वॉट्सएप्प ग्रुपमध्ये महिलेला अॅड करून शेअर केले अश्लील व्हिडीओ; अॅडमिनला अटक.
व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये एका महिलेला अॅड करून त्या ग्रुपमध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ शेअर करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला त्याचा फाजीलपणा महागात पडला आहे. माटुंगा पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या त्या ग्रुप अॅडमिनला अटक केली.
माटुंगा परिसरात राहणाऱ्या एका 44 वर्षीय महिलेने माटुंगा पोलिसात याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून उपनिरीक्षक मारुती शेळके यांनी त्या ग्रुपचा अॅडमिन मुश्ताक अली शेख (24) याला पश्चिम बंगाल येथे जाऊन अटक केली.
त्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना व्हॉटस्अॅपच्या ट्रिपल एक्स नावाने असलेल्या गुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्या ग्रुपमधील कोणालाच त्या ओळखत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी त्या ग्रुपकडे दुर्लक्ष केले आणि त्या ग्रुपमध्ये तशाच राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्या ग्रुपवर आलेले मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण ते सर्व अश्लील मेसेजेस, व्हिडीओ होते. त्यामुळे त्यांनी लगेच माटुंगा पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे याप्रकरणी भादंवि कलम 345, आयटी अॅक्ट 66, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला गेला.

Nice news
ReplyDelete