Tuesday, April 30, 2019

घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ

घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ



बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

 लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य व्यक्तीला सरकारनं जोराचा धक्का दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाट वाढ केली आहे. घरगुती एलपीजी सबसिडी असलेल्या सिलिंडर गॅसची किंमत 6 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरच्या किमतीत 22.5 रुपयांची वाढ झाली आहे, असं वृत्त द हिंदू बिझनेस लाइननं दिलं आहे.या किमती 1 मेपासून म्हणजे आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी 502 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी 730हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. 1 एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.तेल कंपन्यांनी सबसिडी नसलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 5 रुपयांची वाढ केली होती. तर सबसिडीवाल्या सिलिंडरच्या किमतीत 25 पैशांची वाढ नोंदवण्यात आली होती. वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

कार्ला(बु)येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कार्ला(बु)येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी





बिलोली (ता.प्र.)
-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्ला (बु)येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.




तालुक्यातील कार्ला(बु) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८वी जयंती  मोठ्या हर्षऊल्हासात साजरी करण्यात आली.सकाळच्या  सञात बिलोली तालुका वंचित बहुजनआघाडीचे ता.अध्यक्ष वलिओद्दिन फारुखी यांच्या शुभ हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजा रोहन करण्यात आले.तद्नंतर लागलीच  वं.ब.आ.ता.अध्यक्ष वलिओद्दिन फारुखी  यांनी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर , तसेच त्यांना अभिप्रेत असलेले सर्वसमावेशक राजकारन सद्य परिस्थितीत अॕड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात कशा पध्दतीने सुरु असुन येणा-या काळात आपणास कशा पध्दतीने पक्षाला सहकार्य करायचं या विषयी सखोल मार्गदर्शन फारुखी यांनी  केले .दुपारच्या सञात डॉ .बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या तैल चिञाची गावातील मुख्य रस्त्याने पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.या मिरवणुकीत अबालवृद्धासह महिलां मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.पुरोगामी पञकार संघाचे अध्यक्ष मारोती भालेराव व अन्य लोकांची समायोचित भाषने झाली.यावेळी माजी सरपंच सलिम भाई खव्वाल, तंटामुक्ती अध्यक्ष सदर साहाब,राम पटील, प्रविन सोनकांबळे,मसुद देशाई,आदिंची उपस्थिती होती.कार्यक्रम यश्वीतेसाठी मारोती कांबळे,बाबाराव कांबळे,मरीबा कांबळे,विठ्ठल कांबळे,गंगाधर कांबळे यांनी परिश्रम घेतले .

Monday, April 29, 2019

लोहा येथिल त्या घटनेचा बिलोली पञकार संघाच्या वतिने जाहिर निषेध

लोहा येथिल त्या घटनेचा बिलोली पञकार संघाच्या वतिने जाहिर निषेध




बिलोली ता.प्र.
लोहा येथिल वृतपञक  वितरक पांडुरंग राहटकर यांना येथिल न.पा. मा.उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यानी नगर परिषेधेचा प्राप्त विकास निधी सोशल मिडीयावर व्हायरल केल्यामुळे दि.२६ एप्रिल रोजी राहटकर याना शिवीगाळ करुन मारहान केली.या घटनेचा बिलोली तालुका विविध पञकार संघाच्या वतिने आज दि.२९ एप्रिल रोजी सामुहिक जाहिर निषेध करुन सदरील हल्लेखोर संगेवार यांच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करुन अटक करावी अन्यथा बिलोली तालुका पञकार संघाच्या वतिने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हाधिकारी बिलोली  याना निवेदनाद्वारे आज दि.आज २९ एप्रिल रोजी दिला आहे.सदर निवेदनावर महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ अध्यक्ष राजु पाटिल शिंपाळकर मराठी पञकार संघ अध्यक्ष दादाराव इंगळे ,सोनुबाई सावळे संस्थापक अध्यक्ष वल्लियोदिन फारुखी बहुभाषिक पञकार संघ अध्यक्ष शेख फारुख,पुरोगामी पञकार संघ अध्यक्ष मारोती भालेराव पञकार संरक्षण समिती अध्यक्ष ए.जी.कुरेशी, राम तरटे ,साईनाथ आरगुलवार ,बाबुराव इंगळे ,माधव एडके ,शेख सुलेमान ,सय्यद रीयाज,इरेश माचलोड ,साजिद कुरेशी ,नागेश कोंडावार आदिच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.सदर निवेदनाच्या माहितीस्तव प्रति तहसिलदार व पो .नि. भगवान धबडगे याना देण्यात आले,

पीक विम्यातून १० कंपन्यांनी दोन वर्षांत कमावले तब्बल १० हजार कोटी महाराष्ट्रात २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी थांबवले हप्ते भरण

पीक विम्यातून १० कंपन्यांनी दोन वर्षांत कमावले तब्बल १० हजार कोटी महाराष्ट्रात २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी थांबवले हप्ते भरण




औरंगाबाद -शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांच्या फटक्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली, मात्र ती विमा कंपन्यांच्या फायद्याची ठरत आहे. फायदा नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी यातून बाहेर पडत आहेत. महाराष्ट्रात २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हप्ते भरणे थांबवले आहे. १० खासगी विमा कंपन्याची एक रुपयाची गुंतवणूक न करता १० हजार कोटींची कमाई झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित आवृत्तीला बंद करत पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली. मात्र हप्ते भरल्यावर हातात तुटपूंजी रक्कम येणे, प्रशासकीय पातळीवर गलथान प्रकार घडने. विम्याचा अर्ज भरताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणे. या मुळे शेतकरी त्रस्त आहेत. २०११-१२ ते ही योजना सुरू होण्यापर्यंत २०१५-१६ पर्यंत विमा कंपन्यांना नुकसान सहन करावे लागायचे. शेतकऱ्यांनी अदा केलेल्या हप्त्यापेक्षा नुकसान भरपाई अधिक असायची. २०१६-१७ नंतर जमा प्रिमीयमच्या तुलनेत अदा केलेली रक्कम ६९.७१ टक्के झाली.विमा योजना आपल्या नव्हे तर कंपन्यांच्या फायद्याची असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी यातून बाहेर पडत आहेत.

*पहिल्या वर्षात ५८४८ कोटींचा नफा*
> कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार २०१६-१७ मध्ये देशभरातून खरीप पिकासाठी ४ कोटी २३ लाख ६ हजार ४७२ शेतकऱ्यांनी विमा काढला.
> प्रत्येक हप्त्यात शेतकरी, राज्य व केंद्र अशा तिघांचा वाटा आहे. शेतकऱ्यांनी विम्यासाठी २,९१९ कोटी तर केंद्र आणि राज्य शासनाने १३,३५७ कोटी जमा केले.
> विमा कंपन्यांकडे १६,२७६ कोटी रुपये जमा झाले. २ कोटी ५९ लाख ८५ हजार ४५३ शेतकऱ्यांनी पीक नुकसान प्रकरणी दावे केले.

*दुसऱ्या वर्षात ४५३० कोटींचा नफा*
२०१७-१८ मध्ये खरिपासाठी ३ कोटी ४६ लाख ५२६२२ शेतकऱ्यांनी विमा घेतला. वर्षभरात संख्या ५५,८३,८५० ने घटली. तिघांचे कंपन्यांकडे १९,२५९ कोटी जमा झाले. एका शेतकऱ्याने सरासरी ४,७८६ रुपये जमा केले. २०१६ मध्ये ही रक्कम ४,०२५ होती. २०१७-१८ च्या खरिपासाठी १ कोटी २१ लाख ४६४५६ शेतकऱ्यांनी नुकसानासाठीचे दावे दाखल केले. विमा कंपन्यांनी १५,१८१ कोटी वितरित केले. कंपन्यांना ४,०७८ काेटींचा फायदा झाला. याच वर्षात रब्बीसाठी १,६९,८०७१९ शेतकऱ्यांनी विमा घेतला. एकूण ५९१६ कोटी रुपये कंपन्यांकडे जमा केले. रब्बीत ३,३७,८३०१ शेतकऱ्यांनी दावे दाखल केले. त्यांना कंपन्यांनी ५,४६४ कोटी रुपये नुकसान भरपाई अदा केली. म्हणजेच कंपन्यांना ४५२ कोटी रुपयांचा फायदा झाला.

*सरकारी कंपनी बाहेर, १० खासगी कंपन्या मैदानात*
योजना सुरू होण्याआधी सरकारी अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीमार्फत विमा दिला जायचा. नंतर दहा खासगी कंपन्या मैदानात आल्या. यात अायसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, टाटा-एआयजी, युनिव्हर्सल, बजाज आलियान्झ, फ्यूचर जनराली, एसबीआय, एचडीएफसी, इफको-टोकियो आणि चोलामंडलमचा समावेश आहे.

*योजना चांगली पण... खासगी कंपन्यांचे चांगभले*
^प्रधानमंत्री पीक विमा योजना चांगली असली तरी यातून खासगी कंपन्यांचे चांगभले हाेताना दिसतंय. विम्यासाठी अटी अधिक जाचक करण्यात आल्या त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात लाभापासून वंचित राहतायत. तर शेतकरीही स्वत:हून योजनेतून बाहेर पडत आहेत. योजना दलालांच्या कचाट्यात अडकली. यामुळे योजनेचा फायदा होताना दिसत नाही.

महिलांनी विविध योजनेचा लाभ घेउन सक्षम बनावे. ..समतादुत शारदा

महिलांनी विविध योजनेचा लाभ घेउन सक्षम बनावे. ..समतादुत शारदा 



 बिलोली  (ता. प्रतिनिधी )
  शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेउन महिलांनी सक्षम बनावे असे आव्हान बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे यांनी महीलांना मार्गदर्शन करताना केले.  येथुन जवळ च असलेल्या मौजे. रूद्रापुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे च्या वतीने महिला सक्षमिकरण करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्जुन शेळके तर उदघाटनाला उपसरपंच विठ्ठल डोरणेवाड हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे ह्या होत्या. यावेळी समतादुत यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती महिलांना देऊन बचत गटाच्या विकासाचा आढावा घेतला. बचत गटांना मिळणारे मिनी ट्रक्टर , रमाई आवास योजना व लघु उद्योगासाठी मिळणारे कर्ज .इत्यादी ची सखोल माहिती देऊन त्या साठी लागणारे कागद पत्रे व सबंधीत कार्यालये या बाबत सविस्तर माहिती देऊन लाभ घेउन महिलांनी सक्षम बनावे असे आव्हान केले.  या समता सप्ताहास ( बार्टी )च्या समतादुत प्रकल्पाच्या मुख्य संचालीका श्रीमती प्रज्ञा वाघमारे मॅडम पुणे आणि लातूर विभागाच्या सहाय्यक प्रकल्प संचालीका सुजाता पोहरे यांच्ये मार्गदर्शन लाभले.

Saturday, April 27, 2019

-बिलोली तालुक्यातील दगडापूर येथे सर्व धर्मी सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन

-बिलोली तालुक्यातील दगडापूर येथे सर्व धर्मी सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन




बिलोली:प्रतिनिधी

बिलोली तालुक्यातील दगडापूर येथे दर वर्षी प्रमाणे यावर्षी येथील आधारलिंग मल्लीनाथ बाबा महादेव मंदिर येथे दि.१९ मे २००१९ रोजी रविवारी रोजी दु:१२:०५ वाजता सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे या विवाह सोहळायात जास्तीत जास्त नाव नोंदणी करण्याचे आव्हान कासराळी येथील बैठकीत सर्व धर्मीय समूहिक विवाह सोहळा आयोजन समिति तर्फे करण्यात आले.
बिलोली तालुक्यातील दगडापूर येथे दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन येथील आधारलिंग मल्लीनाथ बाबा महादेव मंदिर येथे करण्यात आले आहे सर्वाचा सहकार्य ने हा विवाह सोहळया चे आयोजन करण्यात येते मागील सतरा वर्षा पासून हा यशस्वी उपक्रम राबिन्यात येथे येते आणि सर्वाचा सहकार्य ने हा विवाह सोहळयात तालुक्यातील नागरिकांकडून सहकार्यमुळे आयोजन करणाऱ्या  समिति  ला बळ मिळाला आहे येणाऱ्या विवाह सोहळयात असेच सहकार्य करुण सर्व धर्मीय विवाह सोहळयात यशस्वी करण्याचे आव्हान बैठकीत करण्यात आले या विवाह सोहळयात आपली नोंदणी करावी या विवाह सोहळयात प्रत्येकाचे धर्मविधी नुसार विवाह संपन्न होतील,वधु वराना वस्त्र,मनी मंगळसूत्र विनामूल्य देण्यात येईल,वधु -वराकडील वहाडी  मंडळीच्या भोजनाची व्यवस्था समिति मार्फ़त करण्यात येईल.नोंदणी साठी आवश्यक कागजपत्र वधु -वरांचा जन्म दाखला, वधु-वरांचा फोटो,जातीचे प्रमाणपत्र,उत्पणाचे प्रमाणपत्र,रहिवासी प्रमाणपत्र,शपत पत्र,मोबाईल नंबर आदि .
नाव नोंदणी साठी गंगाधर शक्करवार सगरोळी, कल्याण गायकवाड़ कुंडवाडी,रमेश मेडिकल स्टोअर्स बिलोली,प्रा.जयप्रकाश कमटलवार कुंडलवाडी,विवेकानंद फ़ोटो स्टोडियो, महेश जनरल स्टोअर्स,महाजन ट्रेंडिंग कंपनी कासराळी येथे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले. माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या अध्यक्षते खाली सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळयाचा नियोजना संदर्भात कासराळी येथे बैठक संपन्न झाली सदर बैठकिस जिल्हा परिषद लक्ष्मराव ठक्करवाड,से.सा. सो.चेरमेन साईनाथ उत्तरवार,सेवानिवृत्त अधिकारी साहेबराव बागेलवाड,माजी नगर परिषद अध्यक्ष विजय कुंचनवार, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहेमद,सल्लागार हाई पटेल,आबराव सगनोर,सूर्यकांत महाजन,दिनेश सेठ दाचावार,विश्वनाथ दाचावार,भूमन्न ठक्करवाड,नगरसेवक अरुण उप्पलवार,माधव जाधव,शंकर गंगुलवार व  इतरांची उपस्थित होती

गंजगाव ग्रामपंचायत स्मार्ट व्हिलेज मध्ये तालुक्यात प्रथम

गंजगाव ग्रामपंचायत स्मार्ट व्हिलेज मध्ये तालुक्यात प्रथम





दाहा लाख रुपयेचे बक्षिस झाले घोषीत

सरपंच व ग्रामसेवक यांच्या समन्वया मुळे अनेक विकास कामे राबविण्यात आले




बिलोली प्रतिनिधी

बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव ग्रामपंचायत स्मार्ट व्हिलेज या स्पर्धेत तालुकास्तरावर सहभाग घेतलेला आहे .या बाबत नुकतीच या गावची पाहाणी व मुल्यमापण करण्यासाठी शासकीय समिती येवुन गेली आहे या समितीने बिलोली तालुक्यातील सहभागी असलेल्या गंजगाव या गावची मंगळवार दि 23 एप्रिल 2019 रोजी पाहाणी व मुल्यमापण केले या पाहाणीत श्री.कोंडेकर सर (उपमुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड )श्री.वाळके (लेखा विभाग)श्री माने सर (जिल्हा कृषिअधिकारी नांदेड )डाँ.रुईकर सर (आरोग्य विभाग नांदेड )एन.एन.पावडे (विस्तार अधिकारी ) श्री. ए.जी.राहाटीकर (ग्रामविस्तार अधिकारी ) गर्जे सर (विस्तार अधिकारी बिलोली)पि.डी. वाघमारे (ग्रामसेवक गंजगाव) यांचा समावेश होता गंजगाव ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये विविध विकास कामे राबविण्यात आली आहे संपूर्ण गावात एल.ई.डी.बल्प बसविण्यात आले आले दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत सि.सि.रोडाचे बांधकाम झाले आहे शाळेला डिजिटल करण्यात आले  गाव शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्यात आला आहे आधारकार्ड चे वापट करण्यात आले आहे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकींग सुविधा मिळावे म्हणुन जनधन खाते खोलुन देण्यात आले आहे प्रधानमंञी उज्वला गँस व प्रधानमंञी आवास योजनेची प्रभावीपणे आंमवबजावणी करण्यात आली आहे इत्यादी विकास कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे यांच्या निकषावर गंजगाव ग्रामपंचायतीला स्मार्ट व्हिलेजचे दाहा लाख रुपयेचे बक्षीस घोषीत झाले आहे .या वेळी सरपंच सौ. साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे बंसवतराव पाटील बाबाराव तोटलवार माधवराव घाटे यांनी समितीचे शाल श्रीफळ देवुन स्वागत केले. यावेळी कोंडेकर  (उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.पं.नांदेड )यांची उपस्थिती होती सर्व टिमने ग्रामपंचायतीचे दप्तर पाहुण समाधान व्यक्त केले

Monday, April 22, 2019

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी व्यापक प्रबोधनाची गरज-कमलाकर जमदडे

अंधश्रध्दा निर्मूलनासाठी व्यापक प्रबोधनाची गरज-कमलाकर जमदडे




बिलोली प्रतिनिधी
अंधश्रध्दा ही समाज विकासातील मोठी अडचण असून समाजातील मोठा वर्ग या समस्थेचा बळी ठरला  आहे.त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी व्यापक प्रबोधनाची गरज असल्याचे प्रतीपादन अंधश्रध्दा निर्मूलन समीतीचे कार्यकर्त कमलाकर जमदडे यांनी सगरोळी येथे केले.संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने शारदानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या वासंतीक उन्हाळी शिबीरात केले.उन्हाळ्याच्या सुट्यात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सृजनशीलता वाढावी यासाठी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात १0ते 15 वयोगटातील मुला मुलींना सहभागी करुन घेण्यात आले आहे.
सदरील शिबीरात अंधश्रध्दा विषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावेत.त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी वेगवेगळ्या प्रयोगांचे सादरीकरण करुन त्यामागी असलेले विज्ञान विषद केले.अनेकदा वैज्ञानिक गोष्टीचा आधार घेऊन समाजातील संधीसाधू त्याला भूतबाधेची उपमा देऊन चमत्कारिक पध्दतीने लोकांची फसवणूक करतात.त्यामुळे आपण चिकित्सक व डोळस होऊन असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थासमोर बोलताना व्यक्त केली.
 सदरील शिबीर हे पूर्णवेळ निवासी असून त्यात व्यक्तीमत्व विकासासाठीचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.सदरील शिबीर हे १5एप्रील ते 24 एप्रील दरम्यान आयोजीत केले आहे.या शिबीरामध्ये प्रेरणादायी व्याख्यान,चिञकला,रांगोळी ,कथाकथन,साहसी मैदानी खेळ,संस्कारक्षम चिञपटइत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.या शिबीराला प्रमुख मार्गदर्शन म्हणून संबोधीत करताना जमदडे पुढे म्हणाले.अंधश्रध्दा निर्मूलानासाठी नरेंन्द्र दाभोळकर यांनी अनेक खस्ता खाल्या प्रसंगी त्यामुळेच त्यांना आपले,प्राण गमवावे लागले.त्यांच्यापश्चात अंधश्रध्दा निर्मूलन समीती हे काम नेटाने पुढे नेत आहे.तुम्हीही पुढे जाऊन या विषयी समाजात जाणीवजागृती करावी अशी भावना व्यक्त केली.शिबीराच्या अध्यक्षस्थानी राजेश नरवाडे तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य व्यंकटराव कुलकर्णी ,प्रदीप भुसावळे ,शाहूराज काळम,निरंजन महेशकर,होनराव सूर्यकांत, कवडे मॅडम यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिबीरार्थींची उपस्थिती होती.

Thursday, April 18, 2019

नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार २८ मतदान केंद्रातुन मतदान प्रक्रिया शांततेत पार

नांदेड लोकसभा मतदारसंघात २ हजार २८ मतदान केंद्रातुन मतदान प्रक्रिया शांततेत पार







एकूण ६५.१५ टक्‍के मतदान

(एजास कुरेशी)
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २ हजार २८ मतदान केंद्रातून मतदान प्रकिया शांततेत पार पडली आहे.
 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले आहे.  नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण ६५.१५ टक्के मतदान झाले आहे. 
जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी मतदारसंघात विविध उपक्रम राबविले होते. तसेच व्‍होट फॉर वॉक पदयात्रा काढून मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी त्‍यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी निर्भयपणे मतदान केले असून प्रशासनाने केलेल्‍या मतदान जनजागृतीमुळे पाच टक्‍क्‍यांनी मतदानाचा टक्‍का वाढला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
१६ - नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख १७ हजार ८३० मतदार होते. यात पुरुष मतदार संख्‍या ८ लाख ९१ हजार १०५ तर महिला मतदार संख्‍या  ८ लाख २६ हजार ६६२ तसेच इतर ६३ मतदारांचा समावेश होता. 
       त्‍यापैकी ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला आहे. यात पुरुष मतदार संख्‍या ५ लाख ९४ हजार ६१४ , स्‍त्री मतदार संख्‍या ५ लाख २४ हजार ४९०, इतर १२ असे एकूण  11 लाख १९ हजार ११६ मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे.
 16- नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय माहिती पुढील प्रमाणे आहे.
८५- भोकर- स्त्री- मतदार संख्‍या ९१ हजार ३८९, पुरुष- मतदार संख्‍या                १ लाख ४ हजार ४१९ , इतर एक असे एकूण झालेले मतदान १ लाख ९५ हजार ८०९ (टक्‍केवारी ७०.७१), ८६-नांदेड उत्‍तर- स्त्री- मतदार संख्‍या ९० हजार २६८ , पुरुष- मतदार संख्‍या १ लाख २ हजार ९९७ इतर १०  असे एकूण झालेले मतदान १ लाख ९३ हजार २७५ (टक्‍केवारी ६२.७३), ८७- नांदेड दक्षिण- स्त्री- मतदार संख्‍या ८३ हजार १८१ , पुरुष- मतदार संख्‍या ९७ हजार २८४ असे एकूण झालेले मतदान १ लाख ८० हजार ४६५ (टक्‍केवारी ६४.१७), ८९- नायगांव खै.- स्त्री- मतदार संख्‍या ९२ हजार ८८२ , पुरुष- मतदार संख्‍या १ लाख ४ हजार ५३९ असे एकूण झालेले मतदान १ लाख ९७ हजार ४२१ (टक्‍केवारी ६९.७९), ९०- देगलूर - स्त्री- मतदार संख्‍या ८६ हजार ७३३, पुरुष- मतदार संख्‍या ९६ हजार ७९३ असे एकूण झालेले मतदान १ लाख ८३ हजार ५२६ (टक्‍केवारी ६३.३१), ९१-मुखेड  - स्त्री- मतदार संख्‍या ८० हजार ३७ , पुरुष- मतदार संख्‍या ८८ हजार ५८२ , इतर एक असे एकूण झालेले मतदान १ लाख ६८ हजार ६२० (टक्‍केवारी ६०.४८) असे आहे

Monday, April 15, 2019

काँग्रेसचा बालेकिल्ला असून सुध्दा निवडणूक अटीतटीच्या जोरावर.

काँग्रेसचा बालेकिल्ला असून सुध्दा निवडणूक अटीतटीच्या जोरावर.




नांदेड:(एजास कुरेशी)
१६-नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्र मध्ये ओळख आहे।नांदेड जिल्हा मध्ये चव्हाण कुटुंबातील मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र ची धुरा सांभाळली होती पण आता शहरात विरोध काय असतो व कसा असतो हे अशोक चव्हाण यांना अगदी सोपे वाटत असले तरी आज रोजी नांदेड येथील होत असलेली निवडणूक अटीतटीच्या जोरावर चालू आहे .
अशोक चव्हाण विरोधात वंचित बहुजन आघाडी व समाजवादी पक्षाचे उमेदवार दंड थोपटून निवडणुकीत आपले प्रचार प्रसार अधिक केल्याने याचा सर्व फायदा बीजेपीला होण्याची शक्यता आहे व तसेच अनेक जण थेट अशोक चव्हाण यांच्या बाजूने थांबणे ना पसंद केले असल्याचे चित्र सध्या नांदेड जिल्ह्यात दिसत आहे.
अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ कधीही ते सर्व कुटूंबातील लोकांना पाठवले नव्हते पण त्यांच्या विजय व्हावा म्हणून त्यांच्या दोन्ही मुली अशोक चव्हाण यांनाच मतदान करण्यासाठी भोकर विधानसभा मध्ये फिरताना लोकांना मतमागताना दिसल्या त्या मुळे ह्या निवडणुकीचे नवल वाटत आहे.काही वृत्त पत्रात तर अशोक चव्हाण यांच्या कन्या 'पपा द ग्रेट अस विधान केलेल्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत म्हणून मतदार अजून आपलं मत कुणाला देईल हे अजूनही नक्की नसल्याचे दिसून येत आहे.

अली शिबिबी सेवा भावी स्ंस्थे तर्फे शिलाई प्रशिक्षण घेतलेल्या मुलीना बक्षिस वितरण.

अली शिबिबी सेवा भावी  स्ंस्थे तर्फे शिलाई प्रशिक्षण  घेतलेल्या  मुलीना बक्षिस वितरण...




बिलोली ( .ए.जी.कुरैशी.  )
 शहरातील कपडे शिलाई  प्रशिक्षणात उत्तीर्ण झालेल्या  मुलीना / महीलाना अली शिबिबी सेवा भावी सँस्थे  तर्फे बक्षिस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  जमात चे बोधन तालुका आध्यक्ष आबीद फारुखी होते. तर प्रमुख अतिथी पदी  माजी नगराध्यक्ष एम. ए,जावेद लईख  बाबुभाई शिबिबी   गौसोदिन कुरेशी  ईमाम अहेमद बेग आदि उपस्थीत होते.


कार्यक्रमाचे  प्रास्तविक मार्गदर्शन दिल्ली चे जमात चे कार्यालयाचे बाबुभाई शिबिबी यानी केले. ते म्हणाले  मुलीना  घर कामा नंतर रिकामा वेळ असताना त्याचा हाताला कामा बरोबर रोजगार मिळावा या उध्धेशाने प्रथम खुलताबाद नंतर बिलोली येथे  सर्व सुविधासह  शिलाई  केन्द्र सुरु करण्यात आले. व त्याला बऱ्याच प्रमाणे प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच शिलाई प्रशिक्षणार्थी ची  लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात आली.  उत्तीर्ण झालेल्या मुलीना  संस्थे तर्फे बक्षिस वितरण करण्यात येत आहे. १९  मुलीनी शिलाई शिक्षनाचा लाभ घेतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष  आबीद फारुकी यांचे हस्ते प्रथम येणार्या तरन्नुम  गणी या मुलीस  एक नवीन शिलाई मशीन बक्षिस म्हणुन देण्यात आली. प्रथम दिव्तीय व तृतीय येण्र्या मुलीना  अनुकृमे १०००/- ५००/-  ३००/- प्रमाणे रोख रक्कम व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
आबीद फारुखी मुलीना मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की प्रशिक्षणाचा लाभ भविष्यात स्वता.चे घरचे व  रोजगार मिळविण्यासाठी  उपयोगी राहील. जास्तीत जास्त   महिलाना प्रशिक्षणाचा   लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदरील  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फैजोदिन कुरेशी, गफुर कुरेशी, हबीब कुरेशी, गफार कुरेशी, राशीद कुरेशी, आदिनी परिष्रम घेतले.
कार्यकृमाची सुरवात  मौलाना मुबीन खान यानी पवित्र कुरान पठण ने केली. सूत्रासंचलन फैसल शिबीबी यानी तर आभार अ.गफूर कुरेशी यानी  मानले.
यावेळी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी शेख फारुख ,अब्दुल्ला शिबीबी,आ.गणी, फहीम सेठ ,आमजद चाउस, नगरसेवक जावेद कुरेशी, शेख महेबुब, आजीज बेग,  मोईनसेठ,  रहीम कुरेशी, आदीसह मोठ्या सँखेत नागरीक उपस्थीत होते,

Saturday, April 13, 2019

अशोक चव्हाण यांना विजय करण्यासाठी रॅलीत महिला,कार्यकर्तेंचा रंणदुमाळ .

अशोक चव्हाण यांना विजय करण्यासाठी रॅलीत महिला,कार्यकर्तेंचा रंणदुमाळ .




बिलोली ता.प्रतिनिधी

बिलोली शहराचे विद्यमान मैथिली कुलकर्णी बिलोली नगरी च्या नगराध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य मार्गाने सर्व गल्ली बोळीत महीला रॅली तापा  काढण्यात आला.
शहरातील सर्व प्रभागात  महीला आमचे मत कोणाला, काँग्रेसला पक्षाचे उमेदवार अशोक चव्हाण साहेबांना असे जोरदारनारे बाजी करताना दिसुन येताना शहर ना-यानी धुमधुमले होते, शहरात गेल्या एक महिन्यापासून बहुजन आघाडी(वंचित आघाडी चा मोठ मोठ्या रॕलीचा जनसमोदाय  निळा सागर बाळासाहेबाच्या सभेला दिसुन येतो व आंबेडकरी जनता हे  बाळासाहेबांच्या पाठीशी राहणारे कार्यकर्ते ची चर्चा जनतेत होतानां दिसुन येते.ऐकीकडे  काँग्रेसच्या रॅलीत अशोकराव चव्हाण यांना विजय करण्यासाठी सज्ज होऊन नारेबाजी करताना पहावयास मिळाले, नांदेड जिल्ह्य़ातील  बहुजन समाजातील समस्या भाजपा सरकारच्या अच्छे दिन की सुरुवात लोकांना केव्हां मिळतो. आता मोदी हटाव  असे नारे देत रॕली प्रचारात करीत.काॕग्रेस ला मतदान करुन  विजयी करुन  सभा का साथ सब का विकास या कार्यकृत्याचे  जोर व तळमळनी जीवाचे रान करीत आहेत .जनेते प्रश्नाचे  उत्तर देऊन  कार्यकृते जोडन्याचे काम करत्तांना दिसत आहेत. डोर टु डोर हे करीत भेटी देत आहे हे कार्यकाळात निर्माण झालेले सर्व मार्गी लावण्यासाठी आम्हा गोरगरिबांचे वाली दुसरा कोणी अशोकराव चव्हाण साहेबां शिवाय होऊ शकत नाही.ही बाब बिलोली शहरातील जनताजनार्धनाला कळालेले पहावयास मिळाले आहे.
या रॅलीत माजी नगर अध्यक्ष संतोष कुलकर्णी,उपाध्यक्ष मारोती पटाईत,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे,काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संदेश जाधव, संजय जाधव .नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार,नगरसेवक जावेद कुरेशी,अरूण उप्पलवार,नागनाथ तुम्मोड,शाहेद बेग,शेख फारुख,संजय जाधव, संतोष अंकुशकर,कांग्रेस कार्यकर्ते ठक्करोड ताई,यांच्यासह
शेकडो महिलांनी आपला सहभाग घेऊन काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांना विजयी करण्याचे मानस आपल्या अगी  घेऊन नारे देत होते

राज ठाकरे यांची अवस्था आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आवो अशी ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज ठाकरे यांची अवस्था आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आवो अशी ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





भोकर (एजास कुरेशी)
राज ठाकरे यांची अवस्था आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आवो अशी झाली असून त्या मनसेची काय अवस्था आहे मनसे आधी होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नंतर झाली मतदार नसलेली सेना. आता झाली उनसे, उमेदवार नसलेली सेना अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली.
राज ठाकरे जे मनात येईल ते बोलून जातात मला ते म्हणाले बसवलेला मुख्यमंत्री परंतु मला जनतेनं बसवलं. मोदींनी बसवलं. तुम्हाला तर जनतेनं घरी बसवलं असे भोकर मध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

अशोक चव्हाणांना माणसं भाड्यानं आणावे लागताहेत त्यांनी मंच, खुर्च्या, माणसं किरायाने आणावे लागले. परंतु त्यांना नेताही किरायानं आणावं लागले.
महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नेण्याचा करार अशोक चव्हाणांनी २००६ ला केला. या पठ्ठ्याने ते पाणी करार रद्द करून परत आणलं. ज्या राज ठाकरेला बेडकासारखा डराव डराव करतो असं म्हणणारे अशोक चव्हाण आता राज ठाकरेला सभेला बोलवत आहेत. अशी टिका त्यांनी केली. आता जे  भ्रष्टाचारी आहे ते सर्व अस्वस्थ आहेत ते म्हणतात ,मोदी हटाव,तुम्ही काय खाऊन मोदीला हटवता ही जनता तुम्हाला हरवल्या शिवाय राहणार नाही पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता अभियान संकल्पना प्रभावीपणे राबवली, उज्ज्वल गॅस योजना द्वारे घरोघरी गॅस देण्यासाठी प्रोत्साहन दिले यातून महिलाचा धुरामुळे होणार शारीरिक कष्ट त्रास कमी झाला तर पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान पीक विमा, शेतकरी सन्मान योजनासह शौचालय उभारले याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. नागरिकांचे बँक खाते उघडण्यासाठी प्रोत्साहन दिले यातून लाभार्थ्यांना थेट अनुदानाचा लाभ होत आहे. दलालीचा मार्ग बंद केला आहे




लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की नांदेड जिल्ह्यात मागील पन्नास वर्षापासून चव्हाण परिवाराकडे सत्ता असताना त्यांनी स्वतःचाच विकास केला आहे उद्योग मंत्री महसूल मंत्री मुख्यमंत्री केंद्रात गृहमंत्री असे अनेक पदे चव्हाण परिवाराने भूषविले आहे पण या पदाचा वापर नांदेड जिल्ह्यासाठी झाला नाही चव्हाण परिवाराला त्यांच्या मर्जीतील लोकांनाच मोठे झालेले आवडते  नांदेड मध्ये कोणताही विकास केला नाही ते मतदारसंघाचा काय विकास करतील असे आरोप केले आहे.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राम चौधरी, बबनराव लोणीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, शिवसेनेचे बबनराव बारसे, व तसेच कार्यक्रमास भोकर येथील गणपत पिठ्ठेवाड(भाजप ता.अध्यक्ष),अमोल पवार (शिवसेना ता अध्यक्ष),नागनाथ घिसेवाड, संतोष मारकवार,राजेश अंगरवार,बाळा साखळकर,हरिभाऊ चटलावार,नंदू ऱ्याकावार,राजेश करपे,माधव जाधव ,शिवाजी पा किन्हाळकर, सुभाष किन्हाळकर, दिलीप सोनटक्के,संतोष बिल्लेवाड,अरशद भाई, निशाद इनामदार ,

Friday, April 12, 2019

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा





नांदेड : (एजास कुरेशी )
नांदेड लोकसभेचे भाजप-सेना रिपाई युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ  दि.१३ एप्रिल २०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या अगोदर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नांदेड येथे झाली त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) यांनी दि ०६ एप्रिल २०१९ च्या नांदेड येथील सभेत अशोक चव्हाण यांच्या वर टीकेची झोड केली होती त्यांनी नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण लीडर नसून डीलर आहेत असा घणाघात केला होता त्यानंतर भोकर येथील होणाऱ्या ह्या सभेस देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्यावर कोणती नवीन टीका करतील ह्या साठी मात्र ह्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा भोकर शहरात सध्या सुरू आहे.

दि १३ एप्रिल  २०१९ रोजी भोकर येथील मोंढा मैदानावर सकाळी १०:३० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बबनराव लोणीकर, प्रताप पाटील चिखलीकर(नांदेड लोकसभा उमेदवार),राम पाटील रातोळीकर, भास्करराव पाटील खतगावकर(माजी खासदार), मा.राज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,नागनाथ घिसेवाड,राजेश पवार, यांच्यासह अनेक भाजपा शिवसेना रिपाई प्रेमी या नवा मोंढा मैदानावर येणार आहेत ह्या मैदानाची जागा ही मुख्य भागात असल्याने अनेक लोक ह्या सभेला देवेंद्र फडणवीस यांना ऐकण्यासाठी येतील .या कार्यक्रमास भोकर येथील गणपत पिठ्ठेवाड(भाजप ता.अध्यक्ष),अमोल पवार (शिवसेना ता अध्यक्ष),संतोष मारकवार,राजेश अंगरवार,बाळा साखळकर,हरिभाऊ चटलावार,नंदू ऱ्याकावार,राजेश करपे,माधव जाधव ,शिवाजी पा किन्हाळकर, सुभाष किन्हाळकर, दिलीप सोनटक्के,अरशद भाई निशाद इनामदार ,आदींनी सभा चांगली व यशस्वी व्हावी या करिता परिश्रम करताना दिसून आले सभेची तयारी जोरात असल्याची  चित्र दिसून आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साठी चोख पोलीस बंदोबस्त देखील शहरात अनेक भागात लावला गेला आहे असे भोकर पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले आहे

Wednesday, April 10, 2019

वॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

वॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या प्रकरणी जिल्ह्यात  तीन गुन्हे  दाखल




नांदेड (एजास कुरेशी)
काँग्रेस कार्यकर्त्याना अश्लील शब्द वापरून अपमानास्पद व्हिडीओ व्हाट्सअपच्या वर व्हायरल केल्याची घटना घडली .या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात हनुमान गणेश पवार (रा.निघवा ता.मुदखेड)व राजेश गोविंद पवार रा.निघवा ता.मुदखेड)यांच्या वर राजाराम शंकरराव देशमुख यांच्याफिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हनुमान गणेश पवार हा फिर्यादी यांच्या मोबाईल वर व्हाट्सएप व्हिडीओ क्लिपवर मी हनुमान गणेश पवार रा.निघवा ता.मुदखेड बोलतो मी अशोकराव तसेच कार्यकर्ते यांच्या नावाने अश्लील शब्दात शिवीगाळ केली या प्रकरणी बारड चे उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या तक्रारी वरून बारड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी राजेश पवार
रा.निघवा याने पण काँग्रेस च्या लोकबद्धल अश्लिल शब्द वापरले व व्हिडीओ क्लिप वायरल करून आम्हा कार्यकर्त्यांना अपमानित केले वगैरे जवाब दिले सदरील प्रकरण अदखलपात्र स्वरूपाचे असल्याने फिर्यादी परस्पर कोर्टात दाद मागण्याची समज दिली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर हरणे यांच्या आदेशाने जमादार किडे तपास करीत आहेत.
याच प्रमाणे मुदखेड नगराध्यक्ष हे नरेन्द्र मोदी यांच्या जाहीर सभेला उपस्थित होते.अशी पोस्ट फेसबुकवर व्हायरल करुन बदनामी केल्यामुळे म.गौस अ.नजीबसाब यांच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात कलम ५०० प्रमाणे दि.६एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच एम आय एम च्या राष्ट्रीयअध्यक्ष खा.आवेसी यांच्या फोटोची बदनामी कारक पोस्ट व्हाट्सएपवर व्हायरल केल्या प्रकरणी एम आय एम च्या तालुकाअध्यक्ष  म.सुलेमान व शहरअध्यक्ष  म.हुसेन यांच्या तक्रारी वरून  मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची  माहिती पोलीस निरीक्षक माच्छरे  यांनी सांगितले आहे

Tuesday, April 9, 2019

अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ बिलोलीत प्रचार रँली संपन्न

 अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ बिलोलीत प्रचार रँली संपन्न





बिलोली:ए जी कुरेशी
बिलोली शहरात नांदेड लोकसभा मतदार  संघाचे काँग्रेस व आघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ रँली काढणयात आली.

दि.9 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता छोटी गल्ली पासुन  रँली मुख्य रसत्याने गांधी चौक ते जुना बसस्थानक हनुमान मंदिर कोळी गल्ली ईनामदार गल्ली ते नायकवाड़ी गल्ली येथे रँली संपन्न करण्यात आले यावेळी बिलोली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी बिलोलीतील जनतेला अशोकराव चव्हाण यांच्या जाहिर सभेला बिलोली शहरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान केले यावेळी न.प. उपाध्यक्ष मारोती पटाईत,माजी अध्यक्ष भिमराव जेठे,तालुका अध्यक्ष अल्पसंख्यक सेल शेख सुलेमान,जिल्हा उपाध्यक्ष शेख फारुख अहेमद,माधव जाधव,सुरेश शिवलाड,नगरसेवक जावेद क़ुरैशी,शाहेद बेग ईनामदार,अमजद चाऊस,अरुण उप्पलवार,नितिन देशमुख,लक्ष्मण शेट्टीवार,संतोष अंकुशकर,अखिल सिदिखीं,अफरोज आदि सह मोठ्या संख्यने कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थित होती.

नगर परिषदचे महिला कामगार अंजनबाई कुड़के यांचे मुख्याधिकारीशी चर्चा अंति उपोषण

नगर परिषदचे महिला कामगार अंजनबाई कुड़के यांचे मुख्याधिकारीशी चर्चा अंति उपोषण




बिलोली :ए जी कुरेशी
बिलोली येथील नगर पालिकेचे कार्यरत असलेले  महिला कामगार अंजनबाई कुड़के हे दि.8 एप्रिल रोजी पासून तहसील कार्यलय समोर उपोषणास बसले होते आज बिलोलीच्या मुख्याधिकारीशी चर्चा अंति त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.
बिलोली नगर पालिकेची महिला कामगार अंजनबाई कुड़के हया 1993 पासुन बिलोली नगर पालिकेत रोजनदारी वर काम करीत आहे नोकरीत कायम न केल्याने व अकरा महिन्याचे वेतन थकल्यामुळे दि.8 एप्रिल पासुन बिलोली तहसील कार्यलय समोर आमरण उपोषण सुरु केले होते पालिकेच्या मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे उपाध्यक्ष मारोती पटाईत ,नगर सेवक अनुप अंकुशकर,अधीक्षक संग्रामसिंह चौहाण आदिनी उपोषणार्थी अंजनबाईची उपोषण स्थळी भेट देवून त्यांचे अकरा महिनेचे थकित वेतन रु.32660 चा धनादेश चेक देण्यात आला व फेबुरवारीत निघालेले शासनाचे परिपत्रिके नुसार प्रस्ताव पाठवून   कायम स्वरूपी घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी कांबळे यांनी दिले नींबू शरबत देवून उपोषण सोडविन्यात आले.

Monday, April 8, 2019

काँग्रेस भाजपा दोन्ही सरकार भ्रष्टाचारी असून बहूजन वंचित आघाडी च्या उमेदवाराला निवडून द्या अॅड.बाळासाहेब आंबेडकर

काँग्रेस भाजपा दोन्ही सरकार भ्रष्टाचारी असून बहूजन वंचित आघाडी च्या उमेदवाराला निवडून द्या अॅड.बाळासाहेब आंबेडकर




भोकर(एजास कुरेशी )
देशातील अर्थिक व्यवस्था हि बड्या उद्योगपतीच्या फायद्याची ठरत असल्याने सामान्य शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले त्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे काँग्रेस भाजपा दोन्ही सरकार भ्रष्टाचारी असून बहूजन वंचित आघाडी च्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन अॅड.आंबेडकर यांनी केले आहे




   १९९० नंतर काॅग्रेस च्या हातात सत्ता आली. परंतु तेव्हा पासुन ते आज पर्यंत काॅग्रेने आर. एस.एस ला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला गेला नाही .जर केलाच आसेल तर कोणता प्रयत्न केला आसा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर सभेत बोलत होते
  दुपारी रखरखत्या ऊन्हात प्रचंड जनसमुदाय उपस्थित  होता.पुढे बोलताना  बाळासाहेब म्हणाले की आशोकराव चव्हाण विश्व हिंदु परीषदेचे सदस्य आहेत की नाही हे त्यांनी सिध्द करावे , येथिल सत्ताधारी सहकारी साखर कारखाने मोडीत काडुन खाजगीत घेवुन चालवत आहेत. परंतु यशपाल भिंगे यांना निवडुन दिल्यास तेच कारखाने आम्ही सरकारी करू आसे आश्वासन आंबेडकरांनी दिले.
       या देशात दोन बोके सत्ते वरती येवुन बसलेत ते म्हणजे अमित शहा व नरेंद्र मोदी आणि हे दोघेही कमजोर आश्या लोकांचीच शिकार करतात अशी टीकाही त्यांनी केली .प्रस्ताविक ऊत्तम गवाले यांनी केले तर सुत्रसंचलन निळकंट ताकबिडकर यांनी केले आभार कपिल डुमने यांनी मांडले.


     यावेळी प्रमुख मार्गदर्क भारीप बहुजन माहासंघाचे संस्थापक आध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर , वंचित बहुजन आघाडीचे आधिकृत ऊमेदवार प्रा.डाॅ.यशपाल भिंगे , लिंगायत नेते शिवानंद हैबतपुरे,अॅड. आण्णाराव पाटील,प्रा.रामचंद्र भरांडे,  स्वप्नील नरबाग(फुले शाहु आंबेडकर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष),आनिल सिरसे(जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना), पि .आय.गायकवाड, धम्मदीप गावंडे,शिवाजी गेडेवार, रावसाहेब, पवार ,उत्तम गवले,पंडित वाघमारे,रिफक गौतम धडेकर ,जाकेर चाउस,फेरोज लाला,सूभाष तेले,एल.ए.हिरे,बाबा खान जुनेद पटेल निजाम बाबा सम्राट हिरे युवा पँथरची सर्व टीम प्रमुख उपस्थितीथी  होती.

बिलोलीत बुलडाणा अर्बन बँकेचा चन्द्रशेखर महाराज यांच्या हस्ते शुभारंभ.

बिलोलीत  बुलडाणा  अर्बन बँकेचा  चन्द्रशेखर महाराज यांच्या हस्ते शुभारंभ.





बिलोली.( ए.जी.कुरेशी.) 
 बिलोली येथे बुलडाणा अर्बन बंँकेच्या ४४५ व्या शाखेचा शुभारँभ   चन्द्रशेखर महाराज देगलुरकर याँच्या हस्ते  सम्पन्न झाला.
दिनाक ७ एप्रील रोजी आनंद गार्डन  येथे  झालेल्या उद्घाटन समारंभास कार्यकृमाचे आध्यक्षस्थानी  बुलडाना अर्बन चे चिफ मँनेजिग डायरेक्टर डॉ. सुकेशजी झँवर होते तर प्रमुख अतिथी पदी  वैधकीय अधिक्षक डॉ. नागेशजी लखमवार नांदेड चे पालक संचालक  सुबोधजी काकाणी बिलोली नगरपालीकेचे उपनगराध्यक्ष  मारुती पटाईत माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार  कुँडलवाडीचे व्यापारी राजुसेठ उत्तरवार आदि उपस्थित होते.
 चन्द्रशेखर महाराज  आपल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या भाषणात म्हणाले की जग चालवण्यासाठी धर्म अर्थ व मोक्ष हे  महत्वाचे स्तभ आहेत. यापैकी एक ही नसला तर जगाचे कार्य थांंबते. जग चालवण्यासाठी  धर्म मोक्ष प्रमाणे अर्थ  हा महत्वाचा घटक आहे. स्त्री पुरुष सत्यवादी असावे. दानशुर असावे लोभी नसावेत.अर्थ जागाचा महत्वाचा घटक आहे.बँकेने विकास कार्य करुन विश्वास सपादन करावा असे आवाहन करुन 
    बिलोली येथील  बुलडाना अर्बन बंकेचा शुभारंभ  झाल्याचे जाहीर केले.
यावेळी बँकेचे  व्यवस्थापकीय संचालक डा.सुकेशजी झँवर यानी प्रास्ताविक केले. बंकेने केलेल्या प्रगतीचा व विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची मिहीती देत .संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांंडक  यानी  १९८६ साली दुष्काळग्रस्त भागात  केवळ १२हजार रुपये भांंडवल घेवुन सुरु करण्यात आली.  आज १२ हजार कोटी  रु. ठेवी आहेत. देशातील विविध राज्यात  बँकेचे शाखा आहेत. बँकेने  शेतकर्यासह लघु उध्योग छोटे व्यापारी शैक्षणिकशाळा व सामाजीक सेवा देण्याचे काम केले आहे. बिलोलीकराना चांंगल्या सुविधा उपल्बध करुन देण्याचे आश्वासन दिले.     
यावेळी पहीले खातेदार चन्दृशेखर कुलकर्णी यानी  १लाख ५० हजार रु.जमा करुन खाते उघडले. त्याचा  शाल पूष्पहार देवून सत्कार करण्यात आला. या वेळी डा. नागेश लखमावार  उपाध्यक्ष मारुती पटाईत  विजय कुँचनवार  राजुसेठ उत्त्तरवार यानी आपले विचार मांडले. या कार्यक्रमास बिलोली व परीसरातील शेतकरी  व्यापारी आधिकारी कर्मचारी  खातेदार मोठ्या संखेत उपस्थीत होते.

Sunday, April 7, 2019

जमाअत ए इस्लामी हिंदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नांदेडचे इंजिनियर सआदतुल्लाह हुसैनी यांची निवड

जमाअत ए इस्लामी हिंदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी  नांदेडचे इंजिनियर सआदतुल्लाह हुसैनी यांची निवड



नांदेड:बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
व्यवस्था परिवर्तनाचा उद्देश समोर ठेऊन शांततेच्या मार्गाने समाज उभारणीचे कार्य करणारी उदारवादी चळवळ जमाअत ए इस्लामी हिंदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मूळचे नांदेडचे असलेले इंजिनियर सआदतुल्लाह हुसैनी यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील मुख्यालयात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या प्रतिनीधी सभेत खोलवर चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी प्रसिद्ध विचारवंत मौलाना जलालुद्दीन उमरी या पदावर होते. यानिमित्ताने जमाअतच्या नेता निवडीच्या पद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवघ्या पंचेचाळीस वर्षांचे हुसैनी यांनी इलेक्ट्रॉनिक आणि टेली कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. बारा पुस्तकं लिहिली असून दोनशेच्यावर लेख लिहिले आहेत.

 भारतीय मुस्लिम तरूण पीढीला कट्टरवादापासून दूर राखण्यात मोलाचा वाटा असलेल्या स्टुडन्ट्स इस्लामिक आॅर्गनायजेशन्स आॅफ इंडिया (एस.आय.ओ.) चे ते राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. तसेच यापूर्वी जमाअतचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. सध्या हैद्राबादला स्थायिक असलेल्या हुसैनींची आय.टी. क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे. आपला प्रपंच सांभाळत तर परमार्थ साधण्याच्या इस्लामी शिकवणीवर ते तंतोतंत अंमलबजावणी करत असतात.

अगदी साधी राहणी, अहंकारशुन्यता आणि विनम्रतेने परिपूर्ण व्यक्तीमत्व असलेले हुसैनी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी मात्र प्रसिद्ध आहेत. भारतीय इस्लामी जगतात अंत्यत महत्वपूर्ण मानले जाणार्या या पदावर निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर सदिच्छांचा पाऊस पडतोय. जमाअतच्या देशभरातील सदस्यांनी मतदान करून निवडून दिलेले प्रतिनीधी दर चार वर्षांनी "अमीर (अध्यक्ष)" निवडत असतात. जमाअतची ही लोकशाहीजन्य इस्लामी पद्धतही कौतुकास्पद आहे.

85-भोकर विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

85-भोकर विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न ...





भोकर(एजास कुरेशी)
आज दिनांक 07 एप्रिल, 2019 रोजी ओम लॉन्स, भोकर इथे मतदान अधिकारी यांचे करिता द्वितीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षण मध्ये पवन चांडक (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 85-भोकर तथा उपविभागीय अधिकारी भोकर) यांनी व मा. भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर) यांनी मार्गदर्शन केले आहे. सदरील प्रशिक्षणास एकूण 752 इतके मतदान अधिकारी (मतदान केंद्राअध्यक्ष-375 व सहाय्यक-377) उपस्थित होते.

सदरील प्रशिक्षण ठिकाणी  दिनेश झांपले (तहसीलदार मुदखेड) यांचे निगराणी मध्ये मतदान अधिकारी यांचे करिता टपाली मतदान करुन घेण्यात आले आहे.



तसेच सदरील प्रशिक्षण ठिकाणी श्री. चव्हाण (शिक्षक, नारवट), श्री. नरेंद्र मडगुलवार व टिम भोकर यांचेद्वारे मतदान केंद्रावरील पूर्ण प्रक्रिया व विविध प्रकारचे मतदार कसे येतात याबाबत पथनाट्य स्वरुपात सादरीकरण करुन दाखविण्यात आले. या पथनाट्य मध्ये श्री. राजू चव्हाण, राजकुमार मस्के, वैभव डांगे, सुभाष जगताप, ज्योती राठोड, शिला घोरपडे, सुरकर सर, घोळक सर, राहुल कदम, राम मुनंगे, योगेश गोरठकर, दत्ता चंचलवाड, सुरेश माने यांनी सहभाग नोंदविला आहे.

व तसेच सामाजिक न्याय भवन, मुलांचे वसतिगृह, किनवट रोड भोकर या ठिकाणी झोन निहाय व 3 बॅच निहाय 12 हॉल प्रमाणे झोनल अधिकारी यांचे मार्फत प्रत्येक मतदान अधिकारी यांचेकडून इ व्ही एम व व्ही व्ही पॅट चे प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले आहे.

दोन्ही ठिकाणच्या प्रशिक्षण करिता आवश्यक ते नियोजन मारोतराव जगताप (नायब तहसीलदार भोकर) व टिम यांनी नियोजन केले होते.


Saturday, April 6, 2019

-बिलोलीत कै. अतुल ईनामदार यांच्या स्मरणार्थ पांणपोई चे शुभारंभ

-बिलोलीत कै. अतुल ईनामदार यांच्या स्मरणार्थ पांणपोई चे शुभारंभ




बिलोली:प्रतिनिधी
बिलोली येथील शांत व मनमिळावू व्यक्तित्व असणारे कै. अतुल ईनामदार यांच्या स्मरणार्थ त्यांचा मित्र सहकारर्या कडून पांणपोई चा शुभांरभ करण्यात आला.
आज दि.६एप्रिल गुड़ी पाडवाचे शुभ मुहूर्तावर हैदराबाद महमार्गावर महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या बाजूला पांणपोईचा शुभांरभ डॉ. रविंद्र बापुराव बिलोलीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या पांणपोई मुळे महामार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवासी व नागरिकांना पिण्याचे सोय होणार आहे.यावेळी डॉ. रविंद्र बिलोलीकर,न. प.माजी अध्यक्ष विजय कुंचनवार, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहेमद,अँड.उदय बिलोलीकर,हाई पटेल,नरेश रुद्रुरकर,शरद मोरलवार,वेदांत बिलोलीकर, अथर्व अतुल ईनामदार आदिची उपस्थित होती।

शिंपाळा येथिल त्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसास धनादेशाचे वाटप

शिंपाळा येथिल त्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसास धनादेशाचे वाटप




बिलोली ता.प्र.
सततच्या  नापिकीमुळे कर्ज बाजारी पणाला कंटाळून दि.८ मार्च रोजी तालुक्यातील शिंपाळा येथिल  कै.देविदास परसराम शिंदे वय ४० वर्ष या तरुण अल्पभुधारक शेतक-यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करुन आपली जिवन याञ संपवली.त्या अत्महत्याग्रस्त  शेतक-यांच्या वारस पत्नीस आज दि.३ एप्रिल रोजी तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या हस्ते शासकिय अर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.

सततच्या नापिकीमुळे बँकेच्या कर्जाला कंटाळुन अल्पभुधारक तरुण शेतकरी कै.देविदास शिंदे यानी ८ मार्च २०१९ रोजी विष प्राशन करुन अत्महत्या केली.या बाबत महसुल,पोलिस,व कृषी विभागामार्फत तात्काळ चौकशी करुन शासकिय  अर्थिक मदतीसाठी जिल्हास्तरीय निवड समीतीकडे शिफारस करण्यात आली.या बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १८ मार्च रोजी झालेल्या बैठकित जिल्हास्तरीय समितिकडुन सदर शेतक-यांस शासन अर्थिक मदतीस पाञ ठरविण्यात आले. त्या अनुशंगान्वे  तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या हस्ते  त्या अत्महत्याग्रस्त शेतक-यांची वारस पत्नी श्रीमती  ललिताबाई शिंदे यांना दि. ३ एप्रिल रोजी एक लाख रुपयाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले या वेळी नायब तहसिलदार संजय नागमवाड पञकार राजु पाटील शिंपाळकर ,मंडळअधिकारी मुळेकर ,तलाठी बिराजदार,लिपीक एस,एस,हुंडेकर आदि जन उपस्थित होते.

सपा व बसपा चे उमेदवार अ.समद यांचा विजय नक्की होणार :-सपा जिल्हा अध्यक्ष मो.अल्ताफ

सपा व बसपा चे उमेदवार अ.समद यांचा विजय नक्की होणार :-सपा जिल्हा अध्यक्ष मो.अल्ताफ








भोकर:-(एजास कुरेशी)
१६-नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारा सोबत समाजवादी पार्टी व बसपा युतीचा देखील उमेदवार आहे .
      नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एम.आय.एम.पार्टीची ओळख करून देणारे सय्यद मोईन यांनी एम.आय.एम.सोडून समाजवादी पार्टी मध्ये नुकताच प्रवेश केला त्यांनी समाजवादी पार्टी ची धुरा अबू असीम अजमी यांनी सय्यद मोईन यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची कार्याध्यक्ष पद देऊन धुरा त्यांच्या कडे दिली त्यांनी नांदेड मध्ये स्वतः निवडणूक न लढवता अब्दुल समद अब्दुल करीम यांना उमेदवारी दिली.आज नांदेड जिल्ह्यात मतदारांचे हाल काय आहेत,काँग्रेस सरकाने ,मुस्लिम समाजावर भाजपा प्रमाणेच अन्याय केला आहे म्हणून अखिलेश यादव व मायावती यांनी युती करून उमेदवार उभा केले आहेत याचा फायदा नांदेड जिल्ह्यात नक्की होईल असे समाजवादी पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष म.अल्ताफ यांनी केले.



        बातमी व्हिडिओ 👇👇👇
https://youtu.be/tU0M7OnNhUg



काँग्रेसची व भाजपा च्या उमेदवाराची हार नक्की होणार आहे.
अब्दुल समद हे लोकसभासाठी  सर्व परिचित सपा व बसपा चे उमेदवार असून त्यांचा विजय नक्की होणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्याच्या तोंडून ऐकायला मिळाले आहे.अनेक भागात भोकर शहरात जिल्हाअध्यक्ष म.अल्ताफ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते गल्ली बोळात उमेरवारांचा फोटो असलेले पोम्लेट वाटताना दिसले.
भोकर शहरात काही दिवसात अब्बु आझमी यांची जाहीर सभा होणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
या बैठकीत तालुका अध्यक्ष करीम करखेलिकर, शेख नझीर, मिलिंद गायकवाड,कामरान शेख ,मोसीन सोनार, जुनेद भाई,तसेच भोकर शहरातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Friday, April 5, 2019

दि. जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे अधीक्षक तथा बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र डाॅ.मधुकर गायकवाड राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित ...


दि. जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे अधीक्षक तथा बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र डाॅ.मधुकर गायकवाड राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित ...



- बिलोली (तालुका प्रतिनिधी)
दि. जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे अधीक्षक तथा बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र डाॅ.मधुकर गायकवाड यांना राष्ट्रीय गौरव अवार्ड या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या पुरस्काराने दि.28 मार्च रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे सिक्कीम न्यायालयाचे निवृत मुख्य न्यायाधीश प्रमोद कोहीली,उत्तराखंडचे माजी राज्यपाल श्री कृष्णकांत पाँल,पटियाला युनिव्हरसिटीचे कुलगुरु व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे.राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर विलक्षण कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनाच "राष्ट्रीय गौरव अवार्ड" हा पुरस्का प्रदान करण्यात येत असतो. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, कला, क्रिडा, राजकारण व समाजकारण इत्यादी क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असतो. "राष्ट्रीय गौरव अवार्ड" हा पुरस्कार आजपर्यंत अतिशय मोजक्या लोकांनाच प्रदान करण्यात आलेला आहे.त्यामध्ये सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबईचे अधीक्षक डाॅ. मधुकर गायकवाड यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्यांनी आजपर्यंत केलेल्या संघर्षाचा व सेवा कार्याचा मोठा गौरव आहे. असे मानले जात आहे.
आजपर्यंत हा पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवर व्यक्तींमध्ये थोर संत मदर तेरेसा, भारताचे माजी उपराष्ट्रपती श्री बी.डी.जत्ती, सुप्रसिध्द ह्दय रोग तज्ञ पद्मविभूषण डाॅ.बि.के.गोयल, पद्मभूषण डाॅ.नरेश त्रेहान, सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान, क्रिकेटर सुनील गावस्कर व सय्यद किरमाणी, ऑलंपिक पदक विजेते अभीनव बिंद्रा व धनराज पिल्लै, श्री डी.वाय.पाटील (माजी राज्यपाल - बिहार), माजी एयर चीफ मार्शल श्री एन.सी.सुरी, माजी चीफ जस्टिस पी.एन. भगवती, इलेक्शन कमीशनर जी.व्ही.जी.कृष्णमुर्ती, डाॅ.रमेश पोखरियाल (माजी मुख्यमंत्री गोवा) श्री दिनेश ओरायन(स्पिकर झारखंड ), मुझफ्फर हुसैन (सांसद) अशा निवडक व्यक्तींचा यात समावेश आहे.
डाॅ. मधुकर गायकवाड यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील संघर्ष, त्या नंतर त्यांनी मिळवलेले यश, वैद्यकीय शिक्षण व सेवा क्षेत्रात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, केलेले सेवा कार्ये व योगदान या सर्व बाबींची दखल घेऊन त्यांना "राष्ट्रीय गौरव अवार्ड" या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

भोकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी कपिल कांबळे तर सचिव पदी सम्राट हिरे

भोकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी कपिल कांबळे तर सचिव पदी सम्राट हिरे



(एजास कुरेशी)
भोकर:येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या1१२८ व्या सार्वजनिक जयंती मंडळाची बैठक तोडे यांच्या अध्यक्षतेखालीघेण्यात आली असून या बैठकीत नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे.
यावेळी भोकर सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या  अध्यक्ष पदी कपील कांबळे तर सचिव पदी सम्राट हिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारनी पुढील प्रमाणे आहे.
उपाध्यक्ष साहेबराव मोरे,
कोषाध्यक्ष गौतम कसबे संघटक देवा हटकर,सहसंघटक राजू दांडगे, उपाध्यक्ष संदीप गायकवाड,तर साल्लागार प्रबोधनकार साहेबराव येरेकर,भीमराव दुधारे,दशरथ भदरगे,सल्लागर एल ए हिरे,उत्तम बाबळे सुनील कांबळे,गौरव गोंवदे भीमराव भंडारे, व आदींची निवड करण्यात आली.

Thursday, April 4, 2019

परभणीत पुन्हा एकदा भर दिवसा महाभयंकर राड्यात खुन

परभणीत पुन्हा एकदा भर दिवसा महाभयंकर राड्यात खुन



 डोक्यात रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून केला खून.

बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
परभणी:-
परभणीत पुन्हा एकदा  महाभयंकर राड्यानंतर चर्चेत आले आहे.... एका व्यक्तीला घोळसू  घोळसू आणि शस्त्रांचाचे वार करीत त हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.. घातक हल्ल्यात त्या तरुणाचा  मृत्यू झाल्याचे कळाले आहे.... सुरुवातीच्या प्राथमिक वृत्तानुसार या मुळे झालेल्या व्यक्तीचे नाव समजले नाही शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे परभणी शहरात लागोपाठ ही दुसरी हत्या आहे..गुजरी बाजार परिसर ,सावत्र भावांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे
  पाडव्या निमित्त लागणाऱ्या  साखरेच्या घाटींचे दुकान लावण्यावरून झाला होता वाद डोक्यात रॉड आणि अंगावर चाकूचे वार करून केला खून असून या मारहाणीत काही शस्त्रास्त्रे वापरण्यात आल्याचे समजले आहे

संवेदनशील असलेल्या परभणी शहरातील एका मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी गुरुवारी सकाळच्या सुमारास भयंकर राडा झाला व त्या हल्ल्यात एक इसमाची हत्त्या झाल्याचे समजले आहे ....
परभणी शहरात अत्यंत मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या आणि अत्यंत गजबजलेल्या गुजरी बाजार या परिसरात व्यापाऱ्यांची मोठी दुकाने आहेत या ठिकाणी नेहमीच प्रचंड गर्दी सकाळपासूनच झालेली आढळते याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही विक्रेते आपला व्यवसाय देखील करतात परभणी शहरातील नामवंत अशा अनेक व्यापाऱ्यांची दुकाने याच परिसरात आहेत गुरुवारी सकाळच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये अतिशय किरकोळ कारणावरून वाद झाला या वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले.....
भांडणानंतर काही व्यक्ती घरी गेल्या आणि घरून काही शस्त्रास्त्रे आणली गेली असे सांगण्यात आले आहे शस्त्रास्त्रांचे वार त्या व्यक्तीवर करण्यात आले आणि त्या अवस्थेत तो गंभीर जखमी झाला आहे रक्तबंबाळ अवस्थेत परभणी जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत....
 या घटनेने पुन्हा एकदा परभणी शहरात चर्चेला उधाण आले आहे व तसेच जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे

Wednesday, April 3, 2019

"भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी लहानपणी हरवलेले भाऊच - असदुद्दीन ओवेसी

"भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी लहानपणी हरवलेले भाऊच - असदुद्दीन ओवेसी



बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क
अमरावती - भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच परिवारातील आहेत. लहानपणी ते हरवलेले भाऊ होते आणि आता एकमेकांना भेटले आहेत. प्रत्येक ठिकाणी क्लब करून ते निवडणुका लढवत असून, यांच्या क्लबचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत, अशी घणाघाती टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अमरावतीत येथे केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. अमरावतीच्या निवडणुकीत आमची लढत अपक्ष उमेदवारासोबत आहे, असेही ते म्हणाले.
अकॅडिमक हायस्कूलच्या मैदानात सोमवारी दुपारी ३ वाजता झालेल्या सभेत ओवेसी म्हणाले, अमरावतीत मागील दहा वर्षांपासून निवडून दिलेल्या खासदाराने अपेक्षित विकासात्मक कामे केली नाहीत, गरिबांना मदत होईल अशा प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आता नेहमीप्रमाणे त्यांना मत देऊ नका, विचार करून मत द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये घोषणा केली होती की, प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार. प्रत्यक्षात तसे झाले नाही. मात्र, मोदी स्वत:ची नोकरी वाचवण्यासाठी दोन समुदायांच्या नावावर राजकारण करत आहेत. जीएसटी, नोटबंदीमुळे सर्वाधिक नुकसान गरिबांचे झाले आहे. एकंदरीत मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी सर्वच आघाड्यांवर अयशस्वी झाले आहेत, असा आराेपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मात्र, त्यांना कर्ज माफ करण्यासाठी अडचणी येत आहेत. दुसरीकडे जेट एअरवेजसारख्या कंपनीला १५०० कोटी रुपये देतात. उद्धव ठाकरे म्हणाले हाेते, 'चौकीदार चोर है,' आता मोदींसमोर त्यांची 'भीगी बिल्ली'सारखी अवस्था झाली आहे. सिंचन घोटाळा उघड झाल्यानंतर राज्य सरकार अजित पवारांना अटक करण्याची भाषा करत होत

Monday, April 1, 2019

हिंगोली काॅग्रेस कार्यकर्त्याचे नेत्यांना सूचना दारूच्या वाहतुकीचे नियोजन करा... धाबे बुक करा..!

हिंगोली काॅग्रेस कार्यकर्त्याचे नेत्यांना सूचना
दारूच्या वाहतुकीचे नियोजन करा... धाबे बुक करा..!




                                  फाईल फोटो


बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

हिंगोली : अती उत्साही कार्यकर्ते आपल्याचा नेत्याला कसे अडचणीत आणतील, याचा काही नेम नसतो. तसाच एक  प्रकार हिंगोली लोकसभा निवडणुकीत घडला काॅंग्रेसचे हिंगोली चे  उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या बाबत  घडला आहे
हिंगोली मतदारसंघात वानखेडे हे ऐनवेळी उमेदवारी मिळवत अचानक भाजपमधून काॅंग्रेसमध्ये प्रवेश घेतला विद्यमान खासदार आणि काॅंग्रेसचे नेते राजीव सातव यांनी वानखेडेंना उमेदवारी मिळवून दिली. व तसेच सातव यांच्याकडे गुजरातची जबाबदारी असल्यामुळॆ ते तब्बल दीड महिन्यानंतर हिंगोलीत आले होते. त्यावेळी काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचाराच्या नियोजनसाठी मेळावा घेण्यात आला.
नेत्यांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी झाली. या वेळी संतोषराजे गोरे नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्याने जे सत्यकथन केले, त्यावरून नेतेच अडचणीत आले. गोरे यांनी भावनेच्या भरात आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी खडे बोल सुनावत सातव साहेबांच्या गेल्या निवडणुकीत आम्ही खूप काम केल्याचे सांगितले. ``कारण राजीवभाऊंनी नियोजन तसे लावले होते. त्यांच्यासारखे नियोजन लावा. ढाबे बुक करा. आमच्या काँग्रेसमध्ये खूप गट आहेत. ते अगोदर मिटवा,`` असे गोरेंनी उघडपणे सांगितले. 
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ``गेल्या निवडणुकीत साहेब आमच्या मागे खंबीरपणे उभे असल्याने  आम्ही 
दारूच्या बॉक्सची निवडणुकीत रस्त्याने यशस्वी वाहतूक केली. आपण देखील असेच नियोजन करा, असेही सांगण्यास कमी केले नाही. 
अशा सूचनांमुळे सातव आणि वानखेडे दोघेही चक्रावले. अखेर सातव यांनीच त्या कार्यकर्त्याला थांबविले. दरम्यान या ठिकाणी अनेक  माध्यमांच्या प्रतिनिधींना काँग्रेस कार्यकर्त्यांनी चित्रीकरण न करण्याचा सूचनाही दिल्या होत्या.

पेड न्‍यूज प्रकरणी अपक्ष उमेदवार अशोक चव्‍हाण व डॉ. महेश तळेगावकर यांना नोटीस

पेड न्‍यूज प्रकरणी अपक्ष उमेदवार अशोक चव्‍हाण व डॉ. महेश तळेगावकर यांना  नोटीस


नांदेड (एजास कुरेशी)
नांदेड, 16 नांदेड लोकसभा मतदार संघातील दोन उमेदवारांना पेड न्‍यूज प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्‍या आहेत.

      लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांच्‍या संदर्भाने वृत्‍तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, विविध चॅनल व सोशल मिडियावर नजर ठवेण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणिकरण व संनियत्रण समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. या समितीकडून वरील सर्व प्रसार माध्‍यमांवर करडी नजर ठेवली जात आहे. या प्रक्रियेत उमेदवारांच्‍या प्रसिध्‍द झालेल्‍या बातम्‍या पेड न्‍यूज आसल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर  नांदेड लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. महेश तळेगावकर व अपक्ष उमेदवार अशोक चव्‍हाण यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीसा बजावल्‍या आहेत.

     अपक्ष उमेदवार डॉ महेश तळेगावकर यांच्‍या बाबात दै श्रमिक एकजूट व दै. नांदेड एकजूट या वृत्‍तपत्रातून दिनांक 31 मार्च रोजी बातमी प्रसिध्‍द झाल्‍या. दै श्रमिक एकजूटमध्‍ये पहिल्‍या पानावर डॉ. महेश तळेगावकर यांच्‍या बंडाने भाजप नेते चक्रावले तर दै. नांदेड एकजूट या वृत्‍तपत्रातून डॉ. तळेगावकरांची उमेदवारी कायम निष्‍ठावंतांना डावलल्‍याचा आरोप, नांदेडमध्‍ये बंडाचा झेंडा या शिर्षकाखाली वृत्‍त प्रकाशित झाले आहे. जिल्‍हा माध्‍यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्‍या निदर्शनास ही बाब आले आहे. 




      तसेच दैनिक पुढारी या दैनिकाने दिनांक 31 मार्च, 2019 रोजी महाराष्‍ट्र पानावर प्रसिध्‍द केलेल्‍या मराठवाडा रिंगणातील उमेदवार या शिर्षाकाखाली नांदेड मतदार संघातील उमेदवारांची नांवे प्रसिध्‍द केली आहेत. त्‍यात अपक्ष उमेदवार अशोक चव्‍हाण यांच्‍या नावापुढे (लोहा) असा उल्‍लेख केल्‍याने त्‍यातून उमेदवाराच्‍या वेगळी ओळख प्रदर्शित करण्‍यात आलेली आहे. त्‍यामुळे पेडन्‍युजच्‍या कक्षेत सदर उमेदवार बसले आहेत. त्‍यामुळे या दोन्‍ही उमेदवारांना पेडन्‍युजसंदर्भात जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीस बजावली आहे.

नांदेड:व्‍हॉट्सअप ग्रुपवरुन पक्षाचा प्रचार केल्या प्रकरणी अडमीन व उमेदवाराला जिल्हाअधिकारी अरुण डोंगर यांनी बजावल्या नोटीसा

नांदेड:व्‍हॉट्सअप ग्रुपवरुन पक्षाचा प्रचार केल्या प्रकरणी अडमीन व उमेदवाराला जिल्हाअधिकारी अरुण डोंगरे यांनी बजावल्या नोटीसा




नांदेड,( एजास कुरेशी)
, १६नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाचे  उल्‍लंघन करत सोशल मिडियावरुन उमेदवारांचा व पक्षाचा प्रचार करणा-या अॅडमीन व उमेदवारांना जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्‍या आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांच्‍या संदर्भाने वृत्‍तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, विविध चॅनल व सोशल मिडियावर नजर ठवेण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणिकरण व संनियत्रण समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे. या समितीकडून वरील सर्व प्रसार माध्‍यमांवर करडी नजर ठेवली जात आहे. या प्रक्रियेत उमेदवारांच्‍या व त्‍यांच्‍यासाठी इतरांनी प्रसारित व  प्रसिध्‍द केलेल्‍या  बातम्‍या, सोशल मिडियावरील पोस्‍ट, पक्षाच्‍या विषयी देण्‍यात आलेल्‍या पोस्‍ट व उमेवारांना मतदान करण्‍याविषयी करण्‍यात आलेले आवाहन याबाबत तपासण्‍या करण्‍यात आल्‍या.

या तपासणीत शैलेश नंदकुमार मुखेडकर यांनी वायजर टेक्‍नॉलॉजी, नांदेड येथून भाजपा उमेदवाराच्‍या प्रचारासाठी एकत्रित संदेश वितरीत केले आहेत. माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीने हे संदेश पकडले आहेत. त्‍यानुसार मुखेडकर यांनी समितीची पूर्वपरवानगी घेतली नसल्‍याचे उघड झाले आहे. संबंधित उमेदवारांनी खर्चात या प्रकरणी नोंद केली नसल्‍याचेही लक्षात आले आहे.

व्‍हॉट्सअप परिवर्तन ग्रुपवरुन कॉंग्रेस उमेदवाराच्‍या प्रचारासाठी बैठक बोलविल्‍याचा संदेश देण्‍यात आला होता. या प्रकरणी ग्रुप अॅडमीन डॉ. मनीषा कागडे तसेच सकल मराठा शिवजन्‍मोत्‍सव ग्रुपवरुन कॉंग्रेस उमेदवाराच्‍या विजयी करण्‍यासंदर्भातला संदेश देण्‍यात आला होता. या ग्रुपमधील डॉ. स्मिता गायकवाड, श्रीमती जयश्री पावडे, व्‍यंकटेश मंगनाळे, संगीता पाटील, प्रतिमा पाटील, सुरेखा रावणगावकर, राजश्री मिरजकर, अविनाश कदम पाटील यांना नोटीसा देण्‍यात आल्‍या आहेत. तसेच फेसबुकवरुन विविध उमेदवारांना निवडून देण्‍यासंदर्भात प्रचार करण्‍याच्‍या पोस्‍ट टाकल्‍या आहेत. अशा युझरकर्त्‍यांना या समितीने नोटीसा बजावल्‍या आहेत. प्रभाकर पांडे, वंचित बहुजन आघाडी नांदेड ऑफिशियल फेसबुक, नांदेड सोशल मिडीया भाजपा यांचा त्‍यात समावेश आहे.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...