आजच्या लोकन्यायालयात ३९० प्रकरणे निकाली.
भोकर : (एजास कुरेशी) भोकर येथील जिल्हा सत्रन्यायालयात येथे दिनांक ०८ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले होते. भोकर तालुका विधि सेवा समिती तर्फे लोक अदालत.
तडजोडीने प्रकरण मिटवा - जिल्हा न्यायाधीश शेख.
विधी सेवा समिती तर्फे लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते जनतेनी तडजोडी करून प्रकरण मिटवा असे आवाहन जिल्हा न्यायाधीश शेख यांनी केले होते
त्यामध्ये प्रलंबीत आसलेली २५० प्रकरणे ठेवण्यात आली होती. दाखलपूर्ण प्रकरणे २३०० पेक्षा जास्त ठेवण्यात आली होती. ज्यामध्ये विज महावितरण कंपनी, भारतीय स्टेट बँक भोकर, महाराष्ट्र ग्रामिण बँक, देना बँक अदिसह विविध बँकाचे थकीत कर्ज प्रकरण प्रलंबीत होते या सर्व प्रकरणापैफी आज २५० प्रकरणापैकी ५१ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आले त्यात ६७ लाख ७१ हजार एवढया रकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले. यामध्ये पोटगी , व कौटुंबिक वाद या मधील भोकर तालुक्यातील सावरगाव मेट येथील राजमणी विठठल पॅरमवाड व विठ्ठल पोशट्टी पॅरमवाड या जोडप्याचा कौठोंबिक वाद संपूस्टात आणून दोघात समझौता करुन त्यांना साडी चोळी देऊन आहेर केले व पुर्ववत संसार करण्यास पाठविण्यात आले. दखलपूर्व २३०० प्रकरणात दूरध्वनी विभाग , विज वितरण कंपनी, चे भोकर ,हिमायतनगर ,व उमरी थकबाकी वीज पुरवठा खंडित केलेले प्रकरणे व काही बँका व तसेंच न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व फौजदारी जास्तीतजास्त संख्येने तडजोड कऱण्यात आली असून यात ४० लाख ३१ हजार ४५२ एवढ़या रकमेच्या वसूलीचे अॅवार्ड पास करण्यात आले असे एकूण ३९० प्रकरणे आज निकाली काढण्यात आले आहे, यामध्ये एकूण १,०८,०२,४५२ एवढ्या रकमेची वसूलीसाठी अॅवार्ड पास करण्यात आले आहे
यावेळी न्यायाधीश पठाण न्यायाधीश तळेकर सह ऍड कुंटे.ऍड. लामकाणीकर.ऍड. हाके, ऍड शिवाजी कदम, .ऍड. कुलकर्णी, ऍड सलीम ऍड खाडे सह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते
तालुका विधी सेवा समितीमार्फत अयोजीत हे राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी रित्या संपन्न झाली आहे.


No comments:
Post a Comment