Monday, April 8, 2019

काँग्रेस भाजपा दोन्ही सरकार भ्रष्टाचारी असून बहूजन वंचित आघाडी च्या उमेदवाराला निवडून द्या अॅड.बाळासाहेब आंबेडकर

काँग्रेस भाजपा दोन्ही सरकार भ्रष्टाचारी असून बहूजन वंचित आघाडी च्या उमेदवाराला निवडून द्या अॅड.बाळासाहेब आंबेडकर




भोकर(एजास कुरेशी )
देशातील अर्थिक व्यवस्था हि बड्या उद्योगपतीच्या फायद्याची ठरत असल्याने सामान्य शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले त्यांच्या मालाला आधारभूत किंमत मिळाली पाहिजे त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे काँग्रेस भाजपा दोन्ही सरकार भ्रष्टाचारी असून बहूजन वंचित आघाडी च्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन अॅड.आंबेडकर यांनी केले आहे




   १९९० नंतर काॅग्रेस च्या हातात सत्ता आली. परंतु तेव्हा पासुन ते आज पर्यंत काॅग्रेने आर. एस.एस ला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला गेला नाही .जर केलाच आसेल तर कोणता प्रयत्न केला आसा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर सभेत बोलत होते
  दुपारी रखरखत्या ऊन्हात प्रचंड जनसमुदाय उपस्थित  होता.पुढे बोलताना  बाळासाहेब म्हणाले की आशोकराव चव्हाण विश्व हिंदु परीषदेचे सदस्य आहेत की नाही हे त्यांनी सिध्द करावे , येथिल सत्ताधारी सहकारी साखर कारखाने मोडीत काडुन खाजगीत घेवुन चालवत आहेत. परंतु यशपाल भिंगे यांना निवडुन दिल्यास तेच कारखाने आम्ही सरकारी करू आसे आश्वासन आंबेडकरांनी दिले.
       या देशात दोन बोके सत्ते वरती येवुन बसलेत ते म्हणजे अमित शहा व नरेंद्र मोदी आणि हे दोघेही कमजोर आश्या लोकांचीच शिकार करतात अशी टीकाही त्यांनी केली .प्रस्ताविक ऊत्तम गवाले यांनी केले तर सुत्रसंचलन निळकंट ताकबिडकर यांनी केले आभार कपिल डुमने यांनी मांडले.


     यावेळी प्रमुख मार्गदर्क भारीप बहुजन माहासंघाचे संस्थापक आध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.बाळासाहेब आंबेडकर , वंचित बहुजन आघाडीचे आधिकृत ऊमेदवार प्रा.डाॅ.यशपाल भिंगे , लिंगायत नेते शिवानंद हैबतपुरे,अॅड. आण्णाराव पाटील,प्रा.रामचंद्र भरांडे,  स्वप्नील नरबाग(फुले शाहु आंबेडकर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष),आनिल सिरसे(जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना), पि .आय.गायकवाड, धम्मदीप गावंडे,शिवाजी गेडेवार, रावसाहेब, पवार ,उत्तम गवले,पंडित वाघमारे,रिफक गौतम धडेकर ,जाकेर चाउस,फेरोज लाला,सूभाष तेले,एल.ए.हिरे,बाबा खान जुनेद पटेल निजाम बाबा सम्राट हिरे युवा पँथरची सर्व टीम प्रमुख उपस्थितीथी  होती.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...