Thursday, November 1, 2018

जायकवाडी धरणाला पाणी सोडले!

जायकवाडी धरणाला पाणी सोडले !



               सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर अत्यंत कडक पोलिस बंदोबस्तामध्ये आज मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळी  नगर जिल्ह्यामधील निळवंडे धरणातून जायकवाडी धरणासाठी पाण्याचा  विसर्ग सुरू झाला आहे. निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी पाणी सोडण्यात येईल.
मराठवाड्यावर दुष्काळाचे अत्यंत गंभीर सावट असल्याने पाणी प्रश्नाने संघर्ष उफाळून आला आहे. मराठवाड्याला पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी मुबंई उच्च न्यायालयामध्ये तीन याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून पाणी सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विखे पाटील यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत दणका दिला. काल याचिका फेटाळण्यात आल्यानंतर आज पाणी सोडण्यात आले. धरणकाठ परिरसरातील लोकांचा पाणी सोडण्यासाठी कडाडून विरोध असल्याने पाणी सोडताना अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये सोडण्यात आलेले पाणी जायकवाडी धरणात पोहोचेल अशी शक्यता आहे. ६हजार क्युसेक्सने निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेच्या पाचही दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणासाठी होत आहे. मुळा धरणाच्या एका दरवाज्यातून पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येत आहे. पाच विविध धरणातून जायकवाडी  धरणासाठी पाणी सोडण्यात येईल.

मुळा धरणाचे सर्व ११ दरवाज्यातून आज सकाळी ९ वाजता ६ हजार क्यूसेक प्रवाहाने नदी पात्राद्वारे जयकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले. मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उप अभियंता एन. खेडेकर, शाखाभियंता आण्णासाहेब आंधळे यांच्या मार्गदर्शनात दरवाज्याचे कळ दाबून पाणी सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, पाणी सोडण्यापूर्वी धारणस्थळी सायरन वाजवून नदी पात्रा लागतच्या शेतकरी व ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...