Friday, November 30, 2018

अबब...! आश्चर्यजनक सात वर्षाची गाय तब्बल 1400 किलो वजनाची. {Knickers cow}

अबब...! आश्चर्यजनक सात वर्षाची गाय तब्बल 1400 किलो वजनाची. {Knickers cow}


(अझीम शेख)
सिडनी : आपल्या कडे अलीकडच्या काळात गाई चा विषय निघाला की, राजकीय चर्चेला अनेक तोंड फुटते, मात्र ऑस्ट्रेलिया मधील एक गाय सध्या वेगवेगळ्या चर्चेचा विषय बनली आहे, या गाईचा अगडबंब उंची आणि वजनाने जगभरातील लोकांना बुचकळयात टाकले आहे, सरासरी माणसाची उंची सहा फूट राहते, ही गाय मात्र सहा फुटांपेक्षा जास्त उंच आणि वजन तब्बल 1400 किलो वजनामुळे ही गाय सध्या चर्चेत आली आहे, सोशल मीडियावर नेटीझन्स तिच्या बाबत, मजेदार प्रतिक्रीया देत आहेत, या गाईचं नाव निकर्स knickers असे आहे, सात वर्षाच्या निकर्सची किंमत 396 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच ₹ 20,211/- रुपये इतकी आहे, गाईची उंची जास्त असल्यामुळें त्याचें आयुर्मान वाढते असे म्हटले जाते, सोशल मीडियावर ही गाय सध्या चर्चेचा विषय बनली आहे या आधी इटली मधील एक गाय अशीच चर्चेत होती. ही गाय सध्या सात वर्षाची असून, तिच्या विद्यमान मालकाने तीन वर्षांची असतांना तिला विकत घेतले होते.

भोकर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण क्षमताबांधणी व जनजागृती कार्यशाळा संपन्न.

भोकर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण क्षमताबांधणी व जनजागृती कार्यशाळा संपन्न.


भोकर (एजास कुरेशी)
नगर परिषदच्या वतीने आज दिनांक 30 नोव्हेंबर  रोजी मुख्याधिकारी नितीन बागुल  यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता नगर परिषद  कार्यालय व जागरण पहेल-डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद  प्रांगणात स्वच्छ सर्वेक्षण 2019 क्षमता बांधणी व स्वच्छता जनजागृती कार्यशाळेचे आयोजन यशवीरीत्या करण्यात आले . सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शेख युसुफ उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी , विक्रम क्षीरसागर व नगरसेवक शेख गफार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यशाळेस दिनदयाळ  अन्तोदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद मधील स्थापन  करण्यात आलेले बचत गट ,   शहरातील  बहुसंख्य नागरीकासह व सर्व नगर परिषद कर्मचारी वर्ग  उपस्थिती दर्शविली. श्री विलास वन्नजे व गोपाल कांबळे यांनी  नागरिक व बचत गट स्वच्छता विषयक सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मान्यवराच्या हस्ते बचत  गटांना डस्टबिन वाटप  करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  न.पं.चे श्री सुनील कल्याणकर स.प्रकल्प अधिकारी यांनी केले,. याप्रसंगी न.पं. चे कर निर्धारक श्री अशोक भोसले , राजू पदे स्वच्छता विभाग प्रमुख ,व तसेच प्रमुखाने सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुखाला अटक.

दहा हजाराची लाच घेताना केंद्रप्रमुखाला अटक.
  File photo 
हिंगोली जिल्ह्यातील कलमनुरी येथील 
प्रपत्र ड मधील मंजूर घरकुलाचे नाव अ किंवा ब यादीत बदलून देण्यासाठी दहा हजाराची लाच घेणार्‍या कळमनुरी पंचायत समिती शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख बालाजी गोरे यास एसीबीच्या पथकाने आज शुक्रवारी (दि.30) दुपारी साडेबाराच्या सुमारास अटक केली. ही कारवाई नादेड-हिंगोली रस्त्यावरील आखाडा बाळापूर येथील तुळजाई हॉटेलसमोर केली. यावेळी गोरे यास लाचेच्या रक्‍कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील तक्रारदाराने त्याच्या नावे तसेच वडील व भावाच्या नावाने मंजुर झालेल्या प्रपत्र ड यादीतील घरकुल मंजूर झाले होते. त्या यादीची पडताळणी करण्याची जबाबदारी कळमनुरी पंचायत समिती शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख बालाजी गोरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. प्रपत्र ड मधील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने आपले नाव अ किंवा ब यादीत घ्यावे अशी विनंती गोरे यांच्याकडे केली असता, गोरे यांनी प्रत्येकी पाच हजाराची मागणी केल्याची तक्रार दि.29 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तडजोडीअंती दहा हजार देण्याचे ठरले. या तक्रारीची पडताळणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक रविंद्र थोरात यांनी केली असता, त्यात तत्थ आढळले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचून दुपारी साडेबाराच्या सुमारास आखाडा बाळापूर येथील तुळजाई हॉटेलसमोर केंद्र प्रमुख बालाजी गोरे यास तक्रारदाराकडून दहा हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर गोरे यांना कळमनुरी पंचायत समिती कार्यालयात पुढील तपासासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपाधिक्षक रविंद्र थोरात, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, जमादार उमर शेख, सुभाष आढाव, अभिमन्यू कांदे, विजय उपरे, प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, गजानन आगलावे, रूद्रा कबाडे, संतोष दुमाने, शेख जमीर यांच्या पथकाने केली.

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम हायकोर्टात जाणार.

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएम हायकोर्टात जाणार.

बेधड़क महाराष्ट्र न्यूज़
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने मुस्लीम आरक्षणासाठी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, पण मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हायकोर्टात जाऊ’, असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सरकार असताना मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आरक्षणाची टक्केवारी ७३ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये हायकोर्टाने मराठा आणि मुस्लीम समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली होती. मुस्लीम समाजाला सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यास हायकोर्टाने स्थगिती दिली होती. तर सरकारी शिक्षण संस्थांमधील आरक्षणाला हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला होता.
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूक मोर्चे काढण्यात आले. आरक्षणासाठी सरकारवर दबाव वाढला होता. अखेर गुरुवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले असून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले आहे. मराठा समाजानंतर आता मुस्लीम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. ‘मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही आव्हान देणार नाही. मात्र, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करु’, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. मुस्लीम समाजाच्या आरक्षणासंदर्भात हायकोर्टात नवीन आकडेवारी सादर करु, असे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाचा आनंदच, पण मुस्लिम आरक्षणाचे काय ? - इम्तियाज जलील.


मराठा आरक्षणाचा आनंदच, पण मुस्लिम आरक्षणाचे काय ? - इम्तियाज जलील.

औरंगाबाद : सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले त्याचे स्वागतच आहे, पण मग 2014 मध्ये उच्च न्यायालयाचे आदेश असतांना मुस्लिम समाजाला आरक्षण का दिले नाही ? असा सवाल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी "सरकारनामा'शी बोलतांना केला. न्यायालयाच्या आदेशानंतर मुस्लिम आरक्षणासाठीही एखादा आयोग नेमला असता तर आम्हालाही न्याय मिळाला असता असा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला. 
सभागृहात कुठलेही विधेयक मंजुर करण्याआधी त्यावर चर्चा होणे महत्वाचे असते. सभागृहाचे सदस्य म्हणून तो आमचा अधिकार आहे. पण या सरकारने राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर न ठेवता थेट एटीआर आणि त्यानंतर विधेयक मंजूर करून घेतले. त्यामुळे सभागृहाचे सदस्य म्हणून आमच्या अधिकारांवर देखील सरकारने गदा आणल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला. 
मराठा, मुस्लीम, धनगर, कोळी समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची मागणी होती. पैकी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारने राज्य मागसवर्ग आयोगाची स्थापना केली आणि त्या अहवालावरून आरक्षण जाहीर केले. मराठा बांधवांना आरक्षण मिळाले याचा आनंदच आहे, पण मग मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी यापुर्वी नेमलेल्या रंगनाथ मिश्रा, सच्चर आणि मेहमूद रहेमान आयोगाने दिलेले अहवाल आणि शिफारशी स्वीकारून त्या आधारे तत्कालीन सरकारने आरक्षण का जाहीर केले नाही? असा प्रश्‍न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. 
मुस्लीम समाजाला आतापर्यंत आरक्षण मिळाले नाही याला कॉंग्रेस-आघाडी सरकारच जबाबदार असून केवळ सत्तेसाठी त्यांनी मुस्लिमांचा फुटबॉलसारखा वापर केला. मराठा समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील ज्या शिफारशींवरून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे तो प्रकार घातक आणि हिंदु-मुस्लिम समाजात भेदभाव निर्माण करणारा असल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला. 
मुस्लिमांची सामाजिक परिस्थिती अधिक गंभीर.. 
राज्य मागासवर्ग आयोगाने आपल्या अहवालामध्ये 36 टक्के मराठा समाजाकडे नळ जोडणी आहे, सरकारी नोकरीत मराठा समाजाचे प्रमाण 6 टक्के आहे, 30 टक्के लोकांकडेच पक्की घरे आहेत असे नमूद केले आहे. या आधारे मराठा समाजाला मागास ठरवण्यात आले असेल तर हा घातक प्रकार आहे. मग मुस्लिम समाजाची सामजिक परिस्थिती दर्शवण्यासाठी रंगनाथ मिश्रा, सच्चर, मेहूमुद रहेमान कमिशनने देखील आपल्या अहवालात मुस्लिमांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती भयंकर असल्याचे नमूद केले होते. 
मराठा समाजापेक्षाही मुस्लीम समाजाची अवस्था बिकट असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते, मग तो स्वीकारून त्यावेळच्या सरकारने मुस्लिमांना आरक्षण का दिले नाही ? याचा पुनरुच्चार इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात 2013-18 दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यात 2112 शेतकरी हे मराठा होते असे देखील मागासवर्ग आयोगाने अहवालात म्हटले आहे. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देखील तुम्ही जात बघणार आहात का? मग उद्या मुस्लिम, धनगर जातीच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का? मग तुम्ही त्यांनी आरक्षण देणार आहात का? हा सगळा प्रकार भयंकर आहे. पण मुस्लिम समाज आत्महत्या करणार नाही, आम्ही आरक्षणासाठी न्यायालयात लढा देऊ आणि ते द्यायला सरकारला भाग पाडू असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

Monday, November 26, 2018

वॉट्सएप्प ग्रुपमध्ये महिलेला अॅड करून शेअर केले अश्लील व्हिडीओ; अॅडमिनला अटक.

वॉट्सएप्प ग्रुपमध्ये महिलेला अॅड करून शेअर केले अश्लील व्हिडीओ; अॅडमिनला अटक.


व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये एका महिलेला अॅड करून त्या ग्रुपमध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ शेअर करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला त्याचा फाजीलपणा महागात पडला आहे. माटुंगा पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या त्या ग्रुप अॅडमिनला अटक केली.

माटुंगा परिसरात राहणाऱ्या एका 44 वर्षीय महिलेने माटुंगा पोलिसात याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून उपनिरीक्षक मारुती शेळके यांनी त्या ग्रुपचा अॅडमिन मुश्ताक अली शेख (24) याला पश्चिम बंगाल येथे जाऊन अटक केली.

त्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना व्हॉटस्अॅपच्या ट्रिपल एक्स नावाने असलेल्या गुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्या ग्रुपमधील कोणालाच त्या ओळखत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी त्या ग्रुपकडे दुर्लक्ष केले आणि त्या ग्रुपमध्ये तशाच राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्या ग्रुपवर आलेले मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण ते सर्व अश्लील मेसेजेस, व्हिडीओ होते. त्यामुळे त्यांनी लगेच माटुंगा पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे याप्रकरणी भादंवि कलम 345, आयटी अॅक्ट 66, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला गेला.

भोकर येथे टिपू सुल्तान आणि अब्दुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती थाटामाटात संपन्न.

भोकर येथे टिपू सुल्तान आणि अब्दुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती थाटामाटात संपन्न.



भोकर:(एजास कुरेशी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भोकर येथे मोठ्या उत्साहात ह.टिपू सुल्तान आणि डॉ. अबुल कलाम आझाद यांची संयुक्त पणे जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली.
    रविवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान शहरातील सईद नगर येथून फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताष्याच्या गजरात हज़ारों च्या संखेत टिपूसुल्तान यांच्या तैल चित्रांची मिरवणूक काढण्यात आली, ही मिरवणूक डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे शिवाजी महाराज चौक, बस्थानक,लहुजी चौक मार्गे नियोजित फुले नगराजवळ असलेल्या टिपूसुल्तान यांच्या चौकात विसर्जित झाली, मिरवणूक यशस्वीपणे पारपाडण्यासाठी टीपूसुल्तान संगठने चे भोकर तालुका अध्यक्ष निजाम बाबा भोकर युवावर्ग चे चहिते बनले आहे व तसेच शाहरुखखान,इर्शादखान ,मोहसीन भाई(दाऊद), जुनेद पटेल पत्रकार फहीम शेख सन्ना भाई ईनामदार यांनी जयंती यशस्वी करण्या साठी  परिश्रम घेतले,
मिरवणूकीतील सहभाग सहकार्याबद्दल भोकर टीपू सुल्तान संघटनें चे अध्यक्ष निज़ाम बाबा यांच्याकडून आभार मानण्यात आले 
 तर मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलिस निरीक्षक पडवळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नांदेड़: चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार.

नांदेड़: चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार
बेधडक महाराष्ट्र online न्यूज़

नांदेड , दि. २७ :- नांदेड जिल्ह्यातील उमरी शहरातील व्यंकटेश नगर भागात असलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर रविवारी मध्ये रात्री तिघां नराधमानी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे याप्रकरणी मुलीचे जवाबी वरून तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. उमरी शहरातील वेंकटेश नगर भागात आई व फिर्यादी मुलगी हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे रविवारी मध्यरात्री या कुटुंबाच्या घरी तीन युवकांनी रात्री एक च्या सुमारास दरवाजा उघडण्यास भाग पाडले आत प्रवेश करताच चाकूचा धाक दाखवून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची घटना झाली याप्रकरणी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादीची व आई तिच्यासोबत या दोघांनी उमरी पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकीकत सांगितली लगेच याप्रकरणी उमरी पोलिसांनी सतर्कता दाखवून सामूहिक बलात्कार केलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे या याप्रकरणी उमरी पोलिसांनी पिडीत मुलीचे व आईचे जवाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे यानंतर मुलीचे मेडिकल करण्यात आले आहे याप्रकरणी आज दिवसभर शहरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणात पोलीस उपअधीक्षक ए बी देशपांडे व पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके स्वतः जातीने लक्ष देऊन तात्काळ घटनेनंतर लगेच तिन्ही आरोपींना अटक करून मोठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे दिलेल्या पीडित मुलीच्या जबाबी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपअधीक्षक ए बी देशपांडे भोकर हे तपास करीत आहेत

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मारल्या इसापूर धरणात उड्या सर्वच कार्यकर्ते आंदोलन करून सुखरूप बाहेर पडले.

प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मारल्या इसापूर धरणात उड्या
सर्वच कार्यकर्ते आंदोलन करून सुखरूप बाहेर पडले.


नांदेड (एजास कुरेशी) तीन दिवसाच्या नंतर आज अखेर सकाळी गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला चकमा देत प्रहारचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे यांच्या मार्गद्शनाखाली कार्यकर्त्यांनी दि.२५ सकाळच्या रामप्रहरी जय जवान जय किसानचा नारा देत इसापूर धरणात उड्या घेऊन आंदोलन पूर्ण केले आहे.

इसापूर धरणावर प्रहारचे कार्यकर्ते उड्या मारण्यासाठी येणार असल्याचे समजताच हजारो पोलिसांचा बंदोबस्त लावून त्यांना २ किमी आकडेच अडविण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवस प्रश्नाच्या निगराणीत राहून थंडीमुळे गाढ झोपलेल्याना चकमा देऊन गनिमी काव्याने अखेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इसापूर धरणात उड्या मारल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उड्या मारणारे सर्वच प्रहारचे कार्यकर्ते आंदोलन पूर्ण करून सुखरूप बाहेर पडल्यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या प्रशासनाने सुटकेचे निश्वास सोडला आहे. या आंदोलनात महागाव येथील: उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे, रियाज पारेख, महागाव तालुका प्रमुख पवन धरणकर, शहर प्रमुख रानू कुरेशी, शेखर माहूरे, सागर डोंगरे, अक्षय भालेराव, अभिजीत कांबळे, निलेश खंदारे, ढाणकी प्रमुख माजिद शेख, नांदेड़ जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख, नांदेड उपजिल्हाप्रमुख बालाजी बालपेलवाड, हिमायतनगर तालुका प्रमुख गजानन ठाकरे, हदगाव तालुका प्रमुख अनिल पाटिल कदम, कार्याध्यक्ष बालू पाटिल शिरपुले, युवाध्यक्ष गणेश कदम, सुभाष देशमुख हदगाव, यांच्यासह अनेक प्रहार कार्यकर्तै या शेतकरी हितार्थ अंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर प्रहार संघटना नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी कोणत्या पद्धतीचे आंदोलन करते हे येणार्या काळात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यानंतर तरी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे अधिकारी धरणातील पाणी नदीमध्ये सोडतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Thursday, November 22, 2018

डिजिटल जुगार अड्ड्यावर छापा, लुडो खेळणाऱ्यांवर महाराष्ट्रातील पहिली कारवाई

डिजिटल जुगार अड्ड्यावर छापा, लुडो खेळणाऱ्यांवर महाराष्ट्रातील पहिली कारवाई

                                              (File Photo)

हिंगोली(प्रतिनिधी)
हिंगोली :  हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्‍यातील चुंचा येथे मोबाईलवर लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्या सात जणांवर बुधवारी आखाडा बाळापूर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. त्‍यांच्‍याकडून 28 हजार रुपये रोख व सहा मोबाईल जप्‍त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे मोबाईलवर लुडो खेळणाऱ्यावर कारवाई करण्याची महाराष्ट्रातील बहुतेक पहिलीच कारवाई आहे.
चुंचा येथे राष्ट्रीय महामार्गाच्‍या बाजूला एका लिंबाच्‍या झाडाखाली काहीजण मोबाईलवर पैसे लावून लुडो हा डिजिटल जुगार खेळत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्‍या पथकाने आज दुपारी साध्या वेशात जावून छापा टाकला.
यामध्ये संजय परसराम मोहिते, सुनील  कनके, गणपत  पवार, परसराम  जाधव, पांडूरंग चंद्रवंशी, सय्यद आरेफ, रामराव शेळके हे लुडो जुगार खेळत असल्‍याचे आढळून आले. पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून 28 हजार रुपये व 30 हजार रुपयांचे सहा मोबाईल जप्‍त केले आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.
दरम्‍यान, आखाडा बाळापूर परिसरात मागील काही दिवसात जुगार अड्ड्यावर छापे टाकले जात असताना डिजिटल जुगाराचा नवा फंडा सुरु झाला आहे. पोलिसांच्या पथकाने हा फंडाही उद्‍ध्‍वस्‍त केला आहे.

Wednesday, November 21, 2018

नांदेड़ शिवाजी नगर पुलिस्टेशन मध्ये लाचेची मागणी बाबत गुन्हा दाखल.

नांदेड़ शिवाजी नगर पुलिस्टेशन मध्ये लाचेची मागणी बाबत गुन्हा दाखल.


नांदेड:-(प्रतिनिधी)नांदेड़ येथील शिवाजी नगर पुलिस स्टेशन मध्ये लाचेची मागणी करत असलेल्या दोन पोलीसावर लाचलूत पत प्रतिबंध ने गुन्हा दाखल केला आहे
 तक्रारदार वय- २७ व्यवसाय- शिक्षण रा. वाल्मिकनगर नादेड यांनी दोन पोलीस बद्दल दिलेली तक्रार लाचलुच पत ने  प्रतिबंधक अधिकारी  पडताळणी केली असता दोन आरोपी पोलीस कॉन्स्टेबल आरोपी म्हणून दोषी आढळून आले असता त्यांच्यावर कार्यवाही झाली आहे त्यांनी केलेली पैसेची मागणी त्यांना त्याचे नसल्याने त्यांनी त्याबद्दल ला. प्र. आ. नांदेड यांना दिलेल्या तक्रारी वर नामे असे की आरोपी  १)सुनिल बाजीराव लहाणे  सपोनि  पो.स्टे.शिवाजीनगर नादेड
2) केशव केरबा हाके पोहे काँ १७८४ पो.स्टे.शिवाजीनगर नादेड  यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचेची मागणी २५,०००/-रुपये
 लाच स्विकारली- ००हस्तगत रक्कम-००लाचेची मागणी -ता.१६/११/२०१८ लाचेचे कारण - यातील तक्रारदार यांचा भाऊ यांना पिसीआर दरम्यान चांगली वागणुक व क.३०७भादवि कमि करुन क.३२४ लावण्यासाठी म्हणुन आ लो से क्र १ यांनी ५०,००० रुपये लाचेची मागणी करुन  तडजोडी अंती २५,००० लाचेची मागणी केली व आलोसे नं.2 यांनी प्रोत्साहन दिले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे पण पोलीस शातीर असल्याने त्यांना तक्रारदार कडे दि १६ पासून आज रोजी पर्यंत कसल्याच प्रकारे जवळीकता दाखवली नाही चार दिवस वेगवेगळ्या प्रकारे सापळा रचून काही न सापडल्या ने वरिष्ठ अधिकारी यांनी मागील फोन वरील समभाषण नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पैसेची मागणी केली हे निश्चित स्पष्ट केले असल्याने आज २१ नोव्हेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला आहे
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे
सापळा रचवण्यासाठी अधिकारी   बी.एच.काकडे , ला.प्र.वि.नादेड यांनी योग्य प्रकारे आरोपीना रंगे हाथ पकडण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहे.

भोकर मध्ये जश्न ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे उत्साहित साजरा.

भोकर मध्ये जश्न ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे उत्साहित साजरा.


भोकर:(एजास कुरेशी) दि. २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी समिति चे अध्यक्ष मुर्तुज़ा खान दौलत खान पठान उर्फ बाबू भाई तमसेकर व उप अध्यक्ष शेख नाज़िम भाई  यांच्या अध्यक्षते खाली भोकर येथील सईद नगर येथून सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात येऊन मुख्य मार्गाने अंम्बेडकर चौक ते शिवाजी चौक  मार्गाने ईदगाह मैदानावर पोहचली या निमित्ता ने बस स्टैंड समोर भोकर चे सामाजिक कार्यकर्ते फारूक भाई करखेलिकर यानी शरबत वाटप चा कार्यक्रम ठेवला होता व भोकर चे नगर सेविकास सुवर्णाताई वाघमारे यांनी पानी वाटप केला
जगाला शांतता,सामाजिक एकोप्याचा संदेश देणारे प्रेषित मोहमंद पैगंबर (स.) यांचा जन्म दीन जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला.
  भोकर शहरातील सईदनगर भागात सकाळ पासूनच शेकडो समाजबांधव जमन्यास सुरुवात झाली होती, यात जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर,उपनगरअध्यक्ष प्रतिनिधि शेख युसुब भाई , हामीदखान पठाण, रजाक भाई प्रेसवाले, ताजुद्दीन छन्नू भाई शेरवाले, सामाजिक कार्यकर्ते नाजीम भाई, आणि असंख्य लहान मुले व मुली एकत्र येऊन येथून सजवलेल्या वाहनावर ध्वनिक्षेपक लावून त्यावर सामाजिक धून लावून वातावरण आंनदी बनवले होते ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज झाल्यावर जलसाची सांगता झाली असल्याची माहिती ईद-ए-मिलादुन्नबी मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर यांनी दिली आहे.भोकरचे पोलस निरीक्षक आर एस पडवड व भोकर पोलिस सर्व कर्मचारियांचा शॉल व फूल ने सत्कार करण्यात आले.

Monday, November 19, 2018

निवघा येथे कार्तिक एकादशी निमित्त दही हंडी काला व महाप्रसादाचे आयोजन.

निवघा येथे कार्तिक एकादशी निमित्त दही हंडी काला व महाप्रसादाचे आयोजन.

मुदखेड़( प्रतिनिधि)
मुदखेड़ तालुक्यातील निवघा येथे 
कार्तिकी एकादशी निमित्त 129 वा अखंड हरिनाम टाळ सप्ताह निवघा येथे आयोजित केलेला असून दि.20/11/2018 - मंगळवार रोजी दहीहंडीचा काला व महाप्रसाद घेण्यासाठी आपण यावे अशी विनंती सर्व भाविक भक्ता समस्त निवघा गाववासियातर्फे आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आहे  या सेवेमध्ये सर्व निवघा गावातील जनता विशेषतः नवयुवक मंडळी निस्वार्थ सेवा पूर्वीपासूनच करत आहेत.निवघा गावचे ग्रामदैवत बंजरंगबली हनुमंतराया व विठ्ठल -रुख्माई यांच्या कृपाशिर्वादाने ही परंपरा सुरू आहे.टाळ सप्ताह,पोती-पुराण,किर्तन,भजन,प्रवचन,जञा या धार्मिक उपक्रमाबरोबरच एक नवनिर्मितीच्या दिशेने शैक्षणिक,सामाजिक ,वैद्यकीय,कृषीविषयक उपक्रम सुध्दा निवघा नगरीत राबविले जातात.महिला-पुरुष एकत्र येऊन  सर्व लोकोपयोगी कार्य करत असतात.आती चांगले व शांन्त गांव तसेच दुखा मध्ये एक मेकाना सावरनारे गाव
गावामध्ये दिवाळीपैक्षाही मोठा सण म्हणून ही जञा ओळखली जाते.सर्व लेकी-बाळी या सोहळ्यास उपस्थित राहतात. 
विशेषतः लेकींचाच आशिर्वाद निवघ्यातील जनतेला आहे.मी पणा कुणाच्या अंगी नसून ही भावना सर्व निवघा वासियाच्या अंगी आहे.लोकसहभागातून हनुमान मंदिर व हनुमान निवास(स्वंयपाक गृह),जय हनुमान मंगल कार्यालय इतरही मंदिरे,सभागृह झाली आहेत.एकंदरीत निवघा हे गाव स्वातंत्र्य सैनिकांच गाव म्हणून ओळखल जाते हुतात्मा स्मारक गावात असून ते गावाचा प्रतिक म्हणून सर्वत्र परिचित आहे.शेती हा गावचा मुख्य व्यवसाय असून सर्व शेतकरी जिद्दीने कष्ट करतात.अशा महत्तवकांशी भुमिकेतूनच गावची जञा यशस्वी  होत आहे.तरी येणाऱ्या सर्व बाहेरगावातील भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा. 
         
 हनुमान मंदिर समिती व समस्त गावकरी मंडळी,निवघा यांनी अशी विनंती केली आहे

Sunday, November 18, 2018

आमीर अजमल कसाब भारतीय होता; तो पण उत्तरप्रदेशचा च रहिवाशी. जन्म गाव आंबेडकर नगर, बिधुना तहसील, उत्तरप्रदेश मध्ये हा प्रकार उघडकीस आला.

आमीर अजमल कसाब भारतीय होता; तो पण उत्तरप्रदेशचा च रहिवाशी.
जन्म गाव आंबेडकर नगर, बिधुना तहसील, उत्तरप्रदेश मध्ये हा प्रकार उघडकीस आला.



औरैया : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील एकमेव हाती लागलेला दहशतवादी आमीर अजमल कसाब हा पाकिस्तानी नव्हता, तर तो भारतीय रहिवासी होता. उत्तर प्रदेश प्रशासनाने कसाबच्या जातीचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र जारी केल्याने खळबळ माजली आहे. यानंतर त्वरित सावरत हे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

बिधुना तहसील कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. तेथील आंबेडकर गावातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने अजमल कसाबच्या जातीच्या आणि रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या प्रमाणपत्रामध्ये कसाबचे जन्मगाव आंबेडकर नगर असे नोंद आहे. तर हे प्रमाणपत्र 21 ऑक्टोबर, 2018 मध्ये जारी करण्यात आले होते.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना कसाबचा फोटोही लावण्यात आला होता.

तरीही हे प्रमाणपत्र देताना अधिकारी आणि कर्मचारी त्याला ओळखू शकले नाहीत. तसेच प्रमाणपत्र देतानाही पडताळणी करण्यात आली नाही. अर्जामध्ये कसाबच्या वडिलांचे नाव मोहम्मद आमिर तर आईचे नाव मुमताज बेगम देण्यात आले होते. 

कोन होता कसाब ?
अजमल कसाबने त्याच्या काही साथीदारांसोबत समुद्रमार्गे मुंबईत येऊन 26 नोव्हेंबरला 2008 मध्ये दहशतवादी हल्ला केला होता. शहीद तुकाराम ओंबळे यांनी त्याला सीएसटी स्थानकावर गंभीर जखमी होऊनही जिवंत पकडले होते. या कसाबला 21 नोव्हेंबर 2012 मध्ये फाशी देण्यात आली होती. परदेशी नागरिकाला भारतात फाशी देण्याची ही पहिलीच घटना होती. या हल्ल्यात 166 जण ठार तर 600 पेक्षा जास्त जखमी झाले होते.

भोकर शहरात मुख्य चौकासह विविध भागात मटका जुगार खुलेआम.

भोकर शहरात मुख्य चौकासह विविध भागात मटका जुगार खुलेआम


बेधड़क महाराष्ट्र online न्यूज़

प्रतिनिधि (एजास कुरेशी)
भोकर शहरामध्ये मुख्य चौकासह विविध भागात खुलेआम मटका जुगारांचे बुक्की चे अड्डे तयार झाले असून त्याच्या मार्फ़त फोन मटका तसेच मटका जुगारांचे अन्य ही प्रकार खेळनाऱ्यांची संख्या दिवसे दिवस वाढत आहे यात मटका चालवणाऱ्यासह शहरात इतरत फिरत आहेत. कामगारांना मटका खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या बुकिंकडू लाखों रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे यात मटका जुगार चालक आणि लोकांचे स्थानिक पोलिसां सोबत लागेबंधे आहेत की काय ? असे भोकरच्या जनतेना वाटत असून मटका जुगार तेजीत चालताना दिसत आहे .
   
     शहरामध्ये तालुक्यातील सर्व गावातुन आलेला शेतकरी वर्ग हा शेतात आलेला माल विकण्या साठी येऊन विकलेल्या मालाचे सर्व पैसे मटका जुगार मध्ये टाकून जात आहे आणि शहरातील विविध कामे करणारे कामगार हे  या मटका जुगार चालविणाऱ्या लोकांचे भक्ष होताना दिसत आहे शहरामध्ये आंबेडकर चौकामध्ये आणि मोंढ़ा व रेल्वे गेट तसेच बस स्टैंड परिसरात मटका बुक्की जुगारांच्या बुकिची टेबल टाकून जुगारांला प्रोत्साहन देण्यात येत आहे या मुळे आंकड़े लावणाऱ्या लोकांचे टोळके देखील या मटका बुकिंच्या मागे फिरत असताना दिसत आहे मटका जुगार खेळणाऱ्या बुकी कडून दिवस भरात लाखो रूपयांची उधळपट्टी होताना दिसत आहे या मध्ये सर्वात जास्त फोन मटका चालविला जात आहे फोन मार्फ़त आंकड़े लावने आणि फोन वरच पैश्या ची बोली लावणे असे प्रकार चालू आहे या प्रकार ची अत्ता पर्यंत अनेक लोकांचे जीवन उध्वस्त झाले आहेत परंतू या मटका जुगार मालक व चालकांची स्थानिक पोलिसां सोबत लागे बंधे असल्या सारखे दिसत आहे. म्हणून मटका जुगार मुक्त पने शहरा मध्ये चालु आहे अशी शंखा भोकरच्या जनतेला वाटत आहे या विषयाकड़े स्थानिक पोलिस प्रशासनाला कल्पना असून देखील  पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे या  या मटका जुगाराला खलेआम उधान आल्याचे चित्र भोकर शहरात दिसून येत आहे या वर त्वरित प्रतिबंधक कार्यवाही साठी पोलिस प्रशासना कडून पाऊले उचलनण्या करिता प्रयत्न आवश्यक आहेत.

Saturday, November 17, 2018

भोकर तालुक्यातील तरुण शेतकरी योगेश गायकवाड़ यांची गळफास घेऊन आत्महत्या.

भोकर तालुक्यातील तरुण शेतकरी योगेश गायकवाड़ यांची गळफास घेऊन आत्महत्या.




भोकर : (एजास कुरेशी)
दोन वर्षापासून कर्ज बाजारी असलेल्या तरुणाला कर्ज आज फिटेल उद्या फिटेल म्हणून निसर्गाने साथ दिली तर शेतात माल पिकेल म्हणून निसर्गा कडे पाहणारा तरुण आज निघून गेला ह्यावर गावकऱ्यांचा व त्याच्या परिवाराचा विश्वास बसत नाही 
पदवीतर शिक्षण पूर्ण झाल्या नंतर  लग्न जमले त्यास दोन वर्षे ही झाला नाही त्या तरुण शेतकरी फाशी घेऊन स्वतः ची जीवन यात्रा संपवली भोकर
तालुक्यातील कोळगाव (बु) येथील तरुण शेतकऱ्याने आज दि.१७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली आहे.
      घटनेबाबत पोलिसांनी दिलेली थोडक्यात माहिती अशी की, मयत योगेश विठ्ठलराव गायकवाड वय ३० वर्ष रा.कोळगाव (बु) येथील रहिवासी असून त्यांच्या शेतातील सततच्या नापिकी आणि निसर्गाच्या अवकृपेने नाराज तो नेहमी नाराज असायचा त्यातच बँकेचे कर्ज फिटेनासे झाले, या नैराश्य भावनेतून त्यांनी आज सकाळी स्वताच्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली या आशयाची माहिती मयताचा भाऊ नामे प्रवीण गायकवाड यांनी भोकर पोलीस ठाण्यात दिल्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद घेतली आहे,घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
     नवतरुण शेतकऱ्याने अश्या पद्धतीने आत्महत्या केली असल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणी: :शासकीय कामकाजात हलगर्जीपणा१२ पोलीस कर्मचारी निलंबित.

परभणी: :शासकीय कामकाजात हलगर्जीपणा१२ पोलीस कर्मचारी निलंबित.

परभणीत बारा पोलीस कर्मचारी निलंबित; प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा भोवला 
ठळक मुद्दे
प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांची उपाय योजना
१२ पोलीस कर्मचाऱ्यांना समज देऊनही त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा नसल्याने निलंबन

परभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे़ या संदर्भातील आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले़.

प्रशासकीय कामकाजात सुधारणा आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांनी कडक उपाय योजना सुरू केल्या आहेत़ या अंतर्गत शासकीय सेवेत हलगर्जीपणा करणे, शिस्तभंग करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच गैरहजर राहणे, कर्तव्यात कसूर करणे आदी प्रकरणी १२ पोलीस कर्मचाऱ्यांना समज देऊनही त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाला नसल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहेत.  या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे़ .

यांना केले निलंबित

पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार कारभारी दादाराव वाघमारे, राजेश सत्यनारायण वाजपेयी, श्रीधर रामराव खोकले, गजानन शिवाजी पाटील, व्यंकट संभाजी बिलापट्टे, विजय नागनाथ उफाडे, जिंतूर ठाण्यातील निहाल अहमद नूर पटेल, विनायक मारोतराव भोपळे, पोलीस नियंत्रण कक्षातील सुरेश सटवाजी पानझडे, पाथरी पोलीस ठाण्यातील संतोष उत्तमराव जोंधळे, नानलपेठ पोलीस ठाण्यातील संतोष अन्सीराम जाधव व गंगाखेड पोलीस ठाण्यातील सुरेश कानोबा मोरे या १२ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बल्लाळ गावातील श्रामणेर शिबिराची यशस्वी सांगता

बल्लाळ गावातील श्रामणेर शिबिराची
यशस्वी सांगता


भोकर[प्रतिनिधी ] अतिदुर्ग ग्रामीण खेडेगावात असलेल्या बल्लाळ गावातील श्रामनेर शिबिराची उत्साहपुर्ण वातावरणात गुरूवार दि.१५नोहेबर रोजी यशस्वी सांगता झाली आहे.


नांदेड जिल्ह्यातील मौजे बल्लाळ ता.भोकर हे गाव डोंगराळ भागामध्ये असून बौद्ध धम्मातील समता शांती बंधूत्व मानवतेची शिकवण ग्रामीण भागात रूजली पाहिजे याच उधेशाने सुष्मीत बाबुराव हिरे या युवकांने मोठ्या जिध्दीने धम्मपद माँनेस्ट्री पारनेर जि.अहमदनगर या संस्थेच्या माध्यमातून दि.५नोहेंबर ते १५नोहेंबर पर्यंत १०दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते.याशिबीरात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्यातून ८०च्यावर लहान वया पासून ते मोठया पर्यंत शिबिरार्थि भाग घेतले होते. ग्रामिण भागातील खेड्यात श्रामनेर शिबिरात कुणी सहभाग घेतील असे वाटले नव्हते. बौद्धवाड्यातील समाज मंदिराच्या प्रांगणात सतत दहा दिवस शिबिर चालले.

धम्मपद माँनेष्ट्री पारनेरचे संचालक सुधाकर नगरे,भन्ते महानाम यांनी धम्मचळवळीला वाहुन घेत कशाची सोयी सुविधा नसलेल्या ग्रामिण खेडेगावात वेळेवर मार्गदर्शन देखरेख करण्यासाठी ठाण मांडून होते.

भव्य शांती यात्रा 

गुरूवार दि.१५नोहेंबर २०१८रोजी सकाळी १०वाजता बुध्द मुर्ती सह चिवरधारी श्रामानेर भिक्षुगण माहेरी आलेल्या शुभ्रवस्त्र परिधान केलेल्या  बाईलेकी हे मिरवणूकीचे आकर्षण होते, मिरवणूक गावातून शांतताप्रिय जाताना बल्लाळ वासिय महिला पुरूष रस्त्यावर येवून आश्चर्य चकित बघत होते.ग्रामपंचायत कार्याजवळील पुतळ्याचे जागी जेष्ठपत्रकार एल.ए.हिरे व भंन्तेगन छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला पूष्पहार टाकून पूजन केले व छ.शिवराय,डाँ.आंबेडकर,भ.बुध्द यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

 मिरवणूक विसर्जना नंतर समाज विहारात बुध्दरूपाची भंन्तेच्या हस्ते स्थापना करण्यात आली. नंतर  सहभागी श्रामनेर यांचे चिवर उतरून प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेचे प्रास्तविक करतांना या गावचे सामाजिक कार्यकर्ते  एल.ए.हिरे म्हणाले धर्मांतरानंतर यागावचे आमचे वडील आमृता हिरे,पोचिराम जाधव.संभाजी जाधव वगैरे मंडळी गावात आलेल्या पोतराजाचे केस कापीत अनिष्टप्रथेला  विरोध करीत सुरूवात केली. बाबासाहेब आंबेडकर हे १९५२ला हैद्राबादला जात असतांना माझ्या वडीलासह अनेकजन हातात खुळखुळ्याची काठी खाध्यावर घोंगडी टाकून बाबासाहेबना बघण्यासाठी दऱ्याखोर्यातून पायी चालत उमरी रेल्वेस्टेशनवर गेले होते पण बाबासाहेब बाहेर आले नसल्याने त्यांना पहाता आले नाही असे जुनी मंडळी लहानपणी सांगत होती. असा चळवळीचा इतिहास या बल्लाळ गावाला आहे.

बाबासाहेब हे खरे हिंदू धर्म सुधारक होते! जातीभेद वर्ण व्यवस्था घालविण्यासाठी त्यांनी अश्पृश्य दलित लोकांच्या हक्कासाठी चवदारतळे काळाराम मंदिर प्रवेश करीत असतांना कर्मठ लोकांनी त्यांचेवर दगडफेक केली.अखेरच्या क्षणी त्यांनी लाखो लोकांसह समतेचा बौद्ध धम्म स्विकारला याच धमात मानवाचे कल्यान आहे. या शिबीरातील सहभागी युवक समतेच्या मार्गाने बुध्द फूले आंबेडकर विचारांची पेरणी करतील कुणी अधिकारी  पदावर जावून समाज सेवा करतील असा विश्वास हिरे यांनी व्यक्त केला.प्रसिध्द भिमशाहिर साहेबराव येरेकर यांनी बौद्ध धम्म स्विकारून ६०वर्ष उलटले तरी समाजातील अनिष्टप्रथा अंधश्रदा बाळगणारे देवाच्या नावे नवस करून कंदूरी 

करणारे सुशिक्षित नोकर वर्ग बाबासाहेबाशी गधारी करीत असल्याची घणाघाती टीका आंबेडकरी अनुयावर करीत बौद्ध धम्मात मानवाचे कल्याण असल्याचे सांगितले 

 यावेळी पारनेरचे प्रा. सुधाकर नगरे,बौद्ध महासभेचे राज्यअध्यक्ष दिनेश हनुमंते,वैभव धबडगे, शाहिर सुभाष गवळी,राजेश चंद्रे,शरद महाकश्यप आदिनी विचार मांडले भंन्ते महाकाश्यप यांनी सर्वाना त्रिशरण पंचशिल दिले.यावेळी भन्ते सारिपुत,भ.सुगत,भ.विशुदानंद,दता डोंगरे,दिंगबर हतागळे, हिरामन कांबळे,सुहास फुगले,सुमन जोंधळे आदिसह महिला पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.सुत्र संचलन सुष्मित हिरे यांनी केले तर आभार भिमराव मुनेश्वर यांनी मानले.शबिरास जामदरी, आमदरी,महागाव,गुंडेगाव,बेंद्री गावच्या उपासकांनी भोजनदान दिले बल्लाळ गावातील युवक महिला शिबीर यशस्वी करण्यासाठी दहा दिवस मोठे परिश्म घेतले. 

Friday, November 16, 2018

नांदेड ते दिल्ली विमानसेवा सोमवार पासून सुरू होणार.

नांदेड ते दिल्ली विमानसेवा सोमवार पासून सुरू होणार 


नांदेड़ : एजास कुरेशी
  नांदेडला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची सेवा व्हावी व कंपनीला महसुल मिळावा म्हणून एअर इंडियाने येत्या सोमवारपासून नांदेड- दिल्ली अशी विमानसेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. सोमवारी (ता. 19) पहिले विमान दिल्लीहुन नांदेडकडे झेपावणार असल्याचे गुट्टे यांनी सांगितले. नांदेड शहराला विमानसेवेने जेाडण्यात आल्याने जगाच्या कोणत्याही भागात पोहचता येते. नांदेडला लागून असलेल्या परभणी, हिंगोली, यवतमाळ, निझामाबाद या जिल्ह्यातील प्रवाशांनाही जवळ पडणार आहे. सुरू असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन गजेंद्र गुट्टे आणि श्रीकांत पद्मे यांनी केले आहे.
एअर इंडियाचे (ए 319) हे विमान १२२ सीटचे आहे. त्यात 114 सीट इकॉनिमीक आणि आठ सिट बिझनेस क्लासच्या आहेत. नांदेड- दिल्ली हा प्रवास एक तास 45 मिनिटाचा असेल. 4256 रुपयापासून भाडे सुरू. आतापर्यंत दिल्ली जाणाऱ्या 100 प्रवाशांची बुकींग. सोमवार व गुरूवारी ही सेवा. सोमवारी (ता. 19) दुपारी 3.20 वाजता दिल्ली येथून उड्डाण तर नांदेडला 5.05 वाजता पोहचेल, परत दिल्लीकडे जाण्यासाठी 5.45 वाजता निघून 7.30 वाजत दिल्ली पोहचेल.

कॉग्रेसचे प्रदेशध्यक्ष खा अशोकराव चव्हाण यांची लोकसभा ऐवजी विभानसभेला प्राधान्य ?

कॉग्रेसचे प्रदेशध्यक्ष खा अशोकराव चव्हाण यांची लोकसभा ऐवजी विभानसभेला प्राधान्य ?


नांदेड :-- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत तर विधानसभा लढवणार असल्याचा  मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशोक चव्हाण हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अशोक चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात असुन ते नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाला पसंदी देतील असे सांगण्यात येत आहे . 

दरम्यान काँग्रेस आजपासून मुंबई वगळता राज्यातील 44 मतदारसंघांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता असून त्यामुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच अशोक चव्हाण यांची दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याची माहिती आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राज्यात 2019 ची निवडणूक अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या. (नांदेड आणि हिंगोली)  ज्यासाठी अशोक चव्हाण यांनी परिश्रम  घेतले होते. या पुढे ते राज्याच्या राजकारणाला प्राधान्य देत असुन त्यामुळे नांदेड दक्षिण मतदार संघातुन त्यांनी निवडणुक लढवावी अशी इच्छा वाजेगांव जि प सदस्य मनोहर शिंदे , गंगाप्रसाद काकडे , डॉ कालिदास मोरे यांच्यासह मनपातील नगरसेवकांनी त्याच्या दक्षिण नांदेडच्या विधानसभेसाठी आग्रह धरला आहे .

Thursday, November 15, 2018

नांदेड़ : किरकोळ करणावरुण चाकूने वार करुन युवकाचा खून

नांदेड़ : किरकोळ करणावरुण चाकूने वार करुन युवकाचा खून
स्थानीक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी पाच तासाच्या आतच एका मारेकऱ्याला ताब्यात घेतले.



 नांदेड : एजास कुरेशी   – किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची धमकी देणाऱ्या तरूणाचा तिघांनी निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पोत्यात बांधून हस्सापूर शिवारात गोदावरी नदी पात्रात फेकला. हरमिंदरसिंग उर्फ हऱ्या देविंदरसिंग भोसीवाले (वय २४, रा. सखोजीनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकानी मयताची ओळख पटवून पाच तासाच्या आतच एका मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हरमिंदरसिंग याचा सराईत गुन्हेगार असलेल्या एकासोबत दुचाकीचा धक्का लागण्याच्या कारणावरून वाद झाला होता. यावेळी हरमिंदरसिंग हा एकटा असल्याने त्याला मारहाण करण्यात आली होती. एकट्याला मारता काय ? असे म्हणून कारागृहात असलेल्या एका अट्टल गुन्हेगाराची तो मारेकऱ्यांना धमकी देत होता. मित्र बाहेर येताच तुमचा काटा काढतो, अशी धमकी हरमिंदरसिंग मारेकऱ्यांना देत होता. यामुळे धमकीला त्रस्त झालेल्यानी त्याच्याशी मैत्री केली. असे वाद होतच राहतात. त्यात काही वाईट वाटून घेऊ नकोस असे म्हणून दि.११ नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजता हरमिंदरसिंग याला सोबत घेऊन हस्सापूर शिवारात असलेल्या गोदावरी पुलाखाली नेले. तेथे त्याच्यावर चाकुने सपासप वार करून त्याला ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पोत्यात बांधून नदी पात्रात फेकून दिले.

परंतु त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्याची स्थानिक गुन्हे शाखा चे एपीआय विनोद दिघोरे यांनी ओळख पटविली. लगेच त्यांनी रात्रभर गस्त घालत ते मारेकऱ्यापर्यंत पोहचले. त्यांनी एकाला ताब्यात घेतले असून त्यांनी कबुली दिल्याचे तपासकीय अधिकारी गड्डीमे यांनी सांगितले. या प्रकरणी देविसिंग भोसीवाले यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tuesday, November 13, 2018

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भाच्या दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आज दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भाच्या दौऱ्यावर
१४ व १५ नोव्हेंबरला लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व बुलडाणा जिल्ह्यात पाहणी करणार


मुंबई, दि. १४ नोव्हेंबर २०१८:
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील १४ व १५ नोव्हेंबर रोजी दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते अनेक खेड्यांना भेटी देऊन दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करतील.

नियोजित कार्यक्रमानुसार, बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ते उजनी, ता. औसा, जि. लातूर येथे शेतकरी व शेतमजुरांशी चर्चा करून पाहणी करतील. सकाळी ११ वाजता ते औसा तालुक्यातील बेलकुंड येथे पाझर तलाव व विहिरीची पाहणी करून शेतमजुरांशी चर्चा तर दुपारी १२ वाजता याच तालुक्यातील हिप्परगा येथे पाझर तलावाची पाहणी करणार आहेत.

विरोधी पक्षनेते बुधवारी दुपारी १.३० वाजता उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे शेतमजुरांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतील, तर दुपारी ३.१५ वाजता लोहारा येथे दुष्काळी भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करतील.  

राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

गुरूवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.५० वाजता ते औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथील आत्महत्या करणारे शेतकरी शिवाजी कराळे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील. सकाळी ९.३० वाजता ते चौंडी शहापूर येथे नाला खोलीकरणाची पाहणी करणार आहेत.

विखे पाटील गुरूवारी दुपारी १२.३० वाजता बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मोहखेड येथे दुष्काळाची व जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी करतील. यावेळी ते शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी १.२० वाजता ते चिखली येथील नाफेडच्या खरेदी केंद्रास भेट देतील. दुपारी १.४५ वाजता ते चिखली शासकीय विश्रामगृह येथे शेतकऱ्यांशी चर्चा करणार असून, त्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधतील

Monday, November 12, 2018

भाजप मला गायी दान करेल का- ओवेसी

भाजप मला गायी दान करेल का-  ओवेसी


बेधडक महाराष्ट्र online न्यूज
तेलंगणा : – तेलंगणातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने राज्यात १ लाख गायी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु भाजप मला गायी दान करेल का असा सवाल ओवेसींनी भाजपला विचारला आहे. हा हसण्यासारखा विषय नसून मी सत्य विधान करत आहे. भाजपने मला दान केलेल्या  गायीचा मी चांगला सांभाळ करेल परंतु मला भाजप गाय दान करेल का हा मोठा प्रश्न आहे असे ओवेसी म्हणाले आहेत. ओवेसी यांच्या विधाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ओवेसी आणि वाद या दोन शब्दाचे आपापसात नातेच आहे असे बोलले जात आहे. ओवेसींनी बोललेल्या विधाने या आधी खूप वाद निर्माण झाले आहेत. भाजपचे नेते गावांची आणि शहराची नवे बदलत सुटले आहेत पण अमित शहा यांचे आडनाव पारशी आहे त्यामुळे ते बदलून घ्यावे असे वक्तव्य त्यांनी या आधी केले होते. त्याबद्दल वादाचे पडसाद उठेल होते त्यांनी आज केलेले विधान हि वादाच्या बोहऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. भाजपला काँग्रेस मुक्त भारत करायचा नसून मुसलमान मुक्त भारत करायचा आहे या त्यांनी आज पुन्हा उच्चार केला आहे.

पत्रकारांची लेखनी ही खऱ्या अर्थाने समाजातील त्रुटी दूर करण्या साठी : पोलिस अधिक्षक संजय जाधव

पत्रकारांची लेखनी ही खऱ्या अर्थाने समाजातील त्रुटी दूर करण्या साठी : पोलिस अधिक्षक संजय जाधव
 
 (विशेष प्रतिनिधि)
 एजास कुरेशी
नांदेड,दि.११ःःजिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिक्षक श्री. जाधव यांनी पत्रकार व पोलिसांसाठी दिवाळी फराळाचे पोलिस मुख्यालय मैदानावर शनिवारी (दि. १०) आयोजन केले होते. यावेळी श्री. जाधव बोलत होते. पत्रकारांची लेखणी ही खऱ्या अर्थाने समाजातील त्रुटी दूर करण्यासाठी व योग्य दिशा देण्याचे काम करीत असते.नांदेड : पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा असतो. तसेच पोलिस आणि पत्रकार यांचा संबंध चीखल मातीचा आहे. पोलिसांनी चांगले काम केले तर त्याची दखल आपण घ्यावी, यासोबतच काही कर्तव्यात चुक झाली तर नक्कीच आपल्या लेखणीतून ती चुक सुधारण्याची संधी द्यावी असे मत पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केले.

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस अधिक्षक जाधव यांनी पत्रकार व पोलिसांसाठी दिवाळी फराळाचे पोलिस मुख्यालय मैदानावर शनिवारी  आयोजन केले होते. यावेळी श्री. जाधव बोलत होते. पत्रकारांची लेखणी ही खऱ्या अर्थाने समाजातील त्रुटी दूर करण्यासाठी व योग्य दिशा देण्याचे काम करीत असते. पत्रकारांनी चांगल्या समाजासाठी आपल्या लेखणीचा दरारा कायम ठेवत कुणाच्या दबावाखाली काम न करता आपल्या सद्सदविवेक बुध्दीला पटेल असे लिखान करण्याची गरज आहे. समाजाचा हा तिसरा डोळा कणखर असल्याने देशात सर्च क्षेत्रात कुरघोडी होतांना दिसत नाही.

प्रत्येकांच्या कामाचे मुल्यमापन करून ते समाजासमोर ठेवण्याची खरी किमया पत्रकारांच्या लेखणीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपाधिक्षक अभिजीत फस्के, ए. जी. खान, पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, अनिरूध्द काकडे, मच्छींद्र सुरवसे, संदीप शिवले, द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे, एस. आर. पोकळे, एपीआय नामदेव मद्दे, अशोक लाटकर आणि श्री. आर. के. मुंडे यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्या वतीने पत्रकारांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

Saturday, November 10, 2018

शेर-ए-म्हैसूर/ म्हैसूरचा वाघ नावाने वळखले जाणारे ; टीपू सुलतान

शेर-ए-म्हैसूर/ म्हैसूरचा वाघ नावाने वळखले जाणारे ; टीपू  सुलतान

मुळनाव: फतेहअली टीपू
जन्म: 10 नोव्हेंबर, 1750
मृत्यू: 4 मे, 1799

"टीपू सुलतान हे उत्कृष्ठ अर्थतद्न्य, समाजसुधारक, कवी,कुशल प्रशासक,आधुनिक तंञाचे पुरस्कर्ते,पराक्रमी सेनानी आणि दूरदृष्टीचे, प्रजाहितदक्श व लोककल्याणकारी सुलतान होते".
टीपू सुलतान यांचे मुळनाव फतेहअली टीपू असे होते. राज्याभिषेक झाल्यावर ते "सुलतान" बनले व पुढे "टीपू सुलतान" या नावाने लोकप्रिय झाले.
टीपू सुलतान हे मुस्लिम होते,तर त्यांची प्रजा हिंदू होती. आपल्या प्रजेवर त्यांनी मनापासून प्रेम केले. सध्या कर्नाटकात कावेरी नदीवर जेथे प्रसिद्ध कृष्णराज सागर धरण आहे त्या जागी टीपूंनी एक छोटे धरण बांधले होते. टीपू सुलतान यांच्या कारकिर्दीत म्हैसूर राज्याचा व्यापार श्रीलंका, अफगाणिस्तान,फ्रान्स,टर्की,रशिया,चीन,इराण इ.देशांशी चालत असे. टीपू सुलतान यांना उर्दू,कन्नड,फारसी,अरेबिक,फ्रेंच या भाषा अवगत होत्या.

 1791 मध्ये जेव्हा पेशव्यांच्या फौजांनी शृंगेरीपीठाच्या शंकराचार्यांच्या मठावर हल्ला करून  लूटमार व हत्या केल्या. तेव्हा शंकराचार्यांनी टीपूंना मदतीचे विनंतीपञ धाडले. टीपूंनी लुटारू पेशव्यांना पळवून लावले व मठाची दुरूस्तीही केली. 1782 ते 1799 या दरम्यान टीपू सुलतान यांनी विविध मंदिरांना मदत दिल्याच्या 34 सनद सध्या उपलब्ध आहेत.
.......................................
टीपू सुलतान हे आपल्या एका फ्रेंच मिञासह म्हैसूरच्या जंगलात शिकारीला गेलेले असताना हातातील छोट्या खंजरने हिंस्ञ वाघाला ठार केले. तेव्हापासून टीपू हे "शेर-ए-म्हैसूर/ म्हैसूरचा वाघ" म्हणून ओळखले जावू लागले.मुळातच त्यांना वाघ या प्राण्याविषयी विशेष आकर्षण होते. त्यांचा ध्वज वाघाच्या रंगाचा,सिंहासन वाघाच्या आकाराचे, सैन्याचा गणवेशही वाघाच्या रंगाचा होता.
टीपूंनी आपल्या कारकिर्दीत नवीन कालगणना, नवी नाणी, नवी वजनमापे व प्रशासनात सात नवी खाती सुरू केली.  तसेच,  जनतेच्या सोयीसाठी अनेक मंदिरे,मशिदी, रस्ते बांधले, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली, शेतकरयांसाठी विहिरी खोदल्या, कालवे बांधले, जागोजागी छोटी-छोटी धरणे बांधली.

टीपू सुलतान यांची प्रसिद्ध विधाने:
1."शेती ही देशाची रक्तवाहिनी आहे."
2."गिधाडासारखे 100 वर्षे जगण्यापेक्शा वाघासारखे एकच दिवस जगणे मी पसंत करीन."

टीपूंची लष्करी सज्जता:

इंग्रजांचा धोका ओळखून त्यांचे शञू असलेल्या फ्रेंचांशी चांगले संबंध स्थापित करून टीपूंनी आधुनिक कवायती सैन्य उभारले होते. टीपू सुलतान यांच्या नेतृत्वात म्हैसूर लष्कराने "आधुनिक वैन्यानिक लष्करी शाळा" भारतात प्रथमच सुरू करून  या नव्या क्शेञाची भारतीय राज्यकर्त्यांना ओळख करून दिली.  फ्रेंच सेनानी नेपोलियन बोनापार्ट याच्याशी पञव्यवहार करून राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. नेपोलियनने इजिप्त जिंकल्यानंतर भारतात यावे व इंग्रजांना हाकलून देवून भारत स्वतंञ करण्यास टीपूंना सहाय्य करावे, अशी ही योजना होती.पण त्याचवेळी फ्रेंच राज्यक्रांतीला सुरूवात झाल्याने ही महत्त्वाकांक्शी योजना बारगळली.इंग्रजांविरूद्ध ऐत्देशीय राजांची आघाडी करण्याचाही प्रयत्न टीपूंनी केला. पण त्यांना कोणाची साथ मिळाली नाही. उलट, पेशवा व निजाम यांनी नेहमी इंग्रजांनाच सहाय्य केले.

💥क्शेपणास्ञ प्रणेते:
                        टीपू सुलतान
युद्धासाठी आवश्यक अशा अनेक आधुनिक तंञांचा व शस्ञास्ञांचा टीपूंनी शोध लावला. यातील अत्यंत महत्त्वाचे असे आधुनिक शस्ञ म्हणजे "क्शेपणास्ञ" होय.टीपूंच्या या शोधाचा उल्लेख ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या "अग्निपंख " या आत्मचरिञातही आहे. म्हणजेच "टीपू सुलतान हे आधुनिक क्शेपणास्ञाचे जनक" होय. टीपूंच्या वीरमरणानंतर यातीलच काही क्शेपणास्ञांचा वापर करून  इंग्रजांनी वॉटर्लूच्या युद्धात नेपोलियनचा पराभव केला. पण अशी क्शेपणास्ञे बनवणे इंग्रजांना जमले नाही.

टीपूंचे वीरमरण:

टीपू सुलतान यांचा सेनानी मीर सादिक याला इंग्रजांनी म्हैसूरचा सुलतान करण्याचे आश्वासन देवून फितूर केले. या लोभापोटीच त्याने 1799 च्या श्रीरंगपट्टणच्या चौथ्या युद्धात टीपूंच्या क्शेपणास्ञ साठ्यात पाणी सोडून हजारो क्शेपणास्ञे निकामी केली. अशा विश्वासघातकी लोकांमुळेच 1799 च्या युद्धात शेर-ए-म्हैसूर टीपू सुलतान यांना वीरमरण आले. या युद्धात हैदराबादचा निजाम व पुण्याच्या पेशव्यांनी टीपूंविरूद्ध इंग्रजांना मदत केली.टीपू जिवंत होते तोपर्यंत संपूर्ण भारत जिंकण्याचे इंग्रजांचे स्वप्न अपूर्ण होते.यानंतर माञ इंग्रजांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण झाले.ू

मुंबई महानगरपालिका कडून 4 वर्षाचे तब्बल २७ लाख भाडे!

मुंबई महानगरपालिका कडून 4 वर्षाचे तब्बल २७ लाख भाडे!


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या KEM रुग्णालयात तब्बल ३७ वर्षे सेवा करणा-या परिचारिकेने सेवानिवृत्त झाल्यानंतर, कुटुंबाला राहण्यास हक्काचे घर नसल्याने त्या पतीसोबत स्टाफ क्वाटर्समध्ये मागील ४ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. परंतु, या ४ वर्षांचे तब्बल २७ लाख रुपये इतके प्रचंड भाडे मुंबई महापालिकेने आकारल्याने या गरीब आजींना रोज रडू कोसळत आहे. तब्बल २७ लाख रूपये भाडे आकारत शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आणि रुग्णालय प्रशासन या गरीब आजींना लुबाडत आहे का ? असा सवाल मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची त्या आजींसोबत नांदगावकर यांनी भेट घेतली होती. दरम्यान, दिवाळीनंतर याबाबत योग्य दखल घेण्याचे आश्वासन महापौर महाडेश्वरांनीं दिले होते. त्यानुसार मुंबई महानगर पालिका प्रशासनाने जर योग्य पावले उचलली नाहीत तसेच २७ लाख भाडे माफ केले नाही तर आम्ही आजींना थेट महापौर बंगल्यात निवासासाठी जागा देऊ, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.

दरम्यान, संबंधित निवृत्त परिचारिका १० बाय ३०च्या छोट्या खोलीत राहतात. विशेष म्हणजे रुग्णालयात सेवेत असताना या खोलीचे भाडे केवळ १६६ रूपये लावण्यात येत होते. दुसरं म्हणजे रुग्णांच्या उत्कृष्ट सेवेसाठी या आजींना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. परंतु, सेवानिवृत्त झाल्यानंतर मला रहायला कुठे घर नव्हते. माझे पती कॅन्सरग्रस्त होते आणि त्यांचे आकस्मित निधन झाले. मला दुसरीकडे कुठे रहायला जागा नसल्याने मी स्टाफ क्वाटर्समध्ये राहत होते. परंतु, निवृत्तीनंतर ४ वर्षे अधिक राहिले म्हणून माझ्याकडून तब्बल २७ लाख रुपये घरभाडे मागितल्याची खंत या परिचारिकेने व्यक्त केली. या प्रकरणात रुग्णालयाचे अधिष्ठाता, मुंबईचे महापौर यांचीही भेट घेतली असली तरी काही सुद्धा हालचाल झाली नसल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबई महानगरपालिकेने या आजींवर एवढे भाडे का आकारले? याचा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेने विचारणारच आणि या आजींना न्याय मिळवून देणारच अशी आक्रमक भूमिका नांदगावकर यांनी घेतली आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार अतिशय संतप्त करणारा आहे. इथे करोडो रूपयांची थकबाकी ठेवणाऱ्या आमदार-खासदारांवर कोणतीही कारवाई न करता एका गरीब आजीला जिने मुंबई महानगर पालिकेत रुग्णांची सेवा केली आहे, त्यांना प्रचंड लाखोंचे घरभाडे कसे लावता? असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे.

धक्कादायक शेतकरीने स्वत:च सरण रचुन आत्महत्या केली पेटत्या चितेत मारली उड़ी

धक्कादायक
शेतकरीने स्वत:च सरण रचुन आत्महत्या केली पेटत्या चितेत मारली उड़ी


  एजास कुरेशी
  नांदेड: शेतकऱ्याने स्वत:चं सरण रचून पेटत्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. दुष्काळ आणि नापिकीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. पोत्तना बोलपीलवाड असं या 60 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. उमरी तालुक्यातील तुराटी गावात ही घटना घडली.

पोत्तना यांच्यावर बँकेचं कर्जही होतं. त्यातच दुष्काळ आणि नापिकी तर पाचवीला पूजलेली. अशात दिवाळसणही आल्याने खचलेल्या पोत्तना यांनी स्वत:चं सरण रचून पेटत्या चितेत उडी घेऊन आयुष्य संपवलं.

सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, शिवाय कर्जमाफीचीही घोषणा यापूर्वीच झाली आहे. तरीही शेतकरी आत्महत्या होत असल्याने, सरकारी योजनांची अंमलबजावणी होते की नाही असा प्रश्न पडला आहे.

पोत्तना यांच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते. ते कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागली होती. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे उसनवार करुन त्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली. याच परिस्थितीत त्यांनी स्वत:चं सरण रचून आत्महत्या केली.

सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल

सुप्रीम कोर्टाचे निर्देश सर्रास धाब्यावर : पोलीस कारवाईचा बार फुसका; राज्यात केवळ ३०० गुन्हे दाखल

बेधडक महाराष्ट्र online

       मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवत दिवाळीत सर्वत्र फटक्यांचा धूमधडाका उडाल्याने पोलीस कारवाईचा बार फुसकाच ठरला. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेशिवाय फटाके फोडल्याबद्दल राज्यात केवळ ३०० जणांवर गुन्हे दाखल झाले असून मुंबईत आठ जणांना अटक झाली आहे.
दिवाळीत रात्री आठ ते दहा या कालावधीतच फटाके फोडण्याचे बंधन न्यायालयाने घातले होते. मात्र या आदेशाचे देशातील अनेक भागांत सर्रास उल्लंघन झाले. तरीदेखील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने हा आदेश म्हणजे चांगली सुरुवात आहे, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तांनी पहाटे आणि रात्री १० वाजेनंतर फटाके उडविणाºयांवर कारवाईचे निर्देश देताच ठाणेदारांनी १३६ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, १९० आणि १९१ नुसार गुन्हे दाखल केले. नागपुरात ६४ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर मुंबई-ठाण्यात पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. तसेच बेकायदा फटाके विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापुरात विनापरवाना फटाके विक्री केल्याबद्दल १३ विक्रेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

  नांदेड़ शहरातील डॉक्टर लेन ही अत्यंत मोठी डॉक्टर लेन आहे या डॉक्टर लेन मध्ये डॉक्टरानी  व मेडिकल मालकांनीच फटाकयाची आतिशबाजी केल्याने याचा रुग्णाना मोठा त्रास झाला या परिसरात अतिदक्षता विभाग ,हार्ट पेशंट ऑक्सीडेंटल विभाग , मँटीर्निटी होम असे अनेक हॉस्पिटल्स विविध हॉस्पिटल मध्ये अनेक गंभीर वअतिगंभीर रुग्ण ही आहेत दिवाळी निमित 2 दिवसापासुन  रात्रि डॉक्टर लेन परीसरात मोठ्या प्रमाणात आतिशबाजी करण्यात आल्या मुळे रुग्नाना त्रास तर नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे  या बद्दल रुग्णाच्या नातेवाईकनी नाराजी वेक्त केली आहे अनेक हॉस्पिटल समोर हॉस्पिटलचे डॉक्टर व मेडिकल मालक आतिशबाजी करत आहेत ज्या रुग्नाची व नवजात शिशु तसेच नवमाताच्या जीवाची जबाबदारी आहे त्याच डॉक्टरानी आशा प्रकारचा बेजबाबदार पना दखवल्याचे प्रकार ऊघड़ झाले आनेक रुग्ण हे फटाक्याच्या आवाजाने त्रस्त झाले आहे किमान डॉक्टर लेन मध्ये तरी अतिबाजी करू नये असे जनतेचे मत आहे

पुणे पोलिसांच्या नियत्रंण
कक्षाकडे व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर ३५
तक्रारी आल्या आहेत. मात्र एकावरही कारवाई झाली नाही. येरवड्यात
फटाके वाजविणाºयांनी पोलिसांनाच मारहाण केली.

उत्पादनावरही होणार परिणाम

फटाक्यांमुळे होणाºया प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा देणारे अ‍ॅड. गोपाल शंकरनारायणन म्हणाले, न्यायालयाचा आदेश दिल्लीत नीट पाळण्यात आला नाही याला या शहरातील पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे भविष्यात फटाक्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम व्यक्त केली

एका पाकिस्तानी नागरिकास नागपुरातून अटक नांदेड़ येथे राहनारा एक एजंट व इतर तीन जनाचा शोध सुरु

एका पाकिस्तानी नागरिकास नागपुरातून अटक नांदेड़ येथे राहनारा एक एजंट व इतर तीन जनाचा शोध सुरु



नागपूर,दि.10 – नागपूरसह राज्यातील इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा प्रयत्न मिलिट्री इंटेलिजन्स (एमआय), अ‍ॅण्टी टेररिस्ट सेल (एटीसी) मुंबई आणि नागपूर पोलिसांच्या चमूने शुक्रवारी हाणून पाडला. पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयचा  एक एजंट आणि एका पाकिस्तानी नागरिकास नागपुरातून अटक केली.आणखी एक दुसरा एजंट आणि तीन अन्य पाकिस्तानी नागरिकांचा तपास सुरु असून त्यांनाही ताब्यात घेण्याची तयारी सुरु आहे.

नागपूरसह देशातील काही भागांमध्ये पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीचे एजंट सक्रिय असल्याची माहिती मिलिट्री इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार एजंटांवर पाळत ठेवली जात होती. मिलिट्री इंटेलिजन्स आणि एटीसी मिळून हे काम करीत होते. या दरम्यान मिळालेल्या गंभीर माहितीनुसार देशातील चार ठिकाणी धाड टाकण्याची योजना बनवण्यात आली. नागपूर शिवाय पंजाब, उत्तर प्रदेशातील नोएडा आणि रायबरेली येथे एजंट लपून बसले होते. शुक्रवारी दुपारी गणेशपेठ बस स्टॅँडजवळील एका इमारतीवर धाड टाकली असता त्यांना एक पाकिस्तानी एजंट घटनास्थळीच सापडला. पकडण्यात आलेला एजंट मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. याशिवाय नांदेड येथे राहणारा एक एजंट आणि तीन इतर पाकिस्तानी नागरिकांचाही चमू शोध घेत आहे

Tuesday, November 6, 2018

नगरसेवक पुत्रांची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ शेयर केल्याचा जाब विचारल्याने केले हे कृत्य

नगरसेवक पुत्रांची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ शेयर केल्याचा जाब विचारल्याने केले हे कृत्य  

कल्याण- सोशल मीडियावर अपलोड केलेला व्हिडीओ शेयर का केला असा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणीला सेना भाजपच्या आजी माजी नगरसेवकांच्या पुत्रांनी आपल्या साथीदारासह बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात वैभव पाटील व मयूर भोईर याच्यासह त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव पाटील हा शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांचा मुलगा तर मयूर भोईर हा भाजपचे विद्यमान नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा आहे.पीडित तरुणी कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात राहत असूनया तरुणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ शिवसेनेचे माजी नगरसेवक यांचा मुलगावैभव पाटील याने शेयर केला. त्यामुळे या पीडित तरुणीने त्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या वैभवने मयूर भोईर व त्याच्या साथीदारांना घेऊन पीडित तरुणीचे घर गाठले आणि तिला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पीडित तरुणीने खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी नगरसेवक पुत्र वैभव पाटील व मयूर भोईर विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Sunday, November 4, 2018

दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा - बाबा रामदेव

दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा - बाबा रामदेव


बाबा रामदेव पुन्हा एका चर्चेत आले आहेत. यावेळेस त्यांनी देशाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे.

हरिद्वार 
- योग गुरू बाबा रामदेव आपल्या खास शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आजही एका विधानामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळेस त्यांनी देशाच्या वाढणाऱ्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. 'जी लोक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देतील, त्यांना मतदानाचा अधिकार नसावा', असे परखड मत बाबा रामदेव यांनी मांडले आहे. शिवाय, माझ्याप्रमाणे जी लोक लग्न करणार नाहीत, त्यांना समाजात विशेष सन्मान मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे. हरिद्वारमध्ये एका कार्यक्रमाला बाबा रामदेव संबोधित करत होते.
या देशामध्ये जे माझ्याप्रमाणे विवाह करणार नाही, त्यांचा विशेष सन्मान करायला हवा. पण लग्न केल्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य जन्म देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसावा. 
पुढे ते मिश्किलपणे असंही म्हणाले की, पुरातन काळात लोकसंख्या कमी होती, या पार्श्वभूमीवर वेदांमध्ये 10-10 अपत्यांना जन्म देण्यास सांगितले गेले आहे. आता ज्यांचं सामर्थ्य आहे, त्यांनी करावं. पण आता तशीही देशाची लोकसंख्या 125 कोटी एवढी आहे. मात्र जर कोणी बुद्धिमान पुरुष किंवा स्त्री आहे आणि जर ते पूर्णतः जागृत आत्मा असतील तर ते एकटेच हजारो, लाखो, कोट्यवधींवर भारी पडतात, ही भारतीय ज्ञानाची परंपरा आहे. 

महिला पत्रकारांना शबरीमाला मंदिरांकडे पाठवू नका; हिंदू संघटनांचा इशारा.

महिला पत्रकारांना शबरीमाला मंदिरांकडे पाठवू नका; हिंदू संघटनांचा इशारा.
_________________________________

केरळच्या शबरीमाला मंदिरात सोमवारपासून सुरु होणाऱ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. या उत्सवाच्या वेळी मासिक पाळी असणाऱ्या महिलांना मंदिरात जाण्यापासून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने केरळमधील डाव्या सरकारने याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांनी वृत्तसंस्थांना महिला पत्रकारांना याठिकाणी वृत्तांकनासाठी न पाठवण्याचा इशारा दिला आहे. या मुद्द्यावर समर्थन किंवा विरोध करण्याचा तुमचा हक्क आम्हाला मान्य आहे. मात्र, येथील परिस्थिती चिघळेल, असे काहीही तुम्ही करणार नाही, ही आशा आम्ही करत असल्याचे हिंदू संघटनांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटाच्या महिलांना शबरीमाला मंदिराची दारे उघडी केल्यानंतरही येथील संघर्ष कायम आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हे मंदिर १७ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पहिल्यांदाच उघडण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाला विरोध असणाऱ्या भक्तांनी एकाही महिलेला मंदिरात शिरून दिले नव्हते. तसेच महिला पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला होता. या घटना क्रमानंतर केरळमधील राजकारण प्रचंड तापले आहे. उद्यापासून या मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडतील. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Saturday, November 3, 2018

मनसे महिला मराठवाड़ा सचिव साड्या चोरताना अटक

मनसे महिला मराठवाड़ा सचिव
साड्या चोरताना अटक


पुणे : दिवाळी सण साजरा करायला सर्व दुकानात खरेदीसाठी गर्दी झालेली असतानाच या स्थितीत चोरीच्या साड्यावर दीवाळसण साजरी करायची मजा मनसे महिला पधिकारीला चांगलीच महागात पडली आहे . या महिला पदाधिकार्याला रंगेहाथ पकडल्याने दूकानदाराने कानाखाली वाजवलेले फटके व पोलिस कोठडिची हवा खाऊन माय लेकिना दिवाळी साजरी करावी लागणार आहे .
मनसे मराठवाडा सचिव मीना पाटिल व त्यांच्या कन्येला दूकानदाराने साड्या चोरताना पकडून बदड़ून काढले आहे हा प्रकार 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथील तळेगाव दाभाडे येथे घडला असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय . उस्मानाबाद येथील रहिवासी असलेल्या मनसे मराठवाडा सचिव मीना पाटील तळेगाव दाभाडे येथील एका कापड दुकानात साड्या खरेदीसाठी गेल्या होत्या त्यांच्यासोबत एक मुलगी आणि महिला व चालक असे चौघेजण कापड दुकानात गेले . त्या दुकानात cctv लावले होते .
मीना पाटील 5 साड्या बांधत असताना कामगारालाराला संशय आला व फुटेज बघितले असता त्यांनी पाच साड्या चोरल्याचे समोर आले .त्यांनतर प्रकार समोर आल्याने पाटील यांनी आधी मनसे स्टाईल दादागिरी करून बघितली पण दुकानदार बधला नाही आणि त्याने पोलिसांना पाचारण केले .

हा सर्व प्रकार सोशल मिडियावरही व्हायरल झाला असून व्हिडीओ सर्वत्र फिरत आहे .पोलीस आल्यावर सर्व चाळीस हजार घ्या पण मिटवून घ्या ही खास ऑफर पण पाटील यांनी देऊन बघितली आणि काउंटरवर डोकेही आपटून पाहिले पण कर्तव्यदक्ष पोलीसांनी या “मनसे” बाण्यास अजिबात भीक न घालता त्यांना जेलची हवा खाऊ घातली .

बिलोली शहरातील तहसिल कार्यालय ते रजिस्ट्री अॉफीस पर्यत आंधारच आंधार

बिलोली शहरातील तहसिल कार्यालय ते रजिस्ट्री अॉफीस पर्यत आंधारच आंधार.
पथदिवे बंद असल्याने बिलोली शहरातील महा मार्गावरील रजिस्टरी अॉफीस ते पोलीस ठाणे व  देशमुख नगर समोरिल मुख्य स्ट्रिटलाईट प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही  पथदिव्य सुरु होत नाही  लवकरच दिवाळी सन येत आहे  दिवाळीही आंधारात होणार का ?  मुख्य रस्त्यावर खुप आंधार असल्यामुळे अपघात झाल्यास जवाबदार कोण?  .
शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाहीत, असा जणू नगर परिषदेने  निर्धारच केला असल्याचे पालिकेच्या कारभारावरून दिसते
 अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे

हिंगोलीतील गारमाळ येथे भाजप-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; १५ जण गँभीर जखमी

हिंगोलीतील गारमाळ येथे भाजप-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; १५ जण गँभीर जखमी 

हिंगोली (प्रतिनिधि)
हिंगोलीतअसलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचे एक पथक गारमाळमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी तहसील पथकाचा पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचाऱ्याला मारहाण झाली. यानंतर भाजपा कार्यकर्ते हमीद प्यारेवाले आणि एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख बुऱ्हाण पहेलवान गटात तणाव निर्माण झाला. भाजपा आणि एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांशी परस्पर भिडले. तसेच, दोन्ही गटांत लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारीला झाली. याशिवाय दगडफेक सुद्धा करण्यात आली. दरम्यान, या घटनेत 115 जण जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, गारमाळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ट्रेनी महिला पोलिसांचा 'हैदोस'; पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

ट्रेनी महिला पोलिसांचा 'हैदोस'; पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!
पटना - महिला पोलिस सहकाऱ्याचा मृत्यूच्या विरोधात संतापलेल्या ४०० ट्रेनी पोलिस कॉन्स्टेबलांनी (त्यामध्ये सर्वांधिक महिला) अक्षरशः हैदोस घालून मालमत्तेचे जबर नुकसान केले. बुद्ध कॉलनी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोधीपूर परिसरात ही घटना घडली. इतकेच नव्हे तर या ट्रेनी पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबड उडाली आहे. सविता पाठक (२२) ही ट्रेनी पोलिस कॉन्स्टेबल डेंग्यूने आजारी होती. तिला रजा नाकारण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवत ट्रेनी पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक महंमद मशलुद्दीन यांनाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता त्या ४०० पोलिसांच्या जमावाने ग्रामीण पोलिस अधीक्षक, पाटणा मध्य आणि पूर्वचे पोलिस अधीक्षक तसेच उप पोलिस अधीक्षक यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.  या हल्ल्यामध्ये काही पोलिस अधिकारी जखमी झाले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांना घटनास्थळावर येण्यास ४० मिनीटे उशीर झाल्याने या पोलिसांनी अधिकच उद्रेक केला. मृत झालेल्याला सविताला गेल्या तीन दिवसांपासून तापाने फणफणत असतानाही सुट्टी देण्यात आली नाही. उप पोलिस अधीक्षकांनी सविता गंभीर आजारी असतानाही कारगिल चौकामध्ये तिला ट्रॅफिक ड्युटीवर पाठवून देण्यात आले. बुधवारी सकाळी सविताला रुग्णालयात दाखल केले होते, पण काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला. या अभूतपूर्व झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पोलिस संचालक के.एस.द्विवेदी यांच्याकडून अहवाल मागवला आहे. ट्रेनी पोलिसांनी पुरावे नष्ट करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची तोडफोड केली. पोलिसांनी हैदोस घालायला सुरुवात केल्यानंतर संतापलेल्या स्थानिकांनी त्यांच्यावर दगड आणि वीटा फेकून मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही त्यांच्यावर दगडफेक केली.त्याचबरोबर पोलिस लाईनवरही हल्ला चढवला. या चाललेल्या भयानक प्रकारात १० जण जखमी झाले.

डिसेंबरपासून सुरू होणार राम मंदिर निर्माण, महंतांची घोषणा.

डिसेंबरपासून सुरू होणार राम मंदिर निर्माण, महंतांची घोषणा.
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणावर भाजपचे माजी खासदार आणि रामजन्मभुमी न्यासचे अध्यक्ष राम विलास वेदांती यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय. वेदांती यांनी राम मंदिर निर्माणाचं कार्य डिसेंबर महिन्यात सुरू होणार असल्याची घोषणाच करून टाकलीय. 'कोणत्याही अध्यादेशाशिवाय अयोध्येत राम मंदिराचं निर्माण होईल. परस्पर संमतीनं राम मंदिर अयोध्येत आणि मस्जिदचं निर्माण लखनऊमध्ये करण्यात येईल' असं वक्तव्य राम विलास वेदांती यांनी केलंय. असं वक्तव्य करण्याची वेदांती यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अयोध्येत राम मंदिर बनवण्याची वेळ निश्चित झाल्याचं सांगितलं होतं. भाजपनं अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग काढलाय. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच राम मंदिर बनवण्याचं काम सुरू होईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, अयोध्येच्या वादग्रस्त रामजन्मभूमीवर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रतिक्रिया देताना, हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यानं उत्तरप्रदेशचे सत्ताधारी योगी सरकार आणि केंद्र सरकार काही करू शकत नाही, असं म्हटलं होतं.

नांदेड़ :हिंगोली गेट येथे गोळीबार तांडा बार चे मालक सुरेश राठोड गंभीर जखमी

नांदेड़ :हिंगोली गेट येथे गोळीबार तांडा बार चे मालक सुरेश राठोड गंभीर जखमी

नांदेड:-(एजास कुरेशी)
नांदेड़ शहरातील हिंगोली गेट  परिसरात अज्ञात इसमांनि दि.2 ऑक्टोबर रोजी रात्रि 1 वाजता टांडा बार चे मालक  सुरेश टीकाराम राठोड यांच्या वर गोळीबार केला यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्याच्यावर नांदेड़ येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.
घटने नंतर रुग्णालयात अपर पोलिस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे उप अधिक्षक अभिजित फस्के पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी धाव घेतली.

रेल्वे स्टेशन समोर असलेले नामांकित हॉटेल तांडा बार चे मालक सुरेश राठोड  यांच्या वर अज्ञात व्यक्ती कडून गोळीबार झाल्याने व्यापारी वर्गात भीतीची लाट पसरली आहे.
 दुचाकीवरुनआलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. ते घरातून स्कूटरवरुन हॉटेलच्या दिशेनं जात होते. राठोड यांच्या मांडीवर एक गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
सदरील प्रकरण घडल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...