भोकर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा सुरळीत
फाईल फोटो
भोकर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळा तर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी इयतेच्या परीक्षेला दिनांक 18 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर सुमारे१२०६ विद्यार्थी कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा देत असताना दिसून येत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडावेत म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी शिक्षण विभागाला कडक निर्देश दिले होते . या अनुषंगाने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ . डी एस मठपती यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे बैठे पथक तयार करून परीक्षा केंद्रावर स्वतः नजर ठेवून आहेत . यामुळे परीक्षेत कुठेही अनुचित प्रकार होताना दिसून येत नाही.
दरम्यान सुरक्षीततेसाठी येथील डी .बी. कॉलेज व श्री शाहू महाराज विद्यालय या दोन परीक्षा केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे .परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 अनन्वये प्रतिबंधित करण्यात आले आहे. केंद्र संचालकांना परीक्षेत अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी कडक सूचना निर्गमित करण्यात आल्या असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment