेऊन खरबाडा येथून येऊन दोन दुचाक्या भोकर तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेल्या दिवसी (बु.) व निवघा परिसरातील एका नाल्याजवळ आल्यानंतर थांबविल्या आणि तेथे दिगंबर दासरेने आपला मनातील राग व्यक्त करताना विळ्याने आपला मित्र आणि बहिणीचा प्रियकर गोविंद विठ्ठल कऱ्हाळे याचा गळा कापून टाकला. प्रियकरावर होणारा हल्ला पुजाला सहन झाला नाही. ती मध्ये आली असताना दिगंबरने तिच्यावर सुद्धा विळ्याने अनेक वार करून तिची हत्या केली. रक्ताने माखलेला विळा घेऊन दिगंबर बापुराव दासरे पोलिस ठाणे भोकर येथे हजर झाला. भोकर पोलिसांनी दिगंबर बापुरास दासरे आणि त्याचा चुलत भाऊ मोहन नागोराव दासरे या दोघांविरूद्ध भादवीच्या कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक सुशिल चव्हाण आणि पोलिस हवालदार नामदेव जाधव यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दिगंबर दासरे आणि मोहन दासरेविरूद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. १८ जुलै २०१९ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय वर्ग 1 न्यायाधीश श्री एम एस शेख यांच्या न्यायालयात  ह्या दोन्ही आरोपींना आज न्यायाधीशांनी खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले असून दिगंबर बाबुराव दासरे, याला फाशी व मोहन नागोराव दासरे, याला जन्मठेप सुनावण्यात अली आहे

या खटल्यात आठ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने नोंदवून घेतल्या. उपलब्ध झालेल्या पुराव्याआधारे न्या. शेख मुजीब यांनी खून प्रकरणी दोघांना दोषी मानले. पण प्रत्यक्षात घटना घडताना दिगंबर बापूराव दासरे याने केलेली वेगवेगळी कृती अत्यंत भयंकर मानली गेली आणि त्या आधारावर न्या. शेख मुजीब यांनी दिगंबर बापूराव दासरेला दुहेरी खून खटल्यात फाशी आणि पाच हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. खून प्रकरणात त्याला साथ देणारा त्याचा चुलत भाऊ मोहन नागोराव दासरेला जन्मठेप आणि ११ हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. रमेश राजूरकर यांनी काम केले तर आरोपींच्यावतीने ऍड. मोहन जाधव यांनी त्यांची बाजू मांडली. आपण दिलेल्या फाशीच्या शिक्षेचे सविस्तर विवेचन करताना न्या. शेख मुजीब यांनी समाजात आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी अशा खुनांच्या घटना वाढत आहेत. त्या आधारावरच सर्वोच्च न्यायालयाने अशा मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी असे निवाडे दिले आहेत. म्हणूनच दिगंबर दासरेला फाशीची शिक्षा देत आहे. फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने शिक्का मोर्तब केल्यावर पुर्णत्वाकडे जात असते. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती, त्यावेळी भोकरचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश भाले, सोपान थोरवे यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांची चोख बंदोबस्त राखला होता.

Tuesday, July 16, 2019

भोकर नगर परिषदेतने नागरीकांची आर्थीक लुट थांबवून शहरातील स्थानिक मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा:शिवाजी पाटील किन्हाळकर

भोकर नगर परिषदेतने नागरीकांची आर्थीक लुट थांबवून शहरातील स्थानिक मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा:शिवाजी पाटील किन्हाळकर




पालकमंत्री,विद्यमान खासदार व संबंधीतांकडे केली तक्रार

भोकर एजास कुरेशी
भोकर :जिल्ह्यातील इतर नगर परिषदेची कर वसूली पाहता मालमत्ता कर आणि इतर कर हे भोकर नगर परिषद जास्त प्रमाणात आकारते.यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केल्या जात आहे.म्हणून या गंभीर बाबींकडे पावकमंत्री रामदास कदम,खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, भोकर उपविभागीय अधिकारी पवन चांडक,भोकर तहसीलदार भरत सुर्यवंशी मुख्याधिकारी नगर परिषद भोकर,नगर पंचायत विभाग,नांदेड व संबंधीतांनी लक्ष घालावे आणि होत असलेली नागरीकांची आर्थीक लुट थांबवून शहरातील स्थानिक मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी भोकर येथील शिवसेनेचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील किन्हाळकर यांनी केली आहे.


      माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्या अधिपत्त्या खाली असलेल्या तथा भ्रष्टाचारांच्या अनेक आरोपांच्या विळख्यात सापडलेल्या भोकर नगर परिषद प्रशासन व सत्ताधिशांकडून गेल्या काही वर्षांपासून जनसामान्य नागरिकांना सुविधा न पुरविता अनन्य मार्गाने कर वसूल केल्या जातो आणि त्यांची आर्थिक पिळवणूक केल्या जात असल्याचे निदर्शनास येत असून होत असलेली ती पिळवणूक त्वरीत थांबवण्यात यावी आणि अकारण वसूल करण्यात येत असलेले कर कमी करण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील किन्हाळकर यांनी एका निवेदनाद्वारे नांदेड जिल्ह्याचे पावकमंत्री रामदास कदम व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि नगर परिषदेच्या सर्व संबंधीतांकडे केली आहे.
सदरील निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की,भोकर नगर परिषदेकडून महा शिक्षण कर,वृक्षलागवड कर,सार्वजनिक पाणीपुरवठा कर,महारोजगार कर,आदी कर हे अकारण मोठ्या प्रमाणात वसूल केला जातो.शहरात नगर परिषदेची एकही शाळा किंवा अंगणवाडी सुद्धा नाही.एकाही वार्डात सार्वजनिक नळ बसवलेला नाही.शहरात एक पण झाड नगर परिषदेने लावलेले नाही किंवा आहेत त्या झाडांचे संगोपण केल्या जात नाही.परंतू असे असतांनाही या सर्व बाबीवर विनाारण नागरीकांवर सेवाकराचा भूर्दंड लादून लाखो रुपये वसूल केले जातात. वैयक्तिक नळ कनेक्शन घेत असताना जवळपास ३ हजार ५०० रुपये अनामत रक्कम व दीडशे रुपये प्रतिमाह कर घेण्यात येतो.महिन्यात केवळ ५ ते ६ वेळा पाणी पुरवठा केल्या जात असतांनाही सबंध महिन्याचा कर आकारला जातो.तसेच नमुना नं.४३ मागण्यास गेले किंवा नाव परिवर्तन व बांधकाम परवानगी मागण्यासाठी गेले असता सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून नागरीकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट केल्या जाते आहे.

Monday, July 15, 2019

महावितरणमध्ये मेगा भरती : सात हजार जागा

महावितरणमध्ये मेगा भरती : सात हजार जागा



बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
राज्य शासनाच्या धोरणानुसार महावितरण कंपनीत मेगा भरती करण्यात  येणार असून कंपनीने सात हजार पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयानुसार मराठा समाजातील युवकांना 851 पदांचा लाभ मिळणार आहे;तर अनाथ युवकांना 20 जागांचा लाभ मिळणार आहे.  ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्युत सहायक पदासाठी तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार असून तीन वर्षांनंतर कायम सेवेत सामावून घेतले जाणार आहे. या पदासाठी पाच हजार जागा रिक्त आहेत. या मध्ये अनुुसूचित जाती प्रवर्गासाठी 375 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 236 पदे आहेत. विमुक्त जातीकरिता (अ) 109 जागा, भटक्या जमाती (ब) साठी80,  भटक्या जमाती (क) साठी 118, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 44 जागा राखीव आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 81, इतर मागास प्रवर्गाकरिता 1507, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग (मराठा) साठी 606, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 466, जागा आरक्षित आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी 1378 जागा आहेत. दिव्यांगांसाठी 100 जागा तर अनाथ उमेदवारांसाठी 114 जागा ठेवण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची मूदत 13 ते 26 जुलै आहे. यादी 30 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दहावीतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. दोन हजार उपकेंद्र सहायक या रिक्त पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.  यामध्ये अनुसूचित जातीसाठी 226, अनुसूचित जमातीसाठी 196, विमुक्त जातीकरिता (अ) 65 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 45,  भटक्या जमाती (क) साठी 57, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 44 जागा राखीव आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 29, इतर मागास प्रवर्गाकरिता 355, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (मराठा) साठी 245, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 191, जागा आरक्षित आहेत. तर खुल्या प्रवर्गासाठी 547 जागा आहेत. दिव्यांगांसाठी 41 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत; तर अनाथ उमेदवारांसाठी सहा जागा ठेवण्यात आल्या आहेत. विद्युत सहायक पदासाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे. मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे शिथिल आहे. माजी सैनिक आणि  दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. खेळाडूसाठी पाच वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात आली.  या पदासाठी दहावी पास आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वायरमन अथवा इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर अप्रेंटिसशिप पूर्ण केलेले प्रमाणपत्रदोन वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. या पदासाठी 13 ते 26 जुलै अखेर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. ऑगस्ट 2019 मध्ये ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.

Saturday, July 13, 2019

भोकर न्यायालायातील लोकअदालतीत ६३ लाख ६२ हजाराची विक्रमी वसुली

भोकर न्यायालायातील  लोकअदालतीत  ६३ लाख ६२ हजाराची विक्रमी वसुली





एजास कुरेशी
भोकर : येथील जिल्हा सत्र न्यायलयात आज ( १३ जुलै )  रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते यात  दिवाणी व फौजदारी स्वरूपाची न्यायालयात प्रलंबित असलेली २९८ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती  त्यापैकी  ६२ प्रकरणी निकाली काढण्यात आली आहेत.त्यात  एकोण चाळीस लाख चौरे चाळीस हजार सहाशे चौऱ्याण्णव  एवढ्या विक्रमी रकमेच्या वसुलीसाठी ऑवार्ड पास करण्यात आले. पोटगी  व कौटुंबिक वाद या प्रकरणातील अनिता  पाशमवाड. रा.सावरगाव व पातन्ना पाशमवाड  रा. कोसमेट ता. किनवट या जोडप्यांचे कौटोंबीक वाद संपूष्टात आणून एकमेकात समझौता करून त्यांना साडी -चोळी करून सुखाने नांदावयास पाठवत माहेरची भुमीका न्यायालयाकडून वठवण्यात आली. आजच्या लोकअदालतीत दाखल पूर्व प्रकरणे ८८१० पेक्षा जास्त ठेवण्यात अलेली होती त्यात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी,भोकर,व उमरी येथील  थकबाकी पोटी विज पुरवठा खंडित करण्यात आलेले  प्रकरणे व भारतीय स्टेट बेंक शाखा भोकर,मातूळ महाराष्ट्र ग्रामीण बैंक भोकर, देना बैंक भोसी , महिंद्रा फायनांन्स भोकर भोकर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील थकीत करदाते व भारत संचार निगम भोकर येथील थकीत दूरध्वनीधारक आदींचे प्रकरणे न्यायालयासमोर ठेवण्यात आले आले होते.




 या राष्ट्रीय लोकअदालतीमधे ठेवण्यात आलेल्या एकूण प्रकरणापैकी ६३९ प्रकरणे निकाली काढून २४, १८, १६३ एवढया एकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले. असे एकूण तालुका विधी समिती समोर ७०१ प्रकरणे निकाली काढून ६३ लाख ६२ हजार ८५७ एवढया विक्रमी वसूलीचे अॅवार्ड पास करण्यात आले. यावेळी न्यायदानाची प्रमूख भुमिका जिल्हा सत्र न्यायधिश मुजीब शेख, सत्र न्यायाधिश एन.के त्रिभूवन, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधिश एन.पी. पांडे, दिवाणी न्यायधिश ए. एन. पठाण, सहदिवाणी न्यायधीश .बी.ए. तळेकर, , अदी न्यायधिशांनी पार पाडली. त्यास अभिवक्ता संघाकडून विशेष सहकार्य करण्यात आले व तसेच नवीन कार्यकारणी झालेल्या भोकर तालुका पत्रकार संघ चा जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख याच्या सर्व पत्रकार संघाचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

भोकर मध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या पहाटे सहापासूनच बसस्थानकामध्ये रांगा

भोकर मध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या पहाटे सहापासूनच बसस्थानकामध्ये रांगा





भोकर (एजास कुरेशी)
राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना आली असून या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना चार हजार किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे यापूर्वी मतदान कार्ड आधार कार्ड असले तरी योजनेचा लाभ मिळत होता परंतु बरेच नागरिकानी बनावट आधार कार्ड व त्याच्यावर वयाची बनावट नोंद करून पण या सेवेचा लाभ घेत होते अशी अनेक प्रकरणे उघडकीस आल्यामुळे शासनाने स्मार्ट कार्ड योजनाही अंमलात आली आता हे स्मार्ट कार्ड बनवून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची बरीच फरकट होत असून पहाटे सहा वाजेपासून ज्येष्ठ नागरिकांनी बसस्थानक परिसरात येऊन स्मार्ट कार्ड काढण्याच्या ठिकाणावर येऊन रांगा लावत आहेत आणि त्या ज्येष्ठ नागरिकांचा चहा-नाष्टा फराळ रांगेतच होत असल्याचे दिसून आले आहे स्लो नेट अफाट गर्दी मुळे बराच त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे पहिलं बसस्थानक परिसरात अस्वच्छता पिण्यास अशुद्ध पाणी व दुर्गंधी मुळे प्रवासी नाराज होते पण आता ज्येष्ठ नागरिकांना तेथे चार-पाच तास बसून राहा राहावं लागत असल्यामुळे त्या दुर्गंधीचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे अशा ठिकाणी चहा फराळ करावा लागत आहे संबंधित विभागाने तोरेंत काही उपाययोजना करून ज्येष्ठांना होणाऱ्या त्रासापासून दूर करण्याची मागणी ज्येष्ठ नागरीकातून होत आहे


Friday, July 12, 2019

जण जागृती माहिती अधिकार समिती तर्फे भोकर पोलीस स्टेशन ला सदिच्छा भेट

जण जागृती माहिती अधिकार समिती तर्फे भोकर पोलीस स्टेशन ला सदिच्छा भेट




भोकर (प्रतिनिधी)
नांदेड येथील जण जागृती माहिती अधिकार महाराष्ट्र टीम ही जनतेच्या हिता साठी लढणारी टीम असून अगदी जागरूकतेचे काम करीत आहे जिल्ह्यातील सर्वत्र सदस्य नोंदणी चालू असून जनतेच्या मागण्यांसाठी व बोगस कामे असो का  भ्रष्टाचार असो  असे अनेक समस्या साठी पदाधिकाऱ्यांचे चे धरणे आंदोलन व ठिय्या आंदोलने सुरू आहेत



आज दिनांक ११ जुलै २०१९ रोजी नांदेड येथील जनजागृती माहिती अधिकार समिती महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष बजरंगजी भेंडेकर व गोल्ला गोलेवार (यादव) संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा भा.ज.पा.जिल्हा उधोग आघाडीचे अध्यक्ष नामदेवराव आयलवाड व सर्व टीम सोबत भोकर पोलीस स्टेशन मध्ये भोकर चे डी वाय एसपी व भोकर पोलीस स्टेशन चे पि आय विकास पाटील यांची भेट घेतली व तसेच भोकर च्या सर्व समस्या बद्धल चर्चा करण्यात आली आहे या वेळी जनजागृती माहिती अधिकार समिती चे जिल्हाअध्यक्ष एजास कुरेशी व मराठवाडा उपाध्यक्ष सय्यद जबार,सुलोचनाताई ढोले,मो.फयाझ,मो.रजा,निशाद इनामदार,हुसेन भाई, संजू नाईकडे, आनंद ढोले,बलाजी आनंतवार डौरकर, व सुनील कोईलवाड रायखोडकर, व अनेक कार्यकर्ते हजर होते या वेळी भोकर तालुक्याचे डी वाय एसपी व भोकर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला .

Wednesday, July 10, 2019

भोकर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उत्तम बाबळे तर सचिवपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड

भोकर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उत्तम बाबळे तर सचिवपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड

.
भोकर / प्रतिनिधी
भोकर तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक घेण्यात आली असून दि .१० जुलै रोजी विश्रामगृह येथे ज्येष्ठ पत्रकार बी .एस. सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव
वामनराव बाबळे यांची अध्यक्षपदी तर सचिव म्हणून सिध्दार्थ जाधव यांची निवड करण्यात आली .


उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे गठीत करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष अरूण डोईफोडे, उपाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, माधव मेकेवाड, सहसचिव शेख लतिफ, कोषाध्यक्ष शंकर कदम, सहकोषाध्यक्ष विलास हाटकर, सदस्य म्हणून संदेश कांबळे, म. सुजावोद्यीन, एजाज कुरेशी, अनिल जाधव, शिवाजी गायकवाड, कमलाकर बरकमकर , अमोल पोलादवार, शेख फईम, चंद्रकांत बाबळे, पडोळे सल्लागार म्हणून बी .एस. सरोदे, जयभिम पाटील, शुधांशु कांबळे, राजकुमार सोनकांबळे आदींची निवड करण्यात आली आहे . नूतन अध्यक्षानी बोलतांना म्हणाले की माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचे आभिवचन दिले  पत्रकार बांधवांनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे,त्या बद्दल मी सर्वांचा आभारी आहे.आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करेन व तसे वागेन. असे यावेळी म्हणाले आहे . शेवटी आभार नूतन सचिव सिद्धार्थ जाधव यांनी मानले .

खोटी कागदपत्रे तयार करून अपहार केल्या प्रकरणी मुख्याध्यापिका व सहशिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल

खोटी कागदपत्रे तयार करून अपहार केल्या प्रकरणी मुख्याध्यापिका व सहशिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल





एजास कुरेशी
भोकर येथील भगवान श्रीकृष्ण शाळेतील मुख्यधापिका व सहशिक्षकाने संगनमत करून घर भाडे आणि शालेय पोषण आहार योजनेचे  खोटी बनावट कागदपत्रे तयार करून १३ लाख २१ हजार ८६४ रुपयाचा अपहार केल्या प्रकरणी  भोकर न्यायालयाच्या आदेशाने उपरोक्त दोघांविरुद्ध फसवणूकी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

भगवान श्रीकृष्ण शाळेच्या मुख्याध्यापिका   वंदन शेसेराव कदम (४६) व सहशिक्षक केशव रखुनाथ सूर्यवंशी (४९) दोघेही राहणार भोकर यांनी संगनमत करून सण १९९६ ते ६ मार्च  २०१९ या कालावधीत घर भाडे भत्ता मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली व ते खरे असल्याचे भासवून जिल्हा परिषद शिक्षण विभागात नांदेड याकडे सादर करून १ लाख ७७ हजार ९७७ या बिला पोटी उचलून घेतले तर सन २०११ ते २०१४  या काळा दरम्यान पोषण आहार योजने मूळ पावत्या उपलब्ध न करता बनावट पावत्या देऊन ५ लाख ६० हजार १०२ रुपये उचलून घेतले तसेच सण २०१४ ते २०१६ या वर्षीचे पोषण आहार योजनेचे  लेखापरीक्षण अहवालातचा हिशोब दिला नाही हे निदर्शनास आल्यावरून संस्थेचे अध्यक्ष भगवान जगन्नाथ मोरे यांनी भोकर पोलिसांत सदरील या अपहारा बदल फिर्याद दिली असता गुन्हा दाखल करण्यात आला नाही त्यामुळे त्यांनी भोकर न्यायालयात दाद मागितली असता झालेल्या अपहारा प्रकरणी उपरोक्त दोघां विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्या संदर्भात कलम १५६/३ नुसार न्यायालयाने आदेश दिल्यावरून दि.८ जुलै  रोजी भगवान मोरे  यांच्या फिर्यादीवरून शाळेच्या मुख्याध्यापिका व सहशिक्षका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे  सदरील गुन्ह्याचा पुढील तपास भोकर पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास उमेश कारामुंगे व कृष्णा तलवारे करीत आहेत.

Friday, July 5, 2019

भोकर काँग्रेस शहराध्यक्षपदी रमीझोद्दीन इनामदार यांची निवड

भोकर काँग्रेस शहराध्यक्षपदी रमीझोद्दीन इनामदार यांची निवड





एजास कुरेशी
भोकर येथील सामाजीक कार्यकर्ते रमीझोद्दीन उर्फ खाजु ईनामदार यांची भोकर काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम एकनिष्ठी राहून पक्षवाढीसाठी  सातत्याने प्रयत्न केले असून आज दि.३ जुलै रोजी भोकरच्या ओम लॉन्स मंगल कार्यालयात पक्षाच्या एक कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हान ,व भोकर तालुक्याचे आमदार अमिता चव्हाण, यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष नागेलीकर याच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.इनामदार यांच्या निवडीबद्दल त्यांचे मित्रपरिवाराने व कार्यकर्ते अभिनंदन केले आहे.





 मला शहरअध्यक्ष म्हणून निवड केल्या मूळे मी साहेबांचा खूप आभारी आहे पक्षवाढी साठी सातत्याने काम करेल व सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊ एक निष्ठाने प्रयत्नशील राहीन असे नवीन झालेले शहराध्यक्ष रमीझोद्दीन इनामदार यांनी बेधडक महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले आहे.

Wednesday, July 3, 2019

भोकर येथील मोहम्मद नगर मुदखेड रोड येथे बोगस सी सी रस्त्याचे कामाची चौकशी करा मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू

भोकर येथील मोहम्मद नगर मुदखेड रोड येथे बोगस सी सी रस्त्याचे कामाची चौकशी करा मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू 



एजास कुरेशी
भोकर शहरात सध्या काही वॉर्डात नाली व सी सी रास्ताचे कामे मोठया प्रमाणात चालू आहे या बरोबरच  भोकर येथील मोहम्मद नगर मुदखेड रोड येथील सी सी रास्ता व नाली बांधकामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे ही सर्व कामे  अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून असे बोगस कामे करणाऱ्या  गुत्तेदारावर योग्यती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भोकर येथील जण जागृती माहिती अधिकारी समिती महाराष्ट्र चे मराठवाडा उपअध्यक्ष सय्यद जब्बार यांनी बुधवार दि.३-७-२०१९ रोजी नगर परिषद कार्यालय भोकर येथे एक दिवसीय ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे.
 भोकर येथील मोहम्मद नगर मुदखेड रोड येथील सी सी रस्ता व नाली बांधकाम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे व अंदाज पत्रका नुसार होत नसल्यामुळे ठिय्या आंदोलनाला सुरवात केली आहे



निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपविभागीय आयुक्त औरंगाबाद  जिल्हा अधिकारी नांदेड उप विभागीय कार्यालय भोकर तहसील कार्यालय भोकर यांना देण्यात आली आहे
अनेक निवेदन देऊन सुद्धा काहीच कार्यवाही झाली नसल्याचे जण जागृती माहिती अधिकार समितीचे मराठवाडा उपअध्यक्ष यांनी सांगितले आहे या पुढे कार्यवाही नाही झाल्यास नांदेड जिल्ह्याचे  खासदार यांना भेटनार व तसेच झोपलेल्या नगर पालिकेला जागा करण्यासाठी घंटानाद आंदोलन करू असे ही ते म्हणाले आहे



  भोकर नगर परिषद याकडे लक्ष देईल का होणारे बोगस काम थांबवून गुत्तेदारावर कार्यवाही होईल का या कडे सर्व भोकर वासीयचे लक्ष लागले आहे

Monday, July 1, 2019

झाडे लावण्याच्या कारणाआड पक्क्या नुतन रस्त्त्यावर विना परवाना खड्डे खोदून शासकीय मालमत्तेचे केले लाखोचे नुकसान

झाडे लावण्याच्या कारणाआड पक्क्या नुतन रस्त्त्यावर विना परवाना खड्डे खोदून शासकीय मालमत्तेचे केले लाखोचे नुकसान



भोकर :-(एजास कुरेशी):

भोकर शहरातून जात असलेल्या राज्य महामार्ग क्र.२५१ चे काम सुरू असून शहराचे सुशोभिकरणं करण्यासाठी नगर परिषदेचा निधी कमी पडतोय का ? म्हणून एक सामाजिक उपक्रम राबिवणारी संस्था यांनी चक्क शहरात मुख्य डांबर रस्त्यावरच 3 फूट खड्डे खोदुन झाडे लावण्यासाठी जागा केल्याने अनेक अडचणी समोर आल्या आहेत.भोकर शहरातून जात असलेल्या राज्य महामार्ग क्र.२५१ चे काम सुरु असून नव्यानेच करण्यात येत असलेल्या या रस्त्यावर क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याच्या कारणाआड पक्क्या नुतन रस्त्त्यावर विना परवाना खड्डे खोदून शासकीय मालमत्तेचे लाखोचे नुकसान करुन रस्ता कमकुवत केला असल्याने सार्वजिनक बांधकाम उपविभागाने भोकर नगर परिषदेष नोटीस बजावली असून सदरील प्रकरणातून नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. भोकर शहरातून जात असलेल्या हदगाव-तामसा- भोकर- उमरी राज्य महामार्ग क्र.२५१ वरील क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-विश्रामगृह-तामसा टी पॉईंट या रस्त्याचे व उड्डान पुलाचे काम सुरु असून अपुर्ण असल्याने हा रस्ता भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाने हस्तांतरीत केलेला नाही.असे असतांनाही झाडे लावण्याच्या कारणाआड क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील मजबूत डांबरीकरण केलेल्या नुतन रस्त्यावर दुतर्फा जेसीबी ने मोठमोठी खड्डे खोदण्यात आली आहेत. ती पण चुकीच्या ठिकानि



भोकर शहरात उपरोक्त ठिकाणी खड्डे खोदण्यात आली व झाडे लावण्याचा खटाटोप केला आहे.परंतू हे करतांना सार्वजनिक बांधकाम उपविभाग भोकर व राज्य महामार्ग विशेष प्रकल्प यांच्या कसल्याही परवानग्या घेण्यात आल्या नाहीत.हे निदर्शनास आल्याने सा.बां.उपविभाग भोकर कार्यालयाने दि.२६ जून रोजी नगर परिषद भोकर ला नोटीस बजावली असून खड्डे खोदण्याचे काम थांबविले आहे.त्या नोटीसीमध्ये सदरील कार्यालयाची कसलीही परवानगी न घेता डांबरीकरण केलेला रस्ता विनापरवाना खोदून नुकसान केले असून रस्ता कमकुवत करण्यात आला असल्याचे नमुद करण्यात आले आहे.तसेच रस्ता कमकुवत झाल्याने भविष्यात होणा-या नुकसानीची जबाबदारी नगर परिषदेची राहील त्यामुळे सदरील खड्डे तात्काळ बुजविण्यात येऊन जैसे थे करुन द्यावे असे नमुद करण्यात आले आहे.यामुळे सदरील खड्डे प्रकरणी भोकर नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबद सा.बां.उपविभाग कार्यालयात संपर्क साधला असता सहाय्यक अभियंता बाहेकर यांनी म्हटले आहे की,सदरील खड्डे आमच्या कार्यालयाची कसलीही परवानगी न घेता विना परवाना गैर ठिकाणी खोदण्यात आल्याने आम्ही नोटीस बजावली असून पुढील काम थांबविले आहे.तसेच ते खोदलेले खड्डे बुजवून रस्ता पर्ववत करावा असे सांगीतले आहे.तसे न केल्यास शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याने ती नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल.तसे न झाल्यास योग्य ती कारवाई करु.
तर नगर परिषदेेचे प्रभारी मुख्याधिकारी डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,आमच्या कार्यालयाने या कामासाठी कसलीही परवानगी दिली नसून झालेल्या  शासकीय मालमत्तेच्या नुकसानीस आमचे कार्यालय जबाबदार नाही.तसेच हे काम कोण्यातरी एका संस्थेने परस्पर केले आहे असे आम्हास समजले असून त्याबाबद लवकरच चौकशी करु व निश्चित काय ते सांगू.
भोकर नगर परिषदेने गेल्या ६ वर्षापुर्वी शहरात झाडे लावण्याचा असाच एक उपक्रम(कागदावर) राबविला होता.या उपक्रमावर लाखो रुपये खर्च करण्यात आले.बिल ही उकळण्यात आले.परंतू या उपक्रमातील एकही झाड किंवा संरक्षक जाळी पहावयास मिळत नाही.या उपक्रमावर झालेच्या निधी खर्चाचा अपहार एका विद्यमान नगरसेवकाने उघडकीस आणलेला असतांनाच पुनश्च एकदा विना परवाना ही झाडे लावण्याची घाई नगर परिषदेचे सत्ताधारी व प्रशासन हे कशासाठी करत आहेत आणि यामागिल गोडबंगाल काय? असा प्रश्न अनेकांतून उपस्थित होत आहे.


परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...