Thursday, February 28, 2019

मतदार नोंदणीसाठी २ व ३ मार्चला ८५-भोकर विधानसभा मतदार संघात विशेष मोहीम राबवणार :उपविभागीय अधिकारी पवन चांडक

मतदार नोंदणीसाठी २ व ३ मार्चला ८५-भोकर विधानसभा मतदार संघात विशेष मोहीम राबवणार :उपविभागीय अधिकारी 
 पवन चांडक


नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी


भोकर (एजास कुरेशी)
भोकर दि. 28 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या ८५-भोकर विधानसभा मतदार संघात नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार २ व रविवार दि. ३ मार्च २०१९ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे,अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांनी दिली आहे.

 दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने नुकतीच दि. २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सर्व अर्ज उपलब्ध

या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.

वेबसाईट व टोल फ्री क्रमांक

मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीwww.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राजकीय पक्षांनाही विनंती

या कार्यक्रमाची माहिती सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय सहाय्यकाची (बीएलए) नेमणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंती देखील राजकीय पक्षांना करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक-२०१९ करिता नव मतदारांना शेवटची संधी आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेचा नव मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करुन घ्यावे...असेही आव्हान पवन चांडक (मतदार नोंदणी अधिकारी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोकर यांनी केले आहे.

बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात प्रमाणपत्र नोंदणी कार्यक्रम संपन्न

बिलोली येथील ग्रामीण  रुग्णालयात प्रमाणपत्र नोंदणी कार्यक्रम संपन्न 






बिलोली प्रतिनिधी (ए. जी.कुरेशी)
  दिव्यांग व्यक्ती अस्मिता  अभियान
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड च्या वतीने श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय नांदेड व पंचायत समिती बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरा अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना (UDID)
प्रमाणपत्र नोंदणी कार्यक्रम ग्रामीण  रुग्णालय बिलोली येथे संपन्न झाला
कार्यक्रमाची सुरुवात करण्याअगोदर पुलवामा येथे शहिद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली
सदर कार्यक्रम मध्ये तालुका समतादुत शेख इर्शाद मौलाना यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,अपंग व्यक्तींना कागदपत्राची एका पेक्षा जास्त प्रतिलिपी तयार करणे ,राखून ठेवणे आणि एका पेक्षा जास्त कागदपत्रे घेण्याची आवश्यकता नाही कारण वाचकांच्या मदतीने कार्ड डिकोड केले जाऊ शकणारे सर्व आवश्यक तपशील कॕप्चर करेल .यूडीआयडी कार्ड भविष्यातील विविध फायदे मिळविण्यासाठी ओळख पटवण्याच्या एकमेव दस्तऐवज .
अपंगाचे सत्यापन असलेले यूडिआयडी कार्ड अमलबजावणीच्या सर्व स्तरावर लाभार्थींच्या शारिरीक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यास मदत करेल .यासाठी सर्व बिलोली तालुक्यातील अपंग बांधवांनी याचा लाभ घ्यावा .



सदर कार्यक्रम चे तालुका समन्वयक सय्यद एल.एच.(मु.अ.)मूकबधिर विद्यालय बिलोली व समाज कल्याण विभाग जि.प.नांदेड चे वेलूरकर धनंजय , नामदेव वाघमारे, दिपक कदम यांनी काम पाहिले .व .बजाज (सहाय्यक गट विकास अधिकारी बिलोली )  डाॕ.तोटावार (ग्रामीण रुग्णालयाचे प्रतिनिधी ) तसेच मूकबधिर विद्यालयाचे सहशिक्षक आनंद पाटील बिराजदार ,शिवाजी माने ,रमेश हंबर्डे बालाजी ठक्करवाड , आनंदा अस्थिव्यंग शाळेचे मु.अ. कांबळे व मतिमंद शाळेचे मु.अ. भागेपल्ले यांनी या कार्यक्रम मध्ये नोंदणी करण्याचे व कागदपत्रे पडताळणीचे काम पाहिले व या कामासाठी एकूण ०४ टेबल लावण्यातआले ०१) मूकबधिर ०२)अस्थिव्यंग ०३)मतिमंद ०४)अंध अशी व्यवस्था करण्यात आली
सदर कार्यक्रम साठी पंचायत समिती बिलोली चे सभापती दत्तराम बोधने यांनी सहकार्य केले तसेच सदर कार्यक्रम साठी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंचनवार यांनी सर्व दिव्यांगासाठी  अल्पोपहार (नाश्ता)दिले तसेच अपंग संघटनेचे बिलोली तालुकाध्यक्ष  सागर नरोड व सामाजिक कार्येकर्ते  शाहेद पटेल यांनी सर्व दिव्यांगाना कागदपत्र विषयी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रम चे सूत्रसंचलन  शिवाजी माने यांनी तर आभार आनंद बिराजदार यांनी मानले

पाकच्या छळाला 'अभिनंदनने' धैर्याने तोंड दिेले

पाकच्या छळाला 'अभिनंदनने' धैर्याने तोंड दिेले




विशेष प्रतिनिधी
पाकिस्तानी सैनिकांनी जबर मारहाण केली, हात बांधून ,डोळ्यावर पट्टी बांधून व्हिडिओमध्ये बोलायला भाग पाडले. प्रचंड मानसिक छळ केला. पण या सगळ्या भयानक वागणुकीचा अभिनंदनवर अजिबात परिणाम झाला नाही. अत्यंत धैर्याचा आणि ऑफिसरच्या शालीनतेचा परिचय अभिनंदन याने दिला आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी जबर मारहाण केली, हात बांधून ,डोळ्यावर पट्टी बांधून व्हिडिओमध्ये बोलायला भाग पाडले. प्रचंड मानसिक छळ केला. पण या सगळ्या भयानक वागणुकीचा अभिनंदनवर अजिबात परिणाम झाला नाही. अत्यंत धैर्याचा आणि ऑफिसरच्या शालीनतेचा परिचय अभिनंदन याने दिला आहे.

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केल्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानी विमानं भारताच्या हद्दीत घुसून आली. या विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. पण या दरम्यान दोन भारतीय मिग -२१ त्यांचा पाठलाग करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली. त्यातील एक विमान भारतीय सीमेत कोसळलं तर दुसरं विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं. दुसऱ्या विमानातील पायलट विंग कमांडर अभिनंदनवर्तमानला पाकिस्तानी सैनिकांनी पकडले. अभिनंदनला पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर त्याचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हे व्हिडिओ जीओ टीव्ही या पाकिस्तानातील बातम्यांच्या वाहिनीने ही प्रसारित केले. विंग कमांडर अभिनंदन याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला एका झऱ्याच्या काठी पाकिस्तानी सैनिक मारहाण करत आहेत असा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ पाकिस्तानी जनतेला खुश करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आला.
त्यानंतर प्रदर्शित करण्यात आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचे हात पाठीमागे बांधले होते. त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. मारून मारून त्याचे नाकही फोडले गेले होते. या व्हिडिओत तो त्याचं नाव आणि धर्म हिंदू असल्याचं सांगत होता. या व्हिडिओवर भारतातून भरपूर टीका करण्यात आली तर पाकिस्तानात या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. भारतीय नेत्यांनी यावर टीका केली. तसंच भारत याविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात जाऊ शकतो असा इशाराही भारताने दिला. त्यानंतर पाकिस्तान हे एक सन्मानीय राष्ट्र असून युद्धकैद्यांना अत्यंत चांगली वागणूक देतो हे दाखवण्यासाठी अभिनंदनचा अजून एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला. या व्हिडिओत अभिनंदन एका मेजरशी बोलत होता. त्याचप्रमाणे त्याच्या हातात एक चहाचा कपही होता. त्याच्याशी अत्यंत सन्मानाने पाकिस्तानी ऑफिसर वागत होता. त्याला कशी वागणूक दिली जाते आहे हे विचारण्यात आलं.तसंच चहा कसा आहे हेही विचारण्यात आलं .तो कुठला आहे, त्याचं मिशन याबद्दल त्याला प्रश्न विचारले असता त्याने उत्तर देण्यास नकार दिला.











तिन्ही व्हिडिओमधून अभिनंदन परिस्थितीला अत्यंत धैर्याने तोंड देत आहे हे स्पष्ट झालं आहे. त्याबद्दल संपूर्ण देशभर त्याचं कौतुक केलं जातं आहे. 

मातृभाषेचे ञुण आपल्याला कधी ही फेडता येणार नाही.:प्रा. डॉ. गोपाळ चौधरी.

मातृभाषेचे ञुण आपल्याला  कधी ही फेडता येणार नाही.:प्रा. डॉ. गोपाळ चौधरी.




बिलोली प्रतिनिधी( ए. जी.कुरेशी)
  दि.२७ फेब्रुवारी रोजी बिलोली येथिल बस आगारात  जागतिक मराठी भाषा    गौरव दिन  साजरा  करण्यात आला.
येथील  कर्तव्यदक्ष आगार प्रमुख संजय वाळवे आणी  बस डेपो चे कर्मचारी कामगारानी  मराठी भाषा दिन साजरा करण्याची  सजावट व्यवस्था केली होती.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन पानसरे महाविध्यालयाचे  प्रा. डॉ. गोपाळ चौधरी यांना निंमत्रीत करण्यात आले.
मराठी भाषा गौरव दिनाचे भित्ती पत्रक  प्रा. चौधरी याच्या  हस्ते प्रसिध्द करण्यात आले.
प्रा. चौधरी मराठी भाषा  टिकवुन ठेवणे का अवश्यक आहे. या बद्धल आपल्या भाषणातुन म्हणाले की
मराठी  ही प्राचीन काळातील भाषा आहे. अनेक  शतकापासुन  सतानी मराठी भाषेला  वैभव सम्पन्न केले. ..माझ्या मराठीचे बोल., तितके अमृतातेही पैजा जीन्के,, असे  मराठी भाषेचे ज्ञानेश्वरानी वर्णन केले.
संत एकनाथ , तुकाराम महाराज ,छ. शिवाजी महाराजानी मराठी भाषेला वैभव वाढविला.
डॉ.चौधरी पुढे म्हणाले की  पेशव्यानी मराठी भाषेला आष्श्रय दिला.











डॉ. चौधरीनी यावेळी  कवि बहीणाबाई , कवि कुसुमागृज  करन्दिकराच्या कवितेचे सुन्दर गायन केले.

इंग्रजी भाषेमुळे मराठी ची गळचेपी होत आहे. मराठी भाषेचे प्रभुत्व  वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहीजे  सर्व व्यवहार परिपत्रके न्यायालयीन निर्णय मराठीत करणे अवश्यक आहे. असे  चौधरी म्हणाले.
सजय वाळवे यानी समारोप केला. सुत्रसचालन व आभार  एच. बी. त्रीपाठी यांनी केले.कार्यक्रमास  नागरीक  पत्रकार सह आगाराचे कर्मचारी उपस्थित होते.

आमदार सुभाषराव साबनेच्या प्रयत्नाने अखेर लोहगाव महसुल मंडळात दुष्काळ जाहिर, शासनाने केला दुष्काळ यादीत समावेश

आमदार सुभाषराव साबनेच्या प्रयत्नाने अखेर लोहगाव महसुल मंडळात दुष्काळ जाहिर, शासनाने केला दुष्काळ यादीत समावेश






       बिलोली:- देगलुर-बिलोली मतदारसंघातील एकमेव दुष्काळ यादीत समावेशा पासुन वंचित असलेल्या व् सरासरीने जास्तीचा पाऊस झाला त्यामुळे दुष्काळ जाहिर न झालेल्या लोहगाव महसुल मंडळाचे आमदार सुभाषराव साबनेच्या प्रयत्नाने अखेर दुष्काळ यादीत समावेश झाला असून शासनाने लोहगाव मंडळात दुष्काळ जाहिर केला आहे.              देगलुर तालुक्याचा शासनाने घोषित केलेल्या तिव्र दुष्काळ यादीत समावेश केला त्यावेळी जिल्ह्यातील केवळ तिनच तालुके त्यात होते.बिलोली तालुका फिगर 1 मध्ये येत असल्याने वगळंन्यात आले होते.आमदार साबने साहेबांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करुण बिलोली तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी असल्याचे निदर्शनास आणून दिले.त्यानंतर नामदार महादेव जानकर व पालकमंत्री ना. रामदास कदम यांना बिलोली तालुक्यात आणून पिक परिस्तिथी व शेतकर्यांची भावना त्यांना दाखवुन दिली.त्यानंतर राज्य शासनाने १९१महसुल मंडळात दुष्काळ जाहिर केला त्यात बिलोली तालुक्यातील बिलोली,कुंडलवाडी, आरळी, सगरोळी या चार महसुल मंडळाचा समावेश करण्यात आला.     परंतु लोहगाव महसुल मंडळात सरासरिच्या जास्त पाऊस झाल्याचे कारण पुढे करुण मंडलातील १८ गावांना वगळन्यात आले होते.त्यानंतर आ.साबने यांनी पुन्हा पाठपुरावा करुण सरासरिच्या अधिक झालेला पाऊस हा ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ७७ मी. मी. एवढा पाऊस झाल्याने लोहगाव महसुल मंडळात ७८.६१टक्के पर्जन्यमान झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.त्यांच्या प्रयत्नाने अखेर शासनाने लोहगाव महसुल मंडळ व त्यातील १८ गावांत दुष्काळ जाहिर केला आहे.आमदार सुभाषराव साबने साहेबांच्या प्रयत्नाने आता संपूर्ण मतदार संघात दुष्काळ घोषित झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

Wednesday, February 27, 2019

दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरं हाय अलर्टवर.

दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरं हाय अलर्टवर


                 File photos (2)

भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईक करून पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचा दावा कऱण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 72 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असं सांगण्यात आलं आहे. ज्यानंतर हा हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून आलेली धमकी हेच यामागचं कारण नाही तर काश्मीर खोऱ्यात इतर काही दहशतवादी आहेत जे कोणत्याही हल्ल्यासाठी सज्ज असू शकतात. त्या पार्श्वभूमीवर हा हाय अलर्ट देण्यात आला आहे. 
पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सैन्यदलाचे तळ, शस्त्रे यांवर विशेष नजर ठेवली जाते आहे. दहशतवाद विरोधी कारवाईसाठी सज्ज असलेली पथकंही शहरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत अशीही माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते सुरक्षेबाबत काय तयारी झाली आहे, समजा एखादा हल्ला झाला तर काय करता येईल यासंदर्भातली चर्चा होणार आहे.मात्र दहशतवाद्यांनी काही केले तर त्याला सामोरे कसे जायचे याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. 14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात भारतीय लष्कराचे चाळीस जवान शहीद झाले. याच हल्ल्याचा बदला भारताने एअर स्ट्राइक करून घेतला. मात्र त्यानंतर भारताने पाचशहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताने पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा देशाच्या नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकार घडू नयेत म्हणून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानवरील भारतांकडुन झालेल्या हल्ल्याचा बिलोलीत आनंदोत्सव

पाकिस्तानवरील भारतांकडुन झालेल्या हल्ल्याचा बिलोलीत आनंदोत्सव




 बिलोली( ए.जी.कुरेशी )
दि.१४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान धार्जीण्या दहशतवाद्यांनी सी.आर.पी.एफ. च्या भारतीय जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. तेव्हापासूनच संपूर्ण भारतीयांच्या मणात पाकिस्तान विरोधात आक्रोष खदखदत असताना दि.२६ च्या पहाटे भारतीय वायू सेनेच्या जवानांनी पाकिस्तान मधील दहशतवाद्याच्या स्थळांवर हवाई हल्ला करून मोठे तडाकेबाज प्रतिउत्तर दिले.या हल्याची बातमी समजताच बिलोली शहरात अगदी सकाळ पासून शहरात जणू  दिपावलीच साजरी करण्यात आली.सायंकाळी ६ च्या दरम्यान शहरातील बहुसंख्य नागरिक एका ठिकाणी जमून फटाके फोडीत पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणेने शहर दणानून सोडले.
यावेळी प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते साईनाथ आरगुलवार जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,डॉ. भिमराव अंकोशकर, आनंद पा.बिराजदार,शांतेश्वर पाटील,उमाकांत गोपछडे,वलियोद्दिन फारुखी,राष्ट्रवादीचे मुन्ना पोवाडे,दिलीप उत्तरवाड,शंकर मावलगे,डाँ.दत्ताञय बेटमोगरेकर,नागनाथ पा.माचनुरकर,प्रशांत पांचाळ,गोविंद गुडमलवार,गंगाधर पा.नरवाडे,आबाराव संगनोड,शंकरराव काळे,प्रकाश साखरे,साईनाथ खंडेराय यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
-बिलोली येथील पुस्तक विक्रीतुन डॉ. नितिन जोशी  कडून शहीद कुटुंबीयाना ६० हजार रु. आर्थिक मदत






   बिलोली प्रतिनिधी ए.जी.कुरेशी
कै. अँड.बापुराव बिलोलीकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ आयोजीत बिलोलीत बिलोलीकर परिवारा कडून आपलं पोट आपल्या हाती  या विषयावर नांदेड येथील प्रसिद्ध पोट विकार तज्ञ डॉ.नितिन जोशी यांच्या व्याख्यानाचा आयोजन करण्यात आले होते व त्यांनी लेखन केलेल्या पुस्तक विक्रीतुन जमा झालेली ५९हजार २०० रु. एकूण रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदती साठी दिले.यामुळे डाँ.जोशी यांचे बिलोली शहरात अभिनंदन करण्यात आले.

बिलोली  येथील जेष्ठ वकील कै. बापुरावजी बिलोलीकर यांच्या पुण्यसमरणार्थ  डाँ.रविंद्र बिलोलीकर व बिलोलीकर  परिवराकडून शनिवारी बिलोलीत आपल पोट आपल्या हाती या विषयावर नांदेड़ चे प्रसिद्ध पोट विकार तज्ञ डॉ. नितिन जोशी यांच्या  व्याख्यानाचा आयोजन  करण्यात आले होते,या कार्यक्रमात डॉ. नितिन जोशी यांनी लिहिलेल्या आपले पोट, आपल्या हाती हे पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.यावेळी डॉ. नितिन जोशी यांनी पुस्तक विक्रीतून जी काही रक्कम गोळा होईल,ती पुलवामा घट नेतील शहीद कुटुंबीयांच्या मदतीसाठी दिली जाणार आहे या पुस्तकाच्या माध्यमातून शहिद कुटुंबाना आर्थिक मदत होईल या उद्देशाने बिलोली शहरातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद देत पुस्तक विक्रीतून २९ हजार ५०० रुपये जमा झाले होते.पुस्तक विक्रीतून जमा झालेल्या रक्कमेशिवाय तेवढीच रक्कम आपल्या खिशातील  टाकत डॉ. नितिन जोशी यांनी एकूण ५९ हजार २०० रुपये रक्कम पुलवामा येथील शहीद जवानांचा कुटुंबासाठीची आर्थिक रक्कम केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने शहीदांच्या मदतीसाठी काढलेल्या "भारत के वीर"या खात्यावर जमा केली.डॉ. नितिन जोशी यांच्या सारखे वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक कार्य करून वीर जवानांना आर्थिक मदत करणाऱ्या डॉक्टर दांपत्यकडून सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे.व त्यांच सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Tuesday, February 26, 2019

बेटी बचाओ बेटी पढाओ साठी बिलोलीत जनजागरण रैली संपन्न.

बेटी  बचाओ  बेटी पढाओ साठी बिलोलीत जनजागरण रैली संपन्न.






बिलोली. प्रतिनिधी (ए. जी.कुरेशी)

शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ   ही  योजना  अमलात आणण्याचा निर्णय घेतला  असुन त्यासाठी पुरेशा प्रमाणात जनजागरण करण्याची  जवाबदारी  महिला व बाल कल्याण विभागा कडे सोपवली आहे.
त्या अनुषगाने  दि.२६फेब्रुवारी रोज  मंगळवारी आगणवाडी सेविका व मदतनीसाची बैठक व  रैली चे आयोजन करण्यात आले.
बिलोली पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सभापती दत्तराम बोधने तर प्रमुख अतिथि म्हणुन  नायब तहसिलदार  संजय नागमवाड  प.स. सदस्य शकर यन्कम  महीला व बाल विकास अधिकारी सौ.गिरगावकर मॅडम क.अभियन्ता ए.डी .देशमुख आदि उपस्थित होते.
आगनवाडी सेविका  महिलाना   मार्गदर्शनपर भाषणात   देशमुख      म्हाणाले की  हल्ली  महिला वरील अत्याचार वाढले. स्त्रीभृणहत्या  थांबवने  अवश्यक  आहे. महीला व पुरुषाना समान दर्जा मिळाला पाहिजे. कारण पुरुष हा  आई पासुनच जन्म घेतो. महीलाचे व मुलाचे रक्षण करण्याची आपली जवाबदारी आहे.
देशमुख पुढे म्हणाले कि  नोबेल पुरस्कार विजेता   प्रसिध्द लेखक अमर्त्यसेन  म्हणाले की  ५०  लाख .महिला हरवल्या . ते कसे  म्हणजे स्त्रीभृण हत्या  होय. आता महीलाना पुरुषा बरोबर चे अधिकार प्राप्त आहे.
 सभापती दत्तराम बोधने यांनी  समारोप केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरगावकर मॅडम यांनी केले.  त्यानंतर शहरात मुख्य मार्गाने व गल्ली बोळातुन रैली काढुन जनजागृती करण्यात आली.रैली मध्ये मोठ्या सन्खेत अगणवाडी सेविका मदतनिस चा समावेश होता.

चागल्या सवयी जोपासल्याने आरोग्य सदृढ राहते. :डॉ नितिन जोशी


चागल्या सवयी जोपासल्याने आरोग्य सदृढ राहते. :डॉ नितिन जोशी




बिलोली.प्रतिनिधी (ए.जी.कुरेशी)
सध्या मणुष्याची  जिवन शैली बदलली आहे. चागल्या सवयी जोपासल्यास आरोग्य सुध्दा चागले सदृढ राहते. चागल्या विचाराचा चागला परिणाम आरोग्यावर  होतो. आहारावर नियन्त्रण ठेवावे. आहारावर नियत्रण ठेवण्याचा सल्ला प्रसिध्द पोटविकार तज्ञ डॉ.नितिन जोशी यानी दिला आहे.
बिलोली येथिल प्रसिध्द वीधिज्ञ कै. बापुराव बिलोलीकर यांच्या  चौथ्या पुण्यस्मरण दिनानीमित्त आयोजित व्याख्याना मध्ये  शनिवारी डॉ.नितिन जोशी बोलत होते.
यावेळी डॉ.जोशी  पोटाशी सम्बधित  विविध आजारा विषयी घ्यावयाची काळजी वर सविस्तर मार्गदर्शन केले. व तसेच चित्रफित दाखवले.
कार्यक्रमाचे अध्याक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार  सजीव कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ.किशोर पबितवार , माजी आमदार गगाधर पटने  ,डॉ अजित गोपछडे , डॉ नागेश लखमावार , डॉ बि .पी.अन्कुशकर , डॉ.मुकुन्द जोशी , डॉ.पुरुषोत्तम दाढ , धनजय डोईफोडे  ,प्रा. मनोज बोरगावकर , सुशिल राठी, उपाध्यक्ष मारोती पटाईत  ,ऍड. निलकन्ठ कदम , नागेश येरावार, यान्च्यासह प्राचार्य गोविन्द गोपछडे आदि उपस्थित होते.
यावेळी माजी प्राचार्य गोविन्द गोपछडे गोपाल वैश्णव  यांंचा सत्कार करण्यात आला.
कै. बापुराव बिलोलीकर यांंच्या नावाने अर्जापुर महाविध्यालयात नविन उपक्रम सुरु करण्याचा सल्ला गोपछडे यांंनी  दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.रविन्द्र बिलोलीकर ऍड. उल्हास बिलोलीकर . ऍड. आनत बिलोलीकर.  बाबुराव देशमुख . विजय कुचनवार  ,शे.फारुक अहेमद   आदिनी परिश्रम घेतले.. कार्यक्र्माचे सुत्र संचालन व आभार प्रा.गोपाळ चौधरी यानी केले.

Sunday, February 24, 2019

पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ ची भोकरहून बदली

पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ ची भोकरहून बदली





भोकर:-(एजास कुरेशी)
 आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कऱण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ हे भोकर पोलीस निरीक्षक पदभार ऑगस्ट २०१७ पासून स्वीकारला होता तेव्हा ते केवळ १८ महिन्याच्या आतच बदली प्रक्रियेत आल्याने शहरात एक आगळी वेगळी चर्चा सुरू झाली आहे.रामा सदाशिव पडवळ हे पदभार स्वीकारल्या पासून काही महिन्यातच मटका व गुटखा खुलेआम सुरू झाला होता कित्येक वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या होत्या पन काही केल्या मटका व गुटखा गब्बराण्णा  कोणाचाच धाक नव्हता म्हणून काही प्रमाणात  चर्चेला उत आला आहे त्यांची बदली लवकरच होणार असल्याचे देखील चर्चा अधिकारी वर्गात रंगली होती.
   पण ऐन लोकसभेच्या तोंडावर आर एस पडवळ यांची बदली केल्याने भोकर शहरात चर्चेला उत आला आहे कारण अवैध  मटका,अवैध गुटखा यासारखे धंदे थांबवण्यात अपयशी ठरलेले भोकर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची ओळख ठरली आहे ह्या बद्दल पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दखल घेऊन बदली प्रक्रिया केली असावी अशी देखील तूर्तास चर्चा सुरू आहे.
या पोलीस निरीक्षकाची पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे बदली झाली आहे ते लवकरच भोकर येथील पदभार सोडून नांदेड ला रवाना होणार असल्याचे समजले आहे.
येणारे नवीन पोलीस निरीक्षक हे तरी अवैध धंदे ,मटका व गुटखा  बंद करतील का या कडे भोकर शहरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

मुबई -डोंबिवली रनबर्न मॅरेथॉन २०१९ स्पर्धेत ईशान बारसेला यश

मुबई -डोंबिवली रनबर्न मॅरेथॉन २०१९ स्पर्धेत ईशान बारसेला यश

मुबई -डोंबिवली रनबर्न मॅरेथॉन २०१९ स्पर्धेत ईशान बारसेला यश






मुंबई :-(प्रतिनिधी)
दि.२४/०२/२०१९ वार रविवार रोजी नेहरू मैदान डोंबिवली (मुंबई) येथे घेण्यात आलेल्या १ कि.मी.मॅरेथाॅन स्पर्धेत
नांदेड जिल्ह्यातील नागार्जुना पब्लिक स्कुल मध्ये ईयता पहिल्या वर्गात शिकत असलेल्या ईशान हनमंत बारसे ह्या ७ वर्षाच्या बालकाने चौथा क्रमांक मिळवुन नांदेड जिल्हाचे नाव  उंचावल्याबदल नांदेड अॅथलेटीक्स प्रशिक्षक सौ.शिवकांता देशमुख (अँथेलँटीक प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य) यांने ईशान बारसे चे कौतुक केले. तसेच भगवान नागरगोजे,नारायन आनेराव
ह्या अँथेलँटीक प्रशिक्षकांने ईशान बारसे ने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच ईशान हा मुळचा बारसगाव ता.अर्धापुर येथील असल्यामुळे
ह्या यशा बद्दल ईशान बारसे चे अर्धापुर व भोकर तालुक्यातुन प्रतेक क्षेत्रातुन कौतुक व गुणगौरव होत आहे.
       
           या अगोदर सुद्धा त्या ६ वर्षीय ईशान बारसेचा बीड जिल्यात
दि.२२ नोव्हेंबर २०१८ रोजी श्री क्षेत्र कपिलधारच्या पावन भुमित शिवा संघटनेच्या २० व्या राज्यव्यापी मेळाव्यात शिवासंघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रा.मनोहर धोंडे  श्री.मा.ना.महादेव जानकर (पशुसंवर्धन व दुग्दविकासमंत्री,म.रा),श्री.उमाकांतजी शेटे,श्री.विठ्ठलजी ताकबिडे,इंजि.अनिलजी माळगे सर,श्री.विलासजी कापसे,श्री. दिगंबरजी खपाटे यांच्या हस्ते *“शिवा राष्ट्रीय भुषण”-उत्कृष्ट बाल क्रिडा भुषण पुरस्कार* देउन गौरविण्यात आले.
अत्यंत कमी वयात क्रिडा मिळवलेल्या यशा बद्दल नांदेडच्या ईशान बारसेया बाल खेळाडू चे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे.
मुंबई डोंबवली येथे झालेल्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर धावून त्याने शाळेचे,परिवाराचे नाव लौकिक केले ह्या बदल पुढील कामगिरी साठी अनेकांनी फोन द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत

प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनचे उद्घाटन तहसील कार्यालयात संपन्न

प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनचे उद्घाटन तहसील कार्यालयात संपन्न









  भोकर (एजास कुरेशी)
२४-२-२०१९ रोजी भोकर तहसिल कार्यालय,  येथे किसान सन्‍मान योजनेचे उद्घाटन करण्‍यात आले. सदर योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत पात्र अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी खातेदार यांना ऑनलाईन पद्धतीने त्‍यांचे खात्‍यावर पहिला हप्‍ता रू. २०००/- जमा करण्‍यात आला आहे सदर योजनेचे उद्घाटन पंतप्रधान यांचेहस्‍ते गोरखपुर, उत्‍तरप्रदेश येथे करण्‍यात आले. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तहसिल कार्यालयातील बैठक कक्षामध्‍ये दाखविण्‍यात आले होते.
प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी (पि.एम.किसान) योजनेंतर्गत प्रायोगीक तत्‍वावर भोकर तालुक्‍यातील एकुण ३८ शेतकरी खातेदारांना लाभ त्‍यांचे खात्‍यावर सदर योजनेची रक्‍कम रु.२०००/- खात्‍यावर जमा करून करण्‍यात आला. सदरयोजनेंतर्गत मागील काही दिवसांपासून महसूल विभागातील तलाठी यांचेमार्फत रात्रंदिवस काम चालू असून आज पावेतो एकुण १५०७९ खातेदारांपैकी माहिती गोळा करण्‍यात आलेल्‍या १३८२४ खातेदार यांची माहिती शासनाने उपलब्‍ध करून देण्‍यात आलेल्‍या पोर्टलवर उपलब्‍ध करून देण्‍यात आली. त्‍यापैकी आज सदर योजनेचे उद्घाटन हे देशपातळीवर करण्‍यात आले असून सदर योजनेची सुरूवात  पंतप्रधान यांचे हस्‍ते करण्‍यात आलेली आहे.
 त्‍याबाबत महसूल व कृषि विभागामार्फत संयुक्‍त कार्यक्रम घेण्‍यात आला. सदर कार्यक्रमास भोकरचे तहसिलदार भरत सुर्यवंशी, प्रकाश भोसीकर, जि.प.स. सदस्‍य भोसी गट,दिवाकर रेड्डी, जि.प. सदस्‍य, पाळज गट, गुलाब नाईक, प्रतिनिधी सभापती, प.स. भोकर, सुभाष पाटील कोळगांवकर, प.स. सदस्‍य, किशोर पाटील लगळूदकर, सुभाष पाटील किन्‍हाळकर, संचालक, कृ.उ.बा.स., भोकर,नायब तहसिलदार, संतोष कामठेकर, सुनिल पांडे, कृष्‍णाजी मस्‍के, कृषि विभागाचे अधिकारी,  टारफे, नखाते उपस्थित होते.  सदर कार्यक्रमावेळी बटाळा येथील ज्‍या शेतकरी खातेदारांना लाभ देण्‍यात येणार आहे अशा शेतक-यांचे मान्‍यवरांचे हस्‍ते शाल, श्रीफळ व हार देवून सत्‍कार करण्‍यात आले. सदर कार्यक्रमास भोकर तालुक्‍यातील सर्व स्‍तरावरील अधिकारी, पदाधिकारी,राजकीय मंडळी व पत्रकार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मारोतराव जगताप, नायब तहसिलदार भोकर यांनी केले.














Thursday, February 21, 2019

या साप्ताहिक एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची होणार गोची

या साप्ताहिक एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची होणार गोची

नांदेड:-(एजास कुरेशी)

नांदेड येथून आदीलाबाद मार्गे  जाणारी ही साप्ताहिक एक्सप्रेस नागपूर ,गोदिया सुद्धा जाते तेथून ती सांत्रागाछी ला पोहचते त्या गाडीने प्रवास करणारे अनेक प्रवाशी गाडीरद्द होणार ही बातमी कळताच हैराण परेशान झाले आहे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी देखील प्रवासी चर्चे साठी रेल्वेप्रशासनास विचारणा करणाऱ असल्याचं समजले आहे.अशी ह्या रेल्वे ने नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यां कडून समजले आहे.
नांदेड़-सांत्रागाछी-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या रद्द झाल्याने या गाडीने प्रवास करणाऱ्याची चांगलीच गोची होणार असल्याची समजले आहे.
दक्षिण पूर्व रेल्वे कडून मिळालेल्या माहिती नुसार त्याच्या क्षेत्रात चालू असलेल्या विविध अधुनीकरण आणि सुरक्षे संबंधित कार्यामुळे नांदेड- सांत्रागाछी -नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस च्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत :-
हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या १२७६७ नांदेड ते
सांत्रागाछी एक्स्प्रेस दिनांक ४ मार्च आणि ११मार्च २०१९रोजी रद्द करण्यात आली आहे.सांत्रागाछी येथून सुटणारी गाडी संख्या १२७६८ सांत्रागाछी – नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक ६ मार्च आणि १३ मार्च २०१९ रोजी रद्द करण्यात आली आहे.

शिवसेनेचा टायगर जिंदा नाही तर टायगर लाचार झाला - अशोक चव्हाण

शिवसेनेचा टायगर जिंदा नाही तर टायगर लाचार झाला - अशोक चव्हाण 


नांदेड येथे महाअघाड़ीची पहिली जाहिर सभा संपन्न

 नांदेड़ (एजास कुरेशी)
शिवसेनेचा टायगर जिंदा नाही तर टायगर लाचार झाला आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ बुधवारी नांदेड येथून झाला आहे़ यानिमित्ताने काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला मोठी उपस्थिती लावण्याचे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले होते 
या महायुतीच्या सभेला माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, जयप्रकाश दांडेगावकर, आ़ डी़ पी़ सावंत आ.अमिता चव्हाण,आ. अमर राजूरकर यांची उपस्थिती होती शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली  सभेला जवळपास २० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी अनेक काँग्रेस चे कार्यकर्त्यांनी सभा ऐकण्यास गर्दी केली.सर्व मान्यवरांचे भाषण झाले त्यावर मोदी सरकार व देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना यांच्यावर टीकेची झोड सुरू होती
भाजप सरकारनं नोटाबंदी केली मात्र 99 टक्के रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे जमा झाल्या त्यामुळं काळा पैसा कुठे गेला?, असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.

भाजपसोबत आम्ही कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. युती गेली चुलीत. अशा घोषणा करणाऱ्या शिवसेनेचा स्वाभिमान कुठे गेला असा सवाल देखील अशोक चव्हाण यांनी या सभेत शिवसेनेला विचारला आहे.
 महाआघाडीला सत्ता द्या राज्यात चमत्कार करू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Wednesday, February 20, 2019

शेख युसूफ भाई ने शाहिद जवानांच्या कुटूंबियांना केली 50 हजारांची मदत





बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भोकर (एजास कुरेशी)
जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून शहीदांच्या जवानांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. सेलिब्रिटी ते अगदी सामान्य माणूस सर्वच जण या संदर्भात आपल्या परीने आर्थिक मदत करत आहेत. यात भोकरचे सामाजिक कार्यकर्ते तथा उपनगराध्यक्ष प्रतिनिधी यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी  आपला वाढदिवस साजरा न करता त्यात होणाऱ्या खर्चाची रक्कम महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे वीर सुपूत्र शहीद संजय राजपूत व नितिन राठोड यांच्या कुटूंबीयांसाठी प्रत्येकी २५ हजार असे एकूण ५० हजार रुपये दिले असून ती रक्कम भोकरचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली आहे



 ते सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत असतात. आम्ही आमच्या जवानांच्या कुटुंबीयांची सदैव मदतीसाठी तयार आहोत आणि यापुढेही कायम सहकार्य करू’, असे यावेळी युसुफ भाई म्हणाले.

यावेळी शेख युसूफ भाई व शिष्ठमंडळतील सामाजिक कार्यकर्ते मौलाना मुबीन खान इनामदार, बाबा खान पठाण,हमीद खान पठाण,संपादक उत्तम बाबळे, पत्रकार एल.ए.हिरे,नगरसेवक शेख वकील खैराती,खाजा तौफिक इनामदार, माजी नगरसेवक जवाजोद्दीन बरबडेकर,महंमद ताजोद्दीन,बाबूभाई तामसेकर,इर्शाद खान पठाण यासह आदी जणांची उपस्थिती होती.यावेळी तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी शेख युसूफ भाई मित्रमंडळ व मुस्लीम समाज बांधवांंनी वाढदिवस टाळून शहीदांना मदत करून श्रद्धांजली वाहिली असल्याने या उपक्रमाचे कौतुक केले असून प्रत्येकांनी देश रक्षणकर्त्या वीर जवानांप्रती ही भावना जपली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Tuesday, February 19, 2019

देशावर संकट आले असताना ;कुंडलवाडी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी सुरेखा पुणेकर ला नाचवले.

देशावर संकट आले असताना ;कुंडलवाडी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी सुरेखा पुणेकर ला नाचवले.

              File photo

नांदेड :-(ए.एम.कुरेशी)
नगरपरिषदेच्या प्रशासन विरुद्ध स्थानिक नागरिक व देश प्रेमी नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.
नुकतेच काही दिवसापुर्वी जम्मुकाश्मीर येथिल पुलवामा येथे लष्करी जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला यात जवळपास ४० जवान शहीद झाले तर दि १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी आपल्या  लष्करांसोबत चकमक केली यामध्ये सलग दुसऱ्यांदा ४ जवान शहीद झाले या दोन्हीही घटनेत जवळपास ४४ जवान शहीद झाले यामुळे देशात शोककळा पसरून चिंतेचे वातावरण असताना नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथिल न पा प्रशासनाच्या सत्ताधा-यांनी आपल्या कारकिर्दीची दोन वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधून सोमवार दि १८ फेब्रुवारी रोजी रात्री लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकरांच्या संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करून आपल्या सत्तेचे शहाणपण दाखवून दिले आहे यामुळे कुंडलवाडीच्या उपाध्यक्षाने  विकासाची गाथा जनतेपुढे वाचवली; देशात शोककळा असताना सुरेखा पुणेकर नाचवली अशा चर्चा सोशलमिडीयावर करत या निंदनीय कृत्याचे स्थानिक परिसरातील व तालुक्यातील जनता तीव्र निषेध नोंदवत दिसून आली आहेत.दोन वर्षापुर्वी झालेल्या निवडणूकीत बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगर पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला यामुळे आपल्या सत्तेची दोन वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्य साधून कुंडलवाडी नगर पालिकेच्या भाजपा सत्ताधा-यांनी आपण केलेली कामे जनतेला दाखवावी व नवीन विकास कामांचा शुभारंभ करावा यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी व्हावी या उद्देशाने सोमवार दि १८ फेब्रुवारी रोजी रात्री लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकरांच्या संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला होता. देशात शोककळा असताना असा कार्यक्रम आयोजन करून कुंडलवाडीच्या भाजपा सत्ताधा-यांनी शहीद जवानांच्या शोककळेचे भान विसरले असल्याचे दाखवून दिले. जरी हा कार्यक्रम नियोजित असला तरी सुरेखा पुणेकरांच्या संगीत रजनी कार्यक्रम सत्ताधा-यांना रद्द करता आला असता; मात्र आपल्या कार्यक्रमास जनतेचा प्रतिसाद मिळणार नाही या भित्तीपोटी केलेल्या या कृत्याचे सर्वस्तरातून निषेध केले जात आहे. आपल्या देशावर झालेल्या दहशतवादी हल्याने सर्व देश हादरला असताना सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा कार्यकर्ते यांनी केल्याने अजून जास्तच चर्चेला उत आला आहे.
अखिल भारतीय पद्मशाली वधु वर परिचय गुप्र चे लोकार्पण सोहळा संपन्न
                    जालना येथील युवकांचा सत्कार करताना

लातूर:-(प्रतिनिधी)
अखिल भारतीय  पद्मशाली वधु वर  मिलन गुप्र चे अॅडमीन  आकाश गुंटूक जालना, विष्णू दासरवार देगलूर,
जितेंद्र कांचानी पुणे,
विष्णूप्रसाद लोकम सोलापूर, तसेचं सर्व समाज बांधवाना मार्गदर्शन केले
जालन्यातील युवकांच्या मार्गदर्शनाखाली टेलिग्राम ग्रुप मध्ये चालू केलेल्या पदमशाली समाज वधू वर परिचय ग्रुप मध्ये 3 हजार पेक्षा जास्त लोकांना जोडून समाज एकत्रित करणाऱ्या युवकांचे लातुरात कौतुक व जंगी सत्कार करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हात मोठ्या प्रमाणात पदमशाली समाज एकत्रित होऊन लोकार्पण सोहळा संपन्न केला गेला.
महाराष्ट्र मध्येच नव्हे तर अनेक राज्यात पाहुणे मंडळी आहे पण त्यांचा परिचय नसल्याने अनेकांना दुसऱ्या राज्यात मुलगी देने किंवा मुलगी दुसऱ्या राज्यातील करणे ह्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हणून पाहुणे म्हंटल तर ओळख कुठून न कुठून निघत असते त्याच माध्यमातून अनेक जणांचे संसार जालना येथील आकाश गुंटूक यांनी पुढाकार घेऊन  टेलिग्राम ग्रुप च्या माध्यमातून समाज जोडणी केली आहे त्यामुळे त्यांचे अनेक राज्यातून कौतुक होत आहे जर कोणी वधूवर विवाह संस्था मधून बोलत आहे किंवा अमूक अमूक  संस्थे मधून  पैसेच्या मागणी बाबत फोन आल्यास कुठल्याही प्रकारचे पैसे अदा करू नये असे ह्या सूचक केंद्र यांनी म्हंटले आहे ही सेवा यांनी निशुल्क ठेवली आहे.
आपल्या बाबत फसवे
गिरी किवा लबाडी झाल्यास गुप्र मध्ये कोणीही जवाबदार राहणार नाही.असे देखील ग्रुप च्या वतीने सांगण्यात आले आहे त्या मुळे समाज बांधवा साठी अधिक सोयीस्कर झाले आहे  अखिल भारतीय पदमशाली वधू वर मिलन
टेलीग्राम चा ग्रुप बनवलेला आहे त्यात महाराष्ट्र , विदर्भ , छत्तीसगढ़ , गुजरात , आंध्र तेलंगाना सगळे पद्माशाली समाज आपल्या मुलांनचा किंवा नातेवाईकांचा  लग्ना योग्य आहे असा त्यांचा बायोडाटा  ह्या ग्रुप ला लिंक द्वारे ऍड होऊन जोडू शकता आणि आपल्या मुलांन च भविष्य बनवू शकता.लोकार्पण सोहळ्यात आयोजक श्रीनिवास नक्का लातूर गंगाधरजी गोरखे नागनाथ रामदिनवार बाबुराव अडबलवार प्रशांत रब्बेवार सुरेश  रब्बेवार ,राम पेन्टेवार ,मारोती अंचेवार ,शिवचंद्र मलफेदवार, सुमित्राताई गोरखे, प्रविण नक्का ,तर प्रमुख पाहुणे
कविताताई गंड्डम ,नागनाथ गड्डम, नारायण इरबतनवार ,संग्राम निलपंत्रेवार ,नरसिंग चिलकेवार उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती  मिरवणूक उत्साहात साजरी

                                 शिवजयंती मिरवणूक

भोकर :-(ए.एम.कुरेशी)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती शिवाजी चौक भोकर येथील पुतळ्याच्या नियोजित जागी करण्यात आली व त्या ठिकाणी ध्वज फडकवण्यात आला त्यावेळी अनेक शिव प्रेमी उपस्थित होते त्या नंतर शहरात मिरवणूक निघाली अनेक जणांच्या उपस्थिती मध्ये संपूर्ण शहरात मिरनुक फिरवली गेली त्यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला त्यावेळी त्या मिरवणुकीत बंदोबस्त साठी पोलीस निरीक्षक ची सर्व टीम कार्यरत होती तसेच मिरवणुकीत डीजे लावून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश धुडकावून लावू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज होती व  आयोजकांना अगोदर च बोलुन चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे.मिरवणुकीची सुरवात शिवाजी चौक,आंबेडकर चौक,गांधी चौक,कोळी गल्ली,ग्रामीण रुग्णालय परिसर,महात्मा गांधी नगर,शास्त्री नगर(लहुजी चौक) येथून बसस्टँड समोरून पुन्हा शिवाजी चौक येथे येऊन संपन्न झाली.
 भोकर च्या सार्वजनिक शिव जयंती महोत्सव पाहण्यासाठी शहरातील,ग्रामीण भागातील लोकांनी गर्दी केली होती मिरवणूक मध्ये हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूष राजू सोळंके(पोमनाळकर) यांनी केली होती त्याच बरोबर माँ जिजाऊ चे देखील वेशभूषा करून घोड्यावर स्वार झालेले शाळेतील मुली दिसत होत्या.
अनेक महिलानी देखील ह्या मिरवणुकीत आपला सहभाग पूर्ण वेळ देऊन मिरवणुकीची शोभा वाढवली म्हणून ही मिरवणूक ऐतिहासिक दिसत असल्याची चर्चा भोकर शहरात सुरू आहे.
या वेळी त्यामध्ये  मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता त्या मध्ये 
पोलिस निरीक्षक १, सहाय्यक पोलिस निरीक्षक १, ६० पोलिस व अन्य तुकडी चे १०जण असे कर्मचारी बंदोबस्त मध्ये होते 
मंगळवारी शहरातून दुपारी मिरवणुकिला सुरुवात झाली होती
ही सार्वजनिक मिरवणूक यशस्वी करून अनेक जनाणी परिश्रम घेतले

Thursday, February 14, 2019

व्हॅलेंटाईन डे निमित्त कॉफी शॉप चालकांनी जय्यत तयारी, सर्वच कॉफी शॉप पोलीसच्या रडार वर.

व्हॅलेंटाईन डे निमित्त कॉफी शॉप चालकांनी जय्यत तयारी, सर्वच कॉफी शॉप पोलीसच्या रडार वर.

              File photo

बेधडक महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क

 नांदेड:-(ए.एम.कुरेशी)
नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप उघडण्यात आले असून यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या अश्लील प्रकारास प्रोत्साहन देण्यात आले़ ही बाब काही पालकांनीही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे़ त्यानंतर आता या कॉफी शॉपची संबंधित हद्दीतील पोलीस निरीक्षक तपासणी करणार असून काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अभिजित फस्के यांनी दिली.शहरातील पावडेवाडी, कौठा, आनंदनगर परिसरात यापूर्वी कॉफी शॉपवर धाडी टाकून अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.तसेच अशा कॉफी शॉपच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती.परंतु, त्यानंतरही लपूनछपून कॉफी शॉपमध्ये हे प्रकार सुरुच आहेत़ वाडी ग्रामपंचायतने अशा पंधरा कॉफी शॉपचालकांचे परवाने रद्द केले होते़ त्यानंतर कॉफी शॉप चालकांनी मनपा हद्दीत आपला मोर्चा वळविला होता.दोन दिवसांवर आलेल्या व्हॅलेंटाईन डे निमित्त कॉफी शॉप चालकांनी जय्यत तयारी केली आहे़ त्यासाठी वेगवेगळ्या आॅफर दिल्या आहेत़ महाविद्यालयीन तरुण-तरुणी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फसवणूक करणाऱ्याच्या जाळ्यात ओढल्या जावू नये यासाठी पोलिसांची गस्त सुरु राहणार आहे़ तसेच अशा कॉफी शॉपवर आता पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे़ त्या-त्या हद्दीतील पोलीस निरीक्षक हे अशा कॉफी शॉपची तपासणी करणार आहेत़ त्यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर महाविद्यालय व खाजगी कोचिंग क्लासेसच्या परिसरात बुलेट व इतर दुचाकीवरुन हुल्लडबाजी करणा-यांनाही जरब बसावी यासाठी या परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत़, असेही उपअधीक्षक फस्के म्हणाले.अनेक जुन्या कार्यवाहीत सामील असलेले तर आता नियम बद्द कॉफी शॉप चालवणे चालू केले आहे
काही दिवसा पूर्वी नांदेड पावडेवाडी,कौठा परिसरात कॉफी शॉप वर धाड पडली असता तेथे चमचा भर देखील कॉफी त्या कॉफी शॉप वर आढळला नव्हते तर चक्क बेड असलेली रूम दिसल्याने तिथे नेमक्या कोणत्या गोष्टी चालतात पोलीस चौकशी च्या मार्गी लागले होते आता हग डे,किस डे, व्हॅलेन्टाईन डे असल्याने रंगीन असलेले तरुणाई ह्या ठिकाणी जाऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आले होते.

भोकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी हिरे तर उपाध्यक्षपदी रमेश गंगासागरे यांची निवड.

भोकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी हिरे तर उपाध्यक्षपदी रमेश गंगासागरे यांची निवड.



भोकर (एजास कुरेशी)  भोकर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक सम्पन्न शासकीय विश्रामग्रह भोकर येथे अनिसचे जिल्हा कार्यकर्ते सम्राट हटकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ फेब्रुवारी रोजी नुकतीच पार पडली आहे यात निरीक्षक म्हणून इंजिनीयर रंजना खटके, राणी पद्मावती बंडावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, यावेळी सविस्तर चर्चा घडून आली, त्यानंतर भोकर तालुका कार्यकारणी नवीन वर्षासाठी जाहीर करण्यात आली आहे, अध्यक्ष म्हणून पत्रकार एल.ए. हिरे तर उपाध्यक्ष पदी  पत्रकार रमेश गंगासागरे यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष दिलीप शिवाजी, गायकवाड कायदेविषयक सल्लागार एड. सिद्धार्थ कदम, ॲडव्होकेट अनिल सिनेमाने, संगीता राठोड, बुवाबाजी संघर्ष मिलिंद गायकवाड, वार्तापत्र विभाग अरुण डोईफोडे, सांस्कृतिक अभिव्यक्ती सुरेखा माळे, प्रकाशने वितरण विलास हटकर,  युवा सहभाग भाऊराव कावळे, महिला सहभाग तबस्सुम शेख अहमद, प्रशिक्षण विभाग बी.आर.पांचाळ निधी संकलन शुभाष तेले, संकल्प प्राध्यापक  सदस्य राजेश वाघमारे डॉक्टर साईनाथ वाघमारे, सँभाजी चेरकेवाड, नागोराव शेंडगे ,कार्यकारणी सदस्य यावेळी भोकर तालुक्यात चालू असलेली अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यांचे समूळ उच्चाटन करण्यात येणार असल्याचे नूतन कार्यकारिणीने जाहीर केले आहे.

Wednesday, February 13, 2019

पदमशाली समाज बांधवांचा मोफत वधू वर सूचक केंद्र टेलिग्राम द्वारे.

पदमशाली समाज बांधवांचा मोफत वधू वर सूचक केंद्र टेलिग्राम द्वारे.


बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

जालना:-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र मध्येच नव्हे तर अनेक राज्यात पाहुणे मंडळी आहे पण त्यांचा परिचय नसल्याने अनेकांना दुसऱ्या राज्यात मुलगी देने किंवा मुलगी दुसऱ्या राज्यातील करणे ह्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हणून पाहुणे म्हंटल तर ओळख कुठून न कुठून निघत असते त्याच माध्यमातून अनेक जणांचे संसार जालना येथील आकाश गुंटूक यांनी पुढाकार घेऊन  टेलिग्राम ग्रुप च्या माध्यमातून समाज जोडणी केली आहे त्यामुळे त्यांचे अनेक राज्यातून कौतुक होत आहे जर कोणी वधूवर विवाह संस्था मधून बोलत आहे किंवा अमूक अमूक  संस्थे मधून  पैसेच्या मागणी बाबत फोन आल्यास कुठल्याही प्रकारचे पैसे अदा करू नये असे ह्या सूचक केंद्र यांनी म्हंटले आहे ही सेवा यांनी निशुल्क ठेवली आहे.
आपल्या बाबत फसवे
गिरी किवा लबाडी झाल्यास गुप्र मध्ये कोणीही जवाबदार राहणार नाही.असे देखील ग्रुप च्या वतीने सांगण्यात आले आहे त्या मुळे समाज बांधवा साठी अधिक सोयीस्कर झाले आहे *अखिल भारतीय पदमशाली वधू वर मिलन*
टेलीग्राम चा ग्रुप बनवलेला आहे त्यात महाराष्ट्र , विदर्भ , छत्तीसगढ़ , गुजरात , आंध्र तेलंगाना सगळे पद्माशाली समाज आपल्या मुलांनचा किंवा नातेवाईकांचा  लग्ना योग्य आहे असा त्यांचा बायोडाटा  ह्या ग्रुप ला लिंक द्वारे ऍड होऊन जोडू शकता आणि आपल्या मुलांन च भविष्य बनवू शकता.
ह्या मध्ये जोडण्या साठी *टेलिग्राम अँप* डाउनलोड करावे त्या नंतर 
*अखिल भारतीय पदमशाली वधू वर मिलन*हा नाव टाकू सुद्धा तुम्ही ह्या ग्रुप मध्ये जाॅईन  होता येईल.
        *गुप्र अॅडमीन*
*श्रीनिवास चिलवर जालना-8856894894* 
 *आकाश गुंटूक जालना* 
*गोपाल परसावार छत्तीसगढ* 
 *विष्णू दासरवार देगलूर*
*हरीदास रामदिनवार कुंडलवाडी*
*विष्णूप्रसाद लोकम सोलापूर*
*राज कोकूलवार नांदेड*
*विनायक जेटला गुजरात* 
*जितेंद्र कांचानी पुणे*
*बालाप्रसाद गुडेवार वसमत*

Sunday, February 10, 2019

एक्स गर्लफ्रैंडची आत्महत्त्या ; प्रियकरासह नव्या प्रेयसीविरुध्द गुन्हा दाखल.

एक्स गर्लफ्रैंडची आत्महत्त्या ; प्रियकरासह नव्या प्रेयसीविरुध्द गुन्हा दाखल.

विशेष प्रतिनिधि, महाराष्ट्र
नाशिक : प्रेमभंग झालेल्या तरुणीने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा प्रियकर आणि त्याची नवी प्रेयसीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर आणि नवीन प्रेयसी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना जुने नाशिक भागातील कोळीवाडा परिसरात घडली होती.

प्रिया उर्फ प्रियंका राजू पवार (वय-१८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर उमेश शिवाजी पिंगळे (रा. कोळीवाडा) आणि त्याची नवी प्रेयसी साक्षी पगारे विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंकाचे वडील राजू दत्तू पवार (वय-४३) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने नाशिकमधील कोळीवाडा येथे राहणाऱ्या प्रिया पवार आणि उमेश पिंगळे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यांचा प्रेमभंग झाल्याने प्रियंकाला नैराश्य आले. यातूनच तिने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना प्रियंकाची डायरी सापडली. यामध्ये तिने प्रेमभंगाचे कारण लिहून ठेवले होते. पोलिसांना मिळालेल्या डायरीवरुन तपास सुरु केला. दरम्यान, राजू पवार यांनी पोलिसांकडे फिर्य़ाद दिली. उमेश याने प्रियंकाला प्रेमाचे आमीष दाखवून तिची फसवणूक केली. त्यानंतर उमेशने त्याची नवी प्रेयसी साक्षी पगारे यांनी आपआपसांत संगनमत करुन प्रियंकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्य़ात राजू पवार यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे. पोलिसांनी उमेश आणि साक्षी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, प्रियंकाच्या आत्महत्येनंतर दोघेही फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Thursday, February 7, 2019

लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर खंजीरच्या मुठीने वार करून लुटले.

लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर खंजीरच्या मुठीने वार करून लुटले.

अबब... नांदेड सायंकाळी साडेपाच वाजता लूट.

   File photo
नांदेड : (ए.एम.कुरेशी)
चोरीचे प्रमाण वाढले लघु शंका साठी थांबणार्या माणसाची चोरटे पाहात आहेत वाट पैसे मागणी करून जीवे मारण्याचा करत आहेत प्रयत्न 
शहरातील स्नेहनगर पोलीस वसाहतीनजीक लघुशंकेसाठी थांबलेल्या एका युवकावर लुटीच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला़ ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली़ युवकाने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
संजय अर्जुनराव शंकपाळे रा.राजनगर, पावडेवाडी हे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्नेहनगर पोलीस वसाहतीकडून जात होते़ पाटबंधारे विभागाच्या इमारतीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले होते़ त्याचवेळी दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून असलेला चोरटा आला़ यावेळी त्याने शंकपाळे यांना मारहाण करीत त्यांच्या खिशातील साडेतीन हजार रुपये काढून घेतले़ त्यानंतर तो शंकपाळे यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करीत होता़
त्याचवेळी शंकपाळे यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे चिडलेल्या आरोपीने खंजिराच्या मुठीने त्यांचे डोके फोडले़ शंकपाळे यांच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारील मैदानावर खेळणारे खेळाडू त्यांच्याकडे धावत सुटले़ हे पाहून चोरट्याने पळ काढला़ याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास मपोउपनि खर्जुले या करीत आहेत़
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरुन येणारे चोरटे पायी जाणाऱ्यांना एकट्यात गाठून त्यांना मारहाण करीत लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ विरोध करणा-यांच्या डोक्यात खंजरची मूठ मारुन जखमी करण्याची त्यांची चोरीची पद्धतही एकसारखी असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे़.
या अगोदर कौठा भागात आय जी ऑफिस जवळ लघु शंका करणाऱ्या पत्रकारांला अडवणूक करून रात्रीचा फायदा चोरटे उचलत आहे त्यांच्या वर सिडको ग्रामीण मध्ये सुद्धा अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

प्रा.लक्ष्मण माधव कदम यांना पी एच डी प्रदान.

प्रा.लक्ष्मण माधव कदम यांना पी एच डी प्रदान.



नांदेड:-(प्रतिनिधी)
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडुन प्रा.  लक्ष्मण माधवराव पा. कदम दुगावकर यांना  " विषय- "हिंदी -मराठी उपन्यासों में कृषक जीवन "(१९९०-२०१०) यांना या विषयात पीएच.डी प्रदान करण्यात आली..
 त्यांना गाइडन्स  डाॅ.नानासाहेब गोरे , यांनी केले. बहिस्थ - डाॅ.प्रमोद कोवप्रत ,
कालीकट यूनिवर्सिटी  ,केरला
तरी जे.ई.एस महाविद्यालयाचे संचालक पुरूषोत्तमजी बगाडीया व प्राचार्य डाॅ.जवाहर काबरा व सर्व प्राध्यापक व्रंदाकडुन व विद्यार्थ्यांनकडुन सर्वत्र त्यांचे आभिनंदन व स्वागत चालु आहे .. तसेच कदम परिवारातील पहिले पीएच डी मिळवणारे त्यामुळे यांचे पंचक्रषित सुद्धा कौतुक चालु आहे.सर्व मित्र परिवार व कुटुंबातील अनेक लोक आनंदित आहे त्यांनी पी. एच.डी पदवी मिळाल्यानंतर त्याचे पुतणे सचिन कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा. लक्ष्मण कदम यांना हिंदी विषयात पीएच डी प्रदान 
घरची परिस्थिती जेमतेम असताना आजच्या काळात पीएच. डी मिळवणे जीवघेणेच.
मोठ्या भावांची (शंकरराव कदम व व्यंकटराव कदम ह्याची शिकवण्याची जिद्द व परिस्थितीची जाण ठेवुन केलेली मेहनत यामुळे हे शक्य झाले. 
प्रा. लक्ष्मण माधवराव कदम यांना हिंदी विषयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाकडुन पीएच डी प्रदान करण्यात आली.  सर्व कुटूंबिय व मित्रपरिवार आनंदोत्सव साजरा करित आहेत.

पुण्यातील प्रसिद्ध वडापाव सेंटरवर कारवाई, विक्री थांबवण्याचे आदेश.

पुण्यातील प्रसिद्ध वडापाव सेंटरवर कारवाई, विक्री थांबवण्याचे आदेश.




बेधडक महाराष्ट्रा न्यूज 

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र
पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून(एफडीए) धडक कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या वापरामुळे एफडीएने ही कारवाई केली असून जनहित व जनआरोग्याच्या कारणास्तव विक्रीचा व्यवसाय तातडीने बंद करण्याबाबत आदेश दिल्याचे एफडीएतर्फे सांगण्यात आले आहे.कॅम्पातील गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स व बागवान हॉटेलवरही अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल, केटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाक़डून कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. गार्डन वडापावच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभावतसेच किडक्या बटाट्याचा वापर अशा कारणांचा समावेश आहे.अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६अंतर्गत तरतुदीनुसार बंधनकारक आहे. या कायद्यात सांगितलेल्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई केली जाते. सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत बागबान रेस्टोरंट, अख्तर केटरर्स आणि गार्डन वडापाव सेंटरचा समावेश आहे. यात कामगारांची अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची अयोग्य साठवणूक, अस्वच्छता, विना परवाना व्यवसाय अशी कारणे देण्यात आली आहेत. ही कारवाई सहआयुक्त सुरेश देशमुख, सहायक आयुक्त संजय शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांच्या पथकाने कली.

Monday, February 4, 2019

29 एप्लिकेशन म्हणजेच (apps) करत आहेत, तुमचा फोटोंची चोरी, लगेच करा डिलेट.

29 एप्लिकेशन म्हणजेच (apps) करत आहेत, तुमचा फोटोंची चोरी, लगेच करा डिलेट.

बेधडक महाराष्ट्र न्युज
बातमी आमची, निर्णय तुमचा!

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र







Sunday, February 3, 2019

सावधान...! तुम्हाला तुमच्या मित्राने पैसे पाठवले आहे, असा पैशासाठी गंडा घालणारा मॅसेज येत आहे सध्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर.

सावधान...! तुम्हाला तुमच्या मित्राने पैसे पाठवले आहे, असा पैशासाठी गंडा घालणारा मॅसेज येत आहे सध्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर.


बेधडक महाराष्ट्र न्यूज
बातमी आमची..! निर्णय तुमचा..!
विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र



माणुसकी अजून संपलेली नाही, भेटलेला मोबाईल पोलीस निरीक्षकच्या समक्ष परत.

माणुसकी अजून संपलेली नाही,
भेटलेला मोबाईल पोलीस निरीक्षकच्या समक्ष परत.


भोकर :-(एजास कुरेशी)
रेल्वे गेट जवळ अगदी दाट वस्ती आहे तेथे एक सॅमसंग कंपनीचा मोठ्या किंमतीचा मोबाइल एका तरुण स्टील फर्निचर वर्कर च्या निदर्शनास आला तो मोबाईल तो हातात घेऊन पाहतो तर तो स्वीच ऑफ (बंद) होता.म्हणून त्यावर संपर्क झाला नाही तो उघडताच मोबाइल मालक फोन केला त्या वेळी भोकर येथील मो.फयाज यांनी त्यांना भोकर पोलीस स्टेशन मध्ये येऊन घेऊन जाण्यास सांगितले त्या मोबाईल मध्ये अनेक कामाची फोटो असल्याने ते वापस मिळालेला मोबाइल मोबाईल धारकाच्या मित्रा जवळ देण्यात आला भोकर येथील रेल्वे गेट जवळ एक सॅमसंग कंपनीचा जे 7 मॅक्स मोबाईल मो.फयाझ यांना मिळाला होता तो मोबाईल नाशिक येथे वीज वितरण कंपनी मध्ये काम करणाऱ्या साबळे यांचा होता मो.फोन वर बोलून साबळे यांना मोबाईल परत करेन तुम्ही या असे सांगितले पण साबळे हे नाशिक मध्ये राहत असल्याने त्यांनी भोकर च्या एका मित्रा ला फोन घेण्यास सांगितले व त्यांना भोकर पोलिस स्टेशन मध्ये बोलावून पोलीस निरीक्षक पडवळ याचा समक्ष मोबाईल परत करण्यात आला आहे मो. फयाझ यांचा खुप कौतुक करण्यात आला आहे.
भोकर मध्ये या अगोदर ही कावळे नावाच्या युवकाने देखील मिळालेले पैसे पोलीस निरीक्षक यांच्या कडे दिले होते.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...