पेड न्यूज प्रकरणी अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण व डॉ. महेश तळेगावकर यांना नोटीस
नांदेड (एजास कुरेशी)
नांदेड, 16 नांदेड लोकसभा मतदार संघातील दोन उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या संदर्भाने वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, विविध चॅनल व सोशल मिडियावर नजर ठवेण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून वरील सर्व प्रसार माध्यमांवर करडी नजर ठेवली जात आहे. या प्रक्रियेत उमेदवारांच्या प्रसिध्द झालेल्या बातम्या पेड न्यूज आसल्याचे लक्षात आल्यानंतर नांदेड लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ. महेश तळेगावकर व अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नोटीसा बजावल्या आहेत.
अपक्ष उमेदवार डॉ महेश तळेगावकर यांच्या बाबात दै श्रमिक एकजूट व दै. नांदेड एकजूट या वृत्तपत्रातून दिनांक 31 मार्च रोजी बातमी प्रसिध्द झाल्या. दै श्रमिक एकजूटमध्ये पहिल्या पानावर डॉ. महेश तळेगावकर यांच्या बंडाने भाजप नेते चक्रावले तर दै. नांदेड एकजूट या वृत्तपत्रातून डॉ. तळेगावकरांची उमेदवारी कायम निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, नांदेडमध्ये बंडाचा झेंडा या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाले आहे. जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या निदर्शनास ही बाब आले आहे.
तसेच दैनिक पुढारी या दैनिकाने दिनांक 31 मार्च, 2019 रोजी महाराष्ट्र पानावर प्रसिध्द केलेल्या मराठवाडा रिंगणातील उमेदवार या शिर्षाकाखाली नांदेड मतदार संघातील उमेदवारांची नांवे प्रसिध्द केली आहेत. त्यात अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नावापुढे (लोहा) असा उल्लेख केल्याने त्यातून उमेदवाराच्या वेगळी ओळख प्रदर्शित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पेडन्युजच्या कक्षेत सदर उमेदवार बसले आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना पेडन्युजसंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीस बजावली आहे.

No comments:
Post a Comment