Thursday, November 1, 2018

बारड येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मंजूर बाळासाहेब बारडकर यांच्या अथक प्रयत्नाला यश

बारड येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मंजूर
 बाळासाहेब बारडकर यांच्या अथक प्रयत्नाला यश

मुदखेड़ (प्रतिनिधि)
बारड ता.मूदखेड येथे राज्य शासनाची समाज कल्याण विभाकाडून  विमुक्त जाती  भटक्या जमाती मध्ये येणाऱ्या लोकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासनाकडून राबवली  जाते. ती योजना बारड येथे राबवण्यासाठी  मंजूरी देण्यात आली आहे . बारड येथील गायरान जमीन गट क्र.165 मधील दोन एकर जमीन या योजनेसाठी जिल्हाधीकारी साहेबांनी मंजूर केली आहे. तहसीलदार साहेबांना व येथील उपविभागीय अधिकारी यांना या योजनेच्या लाभार्थ्यांच्या जातीचे जात प्रमाणपत्र व समाजकल्याण विभागाला जमीन ताब्यासह  देण्याचे आदेशीत केले आहे.व सहआयुक्त समाज कल्याण अधीकारी यांना या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी लेखी स्वरूपात आदेशीत केले आहे.सदरील योजना बारड येथे मंजूर करण्यासाठी खा.अशोकराव चव्हाण व आ.अमीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब देशमूख बारडकर यांनी शासनाकडे व समाजकल्याण विभागाकडे सतत पाठपुरावा केला आहे बारड येथील विमुक्त जाती भटक्या जमाती मधील नागरीकांना पक्केघर, रस्ते, विज,पाणी या सूविधा मिळणार आहेत दोन एकर जमिनीवर नविन वसाहत उभी राहणार आहे अशी माहीती बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमूख बारडकर यांनी दिली आहे

1 comment:

  1. चांगली कामे होत आहेत 👏👏👏

    ReplyDelete

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...