Friday, April 5, 2019

दि. जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे अधीक्षक तथा बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र डाॅ.मधुकर गायकवाड राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित ...


दि. जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे अधीक्षक तथा बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र डाॅ.मधुकर गायकवाड राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित ...



- बिलोली (तालुका प्रतिनिधी)
दि. जाॅर्जेस रूग्णालय मुंबईचे अधीक्षक तथा बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र डाॅ.मधुकर गायकवाड यांना राष्ट्रीय गौरव अवार्ड या अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या पुरस्काराने दि.28 मार्च रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर नवी दिल्ली येथे सिक्कीम न्यायालयाचे निवृत मुख्य न्यायाधीश प्रमोद कोहीली,उत्तराखंडचे माजी राज्यपाल श्री कृष्णकांत पाँल,पटियाला युनिव्हरसिटीचे कुलगुरु व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे.राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवर विलक्षण कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींनाच "राष्ट्रीय गौरव अवार्ड" हा पुरस्का प्रदान करण्यात येत असतो. यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, कला, क्रिडा, राजकारण व समाजकारण इत्यादी क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असतो. "राष्ट्रीय गौरव अवार्ड" हा पुरस्कार आजपर्यंत अतिशय मोजक्या लोकांनाच प्रदान करण्यात आलेला आहे.त्यामध्ये सेंट जाॅर्जेस रूग्णालय, मुंबईचे अधीक्षक डाॅ. मधुकर गायकवाड यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्यांनी आजपर्यंत केलेल्या संघर्षाचा व सेवा कार्याचा मोठा गौरव आहे. असे मानले जात आहे.
आजपर्यंत हा पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवर व्यक्तींमध्ये थोर संत मदर तेरेसा, भारताचे माजी उपराष्ट्रपती श्री बी.डी.जत्ती, सुप्रसिध्द ह्दय रोग तज्ञ पद्मविभूषण डाॅ.बि.के.गोयल, पद्मभूषण डाॅ.नरेश त्रेहान, सरोदवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान, क्रिकेटर सुनील गावस्कर व सय्यद किरमाणी, ऑलंपिक पदक विजेते अभीनव बिंद्रा व धनराज पिल्लै, श्री डी.वाय.पाटील (माजी राज्यपाल - बिहार), माजी एयर चीफ मार्शल श्री एन.सी.सुरी, माजी चीफ जस्टिस पी.एन. भगवती, इलेक्शन कमीशनर जी.व्ही.जी.कृष्णमुर्ती, डाॅ.रमेश पोखरियाल (माजी मुख्यमंत्री गोवा) श्री दिनेश ओरायन(स्पिकर झारखंड ), मुझफ्फर हुसैन (सांसद) अशा निवडक व्यक्तींचा यात समावेश आहे.
डाॅ. मधुकर गायकवाड यांनी अतिशय कठीण परिस्थितीत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांचा शिक्षण क्षेत्रातील संघर्ष, त्या नंतर त्यांनी मिळवलेले यश, वैद्यकीय शिक्षण व सेवा क्षेत्रात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, केलेले सेवा कार्ये व योगदान या सर्व बाबींची दखल घेऊन त्यांना "राष्ट्रीय गौरव अवार्ड" या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...