Wednesday, September 18, 2019

चक्क ७० वर्षांच्या ‘तरुणा’ने दिली धमकी सिंधू अन् माझ्या लग्नाची करा तयारी , अन्यथा,तीला पळवून नेईन

चक्क ७० वर्षांच्या ‘तरुणा’ने दिली धमकी
सिंधू अन् माझ्या लग्नाची करा तयारी , अन्यथा,तीला पळवून नेईन





चेन्नई (वृत्तसंस्था) : आपल्या सहजसुंदर खेळाने बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने चाहत्यांच्या हृदयात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. अर्थात, खेळातील कौशल्याचे चाहते असणे आणि केवळ सौंदर्याचे चाहते असणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ‘सिंधू आपल्याला आवडत असून तिच्याशी लग्न करायचे आहे’, असे सांगत चक्क ७० वर्षांच्या ‘तरुणा’ने (?) जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. मलाईस्वामी असं या गृहस्थाचे नाव असून तमिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत. या अजब प्रकाराची राज्यात चर्चा होत आहे.


रामनाथपुरम जिल्हाधिकारी दर आठवड्याला लोकांची भेट घेत असतात. यावेळी लोक आपला अर्ज दाखल करत समस्या मांडू शकतात. मलाईस्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपला आणि सिंधूचा फोटो एका बंद लिफाफ्यात सादर केला. अर्जात त्यांनी म्हटले आहे की, मला २४ वर्षीय पी. व्ही. सिंधूसोबत लग्न करायचं आहे. जर लग्नासाठी योग्य तयारी करण्यात आली नाही तर आपण तिचं अपहरण करु आणि लग्न करु अशी धमकीही दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपला जन्म ४ एप्रिल २००४ रोजी झाला असून आपण फक्त १६ वर्षांचे असल्याचा अजब दावाही यावेळी केला. सिंधूने ज्या प्रकारे आपल्या करिअरमध्ये यशाची उंची गाठली आहे ते पाहून आपण प्रचंड प्रभावित झालो  असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...