भोकर न्यायालायातील लोकअदालतीत ६३ लाख ६२ हजाराची विक्रमी वसुली
एजास कुरेशी
भोकर : येथील जिल्हा सत्र न्यायलयात आज ( १३ जुलै ) रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची न्यायालयात प्रलंबित असलेली २९८ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती त्यापैकी ६२ प्रकरणी निकाली काढण्यात आली आहेत.त्यात एकोण चाळीस लाख चौरे चाळीस हजार सहाशे चौऱ्याण्णव एवढ्या विक्रमी रकमेच्या वसुलीसाठी ऑवार्ड पास करण्यात आले. पोटगी व कौटुंबिक वाद या प्रकरणातील अनिता पाशमवाड. रा.सावरगाव व पातन्ना पाशमवाड रा. कोसमेट ता. किनवट या जोडप्यांचे कौटोंबीक वाद संपूष्टात आणून एकमेकात समझौता करून त्यांना साडी -चोळी करून सुखाने नांदावयास पाठवत माहेरची भुमीका न्यायालयाकडून वठवण्यात आली. आजच्या लोकअदालतीत दाखल पूर्व प्रकरणे ८८१० पेक्षा जास्त ठेवण्यात अलेली होती त्यात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी,भोकर,व उमरी येथील थकबाकी पोटी विज पुरवठा खंडित करण्यात आलेले प्रकरणे व भारतीय स्टेट बेंक शाखा भोकर,मातूळ महाराष्ट्र ग्रामीण बैंक भोकर, देना बैंक भोसी , महिंद्रा फायनांन्स भोकर भोकर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील थकीत करदाते व भारत संचार निगम भोकर येथील थकीत दूरध्वनीधारक आदींचे प्रकरणे न्यायालयासमोर ठेवण्यात आले आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमधे ठेवण्यात आलेल्या एकूण प्रकरणापैकी ६३९ प्रकरणे निकाली काढून २४, १८, १६३ एवढया एकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले. असे एकूण तालुका विधी समिती समोर ७०१ प्रकरणे निकाली काढून ६३ लाख ६२ हजार ८५७ एवढया विक्रमी वसूलीचे अॅवार्ड पास करण्यात आले. यावेळी न्यायदानाची प्रमूख भुमिका जिल्हा सत्र न्यायधिश मुजीब शेख, सत्र न्यायाधिश एन.के त्रिभूवन, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधिश एन.पी. पांडे, दिवाणी न्यायधिश ए. एन. पठाण, सहदिवाणी न्यायधीश .बी.ए. तळेकर, , अदी न्यायधिशांनी पार पाडली. त्यास अभिवक्ता संघाकडून विशेष सहकार्य करण्यात आले व तसेच नवीन कार्यकारणी झालेल्या भोकर तालुका पत्रकार संघ चा जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख याच्या सर्व पत्रकार संघाचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:
Post a Comment