भोकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी हिरे तर उपाध्यक्षपदी रमेश गंगासागरे यांची निवड.
भोकर (एजास कुरेशी) भोकर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक सम्पन्न शासकीय विश्रामग्रह भोकर येथे अनिसचे जिल्हा कार्यकर्ते सम्राट हटकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ९ फेब्रुवारी रोजी नुकतीच पार पडली आहे यात निरीक्षक म्हणून इंजिनीयर रंजना खटके, राणी पद्मावती बंडावार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, यावेळी सविस्तर चर्चा घडून आली, त्यानंतर भोकर तालुका कार्यकारणी नवीन वर्षासाठी जाहीर करण्यात आली आहे, अध्यक्ष म्हणून पत्रकार एल.ए. हिरे तर उपाध्यक्ष पदी पत्रकार रमेश गंगासागरे यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष दिलीप शिवाजी, गायकवाड कायदेविषयक सल्लागार एड. सिद्धार्थ कदम, ॲडव्होकेट अनिल सिनेमाने, संगीता राठोड, बुवाबाजी संघर्ष मिलिंद गायकवाड, वार्तापत्र विभाग अरुण डोईफोडे, सांस्कृतिक अभिव्यक्ती सुरेखा माळे, प्रकाशने वितरण विलास हटकर, युवा सहभाग भाऊराव कावळे, महिला सहभाग तबस्सुम शेख अहमद, प्रशिक्षण विभाग बी.आर.पांचाळ निधी संकलन शुभाष तेले, संकल्प प्राध्यापक सदस्य राजेश वाघमारे डॉक्टर साईनाथ वाघमारे, सँभाजी चेरकेवाड, नागोराव शेंडगे ,कार्यकारणी सदस्य यावेळी भोकर तालुक्यात चालू असलेली अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यांचे समूळ उच्चाटन करण्यात येणार असल्याचे नूतन कार्यकारिणीने जाहीर केले आहे.

No comments:
Post a Comment