Saturday, September 28, 2019

माने , लोकडे, येरेकार यांची केंद्रीय शिक्षक परिक्षेसाठी निवड .

माने , लोकडे, येरेकार यांची केंद्रीय शिक्षक परिक्षेसाठी निवड .





भोकर / प्रतिनिधी /
 डॉ . बाबासाहेब आंबेडकर संस्थापित तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी तज्ञप्रचारक निर्माकरन्यासाठी देशातील कांही निवडक उपासकांची निवड करन्यात येते त्यात नांदेड जिल्ह्यातून कुमारस्वामी माने, सुरेश लोकडे, प्रा .आप्पाराव येरेकार यांची निवड करण्यात आली आहे .
दि .२८सप्टेबर ते ८आक्टोबर २०१९या कालावधित चैत्यभूमि दादर मुंबई येथे दहा दिवस यांना श्रामणेर दिक्षा देऊन भगवंताच्या चिवरमध्ये बसवून धम्माचे प्रशिक्षण देण्यात येत आहे .हे शिबीर केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने व भन्ते बुद्धपाल, भन्ते धम्मप्रिर्य यांच्या मार्गदर्शनात  मातृसंस्थेच्या वतीने घेतले जात आहे . माने, लोकडे,येरेकार हे धम्माचे गाढे अभ्यासक असून ते बौद्धांच्या सर्व विधी पार पाडतात , संस्थेचे निष्ठावान म्हणून जिल्हयात परिचित वेगळी ओळख असलेले उच्चविद्या भूषीत उपासक आहेत . हे यशस्वीरित्या केंद्रीय शिक्षक परिक्षा पास होऊन धम्मचळवळीस वाहुन घेत धम्माचा प्रचार करतील म्हणून यांच्या निवडीचे अभिनंदन अॅड .एम.एन. शिंगे, माधव सरपे, प्रभाकर नांदेडकर, बी .एस. सरोदे, प्रा .बी.एम. वाघमारे, प्रा .डॉ . राजपालसिंह चिखलीकर प्रा . सदानंद कांबळे, सा . ना .भालेराव, प्रा .डॉ.पी.जे. थोटे, प्रा . प्रसेनजित चिखलीकर, इंजि.प्रशांत ठमके, जी .पी. मिसाळे आदिनी केले आहे .

Friday, September 27, 2019

माजी खासदारांने बार बंद करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा बार चालूच ती बार बंद करा अन्यथा आंदोलन करो :- सईद नगर रहिवाशी

माजी खासदारांने बार बंद करण्याचे आश्वासन  देऊन सुद्धा बार चालूच ती बार बंद करा अन्यथा आंदोलन करो :- सईद नगर रहिवाशी



                                 फाईल फोटो


भोकर:-(एजास कुरेशी)
 वॉर्ड क्र. २ मुस्लिम वस्ती असलेल्या  सईद नगर येथे सुनील शहा व संतोष शहा हे साहेबा बारचे परवानाधारक यांनी संगनमत करून त्यांच्या राहत्या घरी अनधिकृतरीत्या दारूचे दुकान बियर बार सुरू केल्यामुळे त्या गल्लीमध्ये दारूडे लोक दारू पिऊन धिंगाणा करीत करीत आहेत व तसेच रस्त्यावरच लघवी वगैरे करीत असल्यामुळे व गल्लीतील लोकांसोबत वाद भांडणे करीत असल्यामुळे त्या अनधिकृत रीत्या सुरु करण्यात आलेल्या साहेबा बार ला तात्काळ बंद करण्यासाठी व तसेच सदरील लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय आयुक्त व नांदेड जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे यापूर्वी भोकर येथील  माजी खासदार यांनी वचन दिले होते की सदरील बियर बार मी सुरू होऊ देणार नाही परंतु त्यांनी वचन दिल्यानंतर सुद्धा त्या  ठिकाणी बार सुरू झाले आहे त्यामुळे वार्ड क्र.२ मधील लोकांनी निषेध व्यक्त केला आहे व तसेच त्या  माजी खासदार वर सर्व सईद नगर वासीयांनी नाराजी वेक्त केली आहे विधानसभा निवडणुकीत त्या माजी खासदारची एक ही सभा सईद नगर मध्ये होऊ देणार नाही असे पण तेथील नागरिंका म्हणाले आहे .
 लवकरात लवकर ती बार बंद करण्यात आली नाहीं तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे करण्यात आलेली तक्रार ही राज्यउत्पादन शुल्क कार्यालय नांदेड ,राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बिलोली, पोलीस अधीक्षक नांदेड, पोलीस निरीक्षक भोकर, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार भोकर,मुख्याधिकारी भोकर यांना देण्यात आली आहे

Wednesday, September 25, 2019

'येवले चहा' चे उत्पादन बंद करण्याचे आदेश : एफडीएची कारवाई

'येवले चहा' चे उत्पादन बंद करण्याचे आदेश : एफडीएची कारवाई


विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र
पुणे : अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले आहेत. येवले चहा पिल्याने पित्त होत नाही. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जात असल्याचा चुकीचा दावा त्यांनाभोवला असून, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शहरातील विविध चहा केंद्र मात्र, माल असेपर्यंत सुरु राहतील.

येवले चहामधे मेलानाईटचा वापर केला जात असल्याचे वृत्त पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी केली. चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला आहे. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. येत्या तीन आठवड्यात प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नुसार पॅकबंद केलेली चहा पावडर, साखर आणि चहा मसाल्याच्या पाकिटावर कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे त्यात नक्की कोणता अन्नपदार्थ किती प्रमाणत आहे, हे समजू शकत नाही. उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी योग्य शिक्षण येतलेल्या व्यक्तीची नेमणूक केलेली नसणे, अन्न पदार्थांची प्रयोगशाळेतून तपासणी न करणे, कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध नसणे, तसेच उत्पादनाच्या ठिकाणी पेस्ट कंट्रोल केले नसल्याची त्रुटी आढळली आहे.

येवले चहाची वृत्तवाहिनीवर जाहीरात प्रसिद्ध केली जाते. त्यात येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नसल्याचा दावा केला जातो. तसेच, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते. ही जाहीरात दिशाभूल करणारी असल्याचे एफडीएने म्हटले आहे. या प्रकरणी एफडीएचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी नोटीस बजावली आहे. तसेच, अ?ॅडर्व्हटायझिंग स्टॅण्डर्ड कौंसिल आॅफ इंडियाकडे देखील तक्रार नोंदविल्याचे एफडीएच्या अधिकाºयांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार व रमाकांत कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” :- विनोद तावडे


लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” :- विनोद तावडे



नांदेड :-एजास कुरेशी
विधानसभा निवडणूक लढवण्यावरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राजकीय सल्ला देत टीका केली आहे. “लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यांनी आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी विधानसभेची निवडणूक लढवु नये,” असा सल्ला देत “राज्यातील कुठल्याही मतदारसंघात चव्हाण उभे राहिले तरी हरतील, अशी टीका तावडे यांनी केली.

आज नांदेडमध्ये मिडीया सेंटरचे उद्‌घाटन करण्यासाठी विनोद तावडे आले होते. राज्यात सात मिडीया सेंटर तयार होणार असून एका मिडीया सेंटरच्या अंतर्गत 22 ते 35 विधानसभा मतदार संघ येणार आहेत. त्याद्वारे जनतेच्या प्रत्येक घरापर्यंत भारतीय जनता पार्टीने मागील पाच वर्षात केलेल्या विकासात्मक कामांचा आराखडा पुन्हा एकदा पोहचविण्याची जबाबदारी या सात मिडीया सेंटरवर असेल हे सर्व मिडीया सेंटर राज्याच्या केंद्रीय मिडीया सेंटरशी जोडले जाणार आहेत. नांदेडच्या मिडीया सेंटर अंतर्गत नांदेडच्या 9, लातूरच्या 6, हिंगोलीच्या 3 आणि उस्मानाबादच्या 4 अशा एकूण 22 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार राम पाटील रातोळीकर, प्रविण साले, व्यंकटेश साठे आदींसह अनेक भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी विनोद तावडे पुढे म्हणाले की, मी येथे आलोच म्हणून अशोक चव्हाणांना सल्ला देवू इच्छीतो की, त्यांनी विधानसभा निवडणुकीमधील भोकर विधानसभा लढवू नये कारण या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसारखाच रिप्ले होणार आहे. त्यामुळे झाकली मुठ झाकलीच राहू द्या असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देत विनोद तावडे यांनी ती झाकलेली मुठ पुढे कधी तरी कामाला येईल असे सांगितले. या निवडणुकीत अशोक चव्हाणांनी 288 जागांपैकी कोठेही निवडणुक लढली तर त्यांचे जे होणारे तेच होणार असे सांगितले. भारतीय जनता पार्टीमध्ये मोदींचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपला हातभार लागावा अशी इच्छा ठेवणारे कार्यकर्ते जास्त असून विधानसभा निवडणुकीचे तिकिट मागणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे अशी माहिती दिली. मराठवाड्यातील महसुल आयुक्तालय नांदेडला सुरू झाले नाही याबद्दल प्रश्न विचारला असता तावडे यांनी ज्यांनी निर्णय घेतला त्यांनीच का अंमलात आणला नाही असा प्रतिप्रश्न विचारत योग्यवेळी आयुक्तालयाचा निर्णय घेवू असे सांगितले. भारतीय जनता पार्टीच्यावतीने अनेक मुस्लिमांना विधानसभेमध्ये टिकीटे दिली जाणार असल्याचे विनोद तावडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Tuesday, September 24, 2019

भोकर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 78 हजार 450 मतदार - पवन चांडक

भोकर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 78 हजार 450 मतदार - पवन चांडक



भोकर : एजास कुरेशी
 85,भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी कार्या लयात श्री, पवन चांडक यांनी बोलाविलेल पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या बाबद मतदार संघातील तिन्ही तालुक्याची माहिती दिली आहे, सोबतच आदर्श आचार संहितेचे सर्वानी पालन करण्याचे त्त्यांनी आवाहन केले आहे.
     

पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी श्री, पवन चांडक व तहसीलदार  श्री,भरत सूर्यवंशी माहिती देतांना

भोकर विधानसभा क्षेत्रातील २ लाख ७८ हजार  मतदार मतदानाचा हक्क बजावतील या निवडणूक प्रक्रियेत ३८ झोनल अधिकाऱ्यांसह २ हजार ४०० कर्मचारी निवडणूकीच्या कामात सज्ज राहतील अशी माहीती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक आज यांनी दिली.

भोकर विधान क्षेत्रात एकूण ३२४ मतदान केंद्र असून पूरुष मतदार १ लाख ४३ हजार ७०८ तर स्त्री मतदार १ लाख ३४ हजार ७३६ असे एकूण २ लाख ७८ हजार  ४५० मतदार आहेत.भोकर मूदखेड अर्धापूर या तिन तालूके विधानसभा क्षेत्रात आहेत.भोकर तालूक्यात दोन ठिकाणी चेक पोस्ट करीता रहाटी व भोकरफाटा या ठिकाणी कर्मचार्‍यांची कॅमेरासह नियूक्ती केली जाईल. असेही यावेळी सांगीतले तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपस्थिती होती.

भोकर तालुक्यात एकुण मतदार

भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर तालुका क्षेत्रात एकूण १३० मतदान केंद्र असून पूरुष मतदार ५४ हजार २९७ तर स्त्री मतदार ५२ हजार २६१ असे एकूण १ लाख  ६ हजार ५५८  मतदार आहेत.

मूदखेड  तालुक्यात एकुण मतदार


भोकर विधानसभा मतदारसंघातील मूदखेड तालुका क्षेत्रात एकूण १०१  मतदान केंद्र असून पूरुष मतदार ४५ हजार ७१० तर स्त्री मतदार ४२ हजार ३३७ असे एकूण ८८ हजार ५०  मतदार आहेत.

अर्धापूर तालुक्यात एकुण मतदार

भोकर विधानसभा  मतदारसंघातील अर्धापूर  तालुका क्षेत्रात एकूण  ९३ मतदान केंद्र असून पूरुष मतदार ४३ हजार ७०१ तर स्त्री मतदार ४० हजार १३९ असे एकूण ८३हजार ८४२  मतदार आहेत.

६ तृतीय पंथी बजावतील मतदानाचा हक्क

होत असलेल्या विधानसभा निवडणूकित भोकर विधानसभा मतदारसंघात एकुण ६ तृतीय पंथी मतदार आपला मतदानाचा हक्क वाजवणार आहेत.यापैकी अर्धापूर तालुक्यातील २ तर  मूदखेड तालुक्यातील ४ असे एकुण ६ तृतीय पंथी मतदारांची मतदान यादी मधे नोंद झाली आहे.

  अर्ज देने,अर्ज स्वीकार करणे,(सुट्टीचे दिवस वगळून) आणि अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून उमेदवारांनी इथे येऊन अधिकची माहिती घ्यावी असेही त्यांनी या वेळी सांगितले आहे, कार्यालयाच्या दोन्ही बाजुचा 100 मीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून उमेदवारासह पाच व्यक्तींना कार्यालयात प्रवेश दिला जाईल, भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत, तर नागरिकांसाठी आचारसंहिता भांगाची तक्रार असल्यास त्यांनी तालुक्यातील गटविकास अधिकारी (आचार संहिता प्रमुख) यांच्याकडे किंवा आपल्या मोबाईल मधून सिव्हिझील वरून थेट तक्रार करू शकतात. ड्राय - डे च्या दिवशी जे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Sunday, September 22, 2019

भोकरला शुक्रवारी मोफत शस्त्रक्रिया शिबिर हायड्रोसिल, हर्णीया, अपेंडिक्स व शरिरावरील गाठी रोगाच्या रुग्णांसाठी आयोजन

भोकरला शुक्रवारी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
हायड्रोसिल, हर्णीया, अपेंडिक्स व शरिरावरील गाठी रोगाच्या रुग्णांसाठी आयोजन



एजास कुरेशी
भोकर -  स्मृतीशेष प्रविण वाघमारे यांच्या चतुर्थ पुण्यस्मृती दिनानिमित्त  हायड्रोसिल, हर्णीया, अपेंडिक्स व शरिरावरील गाठी आदी आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. २७ रोजी करण्यात आले आहे.
   शहरातील पंचायत समिती समोरील यश हॉस्पिटल येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत घेण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानी  नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर राहणार आहेत तर तहसीलदार भरत सुर्यंवंशी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होणार असून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिरात हायड्रोसिल, हर्णीया, अपेंडिक्स व शरिरावरील गाठी या आजाराच्या रुग्णांची तपासणी व मोफत शस्त्रक्रिया डॉ. जिवन पावडे, डॉ. दिलीप फुगारे, डॉ. रामेश्वर भाले, डॉ. उत्तम वागदकर, डॉ. अनंत चव्हाण, डॉ. विजय करणवाड आदी तज्ञ डॉक्टर्स करणार आहेत. गरजु रुग्णांनी या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Wednesday, September 18, 2019

चक्क ७० वर्षांच्या ‘तरुणा’ने दिली धमकी सिंधू अन् माझ्या लग्नाची करा तयारी , अन्यथा,तीला पळवून नेईन

चक्क ७० वर्षांच्या ‘तरुणा’ने दिली धमकी
सिंधू अन् माझ्या लग्नाची करा तयारी , अन्यथा,तीला पळवून नेईन





चेन्नई (वृत्तसंस्था) : आपल्या सहजसुंदर खेळाने बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने चाहत्यांच्या हृदयात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अर्थात, खेळातील कौशल्याचे चाहते असणे आणि केवळ सौंदर्याचे चाहते असणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ‘सिंधू आपल्याला आवडत असून तिच्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगत चक्क ७० वर्षांच्या ‘तरुणा’ने (?) जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. मलाईस्वामी असं या गृहस्थाचे नाव असून तमिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत. या अजब प्रकाराची राज्यात चर्चा होत आहे.


रामनाथपुरम जिल्हाधिकारी दर आठवड्याला लोकांची भेट घेत असतात. यावेळी लोक आपला अर्ज दाखल करत समस्या मांडू शकतात. मलाईस्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपला आणि सिंधूचा फोटो एका बंद लिफाफ्यात सादर केला. अर्जात त्यांनी म्हटले आहे की, मला २४ वर्षीय पी. व्ही. सिंधूसोबत लग्न करायचं आहे. जर लग्नासाठी योग्य तयारी करण्यात आली नाही तर आपण तिचं अपहरण करु आणि लग्न करु अशी धमकीही दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपला जन्म ४ एप्रिल २००४ रोजी झाला असून आपण फक्त १६ वर्षांचे असल्याचा अजब दावाही यावेळी केला. सिंधूने ज्या प्रकारे आपल्या करिअरमध्ये यशाची उंची गाठली आहे ते पाहून आपण प्रचंड प्रभावित झालो  असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा

एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा





 देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असा लौकिक असलेल्या एलआयसीमध्ये तब्बल 24 वर्षांनंतर मोठी भरती निघाली आहे. एलआयसीमध्ये 'असिस्टंट' (सहायक) पदासाठी ही भरती जाहीर झाली असून, या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून सुमारे आठ हजार जागा भरल्या जाणार आहेत. जवळपास 24 वर्षांनंतर होत असलेल्या असिस्टंट या भरतीसाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे. कुठल्याही विषयामधील पदवीधर हा ही परीक्षा देण्यासाठी पात्र असेल. या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षे आहे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सुट देण्यात आलेली आहे.  पूर्व आणि मुख्य परीक्षा असे परीक्षेचे स्वरूप राहील. प्रश्नपत्रिकेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतील. तसेच ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असेल. परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2019 असून, इच्छूक उमेदवारांना www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. या परीक्षेसाठी राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि गोव्यातील पणजी ही परीक्षा केंद्रे असतील. परीक्षेची तारीख नंतर जाहीर होईल.

अयोध्या प्रकरण: सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाइन, नोव्हेंबरमध्ये निर्णय येण्याची शक्यता

अयोध्या प्रकरण: सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाइन, नोव्हेंबरमध्ये निर्णय येण्याची शक्यता.






अयोध्या राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यांना थांबवण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सुनावणी सुरु असताना त्याचवेळी मध्यस्थता करण्याचे प्रयत्न सुरु ठेवण्यास काही हरकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सागितलं आहे. यासोबतच सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गनोगोई यांनी डेडलाइन दिली आहे. रंजन गोगोई यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितलं आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने गरज लागल्यास एक तास अतिरिक्त तसंच शनिवारीही सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे.सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितलं असल्या कारणाने, देशातील अत्यंत संवेदनशील विषय मानल्या जाणाऱ्या अयोध्या प्रकरणातील निकाल नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी निर्णय येण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी रोज एक तास अतिरिक्त देण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच गरज असेल तर शनिवारीही सुनावणी करु शकतो असं सुचवलं आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे की, “१८ ऑक्टोबरपर्यंत पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला पाहिजे जेणेकरुन निर्णय घेतला जाऊ शकतो”. “आम्हाला मध्यस्थी करण्यासाठी पत्रं मिळाली आहेत. हे प्रयत्न सुनावणी सुरु असतानाही करण्यात आमची काही हरकत नाही,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्वाणी आखाडाने पत्र लिहून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्नकेला गेला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. यावरच बोलताना सर्वोच्च न्यायालयाने असे प्रयत्न करण्यासाठी तुमचे हात मोकळे आहेत, पण सुनावणी सुरु राहिल असं स्पष्ट केलं आहे.

तो बोलत होता दुसरीशी फोनवर, पत्नीने गुप्तांगावर चाकू खुपसून केला खून

तो बोलत होता दुसरीशी फोनवर, पत्नीने गुप्तांगावर चाकू खुपसून केला खून

example

औरंगाबाद - शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या उल्कानगरीतील एका उद्योजकाचा पत्नीने जांघेत चाकू भोसकून खून केला. पती अन्य महिलाशी फोनवर बोलत होता. त्यातून पती-पत्नी वाद वाद झाला. त्यानंतर पत्नीने पतीचा खून केला. ही घटना सोमवारी (ता.17) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शैलेंद्र शिवसिंग राजपूत (वय 40, रा. खिंवसरा पार्क, उल्कानगरी) असे मृताचे नाव आहे, तर पूजा राजपूत असे पत्नीचे नाव आहे. 
शैलेंद्र राजपूत यांची वाळूज एमआयडीसी परिसरात हिरा पॉली प्रिंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांचा वर्ष 2002 मध्ये पूजासोबत प्रेमविवाह झाला होता.  पत्नी पूजा आणि शैलेंद्र यांच्यात यापूर्वी वाद सुरू होते. त्यातून एकवेळ पत्नीने उकळते पाणीही शैलेंद्र यांच्या अंगावर टाकले होते. सोमवारी मध्यरात्री शैलेंद्र काम आटोपून घरी आले. त्यावेळी दोन मुलं आणि पत्नी पूजा घरात होती. काही वेळातच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली व त्यांच्यात कडाक्‍याचे भांडण सुरू झाले. यातून शैलेंद्र याने पूजाला मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर रागाच्या भरात पूजा किचनमध्ये गेली. तेथून चाकू हाती घेत तिने शैलेंद्रच्या जांघेत वार केला. आत खोलवर तो घुसल्याने रक्तस्राव होऊन शैलेंद्र जखमी झाले व त्यांची शुद्ध हरपली. यानंतर घाबरलेल्या पूजाने शैलेंद्रच्या मित्राला संपर्क साधला. शैलेंद्रच्या गुप्तांगाजवळ जखम झाली व रक्तस्राव झाल्याचे तिने त्यांना सांगितले. यानंतर शैलेंद्रच्या मित्राने धाव घेत मुलींना फ्लॅटमधून खाली आणले. मुलींनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मित्राने शैलेंद्रचा भाऊ सुरेंद्र यांना फोनवरून माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी जवाहरनगर पोलिस पोचले. त्यांनी शैलेंद्र यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सुरेंद्र राजपूत यांच्या तक्रारीनुसार पूजाविरुद्ध खून, पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. तायडे करीत आहेत.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 
शैलेंद्रवर वार केल्यानंतर पूजाने घरात दोन खोल्यात पडलेले रक्त पुसून काढले. खुनाचा संशय येऊ नये म्हणून तिने घर स्वच्छ केले. जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घराची झडती घेतली. त्यावेळी बाथरूममध्ये रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना दिसून आले. विशेषत: शैलेंद्रच्या मित्रापासूनही खरा प्रकार लपवण्यात आला होता.

मम्मी ने पप्पा को चाकू मारा 
शैलेंद्र यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांच्या छोट्या मुलीने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु वडिलांची हालचाल होत नसल्याने घाबरलेल्या मुलीने तिच्या काकांना फोनवरून "मम्मी ने पप्पा को चाकू से मारा, पप्पा उठ नहीं रहे' असे सांगितले. यामुळे सुरेंद्र राजपूतसह कुटुंबीयांनी खिंवसरा पार्क येथे धाव घेतल्यानंतर भयावह प्रकार निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुनापूर्वी काय घडले 
शैलेंद्र व पूजा यांच्यात वारंवार वाद होत असे. काही महिन्यांपूर्वीच दोघे मुलांसोबत खिंवसरा पार्कमधील एका फ्लॅटमध्ये राहायला आले होते. सोमवारी रात्री शैलेंद्र घरी आले. त्यानंतर एका आर्किटेक्‍ट महिलेशी ते फोनवरून बोलत होते. याचाच पत्नी पूजाला राग आला. त्यातून दोघांत वादाला सुरवात झाली व नंतर खुनाचा प्रकार घडला, असे पोलिसांनी सांगितले. 

Thursday, September 5, 2019

ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार!

ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार!


नव्या अॅक्टनुसार वाहुतकीचे नियम मोडल्यास दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागते.



महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी
नव्या मोटार व्हेइकल अॅक्टला लागू केल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं महागात पडू शकतं. नव्या अॅक्टनुसार वाहुतकीचे नियम मोडल्यास दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागते. नव्या कायद्यानुसार पोलिस याची अंमलबजावणी करत आहेत. नियम मोडणाऱ्यांकडून मोठी पावती फाडली जात आहे.

वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आपली जबाबदारी आहे. मात्र नियमांचा वापर करून पोलिस तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारे तुमच्याशी गैरवर्तन करता येणार नाही. याशिवाय तुम्हाला वाहन धारक म्हणून असलेल्या अधिकारांची माहिती असायला हवी.



वाहतुक निरीक्षक तुम्हाला थांबवू शकतात. जसे तुमच्यासाठी काही नियम आहेत तसेच त्यांच्यासाठीही नियम आहेत. ते नियम वाहतुक निरीक्षकांनी पाळणं गरजेचं असतं. प्रत्येक वाहतूक पोलीस त्यांच्या गणवेशात असणं बंधनकारक आहे. त्यावर त्यांचा बक्कल नंबर आणि नाव असायलाच हवं. या गोष्टी नसतील तर तुम्ही त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शकता. त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्यास तुमच्या गाडीची कागदपत्रं त्यांना देऊ नका.

तुम्हाला एखादा नियम मोडल्याबद्दल दंड झाल्यास त्याची पावती घ्या. वाहतूक पोलिसांकडे पावती बूक किंवा ई- पावती नसेल तर दंड वसूल करता येणार नाही.


वाहतूक पोलीस अडवतात तेव्हा गाडी रस्त्याच्या एका बाजूला नीट लावा. त्यानंतर गाडीचे कागदपत्रं दाखवा. तुमची कागदपत्रं पोलिसांकडं द्यायची नाहीत. यावेळी त्यांना सहकार्य करा तसेच त्यांनीसुद्धा तुमच्याशी योग्य पद्धतीनं संवाद साधला पाहिजे.


अनेकदा गाडी थांबवल्यानंतर वाहतूक पोलीस वाहनाची किल्ली काढून घेतात. त्यांना अशाप्रकारे किल्ली काढून घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही वाद न घालता त्यांच्याशी बोललं पाहिजे.

गाडी चुकीच्या ठिकाणी थांबवली असेल आणि तुम्ही गाडीत बसला असाल तर वाहतुक पोलिसांना गाडी उचलता येत नाही. नो पार्किंगमध्ये गाडी असेल आणि तुम्ही गाडीत नसाल तर वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात.


वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं तर 24 तासांच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक आहे. तुम्हाला वाहतूक पोलिस त्रास देत असतील तर पोलिसांत तक्रार करू शकता.

वाहतूक पोलीस तुमच्याशी गैरवर्तन करत असतील तर त्याची लेखी तक्रार करता येते. याची तक्रार जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधिक्षकांकडे करता येते.

पावती भरल्याचा अर्थ हा नाही की तुम्ही वाहतूक पोलीसांच्या चुकीच्या वर्तनाविरुद्ध तक्रार करू शकत नाही. पावती फाडली तरी तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकता. हाच अधिकार वाहतूक पोलिसांनादेखील आहे.

Wednesday, September 4, 2019

भोकर तहसीलवर आज वंचित बहुजन आघाडी व युवा पँथरचा मोर्चा

भोकर तहसीलवर आज वंचित बहुजन आघाडी व युवा पँथरचा मोर्चा


भोकर(प्रतिनिधी )
तामिळनाडू येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व दिल्ली येथे संतरविदास महाराज यांचे मंदिर पाडल्याच्या निषेधार्त व इतर अन्य मागण्ययासाठी गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी १२वाजता भोकर तहसीलवर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

       वंचित बहुजन आघाडी व युवा पँथर व मित्र पक्षातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सात मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे नमूद केले असून त्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.तामिळनाडू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या देशद्रोह यावर कठोर कार्यवाही करा,  दिल्ली येथील संत रविदास महाराजांचे मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या जातिवाद यावर कठोर कार्यवाही करून मंदिर  पूर्ववत बांधून द्या,  शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सात-बारा कोरा करा, भोकर तालुक्यासह नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, भोकर शहरासह तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे ऊर्ध्व पैनगंगेचे पाणी भोकरच्या सुधा प्रकल्पात आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा,रोजगार हमीची कामे सुरू करून मजूर व बेकारांच्या हाताला कामे द्या,विधवा निराधार व अपंगाचे तुटपुंजे मानधन वाढवून प्रतिमहिना 2000 रुपये मानधन  देण्यात यावे आदी मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.मोर्चात सर्वानी सहभागी व्हावे आसे आवाहन नगर सेवक केशव मुद्देवाड,नागोराव  शेंडगे,बाबाराव राठोड, भारिप तालुका अध्यक्ष  सुभाष तेले,राजेश चंद्रे दिलीप राव,एम आय एम चे बाबाखाॅन  शेख करीम करखेलीकर सम्राट हिरे संदिप गायकवाड दलित ङोंगरे आदिनी केले आहे

नांदेड मध्ये गोळीबार दोन अटकेत;गावठी कट्टा जप्त;तीन गोळ्या जप्त

नांदेड मध्ये गोळीबार दोन अटकेत;गावठी कट्टा जप्त;तीन गोळ्या जप्त





मटका चालवण्याच्या प्रकारातून हा गोळीबाराचा प्रकार 

नांदेड (एजास कुरेश)
 रात्रीच्या १२ वाजेनंतर शहराच्या मध्ये भागी असलेल्या वजिराबाद भागातील दिलीपसिंघ कॉलोनीत २ गटांमध्ये भांडण झाले.यामध्ये एका गटाने आपल्या कडे असलेल्या गावठी पिस्तुलातून दुसऱ्या गटातील माणसांवर गोळीबार केला.पण गोळी कोणाला लागली नाही.निरव शांततेत गोळीबाराचा आवाज घुमला आणि दहशत पसरली.कोणीतरी पोलिसांना फोन केला तेव्हा अत्यंत जलद गतीने वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले,पोलीस कर्मचारी संतोष बेल्लूरोड,चंद्रकांत बिरादार,झांबरे आणि पाटील यांच्यासह दिलीपसिंघ कॉलोनीत पोहचले.पोलिसानी त्याठिकाणी भेटलेल्या शेख अन्वरअली खान आणि प्रदीप सोनू राऊत्रे या दोघांना ताब्यात घेतले आहे.अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि उप अधीक्षक अभिजित फस्के यांनी सुद्धा त्वरित प्रभावाने घटनास्थळी धाव घेतली आणि जनतेला धीर दिला आहे.

 मध्यरात्री नांदेड शहरा मध्ये वजिराबाद भागातील दिलिपसिंघ कॉलोनीमध्ये गोळीबार झाला. गोळीबार गावठी पिस्तुलातून करण्यात आलेला आहे.वजिराबाद पोलीस पथकाने गोळीबार करणाऱ्या दोघांना पकडले आहे. तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.हा वाद कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समजले नाही पण गोळीबार करून शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्नाला पोलिसांनी हाणून पडले आहे.


पोलिसानी पकडलेल्या दोघांवर भारतीय हत्यार कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आले आहे .याप्रकरणी पोलीसानी तक्रार दिली आहे.विरुद्ध गटातील तीन अज्ञात माणसे फरार झाली आहेत.त्यांचा शोध घेऊन जेरबंद करण्याची तयारी पोलिसानी केली आहे. शहरात अग्नीशस्त्रांचा (गावठी बंदूक) चा वापर करणे आता लहानशी बाब झालेली आहे.वजिराबाद पोलिसांनी गावठी कट्टा आणि तीन गोळ्या जप्त केल्या आहेत.मटका चालवण्याच्या प्रकारातून हा गोळीबाराचा प्रकार घडल्याची माहिती पुढे येते आहे पण पोलीस तपासात सर्वकाही उघड होणार आहे.

गडगा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चोकशीच्या मागणीसाठी माळगे यांचे उपोषण सुरू

गडगा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीच्या मागणीसाठी माळगे यांचे उपोषण सुरू




गडगा ग्रामपंचायत मधील चौदावा वित्त आयोग व पानी पुरवठा योजनेमध्ये लाखो रूपयांच्या भ्रष्टाचारा बद्दल गेली
कित्येक वर्षांपासून तीव्र आंदोलन चालु आहे त्याच आंदोलनाचा भाग म्हणून 3 सप्टेंबर रोजी पासून जिल्हाअधिकारी कार्यालया अमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे

वेद माळगे यांनी यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊन व लोकशाही मार्गाने जिल्हापरिषद कार्यालय समोर आंदोलने करून सुद्धा काहीच उपयोग झाला नसल्या कारणाने  त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात चौदाव्या वित्तआयोगाअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचारची चौकशी करणे राष्ट्रीय पेयजल(पा.पु.) योजने अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे सन 2015 ते 2019 या कालावधीत कागदोपत्री ग्रामसभा घेणाऱ्या ग्रामसेवकाची व सरपंचांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे, ग्रामपंचायत सदस्यांनी शौचालयाचा लाभ घेणाऱ्याची चौकशी करण्यात यावी या मागणी साठी गडगा ता.नायगाव येथील वेद मालगे हे बेमुदत आमरण उपोषनाश बसले आहेत जिल्हाधिकारी यांना देण्यात दिलेल्या निवेदनात प्रतिलिपी जिल्हापरिषद अध्यक्ष व उपअध्यक्ष ,व तसेच पोलीस निरीक्षक वजीराबाद यांना देण्यात आले आहे

नांदेड जिल्हा पोलीस दलात १७ पो.नि. सह २१ स.पो.नि.आणि २९ पीएसआयच्या बदल्या

नांदेड जिल्हा पोलीस दलात १७ पो.नि. सह २१ स.पो.नि.आणि २९ पीएसआयच्या बदल्या




नांदेड प्रतिनिधी
 निवडणुक आयोगाच्या निर्णयानुसार नांदेडचे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक अशा एकूण 68 लोकांच्या नवीन बदल्या 3 सप्टेंबर रोजी रात्री जारी केल्या आहेत. त्यात एका घटकात तीन वर्षे पुर्ण करणारे 31 अधिकारी, सेवानिवृत्ती जवळ असलेले 2 अधिकारी तैनातीवरचे नियमित केलेले 7 अधिकारी स्वग्राम असलेले 3 अधिकारी आणि इतर विनंती व प्रशासकीय कारणावरून बदलण्यात आले आहेत.

या बदल्यांमध्ये आपल्या जिल्ह्यातील 12 पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत आणि 5 पोलीस निरिक्षकांना तैनाती कायम केली आहे. बदल्या झालेले पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण कंसात लिहिले आहे. चंद्रशेखर तुकाराम चौधरी- पोलीस ठाणे शिवाजीनगर (पो.नि.कक्ष,नांदेड), आनंता निवृत्ती नरुटे-पो.नि.कक्ष,नांदेड (शिवाजीनगर), चंद्रकांत गोविंदराव गुंगेवाड-मरखेल(पो.नि.कक्ष, नांदेड), शिवाजी अण्णा डोईफोडे-कंधार(पो.नि.कक्ष,नांदेड), विकास अहिलाप्पा जाधव -पो.नि.कक्ष,नांदेड(कंधार), रामराव पाटीलबा गाढेकर-हदगाव(पो.नि.कक्ष, नांदेड), अवधुत वामनराव कुशे-पो.नि.कक्ष, नांदेड(हदगाव), रविंद्र गुलाबराव बोरसे-हिमायतनगर(पो.नि.कक्ष,नांदेड), भगवान भिमराव कांबळे- पो.नि.कक्ष,नंादेड(हिमायतनगर), अशोक अबासाहेब अंनत्रे-पो.नि.कक्ष,नांदेड(उमरी), ज्ञानेश्वर सदाशिव हरणे-बारड (पो.नि.कक्ष,नंादेड), तैनातीने नियुक्त असलेल्या पोलीस निरिक्षकांमध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे माजी पोलीस निरिक्षक सुनिल भिमराव निकाळजे यांना 23 जुलै 2019 पासून पोलीस नियंत्रण कक्षात नियमित केले आहे., वजिराबादचे पोलीस निरिक्षक संदीप शामराव शिवले यांची नियुक्ती 4 जुलै 2019 पासून वजिराबादला नियमित केली आहे., मधुकर माणिकराव कारेगावकर यांची जीपीयु पथकाची नियुक्ती कायम केली आहे. लोहाचे बालाजी महादु मोहिते यांचीही नियुक्ती कायम केली आहे. सध्या नियंत्रण कक्षात असलेले उत्तम सिताराम मुंडे यांना मुळ नेमणूकीच्या ठिकाणी उमरी येथे परत पाठविले आहे. यामध्ये बोरसे आणि गाडेकर यांच्या सेवानिवृत्तीला 6 महिने शिल्लक असल्याने त्यांना अकार्यकारी पदावर नियुक्ती दिली आहे.


नांदेड जिल्ह्यात नव्याने हजर झालेले सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य निवृत्तीराव लोणीकर यांना मरखेल पोलीस ठाण्यात पाठविले आहे. नितीन अप्पासाहेब खंडागळे-मुदखेड(बारड), विनोद मारोतीराव कांबळे-कुंडलवाडी(जिव्हीशा), विश्वंभर अर्जुनराव पल्लेवाड-उमरी(पोनि कक्ष नांदेड), करिम खान सालारखान पठाण-नांदेड ग्रामीण (कुंडलवाडी), शरद सुभाष मरे-कुंटूर(सायबर सेल), सुरेश एकनाथ मांटे-विमानतळ(कुंटूर), बालाजी रामराव बंडे-सोनखेड(जीविशा), सुधाकर भाऊसिंग आडे-पो.नि.कक्ष,नांदेड(सोनखेड), दिलीप सुखदेव इंगळे-धर्माबाद(हिमायतनगर), संदीप आनंद कामत-भाग्यनगर(पो.नि.कक्ष,नांदेड), प्रल्हाद भानुदास गिते-पो.नि.कक्ष नांदेड(इतवारा), जयसिंग कवरसिंग ठाकूर-पो.नि.कक्ष,नंादेड(वजिराबाद), बाळासाहेब मनोहर नरवटे-नव्याने हजर (लोहा), संगमनाथ माधव परगेवार-नव्याने हजर(देगलूर), विश्वजित गंगाधर कासले-नव्याने हजर(नांदेड ग्रामीण), सुशांत गणपत किनगे-नव्याने हजर (मुदखेड).
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेमध्ये पोलीस कल्याणचे रमाकांत धोंडीबा पांचाळ, जिल्हा विशेष शाखेचे अशोक तुकाराम जाधव आणि शहर वाहतूक शाखेचे सुनिल चंद्रकांतराव नाईक यांना नव्याने नियुक्ती दिली आहे. स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत महादेव हणमंतराव मांजरमकर यांना पोलीस कल्याण विभागात पाठविले आहे. इतवाराचे फेरोजखान उस्मानखान पठाण, उस्माननगरचे शिवप्रकाश प्रभाकर मुळे आणि तामसाचे नामदेव शिवाजी मद्दे या तिघांची तैनातीची नियुक्ती कायम केली आहे.

. बदली करण्यात आलेले पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. लक्ष्मण नारायण बोनवाड-उमरी, अनिल विठ्ठल कांबळे-उमरी, गजानन हरीहरराव कागणे-हिमायतनगर, अमृता मारोती केंद्रे- भाग्यनगर, साईनाथ काशिनाथ सुरवसे-उमरी, बाबू मारोती खेडकर-बिलोली, स्वाती केदारनाथ कावळे-नांदेड ग्रामीण, राणी व्यंकट भोंडवे-मुक्रामाबाद या सर्वांना पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे पाठविले आहे, मनिषा संजय पवार-देगलूर(शिवाजीनगर), दत्तात्रय नरहरी काळे-शिवाजीनगर(इतवारा), गणेश नवनाथ कराड-देगलूर (धर्माबाद), दिगंबर केशवबुवा जामोदकर-अर्धापूर (किनवट), शिवानंद बापूअप्पा स्वामी-इतवारा (मुदखेड), राजाभाऊ सिताराम जाधव -नांदेड ग्रामीण(भाग्यनगर), गोपीनाथ आदीनाथ वाघमारे-शिवाजीनगर(मुक्रमाबाद), नंदकिशोर नारायण कांबळे-माळाकोळी (देगलूर), बाळू भगवान चापडे-विमानतळ(इतवारा), सोनाबाई अंबादास कदम-नांदेड ग्रामीण(शिवाजीनगर), दशरथ अंकुश आडे-इतवारा, (विमानतळ),पुनम मोहनराव सुर्यवंशी-भोकर (देगलूर), कपिल मुरलीधर आगलावे-शिवाजीनगर(अर्धापूर), विक्रम पांडूरंग विठू बोने-इस्लापूर(हदगाव), रहिम बशीर चौधरी-इतवारा(उमरी), राजीव भाऊराव म्हात्रे-हदगाव, असदचॉंद पाशा शेख-मुदखेड (नांदेड गाम्रीण), गणपती दत्तु चित्ते-किनवट(मुदखेड), अजित पुंडलिकराव बिराजदार-कुंटूर(मरखेल), दिनेश शिवाजीराव येवलेे-मरलेख(कुंटूर), शालीनी बापूराव गजभारे-इतवारा(भोकर) या सर्व बदल्यांमध्ये पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. मागील अनेक महिन्यांपासून जिल्हा विशेष शाखा सांभाळणाऱ्या प्रशांत देशपांडे यांना स्थानिक गुन्हा शाखेचा अतिरिक्त कार्यभार मिळाला पण त्यांची कार्यकारी पदावर नियुक्ती झालेली नाही.


नांदेड जिल्ह्यात तीन जण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

नांदेड जिल्ह्यात तीन जण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला




गावाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुरात दोघेही दुचाकीसह वाहून गेले.



नांदेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांत नद्यानाल्यांना पाणी आले आहे. सोमवारी जिल्ह्यात दोन घटनांमध्ये पुरात तीन जण बुडाले. यातील एकाचा मृतदेह २४ तासानंतर सापडला असून, दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात दोन जण ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेले आहेत. तालुक्यातील धानोरा मक्ता येथील बंडू बोनडारे आणि जयराम भुजबळ हे मोटारसायकलवरून घरी निघाले होते. गावाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुरात दोघेही दुचाकीसह वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी जयराम भुजबळ यांचा मृतदेह सापडला. तर बंडू बोनडारे यांचा शोध घेणे सुरूच आहे.
दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यात २० वर्षीय सोहेल खान हा तरुण पैनगंगेच्या नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सोहेल बुडाला. सोहेलचा अद्यापही शोध लागलेला नाही. नांदेडमधील यंत्रणा कमी पडल्याने शोध मोहिमेसाठी नागपूर येथील व्यवस्थापन दलाच्या एका पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Tuesday, September 3, 2019

साठ वर्षाच्या नराधमाने दीड वर्षाच्या चिमुकलीवर केला बलात्कार

साठ वर्षाच्या नराधमाने दीड वर्षाच्या चिमुकलीवर केला बलात्कार





 नांदेड :- एजास कुरेशी

 दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर शेजारी राहत असलेल्या साठ वर्षीच्या नराधमाने बलात्कार केल्याची घटना बळीरामपुर भागात मंगळवारी दुपारी घडली आहे.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळीरामपुर येथील सुली नगर भागात राहणारे सुरेश लांडगे वय साठ वर्षे या नराधमाने त्यांच्या शेजारी राहत असलेल्या एका दीड वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी भरदुपारी घडली या नराधमाने त्या बालिकेस आपल्या घरी बोलावून तिच्यावर जबरी बलात्कार केला अशी फिर्याद त्या मुलीच्या आईने ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदर नराधमास ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गंभीर घटनेबाबत बळीरामपुर भागात त्यां नराधमा विषय तीव्र असंतोष पसरला असून पोलिसांनी जास्तीत जास्त शिक्षा या नराधमास द्यावी अशी मागणी या भागातील महिला व नागरिकांनी केली आहे.

२० लाख रुपयांचा गुटखा व २ मालक ताब्यात

२० लाख रुपयांचा गुटखा व २ मालक ताब्यात





नांदेड:-(एजास कुरेशी)
पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या विशेष पथकाने अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात आज सायंकाळी नांदेड ग्रामीण आणि इतवारा या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जवळपास २० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. २ गुटखा मालकांना सुध्दा ताब्यात घेतले आहे.

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहेलवान टी हाऊससमोर अकबर चाऊस यांच्या घरात छापा टाकला. तेथे जवळपास १५ लाखांचा गुटखा पकडला. याच पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रस्त्यावर अली नावाच्या माणसाच्या घरातून जवळपास 5 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. पकडलेल्या अकबर चाऊस यांना इतवारा पोलीस ठाण्यात गुट्‌ख्यासह पाठविले आहे. गाडेगाव रोडवरील अली यांना गुटख्यासह नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत गुटखा विक्रीवर आजही पुर्णपणे निर्बंध आणला गेला नाही हे आजच्या दोन छाप्यांवरून सिध्द झाले. या गुटख्याची सध्या पुर्ण मोजदाद सुरू आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी या प्रकरणाची तक्रार देतील आणि पुढे कायदेशीर कार्यवाही होणार आहे. पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या पथकात पोलीस निरिक्षक सुनिल निकाळजे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस कर्मचारी शेख जावेद, व्यंकट गंगुलवार, मोहम्मद अलीम, निर्मलसिंघ, अफजल पठाण, शेख महेजबीन यांचा समावेश आहे. गुटख्यावर छापा मारून गुटखा पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी कौतुक केले आहे.

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...