Monday, December 31, 2018

दम मारो दम..! भारतीय नागरिकांनी वर्षभरात तब्बल 80 हजार कोटींच्या फक्त विड्याच फुंकल्या तर विचार करा इतर खर्च बद्दल.

दम मारो दम..! भारतीय नागरिकांनी वर्षभरात तब्बल 80 हजार कोटींच्या फक्त विड्याच फुंकल्या तर विचार करा इतर खर्च बद्दल.

 

प्रतिनिधी : (एम.ए.शेख)
'दम मारो दम, पण स्वस्तात…मस्त' असे म्हणत लाखो भारतीय नागरिकांनी वर्षभरात तब्बल 80 हजार पाचशे कोटी रुपयांच्या विडय़ा फुंकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 15-60 वयोगटातील विडीफुक्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती आज साडेसात कोटीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे 2017 मध्ये देशात झालेल्या तंबाखूच्या एकूण उत्पादनापैकी तब्बल 81 टक्के तंबाखू विडी उद्योगात वापरला गेला असल्याचे सेंटर ऑफ पब्लिक पॉलिसी रिसर्चने (सीपीपीआर) 'टोबॅको कंट्रोल' या जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे. स्वस्त वाटणाऱया विडीचा वापर वाढल्याने हजारो कुटुंबे वर्षानुवर्षे गरिबीतच राहिली आहेत.
शेती उत्पादन असलेल्या तंबाखूचे देशात मोठे उत्पादन होत आहे. त्यामुळे विडीचा उत्पादन खर्च अत्यल्प असून सर्वसामान्यांना स्वस्तात उपलब्ध होते. मात्र तंबाखू भरलेल्या विडीला सिगारेटप्रमाणे फिल्टर नसल्याने ती ओढल्यास मोठय़ा प्रमाणात निकोटीन शरीरात जाते. हाच निकोटीनचा धूर फुप्फुसात गेल्याने वेगवेळ्या प्रकारचे कॅन्सर, क्षयरोग अशा जीवघेण्या अजारांची लागण होत असल्याचे सीपीपीआरने म्हटले आहे. त्याचा देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. 2017 मध्ये विडय़ांबरोबरच ओढणाऱयांवरील उपचारावर 80 हजार पाचशे कोटी रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले आहे. विडी आणि त्यामुळे होणाऱया आजारांवरील खर्चामुळे देशातील 15 कोटी जनता वर्षानुवर्षे गरिबीतच जगत असल्याचे सीपीपीआरने म्हटले आहे. दरम्यान विडी ओढणाऱयांची संख्या कमी व्हावी म्हणून सरकारने विडीच्या विक्रीवर जादा कर आकारून त्याची किंमत कशी वाढेल याबाबत योग्य पावले उचलावीत असे सुचवले आहे.
चौघांपैकी एकजण फुंकतो विडी
देशातील विडीफुक्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. 30-60 वयोगटातील चार नागरिकांपैकी एकजण विडी फुंकत असल्याने देशाची क्रयशक्ती घटत आहे. देशाच्या विकासाला हे घातक आहे. तसेच गरिबीचे प्रमाण वाढत असल्याचेही सीपीपीआरचे रिजो एम. जॉन यांनी सांगितले. त्याचबरोबर विडीच्या विक्रीतून वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून वर्षाला सरकारला केवल 0.5 टक्के महसूल मिळतो तर विडीमुळे होणाऱया आजारांवर वर्षाला आरोग्याच्या एकूण बजेटपैकी तब्बल दोन टक्के खर्च होत आहे.

Thursday, December 27, 2018

खा.अशोकरावच्या हुंकाराला 10 दिवस झाले असून सुद्धा मटका सुरुच.

खा.अशोकरावच्या हुंकाराला 10 दिवस झाले असून सुद्धा  मटका सुरुच.



भोकर (प्रतिनिधी) एजास कुरेशी
भोकर तालुक्यात व नांदेड जिल्ह्यात मटका हा जुगार जोरात सुरू असल्याच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी अर्धापूरच्या जाहीर सभेत 16 डिसेंबर रोजी मोठा जोरदार हुंकार भरला होता आठ दिवसात मटका बंद झाला नाही तर युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना तयार राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर खुप चर्चा झाली होती तरीपन भोकर शहरामध्ये मुख्य चौकासह विविध भागात मटका किंग वाढले आहेत त्याच्या मार्फ़त फोन मटका तसेच मटका जुगारांचे अन्य ही प्रकार खेळनाऱ्यांची संख्या वाढली आहे

 कामगारांना मटका खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या बुकिंकडू लाखों रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे यात मटका जुगार सेठ मंडळीची स्थानिक पोलिसां सोबत लागेबंधे आहेत की काय ? असे भोकरच्या जनतेना वाटत असून मटका जुगार तेजीत चालताना दिसत आहे .
 
सोबतच पोलीसांनी 3 ठिकाणी मटका जुगारांवर छापे मारले होते इतर ठिकाणी सुध्दा पोलीस जात आहेत पण त्यांना कोणी सापडत नाही म्हणेअसा निल पंचनामा केल्या जात आहे. ज्या तिन ठिकाणी, अर्धापूर, शिवाजीनगर आणि भोकर येथे पोलीसांच्या विशेष पथकाने छापे टाकले होते

 खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या युवा ब्रिगेडला आठ दिवसांनंतर तयार राहण्याचा हुकूम दिला होता. त्यानुसार आज 10 वा दिवस आहे. तरी पण युवा   कोंग्रेसने मटका बंद करण्यासाठी कांहीच कार्यवाही केलेली दिसलेली नाही

स्थानिक पोलिस प्रशासनाला कल्पना असून देखील  पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे अशी चर्चा दबक्या आवाजात भोकर मध्ये सुरु आहे व तसेच या मटका जुगाराला खलेआम उधान आल्याचे चित्र भोकर शहरात दिसून येत आहे या वर त्वरित प्रतिबंधक कार्यवाही साठी पोलिस प्रशासना कडून पाऊले उचलनण्या करिता प्रयत्न आवश्यक आहेत.अत्ता बघू हे ज़िमेदारी कोन घेईल अशोक चव्हाण च्या हुंकाराप्रमाणे युवक कोंग्रेस का पोलिस प्रशासन ?

Tuesday, December 18, 2018

प्रकाश आंबेडकर, ओवेसींचे जागा वाटपाचे घोडे अडले!

प्रकाश आंबेडकर, ओवेसींचे जागा वाटपाचे घोडे अडले!

बेधडक महाराष्ट्र online न्युज 

मुंबईः भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन करुन इतर राजकीय पक्षांना आव्हान दिले आहे. काँग्रेस सोबत आघाडी करुन 12 जागा पदरात पाडण्यासाठी आंबेडकर वाट बघत आहेत. परंतु काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे आंबेडकर, ओवेसींचे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. यावरुन दोन्ही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमावस्थेत पडले आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांची जागा वाटपावरुन खलबते सुरु आहेत. आंबेडकर हे काँग्रेस सोबत जाण्यास तयार आहेत. त्यांनी 12 जागांचा प्रस्ताव काँग्रेस आघाडीकडे दिलेला आहे. मध्यंतरी अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि आंबेडकर यांच्यात बैठकही झाली. काँग्रेस किती जागा सोडणार हे अद्यापही आंबेडकर यांना स्पष्टपणे सांगितले नाही. आंबेडकरांनी काँग्रेस सोबत राहावे ही काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. आंबेडकर वारंवार काँग्रेस सोबत जाण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. ओवेसी आणि आंबेडकर यांच्या सभांना चांगली गर्दीही होत आहे. एमआयएम जागा वाटपासाठी आतूरतेने वाट बघत आहे.

तेलंगणा निवडणुकीनंतर जागा वाटप करण्यात येतील असं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. मात्र आंबेडकर पुढाकार घेण्यासाठी सध्या तरी तयार नसल्याने एमआयएममध्ये आंबेडकरांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

काँग्रेसला आंबेडकरांचा 12 जागांचा प्रस्ताव मान्य नाही. काँग्रेस,राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागांवर प्राथमिक चर्चाही झाली आहे. इतर आठ जागा या मित्रपक्षांसाठी त्यांनी ठेवल्या आहेत. आंबेडकर दिल्लीत नेत्यांच्या निरोपाची वाट बघत आहेत. मात्र काँग्रेसने जास्त महत्व न दिल्यामुळे चर्चेच गु-हाळ सध्या तरी थांबलेलं आहे.

आम्ही आजही काँग्रेस सोबत जाण्यास तयार

भारिपचा काँग्रेसकडे 12 जागांचा प्रस्ताव आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या सोबत चर्चा करायला पाहिजे. आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही काँग्रेस सोबत आघाडी करु; अशी माहिती भारिप बहुजन महासंघांचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ यांनी प्रहार वेब टीमशी बोलतांना दिली.

आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीला सासरच्या मंडळीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न भोकर पोलिसात गुन्हा दाखल.

आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीला सासरच्या मंडळीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न भोकर पोलिसात गुन्हा दाखल.


प्रतिनिधी (एजास कुरेशी)

भोकर:- हुंड्यासाठी बंदी असताना देखील विवाह कसला ही असो मागणी करणारे सासर मंडळी दिसून येतात असाच प्रकार भोकर शहरातील कोळीगल्ली मध्ये घडला आहे पैश्यासाठी चक्क सासरच्या मंडळीने विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून टाकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला आहे पण मुलीने स्वतः चा बचाव करून सविस्तर पोलिसाने कळवले त्यांनी पोलिसांनी त्या गंभीर होणाऱ्या गुन्ह्याची चांगलीच दखल घेतली आहे
पवन घंटलवाड ह्या तरुणाने प्रेम विवाह (आंतरजातीय) केला असता अनेकांनी विरोध करूनही त्यास दोन्ही परिवाराने काही वर्षा नंतर का व्होईना मान्य केले होते पण अचानक त्याने विवाह केलेल्या पत्नी ला सासरच्या मंडळी कडून त्रास होत आहे असे तिने माहेरच्या मंडळीला सांगितले तेव्हा त्या मंडळीने जाब विचारत असताना सासरच्या मंडळींचा राग अनावर झाला व त्या मुलीच्या नवरा,आई ,वडील,दिर यांनी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा भोकर पोलिसात नोंदविण्यात आला

पीडित महिला दिलेल्या फिर्यादी वरून दि १७ डिसें २०१८ रोजी रात्री त्या पीडितेचा पती,सासू,सासरा, दिर यांच्या विरुद्ध  मानसिक त्रास,व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस चव्हाण हे करीत आहेत
[18/12, 11:15 pm] Aijas Qureshi Sir: *ग्रामीण रुग्णालय परिसरात आढळून आले दोन मृत (नकोसे)*


भोकर : (एजास कुरेशी)
नांदेड जिल्ह्यात घडलेली हृदय द्रावक घटना भोकर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालय परिसरात एक दिवसापुर्वी जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक सापडले असून या प्रकरणी अज्ञात माता पित्याविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकिय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे परिचारक पदावर सेवारत असलेले निलेश पाचभाई हे दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रुग्णालयात जात असतांना ग्रामीण रुग्णालय परिसरात दोन डूकरे काहीतरी ओढत आणून खात असतांना त्यांना दिसले.त्या डूकरांना त्यांनी हुसकावले व जवळ जाऊन पाहिले असता ते एक मृतअवस्थेतील अर्भक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.ही माहिती त्यांनी कर्तव्यावर असलेले वैधकिय अधिकारी डाॅ.समद यांना सांगीतली. यावरुन त्यांनी भोकर पोलीसांना ती माहिती कळवली घटनास्थळी त्यांना बोलावुन यावेळी पो.उप.नि.सुशिल कुमार चव्हाण,पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन व पोलीस कर्मचा-यांनी घटनासिथळी तात्काळ भेट दिली व  परिचारीकां समक्ष रितसर पंचनामा केला.वैद्यकीय अधिका-यांनी त्या मृत अर्भकाची शिच्छेदन केले असता त्यांनी ते पुरुष जातीचे असून एक-दोन दिवसापुर्वी जन्मलेले असावे असा प्राथमिक अभिप्राय दिला.सदरील अर्भकाचा एक पाय व एक हात डूकरांनी खाऊन टाकल्याने त्याची अतिशय दुरावस्था झाली होती.या प्रकरणी परिचारक निलेश पाचभाई यांनी दिलेल्या माहितीवरुन अज्ञात माता पित्याविरुद्ध भोकर पोलीसात भादविच्या कमल ३१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अर्भकाचा पोलीसांनी दफनविधी पार पाडला आहे.तर पो.नि.आर. एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन , जमादार एस हनवते हे पुढील अधिक तपास करत आहेत.
‘त्या’ निर्दयी माता पित्याविरुद्ध परिसरातून संताप व्यक्त होत आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Friday, December 14, 2018

हजारोंच्या संख्येत ईल्ला भाऊ चा अनोखा वाढदिवस साजरा.

हजारोंच्या संख्येत ईल्ला भाऊ चा अनोखा वाढदिवस साजरा.



भोकर (ए.एम.कुरेशी )
भोकर मध्ये वाढदिवस साजरा करण्याचा सूळसुळात झाला असून त्यामुळे बॅनर बाजी खूप होत आहे. एखाद्या गल्लीत राहणारा पण स्वघोषित भावी नगर सेवक तसेच स्वघोषित भावी आमदार चे बॅनर भोकर मध्ये सध्या लागत आहेत त्यामुळे भोकर चे आंबेडकर चौक येथे व्यवसाय करणाऱ्या व्यापारी लोकांना यांचा त्रास झाला आहे मेन चौक मध्ये बॅनर लावणे म्हणजे त्याच्या दुकाना समोर बॅनर लावणे रोज एक दोन स्वघोषित भावी आमदारचा वाढदिवस होत असतो आणि रोज एक दोन बॅनर लावलेलेच असतात नगर परिषद भोकर यांची परवानगी न घेता हे बॅनर लावले जातात पण नगर परिषद यांच्या वर कोणतीच कार्यवाही नाही करत   
म्हणून भोकर चे सामाजीक कार्यकर्ते खुद्दुस भाई मसालेवाले व त्याच्या मित्रमंडळा तर्फे एका गरीब रशीद टेकडी येथे राहणाऱ्या ईल्ला (मतिमंद) मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला व त्याला खुप मोठा प्रतिसाद मिळाला ईल्ला भाऊ ची मिरवणूक काढण्यात आली त्या मध्ये  हजारो च्या संख्येत भोकरच्या जनतेने सहभाग घेतला एखाद्या फिल्म स्टार आल्या सारखे वाटत होते  एवढा मोठा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे की अत्ता जर एखाद्या कार्यकर्त्यांला वाढदिवस करायचा असेल तर कमीत कमी ईल्ला दादा च्या वाढदिवसा ने मोठा करावा लागेल १२० बॅनर तसेच हजारो च्या संघेत मोठी मिरवणूक 
अता पर्यंत राजकिय व सामाजिक कार्यकर्तेचे व मित्रमंडळाचे वाढदिवस थाटा माटात संपन्न झाले पण भोकर मध्ये या वाढदिवसाचा एक वेगळाच चित्र दिसुन आला असून फेसबुक वॉट्सप वर फक्त ईल्ला भाई ची धूम चालू आहे आज भोकर तालुक्यातील संपुर्ण लोंकाच्या ह्रदयात ईल्ला दादा ने वेगळीच जागा स्थापन केली आहे वाढदिवस व मिरवणूक यशस्वीपणे पारपाडण्यासाठी भोकर चे सामाजिक कार्यकर्ते खुदुस भाई मसालेवाले, व अहेमद भाई, वाजीद भाई ,व नासेर भाई ,
यांनी परिश्रम घेतले मिरवणूकित सहभाग सहकार्याबद्दल भोकर चे सामाजिक कार्यकर्ते खुद्दूस भाई मसालेवाले यांच्या कडून आभार मानण्यात आले.

Thursday, December 13, 2018

परभणीत वसतीगृहामध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या.

परभणीत वसतीगृहामध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या.

                               File Photo
 
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत छताच्या पंख्याला फेट्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रात्री ९. ४५  वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रीष्म मुलांच्या वसतिगृहातील खोली क्र. ६६ मध्ये ही घटना घडली. याबाबत पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

सचिन पंडीतराव मुंढे (वय २०वर्षे, रा.सावरगावमुंढे, ता.लोणार, जि.बुलडाणा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. 11 डिसेंबर रोजी रात्री ९. ४५ वाजता वसतिगृहात तो राहत असलेल्या खोली क्रमांक  ६६ मध्ये सचिन छताच्या पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आल्याचे खोलीत राहणार्‍या गणेश हनुमंत कापावार याने सांगितले. इतर मुलांच्या मदतीने  त्यास खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी  त्यास मृत घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती गणेश कापावार याने नवामोंढा पोलिस ठाण्यात दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
सचिन हा कृषी महाविद्यालयात बी.एस्सी.कृषी तृतीय वर्षात शिकत होता. पदवीच्या सलग तिन्ही सेमीस्टरमध्ये तो नापास झाला होता. परंतु याची कल्पना त्याने कुटूंबियांना दिली नव्हती. शिवाय शुल्क भरण्यासाठी कुटुंबियांकडून घेतलेले पैसेही त्याने खर्च करुन टाकले. त्यामुळे त्यास शुल्क भरण्याकरीता पैसे नव्हते. शुल्क भरण्याची मुदतही संपली असल्याने तो मानसिक तणावात आला असावा. घरचे काय म्हणतील आणि शुल्क कसे भरणार या तणावात असलेला सचिन वसतिगृहात राहण्यासही पात्र ठरणार नव्हता अशी माहिती आहे. त्यामुळे अधिकच तणावात येवून त्याने गळफास घेतला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नरसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू हे करीत आहेत.

Saturday, December 8, 2018

आजच्या लोकन्यायालयात ३९० प्रकरणे निकाली.

आजच्या लोकन्यायालयात ३९० प्रकरणे निकाली.



भोकर : (एजास कुरेशी) भोकर येथील जिल्हा सत्रन्यायालयात येथे दिनांक ०८ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले होते. भोकर तालुका विधि सेवा समिती तर्फे लोक अदालत.
तडजोडीने प्रकरण मिटवा - जिल्हा  न्यायाधीश  शेख.  
विधी सेवा समिती तर्फे लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते जनतेनी तडजोडी करून प्रकरण मिटवा असे आवाहन जिल्हा न्यायाधीश  शेख यांनी केले होते
त्यामध्ये प्रलंबीत आसलेली २५० प्रकरणे ठेवण्यात आली होती. दाखलपूर्ण प्रकरणे २३०० पेक्षा जास्त ठेवण्यात आली होती. ज्यामध्ये विज महावितरण कंपनी, भारतीय स्टेट बँक भोकर, महाराष्ट्र ग्रामिण बँक, देना बँक अदिसह विविध बँकाचे थकीत कर्ज प्रकरण प्रलंबीत होते या सर्व प्रकरणापैफी आज २५० प्रकरणापैकी ५१ प्रकरणे  तडजोडीने मिटवण्यात आले त्यात ६७ लाख ७१ हजार एवढया रकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले. यामध्ये पोटगी , व कौटुंबिक  वाद या मधील भोकर तालुक्यातील सावरगाव मेट येथील राजमणी विठठल पॅरमवाड व विठ्ठल पोशट्टी पॅरमवाड  या जोडप्याचा कौठोंबिक वाद संपूस्टात आणून दोघात समझौता करुन त्यांना साडी चोळी देऊन आहेर केले व पुर्ववत संसार करण्यास पाठविण्यात आले. दखलपूर्व २३०० प्रकरणात दूरध्वनी विभाग , विज वितरण कंपनी, चे भोकर ,हिमायतनगर ,व उमरी थकबाकी वीज पुरवठा खंडित केलेले प्रकरणे व काही बँका व तसेंच न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी जास्तीतजास्त संख्येने तडजोड कऱण्यात आली असून यात ४० लाख ३१ हजार ४५२ एवढ़या  रकमेच्या वसूलीचे अॅवार्ड पास करण्यात आले असे एकूण ३९० प्रकरणे  आज निकाली काढण्यात आले आहे, यामध्ये एकूण १,०८,०२,४५२ एवढ्या रकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले आहे 
यावेळी न्यायाधीश  पठाण न्यायाधीश तळेकर सह ऍड कुंटे.ऍड. लामकाणीकर.ऍड. हाके, ऍड शिवाजी कदम, .ऍड. कुलकर्णी, ऍड सलीम ऍड खाडे सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते 
तालुका विधी सेवा समितीमार्फत अयोजीत हे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी रित्या संपन्न झाली आहे.

Friday, December 7, 2018

प्रेम केला जीवन जगण्या साठी पण केली दोघांनी गळफास घेवून आत्महत्या.

प्रेम केला जीवन जगण्या साठी पण केली दोघांनी गळफास घेवून आत्महत्या.


औंढा ना. (एजास कुरेशी) 
येथील वन विभागाच्या पर्यटन उद्यानाजवळ असलेल्या गोकर्णा माळावर एका प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून गळफास घेत आत्महत्या केली. सदरील घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त अशे की औंढा शहरा पासूनच नजीकच असलेल्या गोकर्णाच्या माळावर आज सकाळी स्थानिक गुराखी गवत घेण्यासाठी गेले असता, त्यांना दुर्गंधी जाणवत असल्याने आजूबाजूला पाहणी केली असता एकाच ठिकाणी झाडाच्या फांदीला दोन प्रेत लटकलेले आढळले, सदर घटना त्यांनी वन विभागाला कळविले नंतर वनपाल एस. एस चव्हाण यांनी औंढा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्यांसह औंढा व हट्टा पोलीस घटना स्थळी दाखल झाले. 

प्रेमी युगलाने त्या ठिकाणी झाडाच्या फांदीला ओढणीचे दोनभाग करून दोघांनी गळफास घेतला. झाडाखाली विषाची व पाण्याची रिकामी बाटली आढळल्यामुळे प्रथम विष प्राशन करून नंतर गळफास घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

प्रेत कुजून दुर्गंधी पसरल्यामुळे ४ ते ५ दिवसांपूर्वीच प्रेमयुगलाने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. 

तरुणीचे शाळेचे दप्तर व ओळखपत्र घटनास्थळी सापडल्यामुळे लगेच मुलीची ओळख पटली.सदर तरुणी औंढा तालुक्यातील दरेगाव येथील ध्रुपता कुंडलिक निंबाळकर वय १८ वर्ष असून येथील नागनाथ विद्यालयात १२ वि वर्गात शिक्षण घेत होती, दिनांक १ डिसेंम्बर रोजी शनिवारी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली व त्यानंतर ती घरी परतली नाही. वडिलांनी तिचा शोध घेवूनही ती सापडत नव्हती, आज तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तर १९ वर्षीय मयत तरुण गजानन कुरुडे हा औंढा तालुक्यातील गावलेवाडी येथील रहिवासी होता, वडील विठ्ठल कुरुडे यांनी मयत हा त्यांचा मुलगा असल्याचे सांगितले.औंढा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सय्यद आजम,पोलीस निरीक्षक राहुल तायडे,जमादार अफसर पठाण यांनी घटनास्थळी पंचनामा केला 

या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक मोरे,डॉ.गजानन वाशीमकर यांनी होते.दोघांचेही प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन केले या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सनातन संस्थेसह कट्टरपंथीय संघटनांचे सदस्य हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी घातपाती करण्याच्या होते तयारीत.

सनातन संस्थेसह कट्टरपंथीय संघटनांचे सदस्य हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी घातपाती करण्याच्या होते तयारीत.

बेधडक महाराष्ट्र online न्युज

(विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रा)
राज्याच्या  विविध भागांतून अटक केलेले तरुण सनातन संस्थेसह अन्य हिंदू कट्टरपंथीय संघटनांचे सदस्य असून, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी घातपाती कारवाया करण्याचा कट त्यांनी आखला होता. इतकेच नव्हे, तर या तरुणांची दहशतवादी टोळीच तयार झाली होती.

समविचारी तरुणांच्या या टोळीने त्यांच्या विचारांशी सहमत नसलेल्या व्यक्‍तींना टार्गेट करण्यासाठी स्फोटकांसह घातक शस्त्रांचा साठा केला आणि त्याच्या सहाय्याने त्यांचा मुंबई, पुण्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा डाव होता, अशा धक्‍कादायक बाबी दहशतवादविरोधी पथकाने विशेष सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राद्वारे उघड झाल्या आहेत.

आरोपपत्रात प्रथमच सनातन संस्थेचा थेट उल्‍लेख -

दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या काही महिन्यांत राज्यभरातून अनेक तरुणांना अटक केली. त्यापैकी काही जणांच्या घरी वा ताब्यात घातक स्फोटके सापडली होती. हिंदू दहशतवाद पसरवण्याचे हे कारस्थान असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांनी तेव्हा केला होता. त्यानंतर एटीएसने कसून तपास करून अनेक धक्‍कादायक बाबी उजेडात आणल्या. यासंदर्भात पकडलेल्या बारा जणांविरोधात सुमारे सहा हजार पानांचे आरोपपत्र एटीएसने विशेष सत्र न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रात पहिल्यांदा सनातन संस्थेचा थेट उल्लेख करण्यात आला आहे.

नालासोपारा, सोलापूर, सातारा येथून पकडलेला स्फोटकांचा तसेच शस्त्रांचा साठा, दोन मोटारी, पाच मोटारसायकल, एका मोटरसायकलचे सुटे भाग, नंबर प्लेट आदी गोष्टी, याखेरीज आरोपींनी शस्त्रे-स्फोटके तयार करून ती चालवण्यासाठी  प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणांचा आणि या सगळ्या कारवायांसाठी मिळालेली आर्थिक मदत या सगळ्याच्या आधारे हे आरोपपत्र एटीएसने दाखल केले आहे.

पकडलेल्या बारा जणांपैकी बहुतेक आरोपींकडे सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधनेच्या पुस्तिका सापडल्या होत्या. त्यात नमूद केलेले हिंदू राष्ट्रनिर्मिती हेच या आरोपींचे ध्येय होते. आपल्या या ध्येयास बाधा ठरणार्‍या विचारसरणीचे  विचारवंत आणि  प्रतिष्ठित व्यक्‍तींच्या हत्यांसाठी या टोळीने केलेल्या हालचालींबाबतही या आरोपपत्रात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बेळगाव, कल्याण येथील सिनेमा थिएटरमधील स्फोटांसह पुण्यातील गेल्या वर्षी झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये घातपात घडविण्याच्या कटाचीही माहिती एटीएसने आरोपपत्रात दिली आहे. गोव्यात केंद्र असलेल्या सनातन आणि हिंदू जागृती या संस्थांचे हे आरोपी सदस्य असून, बॉम्बस्फोट करून सामान्य जनतेत दहशत माजवण्याचा या टोळीचा डाव होता, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

नांदेड : औषध प्याले दारू सोडण्यासाठी पण औषध मूळे झाला मृत्यू.

नांदेड : औषध प्याले दारू सोडण्यासाठी पण औषध मूळे झाला मृत्यू.

                {File photo}   

बेधडक महाराष्ट्र online न्युज

(प्रतिनिधी) एजास कुरेशी
नांदेड - दारू सोडवण्याचे कथित औषध पिल्याने 2 सख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नादेंड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात हा प्रकार घडला. आपले दारुचे व्यसन सोडविण्यासाठी हे दोन्ही भाऊ हदगाव येथे एका घरगुती उपचार करणाऱ्या व्यक्तीकडे गेले होते. मात्र, त्यांच्याकडील औषध पिल्यानंतर या दोघांचाही मृत्यू झाला आहे. 

परळी तालुक्यातील संजय ज्ञानदेव मुंडे (वय 38), विजय ज्ञानदेव मुंडे (वय 35) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. परळी तालुक्यातून दारू सोडवण्याचे कथित औषध घेण्यासाठी ते आले होते. या घटनेने हदगावसह परळीतही खबळब उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येईल. त्यानंतर, त्यांचे मृतदेह कुटुबीयांच्या ताब्यात देण्यात येतील. दरम्यान, हदगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जाणून घ्या, बाबा वांगा बद्दल, आणि त्यांनी केलेल्या महाभयानक भविष्यवाण्यान बद्दल, ते पण सर्व सत्य ठरलेल्या आहेत. (About Baba Vanga, Vangeliya Pandeva Dimitrova)

जाणून घ्या, बाबा वांगा बद्दल, आणि त्यांनी केलेल्या महाभयानक भविष्यवाण्यान बद्दल, ते पण सर्व सत्य ठरलेल्या आहेत. (About Baba Vanga, Vangeliya Pandeva Dimitrova)



बाबा वेंगा
पूर्ण नाव वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवाया
जन्म 31 जानेवारी 1911
मृत्यु 11 ऑगस्ट 1996
वय 85 वर्षे.


(मोहम्मद अझीम)
        भारता मध्ये लोकांना जास्त माहिती नसेल, पण मुळात बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वंगा कोण आहेत, वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवाया वय 12 वर्षे पर्यन्त, त्या सामान्य जीवन जगले. त्यानंतर, एक गूढ वादळामुळे त्याच्या दृष्टीक्षेपात गायब झाले. बर्याच दिवसांनंतर ते कुटुंबाशी भेटले, पण त्याचे डोळे मातीने भरले होते. परंतु याउलट, ते भविष्य पाहण्याद्वारे बर्याच गोष्टी बघत असत.
बुल्गारियाचे एक अद्भुत संदेष्टा बाबा वेंगा खूप चर्चेत आहेत.
त्या HistoryTv 18 च्या एका धारा वाहिक


एशीएन्ट एलियन्स (Ancient Aliens) वर सुद्धा गाजल्या, बाबा वेंगा ला 'बाल्कनमधून नास्ट्रेडॅमस' म्हणून ओळखले जाते. बाबा वंगा हे बुल्गारियामध्ये जन्माला आले होते. रशिया आणि युरोपमध्ये त्यांना संत म्हणून सन्मानित करण्यात आले. 1996 मध्ये 85 वर्षांच्या वयात त्यांचा मृत्यू झाला. 50 वर्षांत वांगा यांनी 100 अंदाज व्यक्त केले. यापैकी बहुतेक सिद्ध झाले. त्यांचा अंदाज हवामान आणि नैसर्गिक आपत्तींशी संबंधित आहेत. जरी त्यांनी राजकीय आणि धार्मिक प्रथा देखील वर्तविल्या आहेत आणि त्यांनी केलेल्या सर्व भविष्यवाण्या ह्या खऱ्या झाल्या आहेत.

बाबा वंगाची भविष्यवाणी :
         अंदाजानुसार, 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेत सुनावणी, फुकुशिमा अपघात, आणि आय.एस.आय.एस सारख्या अतिरेकी संघटना समोर आले, जे की खरे झाले. बाबा वांगा यांंनी 2016 मध्ये युरोपात मुस्लिम अतिरेकी हल्ल्याचीही भविष्यवाणी केली. एवढेच नव्हे तर 2010 मध्ये जे होईल, ते म्हणाले मध्य पूर्व मध्ये संघर्ष सुरू होईल. आगामी काळात मंगळावर युद्ध होणार आहे. असे धक्कादायक अंदाज व्यक्त केले जाणून घ्या.

 2001 मध्ये आफ्रिकन अमेरिकन मूळ, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि सुनामी 2001 हल्ला, आफ्रिकन-अमेरिकन अमेरिकेचे राष्ट्रपती व्यक्ती अमेरिकेचे अध्यक्ष बनली होती आणि 2010 च्या अरब वसंत ऋतुचा अंदाज लावला होता.
      बाबा वंगा यांनी काय केल आणि आगामी काळाबद्दल इतर कोणत्या भविष्यवाण्या केल्या जाणून घ्या. शेवटी, आम्ही तुम्हाला सांगू की बाबा वंगा यांनी पुढच्या काळासाठी धर्म आणि राजकीय भविष्याबद्दल काय भाकीत केले आहे ते पुढील पृष्ठावर धक्कादायक आहे. 2004 च्या जागतिक तापमानवाढीचा आणि सुनामीचाही वाँगने अंदाज वर्तविला होता.

       बाबा वंगा यांच्या अंदाजानुसार शीत क्षेत्र उबदार होतील आणि ज्वालामुखी सक्रिय होतील. समुद्र किनार्यासह प्रचंड लाटांमुळे, शहराचा एक मोठा भाग आणि लोक स्वत: ची समेट करतील आणि सर्व काही जलप्रवाहात गायब होतील.सर्व काही बर्फसारख्या पाण्यात सापडेल. 1980 च्या दशकाच्या अंदाजानुसार रशियन परमाणु पनडुब्बी क्रिस्कच्या बुडण्याची घटना. परमाणु पनडुब्बी पाण्यामध्ये शोषली गेली. अनेक दिवस आंतरराष्ट्रीय बचाव कर्मचारीचें वेदनादायक मृत्यू,

त्यांच्या भाषेतील सत्य व सिद्ध झालेल्या भविष्यवाण्या
हिंदी भाषेत दिल्या आहेत त्या खालील प्रमाणे :
*अमेरिका का 44वां राष्ट्रपति अफ्रीकी-अमेरिकी होगा और   बराक ओबामा अमेरिकी राष्ट्रपति बने.
*जार बोरिस- 3 (1918-1943 तक बुल्गारिया के किंग ) की मौत की तारीख
*चेकोस्लोवाकिया का अलग होना
*लेबनान में दंगे (1968)
*निकारागुआ में युद्ध (1979)
*साइप्रस विवाद (1974)
*इंदिरा गांधी का पीएम बनना और उनकी गोली मारकर हत्या
*सोवियत यूनियन का विघटन
*यूगोस्लोवाकिया का अलग होना
*पूर्वी और पश्चिमी जर्मनी का एक साथ मिलना
*चेर्नोबल में न्यूक्लियर हादसा
*स्टालिन की मौत की तारीख
*सीरिया में सिविल वॉर
*क्रीमिया का अलग होना
*2016 में यूरोप इस्लामी उग्रवादियों के हमले का सामना करेगा। संघर्ष ऐसा होगा कि यूरोप को जानमाल का भारी नुकसान उठाना पड़ेगा विनाश का ये अभियान कई सालों तक चलेगा और पूरा महाद्वीप तकरीबन खाली हो जाएगा
*2018 तक चीन दुनिया का सबसे बडा महाशक्ति बन जाएगा
*2023- धरती की कक्षा में बदलाव आएगा।
*2025- यूरोप की आबादी करीब-करीब शून्य हो जाएगी
*2028- ऊर्जा के नए स्रोत की तलाश में इंसान शुक्र पर पहुंचेगा। खाद्यान्न की कमी खत्म हो जाएगी। बुध की तरफ एक मानव अंतरिक्ष मिशन पर जाएगा
*2033- पृथ्वी की बर्फ की विशाल परत गल जाएगी
*2043- यूरोप में पूरी तरह से इस्लामिक खिलाफत कायम हो जाएगी। दुनिया की अर्थव्यवस्था मुस्लिम शासन के अधीन होगी
2046- में इंसान हर अंग का निर्माण करना सीख जाएगा। अंगों को बदलना इलाज का अहम हिस्सा बन जाएगा
2066- एक मस्जिद पर हमला होने के बाद अमेरिका अभूतपूर्व हथियार का इस्तेमाल करेगा। इससे तापमान अचानक गिर जाएगा 2100- कृत्रिम सूरज धरती के अंधेरे हिस्सों को रोशनी देगा
2111- इंसान और रोबोट मिल जाएंगे. उन्हें साइबोर्स कहा गया है
2154- क्रमिक विकास के चलते जानवर आधे इंसान बन जाएंगे
2170- पृथ्वी अभूतपूर्व सूखे का सामना करेगी
2195- एलियंस की मदद से इंसान पानी के नीचे रिहायशी बस्ती बना लेगा। इन बस्तियों में जमीन जैसे सारे इंतजाम होंगे
2196-एशिया और यूरोप के लोगों मिलने से इंसान की एक नई नस्ल बनेगी
2201-सूर्य की नाभिकीय क्रियायों में बदलाव आएगा. सूर्य फीका पड़ने लगेगा और तापमान गिरने लगेगा
2288- टाइम ट्रैवल संभव हो जाएगा. दूसरे ग्रहों से संबंध बनेंगे
2480- दो कृत्रिम सूर्य आपस में संघर्ष करेंगे। पृथ्वी पर अंधकार छा जाएगा
3005- मंगल पर युद्ध होगा.
ह्या सगळ्या भविष्यवाण्या बाबा वांगा ने केल्या आहेत. आपले अमूल्य मत आम्हाला आमच्या ई-मेल वर कळवा.
Bedhdakmaharashtra24@gmail.com

राम जन्मभूमी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व निर्माता यांच्या वर गुन्हा दाखल करा. - ईलियास कुरेशी

राम जन्मभूमी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व निर्माता यांच्या वर गुन्हा दाखल करा. - ईलियास कुरेशी


बेधडक महाराष्ट्र online न्युज

प्रतिनिधी (एजास कुरेशी)
भोकर : राम जन्मभूमी चित्रपटाच्या ट्रेलर मधून इस्लाम धर्मा विषयी चुकीची माहिती दाखवून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामूळे नुरानी मस्जिद चिखलवाडी भोकर चे सदर मोहम्मद इलीयास मोहम्मद इब्राहिम कुरेशी यांनी  एडव्होकेट मोहम्मद अजीम एडव्होकेट अल्तमश एडव्होकेट मुजाहेद, सुलतान, आखीब, शाह व एडव्होकेट मोहम्मद सलीम यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन भोकर येथे सदरील चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक व लेखक यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रारी अर्ज दिला आहे 
  इस्लाम धर्म येण्यापूर्वी समाजमध्ये स्त्रियांची खूप वाईट अवस्था होती जर मुलगी जन्माला आली तर तिला जिवंत पुरले जायचे त्या काळातील माणसे मुलींना मालमत्ते मध्ये कसल्याही प्रकार चा हक्क देत नव्हतें स्त्रियांना केवळ उपभोगाचे साधन म्हणून वापरायचे व एकेक माणूस पन्नास पन्नास ते शंभर शंभर महिला सोबत लग्न करत होते परंतु जेव्हा इस्लाम धर्म उदयास आला इस्लाम धर्माने महिलांना सन्मानाने जगण्याची एक नवी दिशा दाखवली इस्लाम धर्म हा जगातिल पहिला धर्म आहे ज्यानें स्त्रियांना मालमत्तेमध्ये अधिकार सर्वात प्रथम दिले  इस्लाम धर्म असे सांगतो की ज्यांना चार मुली आहेत व त्यानें त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्यांचा योग्य त्या वेक्तीशी विवाह लावून दिल्यास तो स्वर्गात  जाण्याचा हकदार आहे व तसेच इस्लाम धर्माने जगाला तलाक ची कल्पना सर्वात प्रथम दिली इस्लाम धर्मापूर्वी तलाकची कल्पना जगाला नव्हती तलाक या साठी आहे की जर पती पत्नीचे आपापसात जमत नसेल तर ते त्यांच्या स्वखुशीने व त्यांचे भविष्यातील जीवन चांगले जगण्यासाठी ते तलाक देऊन वेगळे होऊ शकतात व आपले जीवन स्वखुशीने जगू शकतात .

पण राम जन्मभूमी चित्रपटा मध्ये इस्लाम धर्माची प्रतिमा मलिन करण्यासाठी  व इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांवर खूप अत्याचार होतात असे खोटे राम जन्मभूमीच्या ट्रेलर मध्ये दाखवले आहे मुस्लिम बांधवांचा द्वेष निर्माण होत आहे त्यामुळे राम जन्मभूमी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक व निर्माता यांच्या वर लवकारात लवकर कार्यवाही करावी अशी तक्रार भोकर पोलीस स्टेशन येथे केली आहे या तक्रारी मुळे काय कारवाई होईल याकडे भोकरचे सर्व मुस्लिम बांधवाचे लक्ष लागले आहे.

Thursday, December 6, 2018

भोकर शहरात खाजगी सावकारी (फाईनान्स) करणार्यांचा सुळसुळाट गरीब जनतेची खुलेआम लूट.

भोकर शहरात खाजगी सावकारी (फाईनान्स) करणार्यांचा सुळसुळाट गरीब जनतेची खुलेआम लूट.

                {File photo}



भोकर :- (प्रतिनिधी)
भोकर तालुक्यात व्याज,चक्रवाढ व्याज विना परवाना (सावकारी) परवाना न काढताच छोटीशी रक्कम बाजारात गुंतवणूक करून लाखो ची माया जमवताना भोकर येथील अनेक दिग्ज व्यापारी दिसून येत असून देखील सावकारी निंबधक कार्यवाही कार्यालय कोणतीच कार्यवाही करून का दाखवत नाही अशी चर्चा भोकर तालुक्यात सुरू आहे.
नुकतेच घडलेले सविस्तर वृत्त असे की,भोकर तालुक्यातील छोटासा हात गाड्या चा व्यवसाय करून पोट भरत असलेला सईद नगर येथील हात गाडा चालवणारा गरीब युवक यांनी मोंढा परिसरात असलेले सावकार प्रशांत देवराव पाटील यांच्या कडे व्याजा ने (फाईल) रुपये ५००० हजारा ची बनवली असता त्यांनी देय तारीख पर्यंत ५००० हजारा चे ६००० हजार नियमाप्रमाणे देऊन देखील त्या सावकाराने मुलाच्या हात गाड्यावर सहकाऱ्यांनी शी येऊन दमदाटी केली व अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रारी भोकर पोलीस ठाणे व सहायक निबंधक सहकारी संस्था यांना देन्यात आली आहे एकी कडे सावकारी कर्जा मूळे शेतकरी आत्महत्या करत आहे या सावकारांनी अत्ता गरीब हात गाडे वाल्याना आपला शिकार बनवला आहे भोकर च्या सर्व सावकारी (फाईनास) करणाऱ्या वर त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भोकर च्या गरीब जनता करीत आहे . तरी या अर्जावर संबंधित अधिकारी काय त्या सावकारावर कायदेशिर कार्यवाही करतील का ह्या कडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे

बाबरी मस्जिद त्याच ठिकाणी बांधा मुस्लिम समाजाची मागणी.

बाबरी मस्जिद त्याच ठिकाणी बांधा मुस्लिम समाजाची मागणी.

भोकर  (एजास कुरेशी)
6 डिसेंबर1992रोजी धर्माध लोकांनी मिळुन एतेहासिक बाबरी मस्जिद विध्वंस केल्याने संबंध भारतामधील मुस्लिम समाजाची मने दुखावली गेली देशात हिंदू मुस्लिम दंगल उसळली.
 त्यात हजारो निष्पाप भारतीय नागरीकांचा बळी गेला अशया घटना पुन्हा होऊ नये यासाठी  बाबरी मस्जिद विध्वंस करणार्याना कठोर शिक्षा व बाबरी मस्जिद त्याच ठिकाणी बांधण्या च्या मागणी जमियत  उलैमा ए हिंद वतीने करण्यात आली

दि 6डिसेंबर गुरुवारी भोकर येथील  मुस्लिमांनी आपली दुकाने बंद ठेऊन बाबरी मस्जिद विध्वंस करणार्याना कठोर शिक्षा व मस्जिद त्याच ठिकाणी बाधणया च्या मागणी साठी 
मक्का मस्जिद सोहराबपुरा येथुन उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत एक मुक रैली काढुन उपविभागीय अधिकारी भोकर मार्फत राष्ट्रपती भारत सरकार ला निवेदन पाठविण्यात आले त्यावेळी  जमियत ए उलैमा चे मौलाना मुबिन खाँन, भोकर नप उपाध्यक्ष प्रतिनिधी  शेख युसुफ, काजी जमील, मौलाना हाफिज कामरान, हाफिज शुजाऔद्दिन, हाफिज सद्दाम, काजी मौलाना, मस्लियोद्दीन,अँड मुजाहेद ,शेख अँन्ड अल्तमश,ह मीद खाँन पठान, जवाजोद्दिन बडबडेकर, सऊद गौंदवाले, टिपू सुल्तान संघटनेचे निजाम बाबा  सय्यद जुनेद, बाबा खाँन सनाओद्दीन ईनामदार अफसर भाई  जुनेद पटेल रफीख खतीब ईरशाद पठान आसीफ तामसेकर व तसेच मुस्लिम  समाज बांधव मोठया संख्येने उपस्थितीत सहभागी झाले होते.

Tuesday, December 4, 2018

त्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड अटकेत, आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित.

त्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड अटकेत, आरोपी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित.


लखनऊ:: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या संशयावरुन मोठा भडका उडाला होता  यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला होता . अवैध कत्तलखान्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी येथील पोलीस स्टेशनला पेटवून दिले. तसेच मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. त्यानंतर एका पोलीस व्हॅनला आग लावण्यात आली होती

 बुलंदशहरामध्ये उसळलेल्या दंगलीमागच्या मुख्य सुत्रधाराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. या दंगलीप्रकरणी आतापर्यंत 75 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दंगलीतील मुख्य सुत्रधारासह तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या मुख्य सूत्रधाराचे नाव योगेश राज असून, तो प्रवीण तोगाडिया यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.  त्याच्यावर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना भडकवल्याचा आरोप आहे. 

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये योगेश राज याचे नाव आहे. योगेश राज याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून जमावाला भडवले, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. योगेश राजसोबत उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल ( माजी अध्यक्ष, भाजयुमो) यांची नावेही  पोलीस अधिकारी सुबोध सिंह यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये आहेत. दरम्यान, देवेंद्र, चमन आणि आशीष चौहान यांना अटक करण्यात आली आहे.  बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली होती.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच एक दंगलखोरही या हिंसाचारात मृत्युमुखी पडला.

Monday, December 3, 2018

भरधाव ट्रकची बसला धडक, 25 हून अधिक जखमी.

भरधाव ट्रकची बसला धडक, 25 हून अधिक जखमी.

नांदेड-नागपूर महामार्गावर आसना पूलाजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदेडहून येणाऱ्या नांदेड-पुसद (एम.एच.२० बी.एल.१७४०) या बसला नांदेडच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये बसमधील 25 हून अधिक प्रवासी जखमी झालेत. जखमींमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. मात्र, अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्याचं समजतंय.

(विधर्मीय) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या त्या आरोपीला १० वर्ष कारावासाची शिक्षा.

(विधर्मीय) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या त्या आरोपीला १० वर्ष कारावासाची शिक्षा.


बेधडक महाराष्ट्र online न्युज

भोकर :(एजास कुरेशी) 
भोकर : तालुक्यातील माै.बोरगाव(सुधा) येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन (विधर्मीय) मुलीस लग्नाचे अमिष दाखऊन पळऊन नेऊन तिच्यावर सतत बलात्कार करणा-या तरुणास भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी १० वर्ष कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
माै.बोरगाव(सुधा) ता.भोकर येथील रहिवासी असलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखऊन त्याच गावातील रहिवाशी असलेला तुळशीराम बापूराव गुंडूले या तरुणाने तिच्या घरुन सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान पळऊन नेले.या प्रकरणी दि.६ एप्रिल २०१७ रोजी त्या मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळशीराम गुडूले विरुद्ध फुस लाऊन पळऊन नेल्याचा गुन्हा भोकर पोलीसांत दाखल करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास पो.उप. नि.सय्यद शरफोद्दीन यांच्याकडे देण्यात आला असता तपासात सदरील मुलगी व तो तरुण पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाली.या माहितीवरुन पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन,पो.ना.प्रकाश व्यवहारे, पो.काॅ.राजेंद्र इंगोले यांनी पुण्यातून त्या दोघांना पकडले व भोकर पोलीसात आणले.करण्यात आलेल्या चाैकशी दरम्यान माहिती समोर आली की,तुळशीराम गुंडूले या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीसोबत गैर कायद्याने लग्न केले व तिच्यावर सतत बलात्कार केला.यात ती गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात ही करण्यात आला.यावरुन सरकार पक्षातर्फे पुर्वीच्या गुन्ह्यात बलात्कार व बाल लैंगीक अत्त्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत भा.द.वि.च्या विविध कलमांनुसार वाढ करण्यात आली. पो.नि.आर.एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.नि.सय्यद शरफोद्दीन व त्यांच्या सहकारी कर्मचा-यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला आणि तपासाअंती दि.१५ डिसेंबर २०१७ रोजी ९२/२०१७ नुसार भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात सदोष दोषारोपपत्र दाखल केले.
दरम्यानच्या काळात भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात सदरील गुन्ह्यातील ८ साक्षीदार तपासण्यात आले.यावेळी सरकारी वकील अॅड.रमेश विनायकराव राजूरकर व आरोपीच्या वकीलात युक्तीवाद झाला.यात काही साक्षीदार व पिडीत मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल हा आरोपीच्या विरुद्ध गेला.या सबळ पुराव्यांच्या सिद्धतेवरुन मा. जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी दि.३ डिसेंबर २०१८ रोजी तुळशीराम बापूराव गुंडूले यास १० वर्ष कारावास,१० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त ६ महिने कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.

Sunday, December 2, 2018

पॅनकार्डमध्ये होणार हे सहा बदल.

पॅनकार्डमध्ये होणार हे सहा बदल.


आर्थिक व्यवहारांसाठी आणि इतर सरकारी कामकाजात ओळखपत्र म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्राप्तिकर विभागाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. यानुसार 5 डिसेंबरपासून पॅनकार्डसाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. पॅनकार्डमध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी अनेकांनी अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार पॅनकार्डमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. 
पॅनकार्डवर वडिलांचे नाव लिहिणे अनिवार्य असणार नाही. या अगोदर वडिलांचे नाव बंधनकारक होते. मात्र, यापुढे पॅनकार्डसाठी अर्ज करताना वडिलांचे नाव लिहिण्याची अट प्राप्तीकर विभागाने रद्द केली आहे.

आर्थिक वर्षात 5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणार्‍यांकडे पॅनकार्ड नंबर असणे अनिवार्य असणार आहे.

आर्थिक वर्षात 2.5 लाखांपेक्षा अधिक व्यवहार करणार्‍यांसाठी पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे. मात्र यासाठी 31 मे 2019 पूर्वी पॅनकार्डसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

आई एकमेव पालक (सिंगल पॅरेंट) असलेल्या अर्जदारांसाठी सुधारीत नियम दिलासादायक आहेत. या अर्जदारांना फक्त आईचे नाव पॅनकार्डवर लावण्याची इच्छा असल्यास तसा पर्याय ते निवडू शकतात.
करचोरी थांबवण्यासाठी आणि काळा पैसा नियंत्रित करण्यासाठी हे नियम नक्कीच फायदेशीर ठरतील.
घरगुती कंपन्यांना देखील पॅनकार्ड आवश्यक असणार आहे. या कंपन्यांची आर्थिक वर्षात होणारी विक्री, उलाढाल 5 लाखांपेक्षा कमी असली तरी पॅनकार्ड असणे बंधनकारक असणार आहे.

लोकपाल’साठी अण्णा हजारेंचे पुन्हा उपोषणास्त्र.

लोकपालसाठी अण्णा हजारेंचे पुन्हा उपोषणास्त्र.


लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्तीसह विविध मागण्यांसाठी हजारे यांनी 2 ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त केले होते. त्यावेळी देण्यात आलेल्या आश्‍वासनांची अद्याप पूर्तता न झाल्याने हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात वाढत चालेल्या भ्रष्टाचारास कंटाळून जनतेने 2011 मध्ये लोकपाल, लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. 

रामलिला मैदानावर आपण केलेल्या आंदोलनानंतर 1 जानेवारी 2014 रोजी लोकपाल, लोकायुक्त कायदा अस्तित्वात आला. आता देशातील भ्रष्टाचारास आळा बसेल, अशी आशा जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आंदोलनानंतर मोदी सरकार सत्तेत आले.     मात्र, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती झालीच नाही. त्यासाठी मोदी सरकारकडे आपण 30 वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, या पत्रांचे साधे उत्तरही देण्यात आले नाही. सुरुवातीस विरोधी पक्षनेता नाही, ज्येष्ठ विधिज्ञ नाही, अशी कारणे सांगून लोकपालाची नियुक्ती टाळली गेली. 

लवकरात लवकर लोकपाल, लोकायुक्त नियुक्त करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अनेकदा फटकारले. तरीही काही ना काही कारणे देत केंद्राने या नियुक्त्या करणे टाळले. मोदी सरकारने चार वर्षे बहाणेबाजी करीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर 23 मार्च 2018 रोजी आपण पुन्हा दिल्लीत रामलिला मैदानावर उपोषण सुरू केले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाने लेखी आश्‍वासन देताना सांगितले की, लवकरात लवकर लोकपाल, लोकायुक्त नियुक्त करू. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण 2 ऑक्टोबर रोजी पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यावेळीही दोन्ही नियुक्त्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे पंंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या विनंतीनुसार आपण ऑक्टोबरमध्ये आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला. 

लोकपाल व लोकायुक्त हा आपला वैयक्‍तिक नव्हे तर, देशातील भ्रष्टाचार रोखण्याचा प्रश्‍न आहे. चर्चेतून प्रश्‍न सुटतात यावर आपला विश्‍वास आहे. मात्र, आता असे वाटत आहे की, सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. सरकारला साडेचार वर्षांचा कालावधी झालेला आहे. एवढा प्रदीर्घ कालावधी उलटल्यानंतरही लोकपालाची नियुक्त होत नाही. यावरून हे स्पष्ट होते की, सरकारला लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची इच्छा नाही. सरकारने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती झाली नाही, तर पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 30 जानेवारी पासून आपण राळेगणसिद्धीत उपोषण करणार असल्याचे हजारे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

नांदेड: पूर्ण गावच करतोय गांजाची ची शेती पोलिसांनी केला शेतातील गांजा जप्ती.

नांदेड: पूर्ण गावच करतोय गांजाची ची शेती पोलिसांनी केला शेतातील गांजा जप्ती...!!




बेधडक महाराष्ट्र online न्यूज

एजास कुरेशी
नांदेड :- किनवट तालुक्यातील अंदबोरी ( ची ) ची ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या रामपूर पोतरेड्डी या अति दुर्गम व डोंगराळ भागात गावाच्या शिवारातील शेतावर छापे मारून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली गांजाची शेती पोलिसांनी उघडकीस आणली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

याबाबत मिळालेली माहिती अशी की रामपुर ( पोतरेड्डी )  तालुका किनवट हे गाव तेलंगाना सीमेवरील डोंगराळ व दुर्गम भागात वसलेले आहे या गावातील शेतकरी खातेदारांच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती करण्यात येत आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस प्रमुख संजय जाधव अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षय कुमार शिंदे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली  ( दि .30 रोजी) स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने किनवट  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप विडके , सपोनी विजय कांबळे व त्यांच्या सहकारी पोलीसांनी रामपूर शिवारातील शेतात छापे घातले असता जवळपास 35 शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती केल्याचे आढळून आले  पोलिसांनी गांजा जप्तीची कारवाई सुरू केलेली आहे ही कारवाई आजही दिनांक एक डिसेंबर रोजी सुरू आहे तसेच ही कारवाई येत्या तीन ते चार दिवस चालणार असल्याची शक्यता पोलिसांनी पोलिस सूत्रांनी व्यक्त केली रामपूर हे गाव अति दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले आहे या भागात 35 खातेधारक मथुरा (लमाण )समाजाचे शेतकरी आहेत पंधरा दिवसांपूर्वी या गावात एक पारधी समाजाचा व्यक्ती भिक्षा मागण्याकरीता गेला होता त्यांनी एका शेतातील गांजाचे झाड उपटून सोबत घेतले होते यावरून शेती मालकाने त्याला जबर मारहाण केली यावेळी त्याने तुमची बघून घेतो अशी धमकी दिली हा प्रकार इतर शेतकऱ्यांना कळल्याने त्यांनी पारधी व त्या शेतकऱ्यांमध्ये समेट घडवून आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ,हे प्रकरण त्या पारधी व्यक्तीने पोलिसांच्या कानावर टाकल्याची शक्यता आहे काही वर्षापूर्वी या गावात छापा टाकून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता त्यानंतर असल्याचे समजते कालपासून करण्यात येणाऱ्या कारवाईत जवळपास दोन ट्रॅक्टर गांजा जप्त करण्यात आलेला आहे अजूनही कारवाई सुरूच आहे कारवाई सुरू असल्याने अद्याप पर्यंत किनवट पोलीस स्टेशनला कुठलीही नोंद झालेली नाही  उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव चौधरी हे त्यागावी तळ ठोकून बसले आहेत.

Friday, November 30, 2018

अबब...! आश्चर्यजनक सात वर्षाची गाय तब्बल 1400 किलो वजनाची. {Knickers cow}

अबब...! आश्चर्यजनक सात वर्षाची गाय तब्बल 1400 किलो वजनाची. {Knickers cow}


(अझीम शेख)
सिडनी : आपल्या कडे अलीकडच्या काळात गाई चा विषय निघाला की, राजकीय चर्चेला अनेक तोंड फुटते, मात्र ऑस्ट्रेलिया मधील एक गाय सध्या वेगवेगळ्या चर्चेचा विषय बनली आहे, या गाईचा अगडबंब उंची आणि वजनाने जगभरातील लोकांना बुचकळयात टाकले आहे, सरासरी माणसाची उंची सहा फूट राहते, ही गाय मात्र सहा फुटांपेक्षा जास्त उंच आणि वजन तब्बल 1400 किलो वजनामुळे ही गाय सध्या चर्चेत आली आहे, सोशल मीडियावर नेटीझन्स तिच्या बाबत, मजेदार प्रतिक्रीया देत आहेत, या गाईचं नाव निकर्स knickers असे आहे, सात वर्षाच्या निकर्सची किंमत 396 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच ₹ 20,211/- रुपये इतकी आहे, गाईची उंची जास्त असल्यामुळें त्याचें आयुर्मान वाढते असे म्हटले जाते, सोशल मीडियावर ही गाय सध्या चर्चेचा विषय बनली आहे या आधी इटली मधील एक गाय अशीच चर्चेत होती. ही गाय सध्या सात वर्षाची असून, तिच्या विद्यमान मालकाने तीन वर्षांची असतांना तिला विकत घेतले होते.

भोकर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण क्षमताबांधणी व जनजागृती कार्यशाळा संपन्न.

भोकर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण क्षमताबांधणी व जनजागृती कार्यशाळा संपन्न.


भोकर (एजास कुरेशी)
नगर परिषदच्या वतीने आज दिनांक 30 नोव्हेंबर  रोजी मुख्याधिकारी नितीन बागुल  यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता नगर परिषद  कार्यालय व जागरण पहेल-डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद  प्रांगणात स्वच्छ सर्वेक्षण 2019 क्षमता बांधणी व स्वच्छता जनजागृती कार्यशाळेचे आयोजन यशवीरीत्या करण्यात आले . सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेख युसुफ उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी , विक्रम क्षीरसागर व नगरसेवक शेख गफार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यशाळेस दिनदयाळ  अन्तोदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद मधील स्थापन  करण्यात आलेले बचत गट ,   शहरातील  बहुसंख्य नागरीकासह व सर्व नगर परिषद कर्मचारी वर्ग  उपस्थिती दर्शविली. श्री विलास वन्नजे व गोपाल कांबळे यांनी  नागरिक व बचत गट स्वच्छता विषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मान्यवराच्या हस्ते बचत  गटांना डस्टबिन वाटप  करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  न.पं.चे श्री सुनील कल्याणकर स.प्रकल्प अधिकारी यांनी केले,. याप्रसंगी न.पं. चे कर निर्धारक श्री अशोक भोसले , राजू पदे स्वच्छता विभाग प्रमुख ,व तसेच प्रमुखाने सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुखाला अटक.

दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुखाला अटक.
  File photo 
हिंगोली जिल्ह्यातील कलमनुरी येथील 
प्रपत्र ड मधील मंजूर घरकुलाचे नाव अ किंवा ब यादीत बदलून देण्यासाठी दहा हजाराची लाच घेणार्‍या कळमनुरी पंचायत समिती शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख बालाजी गोरे यास एसीबीच्या पथकाने आज शुक्रवारी (दि.30) दुपारी साडेबाराच्या सुमारास अटक केली. ही कारवाई नादेड-हिंगोली रस्त्यावरील आखाडा बाळापूर येथील तुळजाई हॉटेलसमोर केली. यावेळी गोरे यास लाचेच्या रक्‍कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील तक्रारदाराने त्याच्या नावे तसेच वडील व भावाच्या नावाने मंजुर झालेल्या प्रपत्र ड यादीतील घरकुल मंजूर झाले होते. त्या यादीची पडताळणी करण्याची जबाबदारी कळमनुरी पंचायत समिती शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. प्रपत्र ड मधील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने आपले नाव अ किंवा ब यादीत घ्यावे अशी विनंती गोरे यांच्याकडे केली असता, गोरे यांनी प्रत्येकी पाच हजाराची मागणी केल्याची तक्रार दि.29 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तडजोडीअंती दहा हजार देण्याचे ठरले. या तक्रारीची पडताळणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक रविंद्र थोरात यांनी केली असता, त्यात तत्थ आढळले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचून दुपारी साडेबाराच्या सुमारास आखाडा बाळापूर येथील तुळजाई हॉटेलसमोर केंद्र प्रमुख बालाजी गोरे यास तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर गोरे यांना कळमनुरी पंचायत समिती कार्यालयात पुढील तपासासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपाधिक्षक रविंद्र थोरात, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, जमादार उमर शेख, सुभाष आढाव, अभिमन्यू कांदे, विजय उपरे, प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, गजानन आगलावे, रूद्रा कबाडे, संतोष दुमाने, शेख जमीर यांच्या पथकाने केली.

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम हायकोर्टात जाणार.

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम हायकोर्टात जाणार.

बेधड़क महाराष्ट्र न्यूज़
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने मुस्लीम आरक्षणासाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, पण मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हायकोर्टात जाऊ’, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सरकार असताना मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आरक्षणाची टक्केवारी ७३ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये हायकोर्टाने मराठा आणि मुस्लीम समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली होती. मुस्लीम समाजाला सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली होती. तर सरकारी शिक्षण संस्थांमधील आरक्षणाला हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला होता.
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चे काढण्यात आले. आरक्षणासाठी सरकारवर दबाव वाढला होता. अखेर गुरुवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले असून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले आहे. मराठा समाजानंतर आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही आव्हान देणार नाही. मात्र, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करु’, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. मुस्लीम समाजाच्या आरक्षणासंदर्भात हायकोर्टात नवीन आकडेवारी सादर करु, असे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा आनंदच, पण मुस्लिम आरक्षणाचे काय ? - इम्तियाज जलील.


मराठा आरक्षणाचा आनंदच, पण मुस्लिम आरक्षणाचे काय ? - इम्तियाज जलील.

औरंगाबाद : सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले त्याचे स्वागतच आहे, पण मग 2014 मध्ये उच्च न्यायालयाचे आदेश असतांना मुस्लिम समाजाला आरक्षण का दिले नाही ? असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी "सरकारनामा'शी बोलतांना केला. न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लिम आरक्षणासाठीही एखादा आयोग नेमला असता तर आम्हालाही न्याय मिळाला असता असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला. 
सभागृहात कुठलेही विधेयक मंजुर करण्याआधी त्यावर चर्चा होणे महत्वाचे असते. सभागृहाचे सदस्य म्हणून तो आमचा अधिकार आहे. पण या सरकारने राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर न ठेवता थेट एटीआर आणि त्यानंतर विधेयक मंजूर करून घेतले. त्यामुळे सभागृहाचे सदस्य म्हणून आमच्या अधिकारांवर देखील सरकारने गदा आणल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला. 
मराठा, मुस्लीम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची मागणी होती. पैकी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने राज्य मागसवर्ग आयोगाची स्थापना केली आणि त्या अहवालावरून आरक्षण जाहीर केले. मराठा बांधवांना आरक्षण मिळाले याचा आनंदच आहे, पण मग मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी यापुर्वी नेमलेल्या रंगनाथ मिश्रा, सच्चर आणि मेहमूद रहेमान आयोगाने दिलेले अहवाल आणि शिफारशी स्वीकारून त्या आधारे तत्कालीन सरकारने आरक्षण का जाहीर केले नाही? असा प्रश्‍न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. 
मुस्लीम समाजाला आतापर्यंत आरक्षण मिळाले नाही याला कॉंग्रेस-आघाडी सरकारच जबाबदार असून केवळ सत्तेसाठी त्यांनी मुस्लिमांचा फुटबॉलसारखा वापर केला. मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील ज्या शिफारशींवरून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे तो प्रकार घातक आणि हिंदु-मुस्लिम समाजात भेदभाव निर्माण करणारा असल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला. 
मुस्लिमांची सामाजिक परिस्थिती अधिक गंभीर.. 
राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालामध्ये 36 टक्के मराठा समाजाकडे नळ जोडणी आहे, सरकारी नोकरीत मराठा समाजाचे प्रमाण 6 टक्के आहे, 30 टक्के लोकांकडेच पक्की घरे आहेत असे नमूद केले आहे. या आधारे मराठा समाजाला मागास ठरवण्यात आले असेल तर हा घातक प्रकार आहे. मग मुस्लिम समाजाची सामजिक परिस्थिती दर्शवण्यासाठी रंगनाथ मिश्रा, सच्चर, मेहूमुद रहेमान कमिशनने देखील आपल्या अहवालात मुस्लिमांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती भयंकर असल्याचे नमूद केले होते. 
मराठा समाजापेक्षाही मुस्लीम समाजाची अवस्था बिकट असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते, मग तो स्वीकारून त्यावेळच्या सरकारने मुस्लिमांना आरक्षण का दिले नाही ? याचा पुनरुच्चार इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात 2013-18 दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यात 2112 शेतकरी हे मराठा होते असे देखील मागासवर्ग आयोगाने अहवालात म्हटले आहे. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देखील तुम्ही जात बघणार आहात का? मग उद्या मुस्लिम, धनगर जातीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का? मग तुम्ही त्यांनी आरक्षण देणार आहात का? हा सगळा प्रकार भयंकर आहे. पण मुस्लिम समाज आत्महत्या करणार नाही, आम्ही आरक्षणासाठी न्यायालयात लढा देऊ आणि ते द्यायला सरकारला भाग पाडू असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

Monday, November 26, 2018

वॉट्सएप्प ग्रुपमध्ये महिलेला अॅड करून शेअर केले अश्लील व्हिडीओ; अॅडमिनला अटक.

वॉट्सएप्प ग्रुपमध्ये महिलेला अॅड करून शेअर केले अश्लील व्हिडीओ; अॅडमिनला अटक.


व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये एका महिलेला अॅड करून त्या ग्रुपमध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ शेअर करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला त्याचा फाजीलपणा महागात पडला आहे. माटुंगा पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या त्या ग्रुप अॅडमिनला अटक केली.

माटुंगा परिसरात राहणाऱ्या एका 44 वर्षीय महिलेने माटुंगा पोलिसात याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून उपनिरीक्षक मारुती शेळके यांनी त्या ग्रुपचा अॅडमिन मुश्ताक अली शेख (24) याला पश्चिम बंगाल येथे जाऊन अटक केली.

त्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना व्हॉटस्अॅपच्या ट्रिपल एक्स नावाने असलेल्या गुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्या ग्रुपमधील कोणालाच त्या ओळखत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी त्या ग्रुपकडे दुर्लक्ष केले आणि त्या ग्रुपमध्ये तशाच राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्या ग्रुपवर आलेले मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण ते सर्व अश्लील मेसेजेस, व्हिडीओ होते. त्यामुळे त्यांनी लगेच माटुंगा पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे याप्रकरणी भादंवि कलम 345, आयटी अॅक्ट 66, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला गेला.

भोकर येथे टिपू सुल्तान आणि अब्दुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती थाटामाटात संपन्न.

भोकर येथे टिपू सुल्तान आणि अब्दुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती थाटामाटात संपन्न.



भोकर:(एजास कुरेशी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भोकर येथे मोठ्या उत्साहात ह.टिपू सुल्तान आणि डॉ. अबुल कलाम आझाद यांची संयुक्त पणे जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली.
    रविवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान शहरातील सईद नगर येथून फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताष्याच्या गजरात हज़ारों च्या संखेत टिपूसुल्तान यांच्या तैल चित्रांची मिरवणूक काढण्यात आली, ही मिरवणूक डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे शिवाजी महाराज चौक, बस्थानक,लहुजी चौक मार्गे नियोजित फुले नगराजवळ असलेल्या टिपूसुल्तान यांच्या चौकात विसर्जित झाली, मिरवणूक यशस्वीपणे पारपाडण्यासाठी टीपूसुल्तान संगठने चे भोकर तालुका अध्यक्ष निजाम बाबा भोकर युवावर्ग चे चहिते बनले आहे व तसेच शाहरुखखान,इर्शादखान ,मोहसीन भाई(दाऊद), जुनेद पटेल पत्रकार फहीम शेख सन्ना भाई ईनामदार यांनी जयंती यशस्वी करण्या साठी  परिश्रम घेतले,
मिरवणूकीतील सहभाग सहकार्याबद्दल भोकर टीपू सुल्तान संघटनें चे अध्यक्ष निज़ाम बाबा यांच्याकडून आभार मानण्यात आले 
 तर मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलिस निरीक्षक पडवळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नांदेड़: चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार.

नांदेड़: चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार
बेधडक महाराष्ट्र online न्यूज़

नांदेड , दि. २७ :- नांदेड जिल्ह्यातील उमरी शहरातील व्यंकटेश नगर भागात असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रविवारी मध्ये रात्री तिघां नराधमानी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे याप्रकरणी मुलीचे जवाबी वरून तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. उमरी शहरातील वेंकटेश नगर भागात आई व फिर्यादी मुलगी हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे रविवारी मध्यरात्री या कुटुंबाच्या घरी तीन युवकांनी रात्री एक च्या सुमारास दरवाजा उघडण्यास भाग पाडले आत प्रवेश करताच चाकूचा धाक दाखवून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना झाली याप्रकरणी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादीची व आई तिच्यासोबत या दोघांनी उमरी पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकीकत सांगितली लगेच याप्रकरणी उमरी पोलिसांनी सतर्कता दाखवून सामूहिक बलात्कार केलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे या याप्रकरणी उमरी पोलिसांनी पिडीत मुलीचे व आईचे जवाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे यानंतर मुलीचे मेडिकल करण्यात आले आहे याप्रकरणी आज दिवसभर शहरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात पोलीस उपअधीक्षक ए बी देशपांडे व पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके स्वतः जातीने लक्ष देऊन तात्काळ घटनेनंतर लगेच तिन्ही आरोपींना अटक करून मोठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे दिलेल्या पीडित मुलीच्या जबाबी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपअधीक्षक ए बी देशपांडे भोकर हे तपास करीत आहेत

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मारल्या इसापूर धरणात उड्या सर्वच कार्यकर्ते आंदोलन करून सुखरूप बाहेर पडले.

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मारल्या इसापूर धरणात उड्या
सर्वच कार्यकर्ते आंदोलन करून सुखरूप बाहेर पडले.


नांदेड (एजास कुरेशी) तीन दिवसाच्या नंतर आज अखेर सकाळी गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला चकमा देत प्रहारचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे यांच्या मार्गद्शनाखाली कार्यकर्त्यांनी दि.२५ सकाळच्या रामप्रहरी जय जवान जय किसानचा नारा देत इसापूर धरणात उड्या घेऊन आंदोलन पूर्ण केले आहे.

इसापूर धरणावर प्रहारचे कार्यकर्ते उड्या मारण्यासाठी येणार असल्याचे समजताच हजारो पोलिसांचा बंदोबस्त लावून त्यांना २ किमी आकडेच अडविण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवस प्रश्नाच्या निगराणीत राहून थंडीमुळे गाढ झोपलेल्याना चकमा देऊन गनिमी काव्याने अखेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इसापूर धरणात उड्या मारल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उड्या मारणारे सर्वच प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन पूर्ण करून सुखरूप बाहेर पडल्यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या प्रशासनाने सुटकेचे निश्वास सोडला आहे. या आंदोलनात महागाव येथील: उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे, रियाज पारेख, महागाव तालुका प्रमुख पवन धरणकर, शहर प्रमुख रानू कुरेशी, शेखर माहूरे, सागर डोंगरे, अक्षय भालेराव, अभिजीत कांबळे, निलेश खंदारे, ढाणकी प्रमुख माजिद शेख, नांदेड़ जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख, नांदेड उपजिल्हाप्रमुख बालाजी बालपेलवाड, हिमायतनगर तालुका प्रमुख गजानन ठाकरे, हदगाव तालुका प्रमुख अनिल पाटिल कदम, कार्याध्यक्ष बालू पाटिल शिरपुले, युवाध्यक्ष गणेश कदम, सुभाष देशमुख हदगाव, यांच्यासह अनेक प्रहार कार्यकर्तै या शेतकरी हितार्थ अंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर प्रहार संघटना नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी कोणत्या पद्धतीचे आंदोलन करते हे येणार्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यानंतर तरी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधिकारी धरणातील पाणी नदीमध्ये सोडतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thursday, November 22, 2018

डिजिटल जुगार अड्ड्यावर छापा, लुडो खेळणाऱ्यांवर महाराष्ट्रातील पहिली कारवाई

डिजिटल जुगार अड्ड्यावर छापा, लुडो खेळणाऱ्यांवर महाराष्ट्रातील पहिली कारवाई

                                              (File Photo)

हिंगोली(प्रतिनिधी)
हिंगोली :  हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यातील चुंचा येथे मोबाईलवर लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्या सात जणांवर बुधवारी आखाडा बाळापूर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. त्‍यांच्‍याकडून 28 हजार रुपये रोख व सहा मोबाईल जप्‍त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे मोबाईलवर लुडो खेळणाऱ्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्रातील बहुतेक पहिलीच कारवाई आहे.
चुंचा येथे राष्ट्रीय महामार्गाच्‍या बाजूला एका लिंबाच्‍या झाडाखाली काहीजण मोबाईलवर पैसे लावून लुडो हा डिजिटल जुगार खेळत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्‍या पथकाने आज दुपारी साध्या वेशात जावून छापा टाकला.
यामध्ये संजय परसराम मोहिते, सुनील  कनके, गणपत  पवार, परसराम  जाधव, पांडूरंग चंद्रवंशी, सय्यद आरेफ, रामराव शेळके हे लुडो जुगार खेळत असल्‍याचे आढळून आले. पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून 28 हजार रुपये व 30 हजार रुपयांचे सहा मोबाईल जप्‍त केले आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.
दरम्‍यान, आखाडा बाळापूर परिसरात मागील काही दिवसात जुगार अड्ड्यावर छापे टाकले जात असताना डिजिटल जुगाराचा नवा फंडा सुरु झाला आहे. पोलिसांच्या पथकाने हा फंडाही उद्‍ध्‍वस्‍त केला आहे.

Wednesday, November 21, 2018

नांदेड़ शिवाजी नगर पुलिस्टेशन मध्ये लाचेची मागणी बाबत गुन्हा दाखल.

नांदेड़ शिवाजी नगर पुलिस्टेशन मध्ये लाचेची मागणी बाबत गुन्हा दाखल.


नांदेड:-(प्रतिनिधी)नांदेड़ येथील शिवाजी नगर पुलिस स्टेशन मध्ये लाचेची मागणी करत असलेल्या दोन पोलीसावर लाचलूत पत प्रतिबंध ने गुन्हा दाखल केला आहे
 तक्रारदार वय- २७ व्यवसाय- शिक्षण रा. वाल्मिकनगर नादेड यांनी दोन पोलीस बद्दल दिलेली तक्रार लाचलुच पत ने  प्रतिबंधक अधिकारी  पडताळणी केली असता दोन आरोपी पोलीस कॉन्स्टेबल आरोपी म्हणून दोषी आढळून आले असता त्यांच्यावर कार्यवाही झाली आहे त्यांनी केलेली पैसेची मागणी त्यांना त्याचे नसल्याने त्यांनी त्याबद्दल ला. प्र. आ. नांदेड यांना दिलेल्या तक्रारी वर नामे असे की आरोपी  १)सुनिल बाजीराव लहाणे  सपोनि  पो.स्टे.शिवाजीनगर नादेड
2) केशव केरबा हाके पोहे काँ १७८४ पो.स्टे.शिवाजीनगर नादेड  यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचेची मागणी २५,०००/-रुपये
 लाच स्विकारली- ००हस्तगत रक्कम-००लाचेची मागणी -ता.१६/११/२०१८ लाचेचे कारण - यातील तक्रारदार यांचा भाऊ यांना पिसीआर दरम्यान चांगली वागणुक व क.३०७भादवि कमि करुन क.३२४ लावण्यासाठी म्हणुन आ लो से क्र १ यांनी ५०,००० रुपये लाचेची मागणी करुन  तडजोडी अंती २५,००० लाचेची मागणी केली व आलोसे नं.2 यांनी प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे पण पोलीस शातीर असल्याने त्यांना तक्रारदार कडे दि १६ पासून आज रोजी पर्यंत कसल्याच प्रकारे जवळीकता दाखवली नाही चार दिवस वेगवेगळ्या प्रकारे सापळा रचून काही न सापडल्या ने वरिष्ठ अधिकारी यांनी मागील फोन वरील समभाषण नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पैसेची मागणी केली हे निश्चित स्पष्ट केले असल्याने आज २१ नोव्हेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला आहे
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
सापळा रचवण्यासाठी अधिकारी   बी.एच.काकडे , ला.प्र.वि.नादेड यांनी योग्य प्रकारे आरोपीना रंगे हाथ पकडण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहे.

भोकर मध्ये जश्न ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे उत्साहित साजरा.

भोकर मध्ये जश्न ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे उत्साहित साजरा.


भोकर:(एजास कुरेशी) दि. २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी समिति चे अध्यक्ष मुर्तुज़ा खान दौलत खान पठान उर्फ बाबू भाई तमसेकर व उप अध्यक्ष शेख नाज़िम भाई  यांच्या अध्यक्षते खाली भोकर येथील सईद नगर येथून सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येऊन मुख्य मार्गाने अंम्बेडकर चौक ते शिवाजी चौक  मार्गाने ईदगाह मैदानावर पोहचली या निमित्ता ने बस स्टैंड समोर भोकर चे सामाजिक कार्यकर्ते फारूक भाई करखेलिकर यानी शरबत वाटप चा कार्यक्रम ठेवला होता व भोकर चे नगर सेविकास सुवर्णाताई वाघमारे यांनी पानी वाटप केला
जगाला शांतता,सामाजिक एकोप्याचा संदेश देणारे प्रेषित मोहमंद पैगंबर (स.) यांचा जन्म दीन जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला.
  भोकर शहरातील सईदनगर भागात सकाळ पासूनच शेकडो समाजबांधव जमन्यास सुरुवात झाली होती, यात जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर,उपनगरअध्यक्ष प्रतिनिधि शेख युसुब भाई , हामीदखान पठाण, रजाक भाई प्रेसवाले, ताजुद्दीन छन्नू भाई शेरवाले, सामाजिक कार्यकर्ते नाजीम भाई, आणि असंख्य लहान मुले व मुली एकत्र येऊन येथून सजवलेल्या वाहनावर ध्वनिक्षेपक लावून त्यावर सामाजिक धून लावून वातावरण आंनदी बनवले होते ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज झाल्यावर जलसाची सांगता झाली असल्याची माहिती ईद-ए-मिलादुन्नबी मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर यांनी दिली आहे.भोकरचे पोलस निरीक्षक आर एस पडवड व भोकर पोलिस सर्व कर्मचारियांचा शॉल व फूल ने सत्कार करण्यात आले.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...