Saturday, November 30, 2019

राष्ट्रवादी-काँग्रेस मधून भाजपात घुसलेल्या अनेकांना घरवापसीचे वेध लागणार..!

राष्ट्रवादी-काँग्रेस मधून भाजपात घुसलेल्या  अनेकांना घरवापसीचे वेध लागणार..!



नांदेड (बेधडक महाराष्ट्र विशेष)
  जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीपूर्वी
अनेक काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची सत्ता आली पण ज्यांनी ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे काय? हा एक मोठा प्रश्‍न आता जनमानसात विचारला जात आहे. या सर्वांनी भाजपात घुसताना ’’आम्हाला मतदार संघात कामे करावयाची आहेत, मतदारसंघाचा विकास करावयाचा आहे असे, जनतेला सांगितले आहे. आता तर भाजपाची सत्ताच आलेली नाही, मग भाजपात गेलेले हे नवप्रवेशवाले नेते आपल्या मतदारसंघात विकास कामे कशी काय करतील? कोण यांना निधी देणार? हे प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहेत. . अशी माणसे आम्ही जनतेच्या विकास कामांसाठी पक्ष सोडून भाजपात जात आहेत, असे म्हणत असतील तर त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याबाबत जनतेला सक्ती कोण करु शकतो ? तर राज्यभर अशा मंडळींना जनतेने धडा शिकविला आहे. आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीने ज्यांना -ज्यांना प्रचंड, महाप्रचंड दिले त्यांनीच स्वार्थासाठी पडत्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून भाजपा जवळ केली, ही बाब जनतेला पटलेली नाही, राज्यभर ही मंडळी आज हास्यास्पद विषय झाली आहेत. सक्रीत तर भाजपा कार्यकर्त्यांनी गंमतच केली आहे. त्यांनी चक्क सोशल मिडीयावर पक्षात नव्याने घुसलेल्यांना आवाहन केले आहे, ’’जनतेची कामे करण्याचा बहाणा करुन तुम्ही ऐनवेळी भाजपात घुसलात, आता भाजपाचेच सरकार आलेले नाही,  तुमची विकास कामे होणार नाहीत, नंतर दोष देण्यापेक्षा तुमची  कामे जिकडे होणार असतील तिकडे आजच निघून जा’’ भाजपात घुसलेल्या संधीसाधूंची या पेक्षा अधिक दुसरी बेईज्जत काय असू शकते. ही सर्व मंडळी आज हास्याचा विषय झाली आहेत. बरं त्यांचे परतीचे दोरही कापले गेले आहेत. काँग्रेस -राष्ट्रवादीत स्वगृही गेले तरी त्यांना पूर्वीचा मान राहिल काय? कुणीतरी घोषणाच केली होती, की भाजपात गेलेली मंडळी पुन्हा परत स्वगृही आली तरी त्यांना कार्यकर्त्यांच्या रांगेत बसावे लागेल ! यात चूकीचे काही आहे असे कुणी म्हणू शकणार नाही. परंतू महाराष्ट्राच्या घडामोडींनी एकूणच देशाच्या राजकारणात एक फार मोठा अंडर करंट सोडला आहेे. देशात ’’बिगर भाजपा वादास’’ सुरुवात झाली आहे. भाजपाने ज्या प्रकारे शतप्रतिशत भाजपा, काँग्रेस मुक्त भारत, विरोधकांचा उघड सफाया, मित्र पक्षांचा स्लो पॉयझनींग तत्वाने सफाया, ही निती अवलंबीली होती. त्यामुळे विरोधकांच्या व मित्रपक्षांच्या आस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. ही बाब ’बिगर भाजपा’ वादाचे अंकुर  उगवण्यास कारणीभूत झाली आहे. भाजपामुळे आपले अस्तित्वच धोक्यात येत असल्याची जाणीव भाजपातेत्तर सर्वच पक्षांना झाली आहे. त्यातून सर्वात प्रथम  शिवसेना पक्ष सावरला आहे. अधिक काळ भाजपा सोबत राहिलो तर आपण संपून जावू, त्यापेक्षा काँग्रेस -राष्ट्रवादी परवडली.  हा विचार सेनेने केला आणि बिगर भाजपा वादाच्या मोहिमेची मुहुर्तमेढ महाराष्ट्रापासून रोवली. हा अंडर करंट आता देशभर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. हे सर्व होत असताना व  देशात भाजपाचा प्रादेशिक राजकारणाचा शेअर 70 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांपर्यत घसरला असताना, भाजपामध्ये नव्याने घुसलेल्या या संधीसाधू  काँग्रेसींचे लाईट लागले नसते तरच नवल होते. त्यातूनच राज्यात अनेकांच्या डोक्यात घरवापसीचे, स्वगृही परतण्याचे चक्र आतापासूनच सुरु झाले आहे. महाविकास आघाडीचा शपथविधी होण्याआधीच एक घरवापसी झाली आहे. आता राज्यभरात भाजपात ताजे -ताजे घुसलेल्यांना पश्‍चात बुद्धी म्हणा, की  पश्‍चातापाची अनुभुती म्हणा, अनेकांना घरवापसीचे वेध लागणार आहेत, ही बाब निश्‍चीत !

Wednesday, November 27, 2019

भोकरच्या त्या मुख्याधिकारी ला अखेर पोलीस कोठडी

भोकरमध्ये भ्रष्टाचार केलेल्या मुख्याधिकारी त्या मुख्याधिकारी ला अखेर पोलीस कोठडी




भोकर (एजास कुरेशी)
भोकर ची नगरपरिषद मनले ची भ्रष्टाचार हे भोकरच्या जनतेला सांगण्याची गरज नाही कारण नगरपरिषद मध्ये बरेच  भ्रष्टाचार झालेले आहेत  काही उघडकीस आलेले पण आहेत ते घनकचरा असो का नोकर भरती
भोकर येथील नगर परिषदे अंतर्गत सन 2018 मध्ये झालेल्या घनकचरा व्यवस्थापनातील घोटाळा प्रकरणी आरोपी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण  यलगड्डे यांना बुधवारी प्रथमवर्ग न्यायालयाने 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे प्रकरणाची पार्श्वभूमीवर अशी की यातील प्रमुख आरोपी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर तत्कालीन मुख्याधिकारी हरी कल्याण यलगड्डे आणि साईबाबा संस्थेचे अध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी संगनमत करून 8 सप्टेंबर 2017 ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत शहरातील घनकचरा व्यवस्थापनात बनावट दस्तावेज तयार करून शासनाच्या दहा लाख 18 हजार 500 रुपयांचा गैरवापर केल्याची माहिती अधिकारातून आढळुन आल्यानंतर यातील फिर्यादी नगरसेवक केशवरामा मुद्देवाड यांनी तक्रार केली होती याबाबत न्यायालयाच्या आदेशाने 14 जून 2018 रोजी वरील तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून सर्व आरोपी पोलिसांना मिळून आले नव्हते याबाबत भोकर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रकरणातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुरेश भाले, पोलिस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत आरकिलवाड, कृष्णा तलवारे, यांनी पुणे येथून आरोपी हरी कल्याण यलगड्डे, यांना अटक केली असून त्यांना येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

Monday, November 25, 2019

भोकर तालुक्यात सशक्त अभियानास उदंड प्रतिसादत

भोकर तालुक्यात सशक्त अभियानास उदंड प्रतिसाद





 भोकर(एजास कुरेशी)
तालुक्यात  विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी  सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आज( दि. 25 ) घेण्यात आलेल्या 'आयएफए' गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी विविध उपक्रम हाती घेतले असून याच धर्तीवर अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शहरासह प्रत्येक गाव,वाडी,तांड्यावरील सुमारे 125 शाळेसह प्रत्येक अंगणवाडीतील  विद्यार्थ्यांना,  लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 'आयएफए' गोळ्या खाऊ घालण्यात आले आहेत.




सदर उपक्रमांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत अंगणवाडी मधील बालकांना शिरपचे डोस  देण्यात  आले. यानंतर सकाळी ११ ते ०१ या वेळेत  स्थानिक मान्यवरांकडून शालेय गुणवत्ता तपासली गेली असून,दुपारच्या भोजनानंतर तालुक्यातील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना आयर्न व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या खाऊ घालण्यात आले.

 केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर येथे जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख ,
तालुक्याचे गट विकास अधिकारी  जी.एल. भोकर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ पत्रकार जयभीम पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  आयएफए गोळ्या  खाऊ घालण्यात आल्या. तर प्राथमिक शाळा रावणगाव येथे जिल्हा परिषद सदस्य रावणगावकर, गटशिक्षणाधिकारी डॉक्टर डी एस मठपती मौजे भोसी येथे जि.प.सदस्य प्रकाश पाटील भोसीकर, तर रायखोड येथील प्राथमिक शाळेत पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बिल्लेवाड, शिक्षण विस्ताराधिकारी एम.जी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना आयएफए  गोळ्या खाऊ घातल्या. मौजे दिवशी येथे राजा खंडेराय यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिड चे डोस देण्यात आले. तालुक्यातील सर्व गावात स्थानिक लोकप्रतिनिधीकडून गोळ्याचे वाटप करण्यात आले.




 नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, निरंतर शिक्षण विभागाचे दिलीप बनसोडे यांनी या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील काही शाळांना भेटी देऊन, सायंकाळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला.

 गटशिक्षणाधिकारी  डॉ.डी.एस.मठपती, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दहिफळे व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात राबविण्यात यावा यासाठी ग्रामपातळीवरील  अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, शिक्षक,मुख्याध्यापक, आशा वर्कर, एनआरएचएम अंतर्गत काम करणारे कर्मचारी आदी  यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करून सदरील उपक्रम यशस्वी केला.

Sunday, November 24, 2019

आयएफए गोळ्या वाटपासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

 आयएफए गोळ्या वाटपासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज




 भोकर( एजास कुरेशी)
  तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी  सशक्त विद्यार्थी अभियान या उपक्रमांतर्गत,तालुक्यात दिनांक 25 नोव्हेंबर  रोजी  एकाच दिवशी स्थानिक पातळीवरील मान्यवरांच्या हस्ते , आयर्न व फॉलिक ऍसिडच्या' गोळ्याचे वाटप केले जाणार आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मा.अशोक काकडे हे जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. याच धर्तीवर अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून  शहरासह प्रत्येक गाव,वाडी,तांड्यावरील सुमारे 125 शाळेतील व अंगनवाडीतील  विद्यार्थ्यांना, मा लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 'आयएफए' गोळ्या खाऊ  घातले जाणार आहेत. यासाठी आरोग्य ,महिला बालविकास  व शिक्षण विभागाकडून याची योग्य ती तयारी करण्यात आली आहे.
सदर उपक्रमांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत गोळ्या वाटपाचे अंगणवाडीत कार्यक्रम घेतले जाणार असून ११ ते ०१ या वेळेत  मान्यवरांकडून शालेय गुणवत्ता तपासले जाणार असून,दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थ्यांना गोळ्या वाटप करण्याचे  नियोजन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुक्याचे गट विकास अधिकारी  जी.एल.रामोड गटशिक्षणाधिकारी  डॉ.डी.एस.मठपती, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दहिफळे व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन महिन्यापासून  शाळास्तरावर लोह व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घातले जात आहेत. दरम्यान सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम  लोकचळवळ म्हणून समोर यावी यासाठी एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात स्थानिक पातळीवरील सरपंच,पोलीस पाटील, साहित्यिक,यशस्वी उद्योजक ,शेतकरी, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या  हस्ते आयएफए गोळ्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.  अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही आयएफए गोळ्या दिल्या जाणार असून.. सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम लोक चळवळ म्हणून उभे राहावी यासाठी ग्रामपातळीवरील  अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, शिक्षक,मुख्याध्यापक, आशा वर्कर, एनआरएचएम अंतर्गत काम करणारे कर्मचारी आदी सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर पूर्वतयारी  करत असताना दिसून येत आहेत.

Tuesday, November 12, 2019

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू

महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू..!!


राज्यपालांच्या आदेशाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क:-
 महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षात राज्यात राष्ट्रपती लागू करण्याचे आदेश राष्ट्रपतींकडून देण्यात आलेत राष्ट्रपतींच्या आदेशानंतर ही घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्राच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येतेय.

दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली होती शरद पवार व राष्ट्रवादी....

महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिले दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे.१९८० आणि २०१४ मध्ये महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं होतं.१९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार होतं.हे सरकार बरखास्त करून तेव्हा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या.त्यामुळे १७ फेब्रुवारी ते ९ जून १९७८ या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.त्यानंतर २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपतीखाली गेलं.ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती.राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
 धक्कादायक म्हणजे, सोमवारी सायंकाळी खुद्द राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बोलावून मंगळवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याची मुदत दिल्याचं सांगितलं होतं. मात्र, आज सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी राज्यपालांना फोन करून सत्तेचा दावा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणारं पत्रं धाडलं होतं. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केल्याची माहिती राजभवनानं दिलीय. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार अहवाल सादर करण्यात आला होता. याबद्दल खुद्द राज्यपालांनी ट्विटरद्वारे माहिती दिली होती.

Monday, November 11, 2019

ना उद्धव.. ना फडणवीस… ‘पॉवर’ केवळ पवारांचीच

ना उद्धव.. ना फडणवीस… ‘पॉवर’ केवळ पवारांचीच




विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १८ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच आता शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेच्या हलचाली सुरु केल्या आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळेच राज्यातील घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. म्हणूनच देशभरामध्ये शरद पवार यांच्यासंदर्भात होणाऱ्या सर्चचे प्रमाण वाढल्याचे गुगल ट्रेण्डवर दिसत आहे. विशेष म्हणजे राज्याने युतीच्या बाजून जनमत देऊनही युतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा पवारांबद्दल सर्च होण्याचे प्रमाण जास्त आहे.
गुगल ट्रेण्डवरील आकडेवारीकडे पाहिल्यास भाजपाने सत्ता स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर रविवारी रात्री शरद पवार यांच्या नावाने गुगल सर्च होण्याचे प्रमाण वाढले. रात्री आठपासून पवार यांच्या नावाबद्दल सर्चमध्ये अचानक वाढ झाली. तेव्हापासून गुगल ट्रेण्डच्या सर्च टॉपिकमध्ये शरद पवार (Sharad Pawar) ही टर्म उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोन्ही टर्मपेक्षा अधिक प्रमाणात सर्च झाली आहे. भाजपाने नकार दिल्यापासून पवारांचे नाव सर्च होण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी दुपारीही तिन्ही टर्मचा एकंदरित विचार केल्या पवार यांचे नाव हे पहिल्या क्रमांकावर उद्धव दुसऱ्या तर फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Friday, November 8, 2019

सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहुं गावात शांतता ठेऊ न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू-भोकर शांतता कमेटी

सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहुं गावात शांतता ठेऊ न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करू-भोकर शांतता कमेटी



भोकर :(एजास कुरेशी )
अयोध्येतील रामजन्मभूमी, बाबरी मशिद प्रकरणी लवकरच न्यायायलायकडून निकाल दिला जाणार आहे. हा निकाल कोणत्याही बाजूने लागू शकतो त्यामुळे निकालानंतर अती उत्साही होवून जल्लोषात फटाके फोडणे, डिजे लावणे, मिरवणूक काढणे, किंवा निकालाबाबत निषेध करणे या बाबी अयोग्य आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोशल मीडियावर निकालासंबंधी कोणत्याही पोस्ट अथवा चर्चा करू नये, अथवा एखादी पोस्ट त्या प्रकारची आढळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भोकर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थता अबाधित राहण्यासाठी घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत न्यायालयालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचे स्वागत करण्याचे ठरले आहे.



आज दि,8 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठीस तहसीलदार भरत सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री, मुदिराज, जेष्ठ पोलिस निरीक्षक विकास पाटील, पंचायत समीतीचे सभापती राठोड, माजी नगराध्यक्ष विनोद पा. चिंचाळकर, माजी नगराध्यक्ष सोमेवाड, माजी उपनगराध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, पत्रकार उत्तम बाबळे, शिवाजी पाटील किन्हाळकर, सुभाष पा.किन्हाळकर, हमीदखान पठाण, बाबूभाई, तामसेकर, व्यंकट माने, मिर्झा ताहेरबेग, बाबाखान पठाण, मौलाना मोबिन ईनामदार,तोफिक इनामदार,संतोष मारकवर, माळेबाई, नरतावारबाई, गणपत पीठेवाड, संतोष मारकवार, यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. सर्वांनी प्रशाषणास सहकार्य करण्याचे व तालुक्यात शांतता ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनावश्यक लिखान करून वाद निर्माण करणाऱ्या टवाळखोरांवरही पोलिसांची करडी नजर राहणार असून,शोषल मीडियावरील व्हाट्सऑप,फेसबुक, यासारख्या अनेक ऑप वर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व अशी पोष्ट लाईक आणि शेर करणाऱ्यारही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असल्याची माहिती आज दिली आहे, त्यामुळे सर्वांनी मंदिर मस्जिद बाबद लिखाण करणे टाळून प्रशाषणास सहकार्य करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. तर पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी म्हटले आहे की, शहरात विनापरवाना बॅनर बाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे, मिरवणूक काढणे, मोठा जमाव जमवणे, अश्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कार्यवाही टाळण्यासाठी सर्वांनी शासनाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.

व्हाट्सअपच्या ग्रुप ऑडमिनला नोटीस

व्हाट्सअपच्या ग्रुप ऑडमिनला नोटीस






नांदेड:- एजास कुरेशी
आगामी काळात सण व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, यांची प्रमुख उपस्थिती होती
 आगामी कालावधीत बाबरी, अयोध्या राम मंदिराच्या निकालाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी या अनुषंगाने विविध व्हाट्सअप ग्रुपच्या एडमिनला पोलिसांनी नोटीस बजावत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ क्लिप,जातीत तेड निर्माण करणारे मजकूर, प्रसार होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत पोलीस प्रशासनाने कलम 149 सीआरपीसी प्रमाणे या नोटीस बजावल्या आहेत त्याचवेळी ग्रुप ॲडमिन ने सेटिंग बदलून ग्रुपमध्ये ॲडमिन मेसेज करू शकेल अशी व्यवस्था करावी अशी सूचना केली आहे त्याच वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

Wednesday, November 6, 2019

इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाची परीक्षा शुल्क माफ करा :- संदीप पवार निवघेकर

इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाची परीक्षा शुल्क माफ करा :- संदीप पवार निवघेकर




नांदेड प्रतिनिधी:-एजास कुरेशी
कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सर्वत्र झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची शंभर टक्के नासाडी झाली आहे महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांवर आस्मानी व सुलतानी संकट कोसळले आहे.या ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे
या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यावर मोठा आघात केल्याने झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा खचून गेला आहे. शेतातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, हळद ही सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे
त्यामुळेच शिक्षण विभागाने राज्यातील इ.१० वी व इ.१२ वी बोर्डाचे परीक्षा शुल्क माफ करावे .या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदवीधर संघाचे मुदखेड तालूकाध्यक्ष .प्रा.संदिप पवार निवघेकर यांच्याकडून नायब तहसिलदार नागमवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालूका अध्यक्ष मा.शिवानंद शिप्परकर उपस्थित होते.

नांदेड येथील तरुण कामगाराने एकतर्फी प्रेमात घेतला गळफास एकाच कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेच्या एकतर्फी प्रेमात होता,

नांदेड येथील तरुण कामगाराने एकतर्फी प्रेमात घेतला गळफास
एकाच कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेच्या एकतर्फी प्रेमात होता,





विशेष प्रतिनिधी:-
 वाळूज एमआयडीसी येथील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सत्यपाल सावते (31) असे या कामगाराचे नाव होते. पांडुरंग हाउसिंग सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या घरातच सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. तसेच प्राथमिक तपासात त्याच्या आत्महत्येचे कारण देखील पोलिसांना सापडले आहे.

विविहेतेच्या एकतर्फी प्रेमात होता सत्यपाल
सत्यपाल सावते आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेच्या प्रेमात पडला होता. ती महिला विवाहित होती, तसेच सत्यपालचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. आपली प्रेम कहाणी अपुरीच राहणार या नैराश्यात तो होता. त्याच नैराश्यात सत्यपालने टोकाचे पाउल उचलले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना सत्यपालच्या खिशातून एक सुसाइड नोट देखील सापडले आहे. त्यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येचे कारण लिहिले आहे.

दोन मुलांचा बाप होता सत्यपाल, पत्नी माहेरी असताना टोकाचे पाउल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यपाल विवाहित होता. तसेच त्याला आपल्या पत्नीकडून दोन मुले देखील आहेत. सत्यपालची पत्नी आपल्या मुलांसोबत दिवाळी सुट्यांच्या निमित्ताने मूळ गावी नांदेडला गेली होती. याच दरम्यान एकटे असताना सत्यपालने गळफास घेतला. प्राथमिक तपासानुसार, त्याने रविवारी रात्रीच आत्महत्या केली होती. तर सोमवारी रात्री उशीरा हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

नांदेड : काळजी करु नका विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे : उद्धव ठाकरे

नांदेड : काळजी करु नका विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे : उद्धव ठाकरे








नांदेड : ‘काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय हे माहीत आहे’, असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. अवकाळी पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल आहे.

शेतकऱ्यांनी रडायचं नाही तर लढायचं अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडच्या लोहा तालुक्यातील जाणापुरी इथून उद्धव ठाकरेंच्या नुकसान पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरेही होते हेक्टरी 25 हजाराच्या मदतीची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी पीकविमा आणि नुकसानभरपाई केंद्र उभारण्याचे आदेश उद्धव यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.


 "काळजी करु नका मला विमा कंपन्यांचं ऑफिस कुठेय माहीत आहे" उद्धव ठाकरेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद



ख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी असून, प्रति हेक्टर 25 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तसेचं तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई मदत केंद्र उभारणार आहे. तसे आदेशही शिवसैनिकांना देण्यात आले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 17 जुलैला शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात धडक मोर्चा काढला होता. वांद्र्यातील बीकेसी मैदानावर हा मोर्चा धडकला होता. यावेळी त्यांनी ज्यातील खासगी विमा कंपन्यांना 15 दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळवून द्यावाच लागेल, असा इशारा   राज्यातील सर्वच खासगी विमा कंपन्यांना दिला होता.



 सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला काय करावं लागेल? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने कशी असेल सत्ता?

Monday, November 4, 2019

अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत करणार- खासदार प्रताप पाटील चिखलीकर

अतिवृष्टीने बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना शासन आर्थिक मदत करणार- खासदार प्रताप पाटील चिखलीकर.




भोकर प्रतिनिधी:- एजास कुरेशी
कधी नव्हे एवढी अतिवृष्टी सर्वत्र झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची शंभर टक्के नासाडी झाली आहे. तेंव्हा सर्व शेतकर्‍यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत त्वरित मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असा आत्मविश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तालुक्यातील हाळदा येथे अतिवृष्टी बाधित पिकांची बांधावर जाऊन पाहणी करताना शेतकऱ्यांना दिला.



त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, उपजिल्हाधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, कृषी अधिकारी विठ्ठल गीते आदींची उपस्थिती होती.
   पुढे बोलताना शेतकऱ्यांना ते म्हणाले की या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यावर मोठा आघात केल्याने झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा खचून गेला आहे. शेतातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, हळद ही सर्वच पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे. परंतु शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. सर्व शेतकऱ्यांना येत्या दोन-तीन दिवसात आर्थिक मदत मिळणार आहे.
  माननीय मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटींची तातडीची मदत शेतकऱ्यासाठी जाहीर केली आहे. ते कमी पडली तर अजून केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वाढून मदत देणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी खचून न जाता येणाऱ्या संकटाला धैर्याने तोंड द्यावे. आमचे सरकार आपल्या पाठीमागे खंबीरपणे मदतीसाठी तयार आहे असे अभिवचन दिले.



   शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा काढलेल्या विम्याचीची झेरॉक्स प्रत व पिक नुकसानीचा अर्ज गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना द्यावा. त्यासाठी कोणत्याही कार्यालयात खेटे मारू नये. सर्व कर्मचारी आपल्या गावात येऊन आपले पीक नुकसानीच्या अर्ज स्वीकारतील. असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले व संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केल्या.
   यावेळी भोकर चे गटविकास अधिकारी रामोड, कृषी सहाय्यक, मंडळाधिकारी, तलाठी यांच्यासह गणपतराव पिटेवाड दिलीप सोनटकके संतोष मारकवार बाळासाहेब साखळकर गणेशराव कापसे  गावातील शेतकरी दत्तराव आक्कलवाड, साईनाथ याटेवाड, बालाजी नार्लेवाड, बाबुराव नागमोड, सुरेश भोसले, श्याम खांडरे, चंद्रकांत नागमोड, संतोष बोईनवाड, संदीप किसवे, आनंद हेमके, गोविंद पन्नसवाड, बालाजी परेवार, पुंडलिक खांडरे, गंगाधर आक्कलवाड, सोपान सुकलवाड, शिवाजी भोसले, आदीसह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Sunday, November 3, 2019

*दिवाळी सुट्टीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग*

दिवाळी सुट्टीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास वर्ग





 भोकर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांत दिवाळीच्या सुट्टीत,दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जादाचे तासिका वर्ग घेऊन निकाल वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत..

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित केले असून गुणवत्तेत सुधारणा झाली पाहिजे यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन ते राबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक बालकास दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे  असा त्यांचा मानस आहे.

भोकर तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हाती घेतलेले, एक मूल एक वृक्ष, वाचनासाठी एक तास, सशक्त बालक अभियान, असे विविध उपक्रम येथील गट शिक्षणाधिकारी डॉ . डी एस मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून  शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .

दरम्यान दिवाळी सुट्टीचा सदुपयोग व्हावा, यातून जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि सोबतच निकालाचे प्रमाण वाढावे म्हणून जादा तासिका घेउन शिक्षकाकडून अध्यापन केले जात आहे. जिल्हा परिषद हायस्कूल मातुळ येथे  दिनांक 1 नोव्हेंबर 2019 पासून अध्यापन कार्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमास विद्यार्थ्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असून पालक गावकरी आदीसह सर्वस्तरातून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात बदलाचे वारे वाहत असल्याने शिक्षण प्रेमी नागरिकाकडून शिक्षण विभागाचे कौतुक होत आहे..

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...