आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीला सासरच्या मंडळीने केला जीवे मारण्याचा प्रयत्न भोकर पोलिसात गुन्हा दाखल.
प्रतिनिधी (एजास कुरेशी)
भोकर:- हुंड्यासाठी बंदी असताना देखील विवाह कसला ही असो मागणी करणारे सासर मंडळी दिसून येतात असाच प्रकार भोकर शहरातील कोळीगल्ली मध्ये घडला आहे पैश्यासाठी चक्क सासरच्या मंडळीने विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटून टाकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडला आहे पण मुलीने स्वतः चा बचाव करून सविस्तर पोलिसाने कळवले त्यांनी पोलिसांनी त्या गंभीर होणाऱ्या गुन्ह्याची चांगलीच दखल घेतली आहे
पवन घंटलवाड ह्या तरुणाने प्रेम विवाह (आंतरजातीय) केला असता अनेकांनी विरोध करूनही त्यास दोन्ही परिवाराने काही वर्षा नंतर का व्होईना मान्य केले होते पण अचानक त्याने विवाह केलेल्या पत्नी ला सासरच्या मंडळी कडून त्रास होत आहे असे तिने माहेरच्या मंडळीला सांगितले तेव्हा त्या मंडळीने जाब विचारत असताना सासरच्या मंडळींचा राग अनावर झाला व त्या मुलीच्या नवरा,आई ,वडील,दिर यांनी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा भोकर पोलिसात नोंदविण्यात आला
पीडित महिला दिलेल्या फिर्यादी वरून दि १७ डिसें २०१८ रोजी रात्री त्या पीडितेचा पती,सासू,सासरा, दिर यांच्या विरुद्ध मानसिक त्रास,व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस चव्हाण हे करीत आहेत
[18/12, 11:15 pm] Aijas Qureshi Sir: *ग्रामीण रुग्णालय परिसरात आढळून आले दोन मृत (नकोसे)*
भोकर : (एजास कुरेशी)
नांदेड जिल्ह्यात घडलेली हृदय द्रावक घटना भोकर येथील शासकिय ग्रामीण रुग्णालय परिसरात एक दिवसापुर्वी जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक सापडले असून या प्रकरणी अज्ञात माता पित्याविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकिय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे परिचारक पदावर सेवारत असलेले निलेश पाचभाई हे दि.१८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रुग्णालयात जात असतांना ग्रामीण रुग्णालय परिसरात दोन डूकरे काहीतरी ओढत आणून खात असतांना त्यांना दिसले.त्या डूकरांना त्यांनी हुसकावले व जवळ जाऊन पाहिले असता ते एक मृतअवस्थेतील अर्भक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.ही माहिती त्यांनी कर्तव्यावर असलेले वैधकिय अधिकारी डाॅ.समद यांना सांगीतली. यावरुन त्यांनी भोकर पोलीसांना ती माहिती कळवली घटनास्थळी त्यांना बोलावुन यावेळी पो.उप.नि.सुशिल कुमार चव्हाण,पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन व पोलीस कर्मचा-यांनी घटनासिथळी तात्काळ भेट दिली व परिचारीकां समक्ष रितसर पंचनामा केला.वैद्यकीय अधिका-यांनी त्या मृत अर्भकाची शिच्छेदन केले असता त्यांनी ते पुरुष जातीचे असून एक-दोन दिवसापुर्वी जन्मलेले असावे असा प्राथमिक अभिप्राय दिला.सदरील अर्भकाचा एक पाय व एक हात डूकरांनी खाऊन टाकल्याने त्याची अतिशय दुरावस्था झाली होती.या प्रकरणी परिचारक निलेश पाचभाई यांनी दिलेल्या माहितीवरुन अज्ञात माता पित्याविरुद्ध भोकर पोलीसात भादविच्या कमल ३१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अर्भकाचा पोलीसांनी दफनविधी पार पाडला आहे.तर पो.नि.आर. एस.पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सय्यद शरफोद्दीन , जमादार एस हनवते हे पुढील अधिक तपास करत आहेत.
‘त्या’ निर्दयी माता पित्याविरुद्ध परिसरातून संताप व्यक्त होत आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

No comments:
Post a Comment