Friday, February 21, 2020

भोकर टिपू सुलतान सेना नगरपरिषद निवडणूक सर्व जागा लढवणार :- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद हैदर पटेल

भोकर टिपू सुलतान सेना नगरपरिषद निवडणूक सर्व जागा लढवणार:- महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद हैदर पटेल




भोकर (प्रतिनिधी):  भोकर येथे टिपु सुलतान सेना यांची बैठक भोकर रेस्टहाऊस येथे होऊन भोकर नगरपरिषद  निवडणुकीत सर्व जागा लढविणार असल्याचे  बैठकीत सांगण्यात आले. 
 टिपु सुलतान सेनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद हैदर पटेल यांनी या वेळेस  सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले .तसेच
भोकर  तालुका उपाध्यक्ष  म्हणून सय्यद ईमरान यांची नियुक्ती करण्यात आली तसेच शहर अध्यक्ष शेख असद यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आले .
या वेळी भोकर तालुका अध्यक्ष  सय्यद जब्बार सय्यद जाफर व सर्व कार्याकर्ते मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते
तरी इछुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी
भोकर तालुका अध्यक्ष सय्यद जब्बार सय्यद जाफर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन टिपु सुलतान सेना भोकर  च्या वतीने करण्यात आले आहे


Thursday, February 20, 2020

टायगर ऑटो रिक्षा संघटना च्या वतीने शिवजयंती साजरी व चने वाटपाचे कार्यक्रम संपन्न

टायगर ऑटो रिक्षा संघटना च्या वतीने शिवजयंती साजरी व चने वाटपाचे कार्यक्रम संपन्न





नांदेड:-प्रतिनिधी
आज च्या धावपळीच्या व विज्ञानाच्या युगात कोणीही ख-या भूकेलेल्यांना अन्नदान करतांना आढळून येत नाही.
नांदेड येथील टायगर ऑटो रिक्षा सामाजिक संघटना नांदेड च्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद रिक्षा स्टँड डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रेल्वे स्टेशन नांदेड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली, व गरजूंना चने देऊन चने वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के, (City police D.y.s.p,) पोलिस निरीक्षक साहेब, स्वाभिमानी संघटना अध्यक्ष हंबर्डे, वाहतूक पोलीस कर्मचारी व तसेच जी, टायगर ऑटो संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष अहेमद (बाबा), उपाध्यक्ष इस्माईल खान, संघटक सुनील वाघमारे, कोषाध्यक्ष धम्मपाल थोरात, सहसचिव मुखीद पठाण,फेरोज खान, सदस्य ओमप्रकाश गायकवाड, शिवाजी गजे, शेख खदीर,नवनाथ तोटरे , शेख मुस्तफा, शेख इस्माईल, शेख शौकत शेख पाशा, दर्शन परमार, शेख सिराज,हाजी साहाब,नासेर खान, शेख नफीस, आदी मान्यवर उपस्थित होते.

भोकर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा सुरळीत

भोकर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा सुरळीत
                           फाईल फोटो


 भोकर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी इयतेच्या  परीक्षेला दिनांक 18 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर सुमारे१२०६ विद्यार्थी कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा देत असताना दिसून येत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या  बारावीच्या परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावेत म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी शिक्षण विभागाला कडक निर्देश दिले होते . या अनुषंगाने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ . डी एस मठपती यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे बैठे पथक  तयार करून परीक्षा केंद्रावर स्वतः नजर ठेवून आहेत . यामुळे परीक्षेत कुठेही अनुचित प्रकार  होताना दिसून येत नाही.

  दरम्यान सुरक्षीततेसाठी  येथील डी .बी. कॉलेज व श्री शाहू महाराज विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे .परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 अनन्वये प्रतिबंधित करण्यात आले आहे. केंद्र संचालकांना परीक्षेत अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी कडक सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

भोकर न.पा सार्वत्रिक निवडणूकित वार्ड क्रमांक 4 अनुसूचित जातीसाठी राखीव

भोकर न.पा सार्वत्रिक निवडणूकित वार्ड क्रमांक 4 अनुसूचित जातीसाठी राखीव



---------
पत्रकार सिद्धार्थ जाधव यांच्या नावास मतदारांची पसंती
----------

भोकर (प्रतिनिधी)
 भोकर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच वार्ड रचना घोषित करण्यात आली असून यात वार्ड क्रमांक 4 हा अनुसूचित  जातीसाठी आरक्षित झाला असल्याने भोकर शहरातील प्रस्थापीत राजकिय पुढाऱ्यांनी  आपापल्या परीने  तयारी सुरू केली आहे .  दरम्यान या वर्डातिल स्थानिक रहिवाशी पत्रकार सिद्धार्थ जाधव या तरुणाच्या नावास मोठ्या प्रमाणात पसंती देत असतांना दिसून येत आहेत.
सिद्धार्थ जाधव हे  उच्च शिक्षीत  तरुण  बऱ्याच वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी या  यापूर्वी वार्डातील अनेक समस्यांचा वर्तमान पत्राच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.
वार्डातिल अनेक नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध असल्याने सोबतच हा वार्ड  अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने सिद्धार्थ जाधव  यांनी आमच्या वार्डाचे प्रतिनिधित्व करावे अशी भावना या वार्डातिल नागरिकांनी व्यक्त केली आहे
 डी
.या वार्डातिल नागरिकांनी प्रामुख्याने रस्ते , नाली बांधकाम पथदिवे  पाणी व  येथील स्मशानभूमी आदी समस्या सोडविल्या गेल्या नसून त्या सोडविण्यासाठी सिद्धार्थ जाधव हेच योग्य उमेदवार असल्याचे बोलून दाखवले जात आहे.
दरम्यान सिद्धार्थ जाधव यांच्याशी संपर्क साधून याविषयी चर्चा केली असता " मी प्रतिनिधित्व करावे ही लोकांचीच इच्छा आहे " असे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय पक्षाकडून तिकीट मिळाल्यास व मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद असल्यास मतदारांच्या भावनेची कदर करून निवडणूक लढवण्यास तयार आहे असे यावेळी म्हटले आहे .




 वार्ड क्रमांक ४ शेख फरीद नगर , हनुमान नगर हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याचे समजले या वार्डात बहुतांश मुस्लिम दलित व अकरापगड जातीचे लोकं वास्तव्यास आहेत याच वार्डातिल सर्वसामान्य कुटुंबातील सामाजसेवकी वृत्ती असलेल्या तरुणास  निवडून देण्यासाठी मानसिकता तयार झाली आहे.

शेसेराव बोईनवाड
स्थानिक नागरिक
वार्ड क्रमांक ४
----------------------------




 सर्वात जुनी गल्ली म्हणून वार्ड क्रमांक 4 ची ओळख आहे परंतु कुठल्याही हव्यासाला बळी न पडता या विकासासाठी स्थानिक उमेदवारांना न्याय देण्याची भूमिका वार्डातील नागरिकांनी घेतला आहे सिद्धार्थ जाधवही वॉर्डातून इच्छुक आहेत जनता त्यांच्या पाठीशी दिसून येते.

वामन कराळे
 शेख फरीद नगर भोकर
------------------------------




 वार्ड क्रमांक ४ चे दुर्दैव्य असे की आत्तापर्यंतचा विकास म्हणावा तसा झाला नाही.आम्हाला  हक्काचा उमेदवार म्हणून वार्डातिलच स्थानिक रहिवाशी असावे असे वाटते सध्या पत्रकार सिद्धार्थ जाधव हे निवडणूकीसाठी समोर जावेत अशी नागरिकांची इच्छा आहे.

शिवाजी शिवेवार
स्थानिक नागरिक  शेख फरीद नगर भोकर
-------------------------


 जि.प.ह्या परिसरात गोर-गरीब जनता आहे या गोरगरीब लोकांच्या भावणेची कदर करणार स्थानिक गल्लीतील उमेदवार असावा.

शेख पाशा मियाँ
स्थानिक नागरिक
-----------------------



 भोकर नगरपरिषदेच्या निर्मितीच्या 10 वर्षे पपूर्ण झाली आहेत तरी देखील वार्डातिल समस्याचे निराकरण होण्यास पूर्णापणे फेल झाली आहे. नागरिक सुविधेचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.दुचाकीला घरापर्यंत घेऊन जाता येत नाही वार्डाच्या विकासासाठी जनसाम्यान्याचे प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधित्व म्हणून पत्रकार सिद्धार्थ जाधव यांना पसंती आहे

प्रतीक कदम
स्थानिक नागरिक
शेख फरीद नगर
------------------------



 भोकर नगरपरिषदेच्या निर्मितीच्या 10 वर्षे पपूर्ण झाली आहेत तरी देखील वार्डातिल समस्याचे निराकरण होण्यास पूर्णापणे फेल झाली आहे. नागरिक सुविधेचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.दुचाकीला घरापर्यंत घेऊन जाता येत नाही वार्डाच्या विकासासाठी जनसाम्यान्याचे प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधित्व म्हणून पत्रकार सिद्धार्थ जाधव यांना पसंती आहे

सौ.कमल कदम
-----------------------------



Sunday, February 16, 2020

शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांची भेट

शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांची भेट






भोकर ( एजास कुरेशी) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी आज (दि 16 )   येथील जिल्हा परिषद हायस्कूल च्या शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास  अचानक भेट देऊन पाहणी केली. या परीक्षेतील ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग बघून समाधान व्यक्त केले.

शैक्षणिक वर्ष 2019 20 मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या  प्रेरणेतून तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.  त्यातच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची मोठ्या प्रमाणात तयारी करून घेण्यात आली  यामुळे   यावर्षी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेस  उदंड प्रतिसाद मिळाला आहे दरम्यान पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २०६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.यावर्षी   तालुक्यातील शिक्षक बांधवांनी केलेल्या मेहनतीमुळे शिष्यवृत्ती परीक्षेस प्रतिसाद मिळाला असून  शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ  होणार असल्याची शक्यता म गटशिक्षणाधिकारी डॉक्टर डी एस मठपती यांनी वर्तवली आहे.


जिल्हा परिषद शाळेत शिकणारा ग्रामीण  विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष देऊन नेमक्या काय सुधारणा करता येतील यासाठी स्वतः प्रयत्न करणार असून  ग्रामीण विद्यार्थ्यांच्या माय बापांच्या डोळ्यातील स्वप्नांची  जाणीव मला आहे. तालुक्यात स्पर्धा परीक्षेकडे ग्रामीण विद्यार्थ्यांचा वाढता कल बघून समाधान वाटते.

Friday, February 14, 2020

भोकर मध्ये १६ फेब्रुवारी ला युवा पँथर आयोजित आंबेडकरी जलसा

भोकर मध्ये १६ फेब्रुवारी ला युवा पँथर आयोजित आंबेडकरी जलसा





भोकर (एजास कुरेशी )  येत्या १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी
भोकरच्या नूतन शाळेच्या मैदानावर युवा पॅंथर च्या वतीने
 भव्य स्वरूपातील ‘आंबेडकरी जलसा’ आयोजित केला आहे.

दलित चळवळीच्या गाण्यांना मोठी परंपरा आहे. डॉ. आंबेडकरांचा लोकसंपर्क वाढत गेला तेव्हापासून ती आहे. बाबासाहेबांच्या भाषणाआधी लोकशाहिरांची गाणी, हा प्रघात १९४०च्या दशकातही होता. ‘एक गीत माझ्या दहा भाषणांपेक्षा अधिक परिणामकारक’ असे डॉ. आंबेडकर म्हणाले, ते वामनदादा कर्डकांच्या गाण्यानंतर. हे वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप अशा थेट आंबेडकरी चळवळीतील कवी-शाहिरांनी ही परंपरा सशक्त केली होती.


   क्रांतिवीर शहीद पोचीराम कांबळे शहीद गौतम वाघमारे या सारख्या अनेक आंबेडकरी वीर यांच्या क्रांतिकारक नामांतर लढ्यातून मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण विस्तार झाले त्या गौरवशाली लढ्याची ज्योत निरंतर प्रज्वलित रहावी यातून खऱ्या अर्थाने युवापिढी आंबेडकरी लढ्याची प्रेरणा मिळावी म्हणून भोकर येथील युवा पॅंथर या सामाजिक लढाऊ संघटनेकडून भव्य आंबेडकरी जलसा चे आयोजन करण्यात आले आहे.
       सदरील कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून एम सायलू म्हैसेकर तेलंगणा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राहुल प्रधान संघटना प्रमुख युवा पॅंथर हे राहणार आहेत, सदरील कार्यक्रमासाठी नामदेव आयलवाड, केशव मुद्देवाड, बाली भाऊ कांबळे, प्राध्यापक जाधव, संजय घंटलवार, दिनेश लोंढे पाटणकर, राहुल चौदंते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
       तसेच दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी रविवारी संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भिमशाहिर सविधान मनोहरे अमरावती यांचा भीम  गितांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजक संदीप गायकवाड यांनी दिली आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स संघदीप वारघडे, महेंद्र दुधारे, अंकुश चव्हाण, प्रकाश जाधव, प्रेम गायकवाड, विजय उर्फ पिल्लू दवणे हे प्रयत्न करत आहेत.

Monday, February 10, 2020

नागरिक संशोधन विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी भोकर शहरात तीन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात

नागरिक संशोधन विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी भोकर शहरात तीन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात






भोकर (एजास कुरेशी)केंद्र सरकार द्वारे अमलात आणले जाणारे संविधान विरोधी नागरिकता संशोधन अधिनियम सीएए 2019 हा कायदा त्वरित रद्द करून प्रस्तावित विधेयक एन पी आर, एन आर सी, तात्काळ मागे घेण्यात यावे या मागणीसाठी
उपविभागीय कार्यालयास समोर भोकर शहरातील रहिवाशांनी आपले तीन दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात केली


कुल जमाती तहरिक च्या वतीने आयोजित तीन दिवसीय धरणे आंदोलनाचा आज पहिल्याच दिवशी
ज्येष्ठ पत्रकार एल ए हिरे, शाहीर बाबुराव गाडेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव दूधारे , भीम टायगर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड, एमआयएमचे बाबा खाॅन,शेख अमेर,मोसींन कुरेशी,हाफिज अरशद,  आदींनी उपस्थिती राहत सदरील  काळया कायद्या विरोधी आपले मत मांडले
  शहराती  सामाजिक संघटना च्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनामध्ये हजेरी लावून आपले विचार मांडले  केंद्रातील भाजपा सरकारने देशा चालू असलेल्या कंपन्या विकण्याचे काम रेल्वेचे खाजगीकरण हे सगळे
काम लपण्यासाठी वाढती महागाई बेरोजगारी लपण्यासाठी हा कायदा आणून तमाम देशवासीयांच्या डोळ्यात धूळ फेक ण्याचे काम करत असूनभारतीय संविधानामध्ये धार्मिक आधारावर नागरिक देण्याचा कोणतीही तरतूद नसताना हे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन कायदे करून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम करत आहेत ते आम्ही कधीही होऊ देणार नाही असे ठाम मत आंदोलनकर्त्यांनी मांडले आहे लवकरात लवकर सरकारने हा कायदा मागे घेतला नाही तर आम्ही अजून मोठ्याप्रमाणात तीव्र आंदोलन करू असं आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले

Wednesday, February 5, 2020

भोकर ला जिल्ह्याचा दर्जा द्या बहुभाषिक पत्रकार संघ व भोकर विकास आघाडी मागणी

भोकर ला जिल्ह्याचा दर्जा द्या बहुभाषिक पत्रकार संघ व भोकर विकास आघाडी मागणी




भोकर प्रतिनिधी - भोकर हे तालुक्याचे ठिकाण असून अतिदुर्गम असलेला तालुका आहे. या विभागाचा विकास होण्यासाठी भोकरला जिल्ह्याच्या दर्जा देण्यात यावा अशी मागणी बहुभाषिक पत्रकार संघ व भोकर विकास आघाडी यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
भोकर शहर हे तेलंगाना सीमेलगत असल्याने  असल्याने मागासलेला आहे तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी. भोकर शहराला जिल्ह्याचा दर्जा देणे आवश्यक आहे याठिकाणी उपविभागीय महसूल कार्यालय. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय. जिल्हा न्यायालय. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय. विद्युत मंडळाचे विभागीय कार्यालय. अशी कार्यालय असून भोकर शहराला जिल्ह्याचा दर्जा देऊन उमरी.धर्माबाद. हिमायतनगर. हदगाव. किनवट .माहूर. या तालुक्यांना जोडून भोकर ला जिल्ह्याच्या दर्जा देण्यात यावा. महा विकास आघाडी सरकारने महाराष्ट्र मध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची संकेत आहे. त्या धर्तीवर भोकरला.  जिल्ह्याच्या दर्जा देण्यात यावा. यासाठी भोकर चे विद्यमान आमदार महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या प्रश्नी विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी भोकर चे नायब तहसीलदार कामठेकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर बहुभाषिक पत्रकार संघ व भोकर विकास आघाडीचे अध्यक्ष अहमदभाई करखेलीकर. सचिव पत्रकारअनिल कराळे सोमठाणकर. पत्रकार भीमराव दुधारे उपाध्यक्ष. पत्रकार अनिल डोईफोडे उपाध्यक्ष. पत्रकार गौतम सरपाते.उत्तम कसबे कोषाध्यक्ष. पत्रकार जयभीम पाटील. पत्रकार  माधव गायकवाड. पत्रकार शाम गायकवाड. परमेश्वर भालेराव लामकानीकर सरपंच. निखिल हंकारे तालुका अध्यक्ष भिम टायगर सेना. शाहरुख सौदागर य��

भोकर येथे विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

भोकर येथे विश्वकर्मा प्रगट दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
.






 भोकर प्रतिनिधी:-
प्रभु विराट विश्वकर्मा प्रगट दिनाच्या औचित्याने भोकर शहरातील विश्वकर्मा मंदिरात उद्या दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोज शुक्रवारी सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रमही उत्साहात साजरे होणार आहेत.
  दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रभु विराट विश्वकर्मा जयंती निमित्त सकाळी ७ वाजता गजानन कोमटलवार यांच्या हस्ते प्रभु विश्वकर्मा मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार असून, विधिवत पूजा,अर्चा,आरती व प्रसादाचे वाटप होणार आहे. सकाळी १० ते १२ ह-भ-प श्री ब्रम्हवाडीकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १० ते २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन विश्वकर्मा मंदिराच्या परिसरात करण्यात आले असून या शिबिरात जास्तीत जास्त समाज बांधवांनी व रक्तदान करणाऱ्या दात्यांनी मोठ्या प्रमाणात पवित्र रक्तदान करावे असे अवाहन विश्वकर्मा पांचाळ समाजातर्फे करण्यात आले आहे.

निवघा येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

निवघा येथील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न





मौजे.निवघा येथे विद्यार्थी विकास इंग्लिश मेडिअम स्कूलच्या 4 थ्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य व नाटके सादर केली.



यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून  समाजसेविका तथा गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा मा.सौ.राजर्षीताई हेमंत पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष बारड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा.नितीन खंडागळे साहेब तर प्रमुख पाहूणे म्हणून व्ही.पी.के.कारखान्याचे चेअरमन मा.मारोतराव कवळे गुरूजी यांची उपस्थिती होती.याप्रसंगी सौ.राजर्षी पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुध्दा इंग्रजी माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन केले.यावेळी मार्केट कमिटीचे सभापती म्हैसाजी भांगे,श्रीराम पवार,शिवाजीराव मारोतराव पवार,सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ संभाजी पा.पवार,चेअरमन प्रकाश पवार,पोलिस पाटील पुंडलिक पा.पवार व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.संदिप पवार यांनी केले.व सुञसंचालन कु.पायल पवार तर आभार प्राचार्या सौ.वर्षा पवार यांनी कैले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सवाचे भोकर येथे शिव भीम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सवाचे भोकर येथे शिव भीम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन





नवयुवक मित्र मंडळाचा उपक्रम

(एजास कुरेशी भोकर)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सवाचे आयोजन नवयुवक मित्र मंडळ भोकर च्या वतीने करण्यात आले आहे

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्याला उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, ह्या करणार असून कार्यक्रमासाठी आमदार अमर राजूरकर, भीमराव शिरसागर, विलास दादा धमाले, यांची विशेष तर नागनाथ घिसेवाड, (बहुजन नेते),गोविंद बाबागौड पाटील, (मा, सभापती) प्रकाश देशमुख भोसीकर, (जि,प सदस्य) बाळासाहेब पाटील रावणगावकर,( जि प सभापती)  जगदीश पाटील भोसीकर, (सभापती  कृ उ बा) विनोद पाटील चिंचाळकर, (मा नगरअध्यक्ष  ) सुभाष रायभोळे, किशोर भवरे,  बापूराव गजभारे, मंगेश कदम, दुष्यंत सोनाळे, बाळु भाऊ राऊत ,रामचंद्र मुसळे, महेन्द्र पिंपळे,  रमेश सरोदे,पप्पू पाटील कोंडेकर, साहेबराव सोमेवाड, संदीप सोनकांबळे,पंचशील कांबळे, संघरत्न कांबळे ,उमेश सरोदे, आदिची
उपस्थिती राहणार असून शिव भीम जन्मोत्सव सोहळ्याला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीम शाहीर यांचा गायनाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता शहरातील नूतन शाळेच्या प्रांगणात होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भिमशाहिर गौतम पवार, व भीम कन्या रितू खंदारे, उपस्थित या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी करावी असे आवाहन संयोजक सम्राट भाऊ हिरे आयोजक विक्रम शिरसागर यांनी केले आहे

Tuesday, February 4, 2020

शेख अहेमद यांनी 350 पेक्षाही जास्त परीक्षा देऊन भारत देशात एक ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावावर केली नोंद या अदभूत शिक्षणाची दखल घेत त्यांची नोंद “ वर्ल्ड बूक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड मध्ये

शेख अहेमद यांनी 350 पेक्षाही जास्त परीक्षा देऊन भारत देशात एक ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावावर केली नोंद या अदभूत शिक्षणाची दखल घेत त्यांची नोंद “ वर्ल्ड बूक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड मध्ये 






                                         
भोकर येथिल भुमिपूत्र आणि ग्रामिण रूग्णालय मुदखेड च्या माजी कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ शेख अहेमद यांनी 24 वेगवेगळया विषयामध्ये पदव्या प्राप्त करून तसेच 60 पेक्षाही जास्त आंतरराष्ट्रिय स्तरावर संशोधनात्मक रिसर्च पेपर देखिल त्यांनी प्रकाशित केलेली आहेत आणि 12 आंतरराष्ट्रिय दर्जाचे पुस्तके प्रकाशित केली आहेत, 11 डेझर्टेशन्स वेगवेगळ्या विदयापिठात सादर केलेली आहेत आणि 350 पेक्षाही जास्त परीक्षा देऊन भारत देशात एक ऐतिहासिक प्रकारचा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंद केला आहे. त्यांच्या या अदभूत शिक्षणाची दखल घेत त्यांची नोंद “ *वर्ल्ड बूक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड*” ने दिल्ली येथे दि. 1 फेब्रूवारी 2020 रोजी लाजपत भवन या ठिकाणी त्यांच्या 100 व्या ईव्हेंट मध्ये मेडिया च्या साक्षिने “ *दि मोस्ट एजूकेटेड परसन ऑफ ईंडिया”* या शिर्षकाखाली ऐतिहासिक नोंद करण्यात आली. या कार्यक्रमास दिल्ली येथिल डॉ. ऊदित राज माजी खासदार दिल्ली, सिमा राज इनकम टॅक्स कमिशनर दिल्ली, वर्ल्ड बूक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड चे अध्यक्ष वेद प्रकाश आणि निरू सेहगल यांच्या हस्ते हा पूरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्लीकर पण त्यांच्या या अभूतपूर्व यशाने भाराऊन गेलेत त्यांना क्षणभर विश्वास होईना की आज आपन या महान व्यक्तिला आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहात आहोत. शोकांतिका एव्हढिच आहे की जे काम गल्लित व्हायला पाहिजे होते ते काम आज दिल्लीने करून दाखविले. स्थानिक पातळिवर त्यांच्या या यशाची साधी दखल ही कोणि घेतली नाही आणि आज तो आंतरराष्ट्रिय स्तरावर विश्वविक्रम नोंदवून भारत देशात ईतिहास रचला आहे. एका सर्वसाधारण मूस्लिम समाजातिल ड्रायव्हरच्या मूलाने ते करून दाखविले आहे जे भल्याभल्यांना जमले नाहि. आजच्या युगातिल शेख अहेमद हे नांव शैक्षणिक क्षेत्रात एक आयकॉन, आयडॉल बनले आहे.

या व्यतिरिक्त त्यांची... *1) वजरा बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 2) क्रेडेंस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 3) व्रिक्षा बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 4) कॉसमॉस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईंडिया 5) फाऊंडेशन रेकॉर्ड ऑफ ईंडिया 6) ईंडिया स्टार रिपब्लिक अवार्ड-2020* या विश्वविक्रमात नोंद घेण्यात आली आहे आणि अजुनही काही वर्ल्ड रेकॉर्ड चे घोषना व्हायची आहे.






आज शेख अहेमद यांची भारतातील ऊच्च्यविद्यविभूषित व्यक्तिंच्या पंक्तित गणती होते. अतिषय प्रतिकूल परिस्थितिवर मात करित त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. त्यांचे स्वप्न हे वैदयकिय अधिकारी बनण्याचे होते परंतू हे स्वप्न अधुरेच राहिले तरिदेखिल खचुन न जाता आयुष्याचे यश अपयश पचवत जिवनाचा संघर्ष सुरूच होता. परंतु हे यशाचे शिखर गाठण्यासाठी संघर्षाला ही लाज वाटेल असा चित्त्त्तथरारक प्रवास करावा लागला. हे शिक्षण प्राप्त करण्यासाठि प्रसंगी कधी कधी ऊपासमारीचे चट्केही खावे लागले आहेत. दिवंगत माजी आरोग्य मंत्री डॉ. श्रिकांत जिचकार यांचे आत्मचरित्र वाचून त्याचा त्यांच्या जिवनावर जबरदस्त प्रभाव पडला.

 *त्यांनी प्राप्त केलेल्या पद्व्या हया पुढिलप्रमाणे आहेत*...

1) एस.एस.सी. श्री शाहू महाविदयालय भोकर येथून विशेष प्राविण्यासह ऊत्तिर्ण 2) एच.एस.सी. (वीज्ञान) 3) बि. एस्सी.(केमेस्ट्रि), 4) एम.एस्सी.( ईकोलॉजी अ‍ॅंड ईनव्हायर्णमेंटल सांयन्स ), 5) एम.एस्सी. (केमेस्ट्रि ), 6) एम.एस्सी.( ईनफोरमेशन टेक्नोलॉजी), 7) एम.ए. (ईंग्लिष लिट्रेचर), 8) एम.ए. (क्लिनिकल सायकोलॉजी), 9) एम.ए. (हयुमन राईट्स), 10) एम.ए. (ईकॉनोमिक्स), 11) एम.ए. (रूरल डेव्हलपमेंट), 12) एम.फिल.ईन (सोशल वर्क), 13) पिएचडी ईन (ईनव्हायर्णमेंटल सांयन्स), 14) एम.बी.ए. ईन (मार्केटिंग मॅनेजमेंट), 15) मास्टर ऑफ सोशल वर्क (मेडिकल अ‍ॅंड सायकियाट्रिक) हा पद्व्युत्त्तर हा अभ्यासक्रम आऊटस्टॅंडिंग ग्रेड मध्ये ऑरेंज सिटि कॉलेज नागपूर टॉपर 16) आय.टि.आय. डिप्लोमा (वेल्डर) भोकर येथून टॉपर, 17) डिप्लोमा ईन ऑटोकॅड 18) अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा ईन नेटवर्किंग ईंजिनिअरिंग, 19) पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा ईन मेडिकल लॅब टेक्नोलॉजी ग्रामिण तंत्रनिकेतन नांदेड येथून टॉपर, 20) पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा ईन रूरल डेव्हलपमेंट, 21) पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा ईन फॉरेंन्सिक सांयन्स अ‍ॅंड क्रिमिनोलोजी, 22) बी.जे.(बॅचलर ऑफ जर्नालिझम), 23) एल.एल.बी. A प्लस ग्रेड विथ डिस्टिंक्शन मध्ये ऊत्तिर्ण केला. 24) एम.जे.(मास्टर ऑफ जर्नालिझम) महाराष्ट्रा टॉपर, 25) एल.एल.एम. ईन (क्रिमिनोलॉजी) 26) एम.टि.एम. मास्टर ऑफ टूरिझ्म अ‍ॅंड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (अ‍ॅपिअरड) या पदव्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त त्यांना मानद 6 पदव्यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.





भारत देशात ज्या वेळेस कंत्राटी कामगारांचा ईतिहास लिहिला जाईल त्या वेळेस शेख अहेमद यांचे नांव हे सुवर्ण अक्षरात नोंद केले जाईल. ईतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी आणि शैक्षणिक क्षेत्रातिल महामेरू म्हणुन संबोधता येईल असे नांव म्हणजे शेख अहेमद होय. त्यामुळेच आपल्या अपार बूदधिमत्त्तेच्या जोरावर त्यांनी एक ही वर्ष वाया जाऊ न देता या पद्व्यांवर आपल नांव कोरल. याच्याव्यतिरीक्त ते ऊत्त्तम संवादपटु आणि मिमिक्रि आर्टिस्ट म्हणुन देखिल प्रसिद्ध आहेत. शेख अहेमद यांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतुन मिळवल्या आहेत. तो भोकर येथील सेवानिव्रुत्त्त चालक शेख ईस्माईल यांचा मुलगा आणि कॉंग्रेस पार्टीचे ऊपनगरअध्यक्ष ईनामदार साबेरा बेगम यांचे जावाई आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण भोकर येथिल जिल्हा परीषद नुतन शाळा येथुन पुर्ण केले आहे आणी शाहू महाविदयालयाचा तो माजी विद्यार्थी आहे. या दोन्ही शाळांना त्यांच्या जिवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या जिवनात ग्रामिण रूग्णालय मुदखेडला देखिल तेवढेच महत्त्व आहे आणि हे एक प्रकारचे विदयापिठ ठरले आहे त्यांच्यासाठी जो धडा एवढे शिक्षण घेऊन पण मिळाले नाही ते या ग्रामिण रूग्णालय मुदखेडच्या चार भिंतिच्या आत शिकायला मिळाले. इ.स. 2011 मध्ये त्यांना सौदि आरामको या कंपणि मध्ये लिपिक या पदासाठी परदेशात जाण्याची संधी मिळालि होती आणि त्याचवेळेस या कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथिल आदेश प्राप्त झाले. तेंव्हा परदेशात न जाता आपल्याच देशात नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे भविष्यात स्थायी होण्याची संधी मिळेल ही आशा होती. ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे त्यावेळेस अधिकारीही चांगल्या स्वभावाचे आणि कर्मचार्यांना सोबत घेऊन प्रशासन चालविणारे होते. त्यामुळे ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे सुरूवातीचे काहि वर्ष चांगल्या प्रकारे गेले. आणि अचानक येथे कान, नाक आणि घसा तज्ञ अहर्ता प्राप्त वैदयकिय अधिक्षक वर्ग-1 यांची नियूक्ति झाली आणि प्रशासनाचा खलनायकि चेहरा समोर आला. याच ठिकाणाहुन  शेख अहेमद यांच्या आयूष्याचा खरा संघर्ष सूरू झाला. त्या हिटलर शाही आणि मनोरूग्ण पद्ध्तिच्या वैदयकिय अधिक्षक च्या आडमूठेपणामुळे वरीष्ठांचे आदेश असतांना देखिल कामावर रूजू करून न घेतल्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करावी लागली, पोलिस स्टेशन मुदखेड येथे एन.सी. दाखल करावी लागली आणी 4 महिण्याच्या अथक परिश्रमानंतर ग्रामिण रूग्णालय मुदखेड रूजू करण्यात आले आणि त्या हिटलरशाहा अधिक्षकाची ऐतिहासिक 3 पाणांची तक्रारीवरून कळमनूरी येथे बदली करण्यात आली शेवटी शासनाकडुन त्या वैदयकिय अधिक्षकाची विभागिय चौकषी लावण्यात आली आणि शेख अहेमद यांना सरकारी साक्षिदार बनवण्यात आले. आणि याच ठिकाणी असा अनुभव आला की या क्षेत्रात जर तग धरून रहायचे असेल तर वैदयकिय क्षेत्रातील कायद्याचा दिर्घ अभ्यास असणे अतिआवश्यक आहे. तेव्हां एल.एल.बी. ला प्रवेश घेतला आणि दवाखाण्याची पायरी चढ्ण्यापासून ते दवाखाणा जमिनदोस्त करण्याचे सर्व कायद्यांचा अभ्यास केला.

पुढे 1 वर्ष ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे *डॉ. कपिल जाधव* यांच्या काळात येथील प्रशासन सुरळित चालले होते तोच अचानक प्रसिध्ध पोटविकार तज्ञ आणि एंडोस्कोपी विषेशज्ञ यांची वैदयकिय अधिक्षक या पदावर ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथे नियूक्ति करण्यात आली आणि आपल्या पूर्विच्या मित्राचा वचपा घेण्यास सूरुवात त्यांनी केली आणि बिनबूडाचे आरोप लाऊन मेमो देण्याचा खेळ सूरू झाला. त्या वैदयकिय अधिक्षकाची नियूक्ती ही फक्त शेख अहेमद यांच्यासाठिच करण्यात आली की काय अशी शंका वाटायची कारण काही कर्मचार्‍यांच्या कक्षाला कुलुप लाऊण असायचे आणि काही कर्मचारी हे घरी बसून पगार घ्यायचे तरिपण त्यांच्यावर कोणतिहि कारवाही व्हायची नाहि. समजून सांगितले तरी तो अधिक्षक ऐकायला तयार होईना. अत्याचाराचा कळ्स गाठला होता आणि अशातच शेख अहेमद यांची एकुलती एक बहीण अचानक आजारी पड्ली आणि आयसियु मध्ये अ‍ॅड्मिट करावे लागले. त्यांच्या बहीणिचे रक्तगट बी निगेटिव होते आणि दिवसेंदिवस प्रक्रुती खालावत चालली होति आणि रक्त मिळविण्यासाठी रोज तारेवरची कसरत करावी लागायची. रजेचा अर्ज देऊन गेल्यास पण अनुपस्थिती नोंद केली जात होती मेमो देण्याचा खेळ सूरूच होता. तब्बल 10 दिवसांनी शेख अहेमद यांच्या बहीणिचे निधन झाले आणि दूखाचे डोंगर कोसळले आणि 2 दिवस कामावर जाऊ शकले नाही त्यामुळे वैदयकिय अधिक्षक यांनी त्यांच्या कार्यालयात बोलाविले आणि कामावर न येण्याचे कारण विचारले तेंव्हा त्यांनी संगितले की माझ्या बहीणिचे निधन झाले त्यामुळे मी येऊ शकलो नाही. तेंव्हा त्या वैदयकिय अधिक्षकाचे ऊत्त्तर होते हे तर चालतच राहते आणि लिपिकाला बोलाऊन परत मेमो काढण्यास सांगितले. तेंव्हा शेख अहेमद यांनी कार्यालयाच्या बाहेर पडत आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि म्यानेतुन लेखणी बाहेर काढली आणि पूढे जे घडले ते महाराष्ट्रातिल आरोग्य क्षेत्रास हादरा देणारी एकमेव घटणा घडली वैदयकिय अधिक्षकाचा नांदेड येथिल डॉक्टर लेन परिसरातिल खाजगी दवाखाना शेख अहेमद यांनी दिलेल्या लेखी तक्रारी नंतर अक्षरश: प्रशासनाने सिल केला. त्या वैदयकिय अधिक्षकाला पळ्ता भुई सापडेना आणि आपली ऊरली सुरली अब्रूचा गाशा गुंडाळत नोकरिचा राजिनामा द्यावा लागला. अशाप्रकारे न घाबरता दोन - दोन दिग्गज, प्रशासनात मूरलेल्या धनाढ्य, अनूभवि सेवानिव्रुत्तिच्या ऊंबरठयावर पोहोचलेल्या त्या दोन वैदयकिय अधिक्षकांच्या अत्याचाराविरूद्ध पेटुण ऊठुण संघर्ष करणारा आणि त्यांचे पानिपत करनारा आरोग्य विभागातिल हाच तो “ *अ‍ॅंग्रि यंग मॅन”*.

त्यांचे स्वप्न हे वैदयकिय अधिकारी बनण्याचे होते परंतू हे स्वप्न अधुरेच राहिले परंतू त्यांनी डॉक्टरांसाठि जे कायदे आहेत त्याबद्द्ल “ *मेडिकल ईथिक्स अ‍ॅंड लेजिसलेश्न्स फॉर डॉक्टर*” हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. आज *Google, AMAZON, FLIPCART,  GOOGLE BOOKS वर Dr. SHAIKH AHMAD*  हे नाव टाईप केल्यास आपल्यास त्यांची माहिति मिळून जाईल.   त्यांच्या स्वर्गवासी बहिणीचे स्वप्न होते कि माझ्या भावाने या देशात खुप मोठे नांव करावे आणी आज खर्‍या अर्थाने त्यांनी आपले नांव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करून या देशात आजरामर करून आपल्या बहीणिला श्रदधांजली वाहिली आहे.

त्यांनी मुदखेड येथिल अडचणिच्या काळात साथ देणार्या शेख जब्बार (मामू), मोहमद बूरहान, मोहमद हुसेन, शेख मूजिब, शेख ईरफान पत्रकार, सचिन कांबळे पत्रकार, नगर अध्यक्ष मूजिब जहागिरदार सर यांचे आभार मानले आणि मुदखेड येथिल सगळ्या जनतेचे आभार मानले. तसेच ग्रामिण रूग्णालय मुदखेड येथिल संपूर्ण कर्मचार्‍यांचे आभार मानले.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...