भोकर जमाते उलेमा हिंद व मुस्लिम समाजाचे तबरेज अन्सारी च्या न्यायासाठी मूक मोर्चा व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
भोकर (एजास कुरेशी)
झारखंड येथे झालेल्या मॉब लिंचींग मध्ये तबरेज़ अन्सारी या युवकाच्या हत्येचा निषेधार्थ भोकर येथील जमाते उलेमा हिंद व मुस्लिम समाज बांधवांतर्फे शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर येथे मूक मोर्चा काढून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येउन निवेदन सादर करण्यात आले.
सदरील घटनेमुळे मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मुस्लिम समाज भयभीत झाल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच, तरबेज अन्सारी या तरुणाच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच तरबेज अन्सारीच्या कुटुंबीयास संरक्षण देऊन त्या कुटुंबास 50 लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, व तरबेज अन्सारीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशीही मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
तबरेज अन्सारी या युवकाची समाज कंटकांनी केलेली निर्घुण हत्या ही मानवजातीला काळीमा फासणारी असून
सतत घडणाऱ्या या घटना भविष्यात घडू नये म्हणून या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 29 जून रोजी दुपारी 3 वाजता भोकर तालुक्यातील जमाते उलेमा हिंद व सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या वेळी अनेक मान्य वरांनी आपल्या भावना व्यक्त करत त्वरित कार्यवाहिची मागणी केली यावेळी आसंख्य मुस्लीम बांधव व जमाते उलेमा हिंदचे सर्व मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment