त्या नाराधमाने केला अल्पवयीन मुलीवर सतत एक वर्ष बलात्कार पीडितेच्या आईनेच केली होती त्याला मदत
भोकर-एजास कुरेशी
– भोकर येथील समता नगरमध्ये धक्का दायक घटना घडली आहे. वास्तव्यास रहात असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आईच्या मदतीने एका नराधमाने सतत एक वर्ष बलात्कार केल्याची तक्रार गुरूवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन पीडितेने केली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या आईसह नराधमाविरूध्द भोकर पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर बातमी अशी की प्रकाश रामजी राठोड (५०) रा.हरीतांडा धानोरा असे त्या नराधमाचे नाव असून राठोडने पिडीतेच्या आईशी संगनमत करून तब्बल एक वर्षापासुन पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता. राठोड करीत असलेले अत्याचार सहन होत नसल्याने पिडीतेने दि. १ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राठोड आणि पिडीतेच्या आईवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपविभागीय अधीक्षकारी बी. मुद्दीराज करीत आहेत.

No comments:
Post a Comment