शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांची भेट
भोकर ( एजास कुरेशी) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी आज (दि 16 ) येथील जिल्हा परिषद हायस्कूल च्या शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. या परीक्षेतील ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग बघून समाधान व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष 2019 20 मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या प्रेरणेतून तालुक्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेची मोठ्या प्रमाणात तयारी करून घेण्यात आली यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेस उदंड प्रतिसाद मिळाला आहे दरम्यान पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २०६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.यावर्षी तालुक्यातील शिक्षक बांधवांनी केलेल्या मेहनतीमुळे शिष्यवृत्ती परीक्षेस प्रतिसाद मिळाला असून शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याची शक्यता म गटशिक्षणाधिकारी डॉक्टर डी एस मठपती यांनी वर्तवली आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकणारा ग्रामीण विद्यार्थी शिकला पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष देऊन नेमक्या काय सुधारणा करता येतील यासाठी स्वतः प्रयत्न करणार असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या माय बापांच्या डोळ्यातील स्वप्नांची जाणीव मला आहे. तालुक्यात स्पर्धा परीक्षेकडे ग्रामीण विद्यार्थ्यांचा वाढता कल बघून समाधान वाटते.

No comments:
Post a Comment