महिलांनी विविध योजनेचा लाभ घेउन सक्षम बनावे. ..समतादुत शारदा
बिलोली (ता. प्रतिनिधी )
शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेउन महिलांनी सक्षम बनावे असे आव्हान बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे यांनी महीलांना मार्गदर्शन करताना केले. येथुन जवळ च असलेल्या मौजे. रूद्रापुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे च्या वतीने महिला सक्षमिकरण करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महात्मा फुले आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्जुन शेळके तर उदघाटनाला उपसरपंच विठ्ठल डोरणेवाड हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे ह्या होत्या. यावेळी समतादुत यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती महिलांना देऊन बचत गटाच्या विकासाचा आढावा घेतला. बचत गटांना मिळणारे मिनी ट्रक्टर , रमाई आवास योजना व लघु उद्योगासाठी मिळणारे कर्ज .इत्यादी ची सखोल माहिती देऊन त्या साठी लागणारे कागद पत्रे व सबंधीत कार्यालये या बाबत सविस्तर माहिती देऊन लाभ घेउन महिलांनी सक्षम बनावे असे आव्हान केले. या समता सप्ताहास ( बार्टी )च्या समतादुत प्रकल्पाच्या मुख्य संचालीका श्रीमती प्रज्ञा वाघमारे मॅडम पुणे आणि लातूर विभागाच्या सहाय्यक प्रकल्प संचालीका सुजाता पोहरे यांच्ये मार्गदर्शन लाभले.

No comments:
Post a Comment