आमदार सुभाषराव साबनेच्या प्रयत्नाने अखेर लोहगाव महसुल मंडळात दुष्काळ जाहिर, शासनाने केला दुष्काळ यादीत समावेश
बिलोली:- देगलुर-बिलोली मतदारसंघातील एकमेव दुष्काळ यादीत समावेशा पासुन वंचित असलेल्या व् सरासरीने जास्तीचा पाऊस झाला त्यामुळे दुष्काळ जाहिर न झालेल्या लोहगाव महसुल मंडळाचे आमदार सुभाषराव साबनेच्या प्रयत्नाने अखेर दुष्काळ यादीत समावेश झाला असून शासनाने लोहगाव मंडळात दुष्काळ जाहिर केला आहे. देगलुर तालुक्याचा शासनाने घोषित केलेल्या तिव्र दुष्काळ यादीत समावेश केला त्यावेळी जिल्ह्यातील केवळ तिनच तालुके त्यात होते.बिलोली तालुका फिगर 1 मध्ये येत असल्याने वगळंन्यात आले होते.आमदार साबने साहेबांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करुण बिलोली तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी असल्याचे निदर्शनास आणून दिले.त्यानंतर नामदार महादेव जानकर व पालकमंत्री ना. रामदास कदम यांना बिलोली तालुक्यात आणून पिक परिस्तिथी व शेतकर्यांची भावना त्यांना दाखवुन दिली.त्यानंतर राज्य शासनाने १९१महसुल मंडळात दुष्काळ जाहिर केला त्यात बिलोली तालुक्यातील बिलोली,कुंडलवाडी, आरळी, सगरोळी या चार महसुल मंडळाचा समावेश करण्यात आला. परंतु लोहगाव महसुल मंडळात सरासरिच्या जास्त पाऊस झाल्याचे कारण पुढे करुण मंडलातील १८ गावांना वगळन्यात आले होते.त्यानंतर आ.साबने यांनी पुन्हा पाठपुरावा करुण सरासरिच्या अधिक झालेला पाऊस हा ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ७७ मी. मी. एवढा पाऊस झाल्याने लोहगाव महसुल मंडळात ७८.६१टक्के पर्जन्यमान झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.त्यांच्या प्रयत्नाने अखेर शासनाने लोहगाव महसुल मंडळ व त्यातील १८ गावांत दुष्काळ जाहिर केला आहे.आमदार सुभाषराव साबने साहेबांच्या प्रयत्नाने आता संपूर्ण मतदार संघात दुष्काळ घोषित झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

No comments:
Post a Comment