Sunday, June 30, 2019

जिल्हा परिषद कन्या शाळा येथील पाण्याच्या टाकी जवळ साफ सफाई करा व नवीन पाईप टाका:-मागणी

जिल्हा परिषद कन्या शाळा येथील पाण्याच्या टाकी जवळ साफ सफाई करा व नवीन पाईप टाका:-मागणी


भोकर (एजास कुरेशी)
  भोकर येथील जिल्हा परिषद कन्या शाळा (जुनी इमारत ) येथील पाण्याच्या टाकी जवळ बसवण्यात आलेल्या पाणी सोडण्यासाठी बसवलेले वाल जवळील पसरलेले घाण पाणी व तसेच तिथे नवीन पाईप टाकण्यासाठी  रशीद टेकडी येथील राहिवश्यनी केला नगर परिषद भोकर येथे केला आहे दि.२१-६-२०१९ रोजी दिलेल्या अर्जाची भोकर नगर परिषदेने आज पर्यंत या कडे दुर्लक्ष केले आहे म्हणून रशीद टेकडी येथील राहिवाश्या कडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद कन्या शाळा येथील टाकी  जवळ असलेल्या वाल जवळ घाण पाणी जमा झाला आहे व तिथे डुकरे येऊन खूप  घाण करत आहेत त्या पाणी च्या टाकी चे पाणी पिण्यासाठी असते नगर सेवकांना तोंड  सांगुण सुद्धा कोणताच परिणाम होत नसल्या मुळे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा करण्यात येणार आहे नगर पालिके ने या कडे लवकरात लवकर लक्ष देऊन नवीन पाईप टाकावे व वाल नवीन बसून स्वच्छ करावे अशी विनंती तेथील जनता करत आहे



Saturday, June 29, 2019

ई महापरीक्षामार्फत २ जुलैपासून तलाठी पदासाठी १२२ केंद्रांवर परीक्ष

ई महापरीक्षामार्फत २ जुलैपासून तलाठी पदासाठी १२२ केंद्रांवर परीक्ष


बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मुंबई : महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दि. 2 जुलै ते 26 जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील 122 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती अथवा तक्रारींसाठी 1800 3000 7766 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती मुंबई शहर व मुंबई जिल्हा उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळविली आहे.

राज्य शासनाने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी 2 जुलैपासून राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होणार आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषय पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा / कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात येऊन राज्यभरात एकूण-122 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेसंदर्भात महाआयटीकडून परीक्षार्थींना सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र आणणे अत्यावश्यक आहे. यामध्ये 1. पॅन कार्ड 2. पासपोर्ट 3. वाहन अनुज्ञप्ती (Driving Licence) 4. मतदान ओळखपत्र 5. मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बॅक पासबुक 6. आधार कार्ड यांचा समावेश आहे. ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, ई आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकिटावर देण्यात आल्या आहेत.

महापरीक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सुरू असतांना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक (Observer) म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक (Controller) म्हणून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

महापरीक्षा पोर्टलवरील तसेच परीक्षा प्रवेश पत्रावरील सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी/तक्रारी नोंदविण्यासाठी महापरीक्षा1800 3000 7766 हा टोल फ्री तसेच enquiry@mahapariksha.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

साप्ताहिक काजीपेठ मुंबई ही रेल्वे गाडी नियमित करा पटणा,कोल्हापूर,संत्रागाच्छी रेल्वेएक्सप्रेसला भोकर येथे थांबा द्यावा :-मा.नगरसेवक दिलीप सोनटक्के

साप्ताहिक काजीपेठ मुंबई ही रेल्वे गाडी नियमित करा पटणा,कोल्हापूर,संत्रागाच्छी  रेल्वेएक्सप्रेसला भोकर येथे थांबा द्यावा :-मा.नगरसेवक दिलीप सोनटक्के




भोकर (एजास कुरेशी)
साप्ताहिक काझीपेठ मुंबई ही रेल्वे गाडी नियमित करून पटणा,कोल्हापूर,संत्रागाच्छी,यारेल्वे एक्सप्रेसला भोकर येथे थांबा द्यावा असा विनंती अर्ज भोकर येथील माजी नगरसेवक दिलीप सोनटक्के यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दिला आहे
भोकर येथे बाजार पेठ मोठे आहे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पटणा,कोल्हापूर,धनबाद, संत्रागाच्छी, या रेल्वे एक्सप्रेसला भोकर येथे थांबा देऊन साप्ताहिक काजीपेट आदीलाबाद-मुंबई ही रेल्वेगाडी भोकर तालुक्यातील जनतेसाठी वरदान आहे काजीपेट आदीलाबाद -मुंबई ही रेल्वे एक्सप्रेस भोकर ला सकाळी ५ वाजता आहे ती नांदेड ला ६ वाजता पोहचते तालुक्यातील गरीब विध्यार्थ्यांना नांदेड येथे राहून शिक्षण घेणे ज्यांना परवडत नाही असे विध्यार्थ्यांना काजीपेट, आदीलाबाद-मुंबई ही गाडी नियमित झाल्यास तालुक्यातील विध्यार्थ्यांना वर्दान ठरेल आणि नांदेड कडून भोकरकडे येणाऱ्या प्रवाश्यांना रात्रीला एक गाडी उपलब्ध होते म्हणून ही गाडी भोकर तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
तसेच पटणा, कोल्हापूर, धनबाद, संत्रागाच्छी, या गाड्यांना भोकर येथे थांब देऊन भोकर तालुक्याच्या प्रवाशांच्या प्रवासाची सोय करावी व तसेच भोकर रेल्वेस्टेशन ला खूप दिवसापासून कँटीन बंद आहे ती कॅन्टीन लवकर चालू करावी कोच इंडिकेशन बोर्ड व पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टम चालू करावे व तसेच सफाई कामगार हाय मास्ट लाईट असे अनेक मागण्यांचे निवेदन खासदार प्रताप पाटील चिकलीकर व रेल्वेचे महाव्यवस्थापक सिकंदराबाद, रेल्वे अध्यक्ष दिल्ली, डिआर एम नांदेड यांच्याकडे माजी नगरसेवक दिलीप सोनटक्के यांनी केली आहे.

भोकर जमाते उलेमा हिंद व मुस्लिम समाजाचे तबरेज अन्सारी च्या न्यायासाठी मूक मोर्चा व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

भोकर जमाते उलेमा हिंद व मुस्लिम समाजाचे तबरेज अन्सारी च्या न्यायासाठी  मूक मोर्चा व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन




भोकर (एजास कुरेशी)
झारखंड येथे झालेल्या मॉब लिंचींग मध्ये तबरेज़ अन्सारी या युवकाच्या हत्येचा निषेधार्थ भोकर येथील जमाते उलेमा हिंद व मुस्लिम समाज बांधवांतर्फे शनिवारी   उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर येथे मूक मोर्चा काढून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी  करण्यात येउन निवेदन सादर करण्यात आले.



  सदरील घटनेमुळे मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मुस्लिम समाज भयभीत झाल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच, तरबेज अन्सारी या तरुणाच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच तरबेज अन्सारीच्या कुटुंबीयास संरक्षण देऊन त्या कुटुंबास 50 लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, व तरबेज अन्सारीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशीही मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
तबरेज अन्सारी या युवकाची समाज कंटकांनी केलेली निर्घुण हत्या ही मानवजातीला काळीमा फासणारी असून
सतत घडणाऱ्या या घटना भविष्यात घडू नये म्हणून या घटनेच्या निषेधार्थ  आज दिनांक 29 जून रोजी दुपारी 3 वाजता भोकर तालुक्यातील जमाते उलेमा हिंद व  सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन सादर करण्यात आले आहे.


या वेळी अनेक मान्य वरांनी आपल्या भावना व्यक्त करत त्वरित कार्यवाहिची मागणी केली यावेळी आसंख्य मुस्लीम बांधव व जमाते उलेमा हिंदचे सर्व मान्यवर उपस्थित होते.

Friday, June 28, 2019

तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्प उंची वाढविण्यासाठी जनतेची मागणी एक महिन्यात मी पूर्ण केली:- खा.प्रताप पाटील चिखलीकर

तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्प उंची वाढविण्यासाठी जनतेची मागणी एक महिन्यात मी पूर्ण केली:- खा.प्रताप पाटील चिखलीकर



भोकर (एजास कुरेशी)
भोकर तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पची उंची वाढवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून तालुक्याच्या जनतेची होती. ती मागणी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असून त्या पदावर पूर्ण केली नाही. पण मी हीच मागणी १ महिन्यात पूर्ण केली आहे. त्या मुळे ह्याच श्रेय नेमकं कोण घेणार ह्या पेक्षा जनतेचं काम झालं ते महत्वाचं असेही ह्या मनमोकळे पणाने खासदार चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रेणापूर सुधा प्रकल्पची आवश्यक उंची वाढवणे त्या मधूनच भोकर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केली जाते. पिंपळढव तलावाची मागणीसुद्धा जनतेची होती. त्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आवश्यक होते ते प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच हे दोन्ही काम चालू करण्यात येईल असे मत नांदेड लोकसभा मतदार संघातील खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.



चर्चेत झालेल्या सुधा प्रकल्प (तलाव) पिंपळढव यांचे प्रमाणपत्र कोणी व कसे आणले यासाठी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेतली
 सुधा रेणापुर प्रकल्प व पिंपळढव तलावाचा पाणी उपलब्धतेचा प्रमाणपत्र मिळालेला आहे. पण हे नेमकं कोणत्या खासदारांची कार्यशैली आहे हे जनतेपुढे स्पष्ट झाले नव्हते. अशोक चव्हाण यांनी केलेला नुसता पाठपुरावा कामाचा ठरला नाही. तर प्रताप चिखलीकर यांची मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याशी झालेली भेट महत्वाची ठरली आहे. त्या मुळे ह्या प्रकल्पाची व तळ्यासाठीची पाठपुरावाचे महत्वाची कागदपत्रे सुद्धा चिखलीकर यांच्या कडे आहेत. असे त्यांनी या वेळी सांगितले या श्रेय घेण्यासाठी पेपर मध्ये मोठं मोठ्या जाहिराती देणे व प्रसिद्धी करणे हे त्यांना जमते यांनी तेच केलं. असे ते नाव न घेता अशोक चव्हाण यांच्या वर टीका केली.

  मी खासदार झाल्यानंतर त्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी प्रलंबित असलेला सुधा प्रकल्प व पिंपळढव प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांना चिखलीकर यांनी पत्र देऊन केले त्या प्रलंबित प्रश्नाला  निकाली काढले. सुधा प्रकल्पाची उंची वाढविणार व पिंपळढव तलावाचे काम लवकरच सुरू होणार अशी माहिती नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांना बोलताना माहिती दिली.

अशोक चव्हाण यांचे भोकरकडे आता जास्तच लक्ष झाले आहे. मी जर एकच भेट दिली तर त्या भेटी साठी अशोक चव्हाण भोकर मध्ये संपूर्ण एक महिना स्थाही राहतील अशी देखील मतदार संघातील लोक म्हणत आहेत म्हणून खासदार यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेत सुभाष पाटील किन्हाळकर, दिलीप सोनटक्के, किशोर पाटील लगळुदकर, तालुकाध्यक्ष गणपत पिटेवाड, संतोष मारकवार, शेख अर्शद भाई ,निशाद इनामदार, बालाजी वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Thursday, June 27, 2019

भोकर येथे रात्री झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी ठार व इतर चार जखमी

भोकर येथे रात्री झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी ठार व इतर चार जखमी




भोकर : (प्रतिनिधी )
भोकर उमरी रस्त्यावर भोकर पासून जवळच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरा समोर एक स्कूटी आणि ट्राली ऑटोच्या झालेल्या भीषण अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला व तसेच चार  जखमी झाले आहे.

      उमरी कडून भोकरकडे येणारी एक विना नंबरची स्कूटी आणि भोकर कडून उमरी कडे जाणारा पिवळ्या रंगाचा मालवाहू ऑटो क्रमांक एम एच 26 AD 88 92 यांच्यात उमरी रोडवर, श्रीकृष्ण मंदिराजवळ दिनांक 26 जून रोजी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान समोरासमोर भीषण धडक झाली, यात लामकानी  येथील रहिवाशी असलेले तरुण पोलिस कर्मचारी श्री, राजू गणेश सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. राजू सूर्यवंशी हे नांदेड पोलीस दलात क्यू आर टी मध्ये सामील होते, अपघात झाल्याचे कळताच पोलीस कर्मचारी व आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी अपघातस्थळी धाव घेतली  पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले, अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झालेला आहे.
मयत पोलीस जवान गंगाधर सुर्यवंशी यांच्या पश्चात आई, वडील,दोन भाऊ,पत्नी व मुलगा असा परिवार असून त्यांच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूने पोलीस विभागासह कुटूंबीय व स्नेहीजणांत शोककळा पसरली आहे.तर सदरील भिषण अपघात प्रकरणी भोकर पो.नि. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार उमेश कारामुंगे,पो.कॉ.कृष्णा तलवारे हे करत आहेत.
तरुण पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Wednesday, June 26, 2019

भारतीय संघाच्या भगव्या जर्सीमागे नरेंद्र मोदींचा हात, अबू आझमींचा आरोप

भारतीय संघाच्या भगव्या जर्सीमागे नरेंद्र मोदींचा हात, अबू आझमींचा आरोप





बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मुंबई:-भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत बदल करण्यात आला असून इंग्लंड विरोधीतील सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सीत दिसणार आहे. निळ्या रंगाची जर्सी वापरणारा भारतीय संघ भगव्या जर्सीत दिसणार आहे. दोन्ही संघाच्या जर्सीचा रंग निळा असल्याने हा बदल करण्यात आला आहे. मात्र यावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी धरत भारतीय संघाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.अबू आझमी यांनी म्हटलं आहे की, ‘भारतीय संघ ज्याप्रकारे कामगिरी करत आहे त्याची प्रशंसा आहे.पण मोदी सरकार देशाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात कोणताही विकास केला नाही, बेरोजगारी वाढत चालली आहे, महागाई वाढली आहे, डॉलरचा भावही वाढत आहे. लोकांनी अशा परिस्थितीत मोदींना निवडून दिलं याचं आश्चर्य वाटत आहे’.

‘पोलीस’ लिहणे आणि ‘लोगो’ लावणे पडेल महागात होईल कार्यवाही :हायकोर्ट

‘पोलीस’ लिहणे आणि ‘लोगो’ लावणे पडेल महागात होईल कार्यवाही :हायकोर्ट


 मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना खासगी गाडीवर ‘पोलीस’ लिहणे आणि ‘लोगो’ लावण्यास हायकोर्टाने बंदी घातली आहे. जर अशी पाटी लावली तर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१३ च्या कलम १३४ प्रमाणे संबंधीतावर कारवाई करण्यात येणार आहे.

अनेक पोलीस आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावतात. कारवाई टाळण्यासाठी याचा वापर केला जात आहे. मात्र, आता या पुढे मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर पोलीस किंवा लोगो लावता येणार नाही. जर अशी पाटी लावलेली दिसल्यास सबंधीतावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

हायकोर्टाने पोलिसांना आदेश दिले असून येत्या सात दिवसात कोणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांकडूनच पोलिसांवर कारवाई होताना पहायला मिळणार आहे. मात्र, वाहतूक पोलीस पाटी लावलेल्या वाहनांवर कारवाई करणार का असा प्रश्न आहे.

Tuesday, June 25, 2019

भोकर शहरात डोनेशन च्या नावाखाली होत आहे पालकाची लूट..

भोकर शहरात डोनेशन च्या नावाखाली होत आहे पालकाची लूट..

   

 प्रतिनिधी: एजास कुरेशी

भोकर शहरातील इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून, आता पालकांची गरज लक्षात घेऊन ऍडमिशनसाठी संस्थाचालक मनमानी पद्धतीने रक्कम उकळत आहेत म्हणून गोरगरिबांना हे शिक्षण महागाचे झाले आहे. एकीकडे शासन आठवीपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे सांगतो आणि दुसरीकडे हे खाजगी संस्थाचालक हजारो रुपये डोनेशनच्या नावाखाली उकळून आपली तुंबळ भागत आहे.

  शहरातील व तालुक्यातील इग्रजी व मराठी माध्यमाच्या प्रसिद्ध शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धावपळ सुरु झाली आसुन, आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण मिळावे व चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा या करिता गुपचूप सस्थेच्या संबंधिताशी संपर्क साधुन वाटेल ते ‘डोनेशन’ देण्यात  येत आहे. काही पालक इंंग्रजी व सेमी इंग्रजी शाळामध्ये नर्सरीते पहीलीच्या वर्गा करिता प्रवेशासाठी चकरा मारत आहेत. काही नांमकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेशा करिता वाढविलेल्या भरमसाठ ‘डोनेशन’ मुळे पालकांनी ‘धास्ती’ घेतली आहे. विशेष म्हणजे ‘शासनाने शाळांच्या ‘डोनेशन’ वाढीला कोणताही बंदी लावण्यात आलेली नाही. उलट मुलांच्या पालकांचा आधिकारांवरच गदा आणलेली आहे. या शाळानी ‘डोनेशन’ ची रक्कम वाढवुन मणमानी कारभार सुरु केल्यामुळे गोर – गरिबांना चांगले शिक्षण मिळाले दुरापास्त झाले आहे. अशी चर्चा काही वंचित आणि जागरूक पालकाच्या तोंडून ऐकवायास मिळत आहे. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे बघुन भरपुर काही खाजगी संस्थाचालक मनमानी डोनेशनची मागणी करत आहेत. आणि त्यातही विविध फंडाच्या नावे पालकाकडुन निधी उकळल्या जात आहे अशी ही चर्चा भोकर शहरा मध्ये सध्या तरी आयकण्यात मिळत आहे.

यावर्षी सुध्दा भोकर शहरात कार्यरत असलेल्या काही खाजगी संस्थाच्या शाळेनी डोनेशनचे दरच ठरविले असल्याचे विश्वासनिय माहीती आहे. ते ‘डोनेशन ‘नाही तर प्रवेश मिळणार नाही अशी भुमिका संस्थाचालकांची असल्याने अर्थिक परिस्थितीने ञस्त असलेल्या पालकांत माञ चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही ञस्त पालकांनी आपला रोष व्यक्त करताना सागितले की, शासनाने २०११ मध्ये शिक्षन शुल्क नियमन कायदा केला. परंतु त्या कायदाचा फायदा पालकांना नव्हे शाळा सस्था चालकांनाच होताना दिसत आहे. शासनाने हा कायदा रद्द करावा. आणि इंग्रजी शाळेतही आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्याची तरतूद करून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येही इंग्रजी अभ्यास करांची सोया करून गोर – गरिबांच्या शिक्षणाची सोय करावी अशी रास्त मागणी पालक वर्गातुन होत आहे.

बँक तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतेय, आता इथे करा तक्रार.

बँक तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतेय, आता इथे करा तक्रार.



विशेष प्रतिनिधी
तुमचं कोणत्याही बँकेत अकाऊंट असेल आणि तुम्हाला या बँकेच्या सुविधांविषयी तक्रारी असतील तर आता तुम्हाला आपली तक्रार नोंदवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. कारण, आता तुम्ही एकाच ठिकाणी तक्रार नोंदवून तुमच्या समस्येवर उपाय मिळवू शकणार आहात. आमचं सहकारी चॅनल 'झी बिझनेस'नं दिलेल्या माहितीनुसार, बँक ग्राहकांच्या तक्रारींसाठी आता खुद्द बँकांची शिखर बँक अर्थात 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' पुढे सरसावलीय. 'आरबीआय'कडून लवकरच एक कम्प्लेन्ट मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच सीएमएस लॉन्च करण्यात येणार आहे. याद्वारे ई-मेल, लिखित पत्रं, सोशल मीडिया यांसारख्या माध्यमांतून कोणत्याही बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारींवर नजर ठेवण्यात येईल. या तक्रारी आरबीआयकडून संबंधित बँका आणि इतर संबंधित संस्थांना धाडण्यात येतील. तुमच्या बँका तुम्ही केलेल्या तक्रारी कानामागे टाकत असतील तर त्यावर आता ग्राहकांना उपाय सापडलाय, असं म्हणायला हरकत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, आरबीआयचा सीएमएस (CMS) तयार आहे तसंच तो कोणत्याही दिवशी लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या तरी बँकांशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तीन बँकिंग ओम्बुडसमॅनची व्यवस्था आहे. याशिवाय तक्रार यंत्रणाही पूर्णपणे ऑनलाईन नाही. परंतु, आरबीआयच्या या नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना घरबसल्या आपल्या बँकांच्या तक्रारी शिखर बँकेपर्यंत पोहचवता येऊ शकतील. त्यामुळे आरबीआयचा इतर बँकांवरचा वचकही कायम राहायला मदत होईल.आरबीआयच्या सीएमएसमध्ये ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर या तक्रारीवर काय कारवाई झाली हेदेखील ऑनलाईन ट्रॅक करता येऊ शकतील.

Sunday, June 16, 2019

ई.व्ही.एम. हटाव , देश बचाव बिलोली तहसिलवर घंटानाद आन्दोलन

 ई.व्ही.एम. हटाव , देश बचाव  बिलोली तहसिलवर घंटानाद आन्दोलन.



बिलोली प्रतिनिधी.
बहुजन महासंघ  वँचित आघाडी  लोकस्वराज आन्दोलन एम आय एम युवा पन्थर आदि पक्षाच्या वतिने  दिनाक १७ जुन रोजी सकाळी ११ वाजता  बिलोली तहसिल कार्यालयावर
ई.व्ही.एम. हटाव व देश बचाव च्या मागणी साठी घंटानाद आन्दोलन पुकारण्यात आले. अशी माहीती  वँचित आघाडी तालुका अशा ध्यक्षानी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीत लोकशाहीची हत्या केली आहे.त्याना जाब विचारना करण्यासाठी आदरणीय सर्वांचे ष्रध्दास्थान व राष्टरीय नेते अड. प्रकाश आंबेडकर यानी महाराष्ट्र व देशात महत्वाचा मुध्दा गाजत आहे. तो ई. व्ही. एम. मशीन हटाव , देश बचाव या मागणीसाठी संबध महाराष्ट् बन्द चे आवाहन केले व जिल्हा  व तालुक्याचे ठिकाणी   ई.व्ही.एम. हटाव  साठी कार्यकर्ते नागरीकानी घंटानाद आन्दोलन करण्याचे आवाहन केले.

लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आपले मुलभुत हक्क व मतदानाचा अधिकार डा. बाबासाहेब आंबेडकर यानी दिला आहे. गरीब असोकी ष्रिमंत असो सर्वाना समान न्याय समता बंधुत्व भाईचारा टिकवुन रहावा. देशाचे विकासात्मक धोरणे व संविधानाचा आदर केला पाहीजे.भारतात खरी लोकशाही नांदली पाहीजे.खरी लोकशाही जिवंत असावी.
सर्व तमाम जनता व नागरीकानी याकडे लक्ष देवुन आगामी विधानसभेची निवडणुक बलेट पेपर कागदावर व्हावी.
तसेच लोकसभेच्या ४८  मतदार संघात मतमोजणीत असलेली तफावत या संशयाला बळकटी देणारी आहे. जनतेला अंधारात ठेवुन दिशाभुल करुन कटकारस्थान करुन सत्ता  काबीज करण्याची चाल आहे.
ई.व्ही,एम. मशीन हटवुन विधानसभा निवडणुक  बलेट पेपर द्वारे करण्यात यावी. डा.बाबासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवणे हि काळाची गरज आहे. हे आवश्यक समजुन सर्व मतदार बँधु व नागरीकानी घंटानाद आन्दोलनात भाग घेण्याचे आवाहन बाळासाहेब आँबेडकर जिल्हा अध्यक्ष डा.संघरत्न कुर्हे  तालुका अध्यक्ष धम्मदिप गाँवडे  नगरसेवक अनुप अंकोशकर तालुका अध्यक्ष वलीयोदिन फारुखी एम आय एम चे ता. अध्यक्ष साजीद कुरेशी  एल पी गोणेकर बालाजी नरहरे शेषराव वाघमारे कांगठी  सुनिल नरहरे प्रा. धम्मपाल जाधव प्रकाश दुगाने सुरेश भुसावळे जयकुमार पोवाडे गणेश काँबळे आदि नी आवाहन केले.

Thursday, June 13, 2019

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन अँड.शिवाजी जाधव वाढदिवस साजरा करणार

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन अँड.शिवाजी जाधव  वाढदिवस साजरा करणार




 हार-तुरे न आणता नियोजित उपक्रमात हातभार लावण्याचे कार्यकर्ते,हितचिंतकांना केले आवाहन


वसमत (प्रतिनिधी)
यंदा आपल्या परिसरात अतिशय दुष्काळ परिस्थिति असल्यामुळे अॅड. शिवजीराव जाधव हे आपला वाढदिवस साजरा करणार नसून दि 14 जुन वाढदिवस कार्यक्रमा ऐवजी दि 22 जुन रोजी दुपारी 12 वाजता भाजपा कार्यालय, वसमत येथे सन 2017,2018, 2019 सालातील वसमत विधानसभा मतदार संघामधील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी २ क्विनटल अन्नधान्य वाटप करून साजरा करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षा पासुन अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हाभरासह वसमत विधानसभा मतदारा संघात दुष्काळ सदुश्य परिस्थिति निर्माण झाली आहे या मुळे सर्व सामान्य मानुस होरपळून निघाला आहे

निर्माण झालेली परिस्थिति पाहता माझ्या वाढदिवसा निमित्त हार,तुरे,बैंनरबाजीवर खर्चा ऐवजी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप करावे अथवा आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबास पेरणीसाठी, उदर निर्वाहासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन अॅड.शिवजीराव जाधव यांनी
भाजप पदधिकारी, कार्यकर्त्यास व
हितचिंतकांना केले आहे

आगामी काळात प्रत्येक गावातील प्रत्येक सर्वसामान्य माणसा सोबत व सर्व जाती धर्माच्या जनते सोबत काम करुन वसमत मतदार संघाचा विकास करायचा आपला उद्देश असल्याचे अॅड.शिवजीराव जाधव यांनी गौरव महाराष्ट्राचा ला बोलताना सांगितले आहे

बिलोली येथील ईदगाह चे पुनर्जिवन करण्याची मागणी.

बिलोली येथील ईदगाह चे पुनर्जिवन करण्याची  मागणी.








बिलोली  .प्रतिनीधी.

 बिलोली शहराच्या ऊत्तरेस  माळावर मुस्लिम समाजाचे ईदगाह ( ईद ची प्रार्थना स्थळ  )   आहे.

शहर व परिसरातील  हजारो मुस्लीम बांधव   ईद ची नमाज(   ईश्वर     प्रार्थना) करतात.   या ईदगाह चे नव्याने बांधकाम करण्याची मागणी  या प्रभागाचे नगरसेवक  जावेद गफुर कुरेशी   शाहेद बेग ईनामदार व सौ. मैमुना बेगम आमजद चाऊस यानी नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी याना निवेदन देवुन मागणी करण्यात आली.
मुस्लिम समाज बांधव  वर्षातुन दोन वेळा  ईदुलफीत्र रमजान  ईद व ईदुजुहा बकरी ईद  ची नमाज प्रार्थना करतात. ईश्वर चरणी शांती व भाईचारा टिकुन रहावा.
ईदगाह म्हणजे मुस्लिम समाजाचे  पवीत्र स्थान आहे.
येथील ईदगाह  शहराचे उत्तरेस माळावर आहे. ईदगाह चे बाँधकाम  ५०ते ६०  वर्षापुर्वी  बाधलेले आहे. जीर्ण होऊन  ईदगाह चे मिनार  भिंती  ओटा  प्लासटर चे तुकडे खाली पडले आहे. पडण्याच्या मार्गावर असुन प्राण हौण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुर्वी ही  ईदगाह बाँधकामाची मागणी करण्यात आली हौती.  तेव्हा केवळ  ओटाव पायरया   स्टेपस्
   रस्ता बांधकामासाठी  तत्कालीन खासदार यानी निधी मंजुर केला होता. पंरतु स्थानिक  गुत्तेदाराने थातुर मातुर काम करुन निधी हडप केला. ईदगाह चा ओटा पहिल्याच पावसात कोसळला.संभधिता ना तक्रारी देण्यात आले. उपोषण करावे लागले  होते.
ईदगाह जागा अपुरी पडते.नमाज पडण्यासाठी अडचणी येतात.येथे कसल्याच प्रकारची सुविधा दिली जात नाही. ईदगाह ची ईमारत जीर्ण झाली आसल्या कारणाने  तिचे  पुनर्ज्जिवन नव्याने  बाँधुन देण्याची मागणीचे निवेदन  नगराध्यक्षा मडम मुख्याधिकारी काबळे याना नगरसेवक  जावेद कुरेशी  शाहेद बेग व सौ.मैमुना बेगम याना दिले. कामाचे आश्वासन देण्यात आले.

Wednesday, June 5, 2019

बिलोलीत रमजान ईदचा उत्साह; हिंदू-मुस्लिम बांधवाकडून शुभेच्छा

बिलोलीत  रमजान ईदचा उत्साह; हिंदू-मुस्लिम बांधवाकडून शुभेच्छा



बिलोली (प्रतिनिधी)
महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर बुधवारी बिलोली  शहर व तालूक्यात मुस्लिम बांधवांनी ईद-ऊल-फितर (रमजानईद) उत्हात   सकाळी 8 : 30 नमाज पठणानंतर  हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे.


 सकाळी शहरातील जामा मस्जिद व ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळलेसुध्दा नाही.

 मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते़

सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.
देशात व जगात सुख व शांती नांदू दे,  आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना ख-या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना  मौलाना आहेमद बेग यांनी केली

ईदनिमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्या च्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून, आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते. या वेळी जेष्ट ए.जी. कुरेशी, मुकरम फारुखी, वलीओद्दीन फारुखी , सय्यद रियाज, फहिम सेठ , साजिद कुरेशी ,जावेद कुरेशी, पोलीस निरिक्षक  भगवान धबडगे, उपनगर अध्यक्ष  मारोती पटाईत , सुलेमान शेख,  मुज्जू बेग, साबेर पटेल , शौकत बेग, मनसूर भाई, बासीत सेठ, अत्तर भाई , यांच्या सह अनेकांनी ईदगाहवर भेटी दिले

Tuesday, June 4, 2019

लोहा तालुक्यातील त्या शेतकर्‍याच्या कुटूंबाला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप.

लोहा तालुक्यातील त्या शेतकर्‍याच्या कुटूंबाला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप.



(जाहिरात)



लोहा तालुक्यातील त्या शेतकर्‍याच्या कुटूंबाला खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप.
बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नांदेड :-
रान डुक्कराच्या हल्यात मृत्यू पावलेल्या लोहा तालुक्यातील एका शेतकर्‍याच्या कुटूंबाला नवनिर्वाचित खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मंगळवारी 15 लक्ष रूपयाचे सानुग्रह अनुदान देण्यात आले.

लोहा तालुक्यातील हिप्परगा (चितळी) येथील शेतकरी सुधाकर बापुराव खांडेकर यांच्या 22 फेब्रुवारी रोजी रान डुक्कराने केलेल्या हल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर सुधाकर खांडेकर यांचे कुटूंब उघडयावर आले होते. तत्परतेने कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार तसेच नवर्विचित खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खांडेकर कुटूंबियांची भेट घेतली व तसेच त्यांना शासनाकडून मिळणारे सानुग्रह अनुदान मंजूर करावे अशा सुचना वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिल्याह होत्या. सुचना देवून एवढयावरच न थांबता खांडेकर कुटूंबियांची होरपळ थांबावी यासाठी जातीने लक्ष देत शासनाकडून 15 लाख रूपयाचा निधी मंजूर करून आणला. याच सानुग्रह अनुदानाचा धनादेश मृत्त शेतकरी सुधाकर खांडेकर यांच्या पत्नी संगीता खांडेकर, मुलगा माधव खांडेकर यास खा. चिखलीकरांच्या हस्ते मंगळवारी साईसुभाष या त्यांच्या निवासस्थानी देण्यात आला. यावेळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डी.एस. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एन. ठाकूर, वनपरिमंडळ अधिकारी एस.एन. मुंडे, वनरक्षक एल.एन. शेळके यांची यावेळी उपस्थिती होती.

(जाहिरात)




























Sunday, June 2, 2019

बिलोली - नरसी राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम थातूर-मातूर

बिलोली - नरसी राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम थातूर-मातूर




बिलोली (प्रतिनिधी)
 बिलोली ते नरसी राज्य मार्गावरील  रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन धारकाला  त्याचा ञास सहन करावे लागत आहे  रस्त्यावर झालेले खड्डे बुजवण्याचे काम मात्र थातूरमातूर होत असताना दिसून येत आहे

बिलोली नरसी  20 किमी अंतराचा  चा रस्ता आहे या मार्गाने दररोज शेकडो वाहने  बोधन, निजामबाद, हैदराबाद धर्माबाद, बासवाडा, आदिलाबाद , बासर यासह अनेक  जिल्हा व तालूक्याला येथून जातात या मार्गाने जात असतात . हा रस्ता कल्याण टोल कडे देण्यात आलेला आहे यांच्यामार्फत देखरेख व दुरुस्ती करण्याचे त्यांच्या कडे आहे  पण त्यांच्याकडून रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे भेगा पडले आहे अनेक ठिकाणी रस्ता जम्पिंग होत आहे  यामुळे वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच अनेक गतीरोधक निर्माण करण्यात आली या मार्गावर शाळा असल्याचे , गतीरोधक असल्याचे व ईतर कोणही  प्रकारचे फलक  नाहीत  पांढरे पट्या व लाल रेडियम चे पट्ट्या मारल्या गेलेल्या नाहीत 

  बिलोली - नर्सी मार्गावर  अनेक ठिकाणी प्रत्येक गावाजवळ दोन ते तीन गतिअवरोधन लावण्यात आले आहे त्याची उंची जास्त आहे.  त्या मुळे लहान  वाहन धारकांना त्याचा ञास होत आहे ते  कमी करण्याची  मागणी होत आहे

भोकर पोलीस स्टेशन येथे आज शांतता मिटिंग व इफ्तार पार्टीचे आयोजन

भोकर पोलीस स्टेशन येथे आज शांतता मिटिंग व इफ्तार पार्टीचे आयोजन




इफ्तार पार्टी व शांतता कमिटी मिटिंग मध्ये उपस्थित राहण्याची विनंती:- पोलिस निरीक्षक विकास पाटील भोकर


भोकर (एजास कुरेशी)
पोलीस स्टेशन भोकर  येथे रमजान महिना रोजा/उपवास निमित्तआज दिनांक  2 जून रविवार रोजी सांयकाळी 6.30.वा. (साडे सहा) वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे

दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड,व उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षण विकास पाटील यांच्या तर्फे भोकर पोलीस स्थानकात दि 2 जून रविवार रोजी इफ़्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित इफ़्तार पार्टीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,पंचायत समिती सभापती, उपसभापती सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय नगर सेवक, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,विविध संघटनांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य,सर्व मौलाना,मस्जिद,मदरसाचे , मंदिराचे प्रमुख,बौद्ध विहाराचे प्रमुख, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बंधू,सर्व पत्रकार बंधू, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला दक्षता समिती सदस्यांनी इफ्तार पार्टीस उपस्थित राहण्याची विनंती पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस स्टेशन भोकर यांनी केली आहे

Saturday, June 1, 2019

पानसरे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक पंढरीनाथ पेंडलवार यांचे दु:खद निधन

पानसरे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक पंढरीनाथ पेंडलवार यांचे दु:खद निधन




बिलोली प्रतिनिधी
कुंडलवाडी येथून जवळच असलेल्या पानसरे महाविद्यालयातील सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक पंढरीनाथ मारोतीराव पेंडलवार(घूळेकर) ( वय 67) यांचे नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान दि.1 जून रोजी रात्री 8 वाजता दु:खद निधन झाले. त्यांचेवर दि.2 जून रोजी दुपारी 12 वाजता अर्जापूर ता.बिलोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सुना,नातू असा मोठा परिवार आहे. ते जि.प.के.प्रा.शा.बोथी ता.उमरी येथील सहशिक्षक संदिप पेंडलवार यांचे वडील होत.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...