Saturday, November 17, 2018

बल्लाळ गावातील श्रामणेर शिबिराची यशस्वी सांगता

बल्लाळ गावातील श्रामणेर शिबिराची
यशस्वी सांगता


भोकर[प्रतिनिधी ] अतिदुर्ग ग्रामीण खेडेगावात असलेल्या बल्लाळ गावातील श्रामनेर शिबिराची उत्साहपुर्ण वातावरणात गुरूवार दि.१५नोहेबर रोजी यशस्वी सांगता झाली आहे.


नांदेड जिल्ह्यातील मौजे बल्लाळ ता.भोकर हे गाव डोंगराळ भागामध्ये असून बौद्ध धम्मातील समता शांती बंधूत्व मानवतेची शिकवण ग्रामीण भागात रूजली पाहिजे याच उधेशाने सुष्मीत बाबुराव हिरे या युवकांने मोठ्या जिध्दीने धम्मपद माँनेस्ट्री पारनेर जि.अहमदनगर या संस्थेच्या माध्यमातून दि.५नोहेंबर ते १५नोहेंबर पर्यंत १०दिवसीय शिबीराचे आयोजन केले होते.याशिबीरात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्यातून ८०च्यावर लहान वया पासून ते मोठया पर्यंत शिबिरार्थि भाग घेतले होते. ग्रामिण भागातील खेड्यात श्रामनेर शिबिरात कुणी सहभाग घेतील असे वाटले नव्हते. बौद्धवाड्यातील समाज मंदिराच्या प्रांगणात सतत दहा दिवस शिबिर चालले.

धम्मपद माँनेष्ट्री पारनेरचे संचालक सुधाकर नगरे,भन्ते महानाम यांनी धम्मचळवळीला वाहुन घेत कशाची सोयी सुविधा नसलेल्या ग्रामिण खेडेगावात वेळेवर मार्गदर्शन देखरेख करण्यासाठी ठाण मांडून होते.

भव्य शांती यात्रा 

गुरूवार दि.१५नोहेंबर २०१८रोजी सकाळी १०वाजता बुध्द मुर्ती सह चिवरधारी श्रामानेर भिक्षुगण माहेरी आलेल्या शुभ्रवस्त्र परिधान केलेल्या  बाईलेकी हे मिरवणूकीचे आकर्षण होते, मिरवणूक गावातून शांतताप्रिय जाताना बल्लाळ वासिय महिला पुरूष रस्त्यावर येवून आश्चर्य चकित बघत होते.ग्रामपंचायत कार्याजवळील पुतळ्याचे जागी जेष्ठपत्रकार एल.ए.हिरे व भंन्तेगन छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला पूष्पहार टाकून पूजन केले व छ.शिवराय,डाँ.आंबेडकर,भ.बुध्द यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

 मिरवणूक विसर्जना नंतर समाज विहारात बुध्दरूपाची भंन्तेच्या हस्ते स्थापना करण्यात आली. नंतर  सहभागी श्रामनेर यांचे चिवर उतरून प्रमाण पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेचे प्रास्तविक करतांना या गावचे सामाजिक कार्यकर्ते  एल.ए.हिरे म्हणाले धर्मांतरानंतर यागावचे आमचे वडील आमृता हिरे,पोचिराम जाधव.संभाजी जाधव वगैरे मंडळी गावात आलेल्या पोतराजाचे केस कापीत अनिष्टप्रथेला  विरोध करीत सुरूवात केली. बाबासाहेब आंबेडकर हे १९५२ला हैद्राबादला जात असतांना माझ्या वडीलासह अनेकजन हातात खुळखुळ्याची काठी खाध्यावर घोंगडी टाकून बाबासाहेबना बघण्यासाठी दऱ्याखोर्यातून पायी चालत उमरी रेल्वेस्टेशनवर गेले होते पण बाबासाहेब बाहेर आले नसल्याने त्यांना पहाता आले नाही असे जुनी मंडळी लहानपणी सांगत होती. असा चळवळीचा इतिहास या बल्लाळ गावाला आहे.

बाबासाहेब हे खरे हिंदू धर्म सुधारक होते! जातीभेद वर्ण व्यवस्था घालविण्यासाठी त्यांनी अश्पृश्य दलित लोकांच्या हक्कासाठी चवदारतळे काळाराम मंदिर प्रवेश करीत असतांना कर्मठ लोकांनी त्यांचेवर दगडफेक केली.अखेरच्या क्षणी त्यांनी लाखो लोकांसह समतेचा बौद्ध धम्म स्विकारला याच धमात मानवाचे कल्यान आहे. या शिबीरातील सहभागी युवक समतेच्या मार्गाने बुध्द फूले आंबेडकर विचारांची पेरणी करतील कुणी अधिकारी  पदावर जावून समाज सेवा करतील असा विश्वास हिरे यांनी व्यक्त केला.प्रसिध्द भिमशाहिर साहेबराव येरेकर यांनी बौद्ध धम्म स्विकारून ६०वर्ष उलटले तरी समाजातील अनिष्टप्रथा अंधश्रदा बाळगणारे देवाच्या नावे नवस करून कंदूरी 

करणारे सुशिक्षित नोकर वर्ग बाबासाहेबाशी गधारी करीत असल्याची घणाघाती टीका आंबेडकरी अनुयावर करीत बौद्ध धम्मात मानवाचे कल्याण असल्याचे सांगितले 

 यावेळी पारनेरचे प्रा. सुधाकर नगरे,बौद्ध महासभेचे राज्यअध्यक्ष दिनेश हनुमंते,वैभव धबडगे, शाहिर सुभाष गवळी,राजेश चंद्रे,शरद महाकश्यप आदिनी विचार मांडले भंन्ते महाकाश्यप यांनी सर्वाना त्रिशरण पंचशिल दिले.यावेळी भन्ते सारिपुत,भ.सुगत,भ.विशुदानंद,दता डोंगरे,दिंगबर हतागळे, हिरामन कांबळे,सुहास फुगले,सुमन जोंधळे आदिसह महिला पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.सुत्र संचलन सुष्मित हिरे यांनी केले तर आभार भिमराव मुनेश्वर यांनी मानले.शबिरास जामदरी, आमदरी,महागाव,गुंडेगाव,बेंद्री गावच्या उपासकांनी भोजनदान दिले बल्लाळ गावातील युवक महिला शिबीर यशस्वी करण्यासाठी दहा दिवस मोठे परिश्म घेतले. 

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...