Monday, November 25, 2019

भोकर तालुक्यात सशक्त अभियानास उदंड प्रतिसादत

भोकर तालुक्यात सशक्त अभियानास उदंड प्रतिसाद





 भोकर(एजास कुरेशी)
तालुक्यात  विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी  सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आज( दि. 25 ) घेण्यात आलेल्या 'आयएफए' गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणेसाठी विविध उपक्रम हाती घेतले असून याच धर्तीवर अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शहरासह प्रत्येक गाव,वाडी,तांड्यावरील सुमारे 125 शाळेसह प्रत्येक अंगणवाडीतील  विद्यार्थ्यांना,  लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 'आयएफए' गोळ्या खाऊ घालण्यात आले आहेत.




सदर उपक्रमांमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत अंगणवाडी मधील बालकांना शिरपचे डोस  देण्यात  आले. यानंतर सकाळी ११ ते ०१ या वेळेत  स्थानिक मान्यवरांकडून शालेय गुणवत्ता तपासली गेली असून,दुपारच्या भोजनानंतर तालुक्यातील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना आयर्न व फॉलिक ऍसिडच्या गोळ्या खाऊ घालण्यात आले.

 केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर येथे जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख ,
तालुक्याचे गट विकास अधिकारी  जी.एल. भोकर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ पत्रकार जयभीम पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  आयएफए गोळ्या  खाऊ घालण्यात आल्या. तर प्राथमिक शाळा रावणगाव येथे जिल्हा परिषद सदस्य रावणगावकर, गटशिक्षणाधिकारी डॉक्टर डी एस मठपती मौजे भोसी येथे जि.प.सदस्य प्रकाश पाटील भोसीकर, तर रायखोड येथील प्राथमिक शाळेत पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बिल्लेवाड, शिक्षण विस्ताराधिकारी एम.जी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना आयएफए  गोळ्या खाऊ घातल्या. मौजे दिवशी येथे राजा खंडेराय यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिड चे डोस देण्यात आले. तालुक्यातील सर्व गावात स्थानिक लोकप्रतिनिधीकडून गोळ्याचे वाटप करण्यात आले.




 नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, निरंतर शिक्षण विभागाचे दिलीप बनसोडे यांनी या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील काही शाळांना भेटी देऊन, सायंकाळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला.

 गटशिक्षणाधिकारी  डॉ.डी.एस.मठपती, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दहिफळे व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सशक्त विद्यार्थी अभियान हा उपक्रम एकाच दिवशी संपूर्ण तालुक्यात राबविण्यात यावा यासाठी ग्रामपातळीवरील  अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,आरोग्य सेवक, शिक्षक,मुख्याध्यापक, आशा वर्कर, एनआरएचएम अंतर्गत काम करणारे कर्मचारी आदी  यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करून सदरील उपक्रम यशस्वी केला.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...