नांदेड़ :हिंगोली गेट येथे गोळीबार तांडा बार चे मालक सुरेश राठोड गंभीर जखमी
नांदेड:-(एजास कुरेशी)
नांदेड़ शहरातील हिंगोली गेट परिसरात अज्ञात इसमांनि दि.2 ऑक्टोबर रोजी रात्रि 1 वाजता टांडा बार चे मालक सुरेश टीकाराम राठोड यांच्या वर गोळीबार केला यात ते गंभीर जखमी झाले आहेत त्याच्यावर नांदेड़ येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.
घटने नंतर रुग्णालयात अपर पोलिस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे उप अधिक्षक अभिजित फस्के पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी धाव घेतली.
रेल्वे स्टेशन समोर असलेले नामांकित हॉटेल तांडा बार चे मालक सुरेश राठोड यांच्या वर अज्ञात व्यक्ती कडून गोळीबार झाल्याने व्यापारी वर्गात भीतीची लाट पसरली आहे.
दुचाकीवरुनआलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. ते घरातून स्कूटरवरुन हॉटेलच्या दिशेनं जात होते. राठोड यांच्या मांडीवर एक गोळी लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी अवस्थेत त्यांना शहरातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरील प्रकरण घडल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे

No comments:
Post a Comment