Sunday, April 7, 2019

जमाअत ए इस्लामी हिंदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नांदेडचे इंजिनियर सआदतुल्लाह हुसैनी यांची निवड

जमाअत ए इस्लामी हिंदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी  नांदेडचे इंजिनियर सआदतुल्लाह हुसैनी यांची निवड



नांदेड:बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
व्यवस्था परिवर्तनाचा उद्देश समोर ठेऊन शांततेच्या मार्गाने समाज उभारणीचे कार्य करणारी उदारवादी चळवळ जमाअत ए इस्लामी हिंदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मूळचे नांदेडचे असलेले इंजिनियर सआदतुल्लाह हुसैनी यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील मुख्यालयात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या प्रतिनीधी सभेत खोलवर चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी प्रसिद्ध विचारवंत मौलाना जलालुद्दीन उमरी या पदावर होते. यानिमित्ताने जमाअतच्या नेता निवडीच्या पद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवघ्या पंचेचाळीस वर्षांचे हुसैनी यांनी इलेक्ट्रॉनिक आणि टेली कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. बारा पुस्तकं लिहिली असून दोनशेच्यावर लेख लिहिले आहेत.

 भारतीय मुस्लिम तरूण पीढीला कट्टरवादापासून दूर राखण्यात मोलाचा वाटा असलेल्या स्टुडन्ट्स इस्लामिक आॅर्गनायजेशन्स आॅफ इंडिया (एस.आय.ओ.) चे ते राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. तसेच यापूर्वी जमाअतचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. सध्या हैद्राबादला स्थायिक असलेल्या हुसैनींची आय.टी. क्षेत्राशी संबंधित कंपनी आहे. आपला प्रपंच सांभाळत तर परमार्थ साधण्याच्या इस्लामी शिकवणीवर ते तंतोतंत अंमलबजावणी करत असतात.

अगदी साधी राहणी, अहंकारशुन्यता आणि विनम्रतेने परिपूर्ण व्यक्तीमत्व असलेले हुसैनी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी मात्र प्रसिद्ध आहेत. भारतीय इस्लामी जगतात अंत्यत महत्वपूर्ण मानले जाणार्या या पदावर निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर सदिच्छांचा पाऊस पडतोय. जमाअतच्या देशभरातील सदस्यांनी मतदान करून निवडून दिलेले प्रतिनीधी दर चार वर्षांनी "अमीर (अध्यक्ष)" निवडत असतात. जमाअतची ही लोकशाहीजन्य इस्लामी पद्धतही कौतुकास्पद आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...