दर ३ महिन्याला जनता दरबार घेणार
खासदार आपल्या दारी उपक्रम राबवणार :- खा.प्रताप पाटील चिखलीकर
एजास कुरेशी
भोकर : केंद्र व राज्य सरकारच्या मिळणाऱ्या विविध योजनेच्या लाभापासून भोकर तालुक्यातील जनता मागील काळात वंचित असून आता यापुढे थेट जनता दरबारात खासदाराला भेटून समस्यांचे प्रत्यक्ष समाधान केले जाणार आहे.त्याच अनुशंगाने जनतेचे प्रलंबीत प्रश्न व समस्या जाणून घेतांना अधिका-यांकडून होत असलेली हेळसांड प्रस्तुत झाल्याने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ” अधिकाऱ्यांनों माझ्या सोबत काम करताना चष्मा बदला व जनतेच्या हिताची कामे प्राधान्यानी करा,मी निवडून गेल्यानंतर पाच वर्षांनी मतदार संघात येणारा खासदार नाही तर सतत जनतेच्या सेवेत राहणारा सेवक आहे. जर जनतेच्या कामात कुचराई किंवा हयगय करत असाल तर गाठ माझ्याशी आहे.मी कुणालाही माफ करणार नाही असा सज्जड सल्ला खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी भोकर तहसिल कार्यालयात दि.२२ ऑगस्ट रोजी प्रथमच संपन्न झालेल्या जनता दरबारात अधिका-यांना बहुसंख्य जनतेच्या समोर दिला.
भोकर तहसिल कार्यालयात खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी विविध विभागांतर्गत असलेल्या जनतेच्या समस्या व प्रलंबीत प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी जनता दरबार भरविला होता. तालुक्यातील बहुसंख्य जनतेनी लेखी निवेदनांनी आणि प्रत्यक्ष बोलून तक्रांरींचा महापुर मांडला.यावेळी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिका-यांशी प्रश्नोत्तरे करुन प्रलंबीत प्रश्न व समस्या सोडवित ‘ऑन द स्पॉट ‘ जनतेचे समाधान केले.
तर जनता दरबाराचा समारोप करतांना खा.प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की,तालुक्यातील प्रत्येक गावात मला जाता आले नसले तरी सर्वच गावातील मतदारांनी लोकसभा निवडणूकीत मताचे भरभरून दान माझ्या झोळीत टाकले व निवडून दिले आहे.त्या उपकाराची जान मला असल्याने मी आभार व्यक्त करतो व गेल्या २५ वर्षात जे झाले नाहीत ते विकास कामे मी या ५ वर्षात करेन अशी ग्वाही देतो.परंतू ही प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी मी एकटा कमी पडेन,त्यासाठी येणाऱ्या काळात जनतेच्या समस्या सोडविणारा एक जोडीदार येत्या विधानसभा निवडणूकीत निवडूण माझ्या ताब्यात द्या.तसे झाल्यास मागील पुर्ण बॅक लॉग भरुन काढण्याचा प्रयत्न आम्ही करु.तसेच पारिवर्तनाची लाट असून येणाऱ्या काळात तुमच्या हातून परिवर्तन घडवा.त्या परिवर्तनातून जनतेची कामे वेळेत नक्कीच होतील व आम्ही ते करुच आता ” खासदार आपल्या दारी ” या ऊपक्रमांतर्गत दर ३ महिन्याला मी जनता दरबार घेणार आहे.असे ही ते म्हणाले.
यावेळी राजा खंडेराव देशमुख,जि.प.सदस्य दिवाकर रेड्डी सुरकुंटवार,माजी नगरसेवक दिलीप सोनटक्के,भाजपा ता. अध्यक्ष गणपत पिट्टेवाड,प्रकाश मामा कोंडलवार,प्रविण गायकवाड,सुभाष पाटील घंटलवार,सुभाष पाटील किन्हाळकर,किशोर पाटील लगळुदकर,गणेश कापसे बटाळकर,सुभाष पाटील कोळगावकर,दत्तात्रय पांचाळ,डॉ. फेरोज इनामदार,जवाजोद्दीन बरबडेकर,माधव शिंदे बटाळकर,उत्तम बाबळे,प्रशांत कानडे,नामदेव वाघमारे, बालाजी वाघमारे,शेख अर्शद भाई,सुनिल शहा,नगरसेवक शेख वकील शेख खैराती,खाजा तौफिक इनामदार,राजेश्वर देशमुख,नागमोड,संभाजी देशमुख कल्याणकर यासह तालुक्यातील सरपंच,ऊपसरपंच व सामान्य नागरीकांसह आदींची उपस्थीती होती.तर वन परिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे,सा.बां.वि.चे कार्यकारी अभियंता एस.व्ही.तोटावाड, उपअभियंता शिंदे, गटविकास अधिकारी जी.एल.रामोड,ता. कृषि अधिकारी विठ्ठल गिते यांसह शासकीय कार्यालयांच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
जनतेचं मत…पुर्वीच्या खासदाराच्या कार्यकाळात असला दरबार कधीच झाला नाही… आता मात्र ‘ऑन द स्पॉट ‘ न्याय मिळतांना दिसतय !