हिंगोली काॅग्रेस कार्यकर्त्याचे नेत्यांना सूचना
दारूच्या वाहतुकीचे नियोजन करा... धाबे बुक करा..!
फाईल फोटो
बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
हिंगोली : अती उत्साही कार्यकर्ते आपल्याचा नेत्याला कसे अडचणीत आणतील, याचा काही नेम नसतो. तसाच एक प्रकार हिंगोली लोकसभा निवडणुकीत घडला काॅंग्रेसचे हिंगोली चे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या बाबत घडला आहे
हिंगोली मतदारसंघात वानखेडे हे ऐनवेळी उमेदवारी मिळवत अचानक भाजपमधून काॅंग्रेसमध्ये प्रवेश घेतला विद्यमान खासदार आणि काॅंग्रेसचे नेते राजीव सातव यांनी वानखेडेंना उमेदवारी मिळवून दिली. व तसेच सातव यांच्याकडे गुजरातची जबाबदारी असल्यामुळॆ ते तब्बल दीड महिन्यानंतर हिंगोलीत आले होते. त्यावेळी काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचाराच्या नियोजनसाठी मेळावा घेण्यात आला.
नेत्यांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी झाली. या वेळी संतोषराजे गोरे नावाच्या काँग्रेस कार्यकर्त्याने जे सत्यकथन केले, त्यावरून नेतेच अडचणीत आले. गोरे यांनी भावनेच्या भरात आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी खडे बोल सुनावत सातव साहेबांच्या गेल्या निवडणुकीत आम्ही खूप काम केल्याचे सांगितले. ``कारण राजीवभाऊंनी नियोजन तसे लावले होते. त्यांच्यासारखे नियोजन लावा. ढाबे बुक करा. आमच्या काँग्रेसमध्ये खूप गट आहेत. ते अगोदर मिटवा,`` असे गोरेंनी उघडपणे सांगितले.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ``गेल्या निवडणुकीत साहेब आमच्या मागे खंबीरपणे उभे असल्याने आम्ही
दारूच्या बॉक्सची निवडणुकीत रस्त्याने यशस्वी वाहतूक केली. आपण देखील असेच नियोजन करा, असेही सांगण्यास कमी केले नाही.
अशा सूचनांमुळे सातव आणि वानखेडे दोघेही चक्रावले. अखेर सातव यांनीच त्या कार्यकर्त्याला थांबविले. दरम्यान या ठिकाणी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना काँग्रेस कार्यकर्त्यांनी चित्रीकरण न करण्याचा सूचनाही दिल्या होत्या.

No comments:
Post a Comment