३ लाख १२ हजार लाचेची रक्कम स्विकारनाऱ्या नगरअध्यक्षा सह एकाला अटक
नांदेड (प्रतिनिधी)
मुदखेड नगर परिषद नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमिरोद्दीन अन्सारी व खासगी इसम मो.अली मो.एजाज मुदखेड येथील नगर परिषदचे नगरअध्यक्ष यांनी गुत्तेदारचे बिल काढण्यासाठी ५ लाख ९२ हजार ची मागणी केली होती त्या प्रमाणे ५ लाख राउंड फिगर ची मागणी केली असता ३ लाख १२ हजार रुपये नगदी नगराध्यक्षचा सहकारी मो. अली मो.एजाज याला ३ लाख १२ हजाराची लाच स्वीकारताना नगर परिषद मुदखेड येथे रंगेहात अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की
मुदखेड नगरपरिषदेमध्ये कंत्राटदार असणाऱ्या बजरंग वामनराव खोडके यांचे बिल काढून देण्यासाठी मुदखेडचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमीरोद्दीन अन्सारी यांनी खाजगी इसम मोहम्मद अली मोहम्मद एजाज यांच्याकडे ३ लाख १२ हजार रूपये दिले. त्यांच्या कामाचे शिल्लक राहिलेले देयक आणि सुरक्षाठेव रक्कम ३४ लाख ८४ हजार ५२६ रूपये यावर स्वाक्षरी करून देण्यासाठी नगराध्यक्ष मुजीब जहागीरदार यांनी १७ टक्केप्रमाणे ५ लाख ९२ हजार ३९६ रूपये लाच मागत असून एकत्रीत रक्कम ५ लाख रूपये दिले तरच देयक स्वाक्षरी करणार असे सांगत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १ ऑगस्ट रोजी आली होती. ७ ऑगस्ट २०१९ रोजी मुदखेड येथे पंचासमक्ष मुजीब अहेमद अन्सारी, जहागीरदार यांनी ३ लाख १२ हजार रूपये लाच मागितल्याची मागणी समोर आली. ते ३ लाख १२ हजार रूपये जी लाचेची रक्कम आहे, ती मुदखेड येथील खाजगी माणुस मोहम्मद अली मोहम्मद एजाज यांच्याकडे देण्यास सांगितली. आज ९ ऑगस्ट रोजी ३ लाख १२ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुदखेडचे कॉंग्रेसचे नगराध्यक्ष मुजीब अहेमद अमीरोद्दीन अन्सारी (५१) आणि खाजगी माणुस मोहम्मद अली मोहम्मद एजाज (२८) या दोघांविरूद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन२०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय लाटकर , श्नीमती अर्चना पाटील, व पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कपिल शेळके,व बालाजी तेलंग, गणेश तालकोकुलवर,जगन्नाथ आनंतवार, सुरेश पांचाळ, नरेंद्र बोळके, यांनी कार्यवाही पार पडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणी लोकसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी हा शासकीय काम करण्यासाठी लाच मागत असेल तर त्या संदर्भाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. लाचेच्या मागणीचे फोनवरील बोलणे, एसएमएस, ओडीओ, व्हिडीओ असल्यास ती माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाल द्यावी, कोणाकडे माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार प्राप्त झालेली शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर ती माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी. लाच संदर्भाने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर, फेसबुक पेजवर तक्रार करता येते, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 (2), कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462 253512 आणि पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांचा मोबाईल क्र. 8975769918 यावर सुद्धा तक्रार करता येईल.

No comments:
Post a Comment