२० लाख रुपयांचा गुटखा व २ मालक ताब्यात
नांदेड:-(एजास कुरेशी)
पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या विशेष पथकाने अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात आज सायंकाळी नांदेड ग्रामीण आणि इतवारा या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जवळपास २० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. २ गुटखा मालकांना सुध्दा ताब्यात घेतले आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहेलवान टी हाऊससमोर अकबर चाऊस यांच्या घरात छापा टाकला. तेथे जवळपास १५ लाखांचा गुटखा पकडला. याच पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव रस्त्यावर अली नावाच्या माणसाच्या घरातून जवळपास 5 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. पकडलेल्या अकबर चाऊस यांना इतवारा पोलीस ठाण्यात गुट्ख्यासह पाठविले आहे. गाडेगाव रोडवरील अली यांना गुटख्यासह नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत गुटखा विक्रीवर आजही पुर्णपणे निर्बंध आणला गेला नाही हे आजच्या दोन छाप्यांवरून सिध्द झाले. या गुटख्याची सध्या पुर्ण मोजदाद सुरू आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी या प्रकरणाची तक्रार देतील आणि पुढे कायदेशीर कार्यवाही होणार आहे. पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या पथकात पोलीस निरिक्षक सुनिल निकाळजे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस कर्मचारी शेख जावेद, व्यंकट गंगुलवार, मोहम्मद अलीम, निर्मलसिंघ, अफजल पठाण, शेख महेजबीन यांचा समावेश आहे. गुटख्यावर छापा मारून गुटखा पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी कौतुक केले आहे.

No comments:
Post a Comment